(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेची गणपुर्ती व इतिवृत्त बाबत

    आजच्या लेखात तुम्हाला तुमची संस्था योग्य त्या प्रकारे काम करत आहे का ? नसल्यास याबाबत तुम्ही हक्काने व्यवस्थापन सदस्यांना प्रश्न विचारू शकता.

      July 16, 2021


  • बृहन्महाराष्ट्रातील संस्कृती वैभव – गणेशोत्सव

    १९३० ते १९४० या दरम्यान भारतीय रेल्वेच्या सेवेत रुजू झालेली अनेक मराठी कुटुंब दिल्लीत स्थायिक झाली. त्यांच्यासोबत मराठी सण, परंपरा आल्याच. याचवेळी त्यांनी गणेशोत्सवाची परंपराही सोबत आणली. दिल्लीत कामधंदा आणि राजकारण या दोन्हीसाठी मराठी माणसांची संख्या वाढल्यावर महाराष्ट्राचा सार्वजनिक गणेशोत्सव ही उत्सव संस्कृतीही इथे रुजायला लागली.

      September 18, 2013


  • पाऊस – कवीच्या मनात दडलेला

    कधी रिमझिम ,कधी मुसळधार,कधी वादळवा-यासह तर कधी उन्हाची सोबत घेऊन कोसळतो पाऊस.पावसाचे रंग तरी किती वेगवेगळे…मनसोक्त भिजणारी ,पावसाचे तुषार एकमेकांच्या अंगावर उडवत चालणारी लहान मुलं पाहिली कि गँलरीत उभ्या असणा-या आजोबांचा हातही नकळत पाऊस झेलण्यासाठी बाहेर येतो.

      July 15, 2012


  • विरही भैरवी

    प्रत्येक झाडाचे
    प्रत्येक पक्षी कसले तरी
    कसले तरी गाणें गातो
    प्रत्येक सूर
    पानाइतकाच झाडांनाही
    आपला आपला वाटतो
    गाणें गातात
    देणें देतात
    झडून जातात
    उडून जातात
    झाडे नुस्ती नुस्ती
    नुस्ती रहातात
    आरतीप्रभूंची ही अजरामर कविता. छंदात्मक रचनेपासून वेगळे अस्तित्व दाखवणारी आणि तरीही आशयाचा अप्रतिम नमुना दाखवणारी. केवळ शब्दांच्या उलटापालटी मधून, वेगवेगळे आशय व्यक्त करणारी. या कवितेत,
    गाणें गातात
    देणें देतात
    झडून जातात
    उडून जातात
    या ओळी मला भैरवी रागाचे अस्तित्व दर्शवतात, असे मला वाटते. भैरवी रागिणीचा सगळा प्रवास हा असाच चालू असतो. स्वर येतात आणि येताना काहीतरी संपल्याची जाणीव देत, मनाला हुरहूर लावतात. ही रागिणी अशीच आहे, साफल्याचे समाधान देत असताना, अस्तित्वाचा अंत दर्शवत असते. कधीकधी तर दु:खाच्या आवर्तात गुंतवून ठेवतात आणि तसे ठेवत असताना, या भावनेच्या अनंत "परी" दिसतात. इथे, अंत संपून जीवनाची नव्याने सुरवात झाली, असले काही नसते. जे आहे ते आता विरायला लागले आहे, हेच खरे.
    या रागात, एक, नाही दोन नाही चक्क चार स्वर कोमल आहेत. "रिषभ,गंधार,धैवत, निषाद" हे स्वर कोमल आणि त्यामुळेच, या रागाची ठेवण अंतर्मुख आहे. वादीसंवादी स्वर आहेत - मध्यम/षडज. भारतीय संगीतातील, "षडज/पंचम" भावानंतर "षडज/मध्यम" भावाला अनन्वित महत्व आहे. तसे बघितले तर संस्कृत ग्रंथानुसार रागिणीचा समय, दिवसाचा पहिला प्रहर किंवा पहाटेची वेळ दर्शवली आहे. पण, भैरवी ही रागिणी, कधीही सादर केली तरी तितकीच गहिरी, आर्त आणि अवीट गोडीची आहे. रागाच्या प्रमुख स्वरसंहती बघायला गेल्यास, "रे ग रे ग सा रे सा","प ध नि ध म","सा ग रे ग म". या स्वरांना अतिशय महत्व आहे.
    "मेवाती" घराण्याचे प्रथितयश गायक, पंडित जसराज यांनी सादर केलेली भैरवी आपण ऐकायला घेऊया. मुळात, पंडित जसराज यांचा अत्यंत मुलायम आवाज पण विसविशीत नसलेला. प्रसंगी अति खर्जात जाउन देखील आवाजाचा निराळाच पोत दाखवण्याचे त्यांचे कौशल्य असामान्य आहे. गायनात केवळ मेवाती घराण्याचेच सौंदर्य न दाखवता, बरेचवेळा आग्रा घराण्याची छाया देखील पडलेली आढळते. रागदारी गायन, सुगम संगीताच्या जवळपास आणता येते, हा विचार त्यांच्या गायनातून वारंवार दिसतो, याचा परिणाम असा झाला, अगदी सामान्य रसिक देखील, त्यांच्या गायकीकडे आकृष्ट झाला. तीनही सप्तकात विहार सहजतेने करण्याची अचाट क्षमता, "मुर्घ्नी" स्वराचे अस्तित्व दाखवण्याची करामत, आणि "मूर्च्छना" या अतिशय अवघड अलंकाराचे दर्शन घडविणे इत्यादी सौंदर्यस्थळे सहज मांडता येतात.
    "रसिकनि रस में रहत" या अप्रतिम रचनेत, आलापीतून रागाचे सौंदर्य अतिशय विलोभनीय पद्धतीने आपल्याला ऐकायला मिळते. स्वरांवर आरूढ होण्यापेक्षा त्या स्वरांशी "मैत्री" साधून, रागाचा आविष्कार कसा करता येऊ शकतो, याचे ही रचना हे उत्तम उदाहरण म्हणून सांगता येईल.साधारणपणे, भैरवी म्हटले की - आता सगळे संपत आले, ही भावना दृग्गोचर होते. हे संपणे, साफल्याचे असू शकते, अपयशाचे देखील असू शकते परंतु आता पुढे काही नाही, हीच भावना या रागातून जी प्रकर्षाने आढळते, तिचा आढळ या रचनेतून पुरेपूर घेता येतो. अर्थात, या रागाचे जो "स्वभाव" आहे, त्या स्वभावाला साजेसे असे गायन म्हणजे परिपूर्तीचा अप्रतिम अविष्कार आहे.
    संगीतकार जयदेव यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक नवोदित गायकांना, गायनाची संधी दिली आणि त्यांना प्रकाशात आणले, जसे हरिहरन, सुरेश वाडकर किंवा छाया गांगुली. छाया गांगुली तर, हे गाणे प्रकाशात येण्याआधी फारशी कुणाला माहितीच नव्हती. "गमन' सारखा नवी वाट चोखाळणारा चित्रपट, अशा चित्रपटातील "आप की याद आती रही" हे गाणे भैरवी रागातील, एक अनुपमेय रचना म्हणून गणली जाते.
    "आप की याद आती रही रातभर,
    चश्म-ए-नम मुस्कुराती रही रातभर".
    निखळ रचना म्हणून जरी या गाण्याची विचार केला तरी हे गाणे फार वेगळ्या ढंगाचे आहे. एकतर रचना, ठराविक साच्यात बसणारी नाही. सुरवात फक्त आलापीमध्ये गायन तर मधेच वाद्यमेळ फार वेगळ्या अंगाने वाजलेला. आता भैरवीचाच विचार करायचा झाल्यास, "आप की याद" या ओळींच्या सुरांतून नेमके सूचन होते. गाण्यात, मध्येच अतिशय गुंतागुंतीच्या रचना आहेत तसेच गायन देखील त्याच अंगाने गेलेले आहे. गाण्यातील ताल देखील तसा खास "उठावदार" नसून, गायकीला पूरक इतपतच तालाचे अस्तित्व आहे. ययाचा परिणाम असा झाला, गाण्यात गायनाला अपरिमित महत्व मिळाले. खरतर जयदेव यांच्या बहुतेक सगळ्या गाण्यांत, वाद्यांचा नेहमीच नाममात्र वापर असतो. थोडे बारकाईने ऐकले तर आपल्याला समजून घेत येईल, मोजक्याच वाद्यातून चालीची अर्थपूर्णता आणि शब्दांचा आशय अधिक अंतर्मुखतेने सादर केलेला आढळून येतो. या गाण्यात, जेंव्हा सुरवातीला ताल विरहित गायन चालू असताना, या कौशल्याची प्रचीती आपल्याला नेमकेपणाने घेता येते.
    गीतास रागाधार असावा पण गीत रागात नसावे, या पंथाचे, जयदेव हे संगीतकार आहेत. प्रस्तुत गाण्यात, याच वाक्याचा प्रत्यय आपल्याला घेता येतो. भैरवी रागाचे सूर ऐकायला येतात, जाणवतात पण गाणे भैरवीपासून वेगळे होते आणि मुख्य म्हणजे "गाणे" म्हणून सादर होते. बरेचवेळा इष्ट ते चमकदार वा भरून टाकणारे सुरावटींचे परिणाम देखील जयदेवांनी वेचक वाद्यांच्या सहाय्याने साधले आहे. इथे आपल्याला बासरी वाद्याने साधलेला इष्ट परिणाम ऐकायला मिळतो. गीताचा लयबंध यामुळे पुढे सरकत असला तरी तो गीतास बळजबरीने पुढे ढकलतो आहे, असे अजिबात दिसत नाही आणि, संगीतकार म्हणून जयदेव इथे फार वेगळे होतात. आणखी खास वैशिष्ट्य लिहायचे झाल्यास, साधे, मधुए आणि तसे पहाता परिचयाचे, बारकाव्यांनी भरलेले व विस्तारशक्यता असलेले संगीतवाक्यांश त्यांना सहज सुचत असत. बरेच रचनाकार नेहमी म्हणतात, मुखडा सुचण्यातच खरी प्रतिभा लागते. नंतर सगळे बांधकामच असते आणि हे जर मान्य केले तर जयदेव फार मोठे कारागीर ठरतात.
    आताचे गाणे आपण ऐकणार आहोत, हे देखील सरळ सरळ भैरवी रागावर आधारित अजिबात नाही पण, आपण चित्रपट गीत बांधत आहोत, याची नेमकी जाणीव ठेऊन, रचना केल्याचे स्पष्टपणे दिसते. "हमे तुमसे प्यार कितना" हे "कुदरत" चित्रपटातील, संगीतकार राहुल देव बर्मन यांनी सादर केलेली रचना आहे.
    "हमें तुम से प्यार कितना, ये हम नहीं जानते;
    मगर जी नहीं सकते, तुम्हारे बिना."
    किशोरकुमारने गायली आहे. गाण्यात, केरवा ताल वापरले आहे. या संगीतकाराची खासियत अशी आहे, गाण्यातील ताल हा कधीही पारंपारिक पद्धतीने आपल्या समोर येत नाही, पण जर का मात्रांचा हिशेब लावायला बसलो तर मात्र, भारतीय पद्धतीचा ताल आढळतो. अर्थात, गाणे भारतीय बनावटीचे असल्याने, हा संगीतकार, परंपरेपासून जरी फटकून वागत असला तरी त्याची अखेर मात्र परंपरेशी नाळ जोडून असते. इथे गंमतीचा भाग म्हणजे चालीतून रागाचे सूचन होण्यापेक्षा, गाण्यात जो वाद्यमेळ वापरला आहे, त्यातून भैरवी रागाचे सूर आपल्याला मिळतात याचेच वेगळा अर्थ, तत्काल म्हणजे महत्वाचे वा अर्थपूर्ण सांगीत विधान करण्याआधीच परिणाम साधणे, हे या संगीतकाराचे आद्य उद्दिष्ट होते. म्हणूनच त्याने बहुदा तारतेच्या ध्वनीपरिणामावर लक्ष केंद्रित करून संगीत रचना मार्ग थोडा सहज करून घेतला. हे ध्वनीपरिणाम सर्वांत सहज आणि सर्वांच्या कानात लवकर शिरते, त्याचा बोध होतो.
    मघाशी मी, तालाच्या बाबतीत जे मांडले आहे, त्या बाबत आणखी लिहायचे झाल्यास, ध्वनीपरिणाम, भारतीय केरवा तालाशी वरकरणी साम्य नसणारा मात्रांचा एक लायाबंध, तसे बघत सुटेपणाने केलेले गायन, सहज प्रतीत न होणारी सुरावट आणि घसीट तसेच मींड या स्वर लगावांचा मुबलक वापर करताना, लयखंडाचे भान काळजीपूर्वक ठेऊन, सादर केलेले गायन!! या संगीतकाराच्या शैलीचा आणखी एक बारकावा म्हणजे अनेक वेळा रचनेचा लयबंध लयवाद्यांतून प्रतीत न होता गीताच्या गतीतून प्रत्ययाला येतात. गीतांत लय प्रतीतीला येते ती शब्दांच्या घनतेमुळे, चरणाला आणि छंदाला मिळणारी गती अबाधित राहिल्यामुळे. या गाण्याच्या बाबतीत आपल्याला असे म्हणता येईल, भैरवी रागचौकटीपासून दूर सरकूनही रागाचे एकसंधपण आपल्या चालीस देण्याची प्रशंसनीय क्षमता या संगीतकाराकडे होती. भोवतालच्या निसर्गाचे निमित्त करून काहीसे अंतर्मुख होण्यासाठी हे गीत अवतरले आहे आणि या परिणामासाठी, या संगीतकाराने इथे संयमित भावनावेग आविष्कृत शास्त्रोक्त बाज - किंचित पातळ करून - एक अप्रतिम चित्रपट गीत निर्माण करण्यासाठी कामी लावला आहे, असे ठामपणे म्हणता येते.
    सुप्रसिद्ध गझल गायक, जगजीत सिंग यांनी भैरवी रागावर आधारित अतिशय सुरेख रचना सादर केली आहे. मुळातली अतिशय मुलायम गायकी आणि त्यात भैरवी सारखी रागिणी!! रचना अप्रतिम होणारच. अतिशय ठाय लयीत सुरु झालेली ही रचना, शेवटपर्यंत त्याच लयीत चालत आहे आणि सुरवातीला घडवलेला परिणाम, उत्तरोत्तर गडद होत जातो.
    "मेरी तनहाइयो तुम ही लगा लो मुझको सीने से,
    कि मैं घबरा गया हुं इस तरहा रो-रो के जीने से".
    जगजीत सिंग यांच्या सादरीकरणात बरेचवेळा तोचतोचपणा जाणवतो पण, जर का गाण्याची चाल, स्वतंत्रपणे तपासली तर त्यात नेहमीच वैविध्य आढळते. गायनशैली कायम ठेवल्या मुळे, ऐकायला येणाऱ्या हरकती आपल्याला सारख्या वाटतात. उर्दू गझल सामान्य माणसापर्यंत पोहोचवताना, त्यातील "अर्क" सांभाळून सामान्य लोकांना "सजग" करण्याचे काम, या गायकाने निश्चित केले असे म्हणता येईल.
    आधुनिक चित्रपट संगीतात, "शंकर-एहसान-लॉय" या त्रिकुटाने आपले स्थान सिद्ध केले आहे. सध्या एक समज प्रचलित झाला आहे, चित्रपट गीतांतील "मेलडी" हरवत चालली आहे आणि त्यात थोडेफार तथ्य देखील आहे पण ज्या संगीतकारांनी मेलडीबाबत प्रशंसनीय काम केले आहे, त्यात यादीत या त्रिकुटाचे नाव घ्यावेच लागेल. वास्तविक, शंकर महादेवन हा गायक म्हणून फारच अप्रतिम आहे. कुठल्याही प्रकारचे गाणे गायची क्षमता याच्या गळ्यात आहे आणि केवळ गायचे म्हणून नसून, गायलेले गाणे प्रतवारीनुसार अप्रतिम ठरेल, याची खात्री देता येते. "लक बाय चान्स" या शंकरने "सपनो से भरे नैना" हे गाणे गाउन, आपल्या गायनातील वैविध्याचा असामान्य पुरावा सादर केला आहे.
    "बगीया बगीया बालक भागे,
    तितली फिर भी हाथ ना लगे,
    इस पगले को कौन बताये,
    ढूढ रहा हैं जो तू जग में,
    कोई जो पाये तो, मन में ही पायें;
    सपनो से भरे नैंना, तो नींद है ना चैना".
    प्रसिद्ध शायर जावेद अख्तर यांच्या बाबतीत म्हणायचे झाल्यास, त्यांची शब्दरचना कधीही एका ठराविक पातळीच्या खाली घसरलेली फारशी दिसत नाही. काही वेळा अपवाद म्हणून फडतूस शब्दरचना वाचायला मिळेल पण संपूर्ण आवाका बघितला तर दर्जा दिसून येतो. बरेचवेळा उर्दू शब्दांची पखरण दिसते पण त्यामुळे शायरीच्या श्रीमंतीत भर पडली आहे, असेच दिसून येते. तसे बघितले तर, प्रस्तुत गाणे पारंपारिक भैरवी थाटात बसत नाही पण तरीही सादरीकरणाच्या दृष्टीने बघितले तर गाणे सुंदर वाटते. सुगम संगीतात, रागाची तंतोतंत ओळख पटवून घेण्याचा अट्टाहास हा चुकीचाच असतो आणि हे एकदा मान्य केल्यावर मग हे गाणे आपल्या पचनी पडू शकते.
    - अनिल गोविलकर

      October 19, 2018


  • मेडिटेरेनियन आयलंड

    संपूर्ण बेटाच्या चारही बाजूला उंचच उंच कड्याप्रमाणे सरळसोट कडा उभा होता. स्वच्छ आणि निळेशार पाणी त्या खडकावर आदळून फेसाळत होते. पांढऱ्या शुभ्र बुड बुड्यानी बेटाभोवती एक वलय निर्माण झाल्यासारखे दिसत होते. जहाज जसं जसं पुढे सरकत होते तस तसे बेटाचे सौंदर्य आणखीनच खुलत चालल्या सारखे दिसत होते. सगळे खलाशी आणि अधिकारी बाहेर येऊन निसर्गाचे अनोखे सौंदर्य न्याहाळत होते. कॅप्टन ने चीफ इंजिनियर ला विचारले, बडा साब आपण ह्या आयलंड ला एक फेरी मारू या का? वीस मिनिटे जातील थोडा स्पीड कमी करावा लागेल, पण तुम्ही हो म्हणत असाल तरच. लगेचच चीफ इंजिनियर ने स्पीड कमी करतोय म्हणून इंजिन कंट्रोल रूम मध्ये फोन करून सांगितले.

      July 16, 2021


  • संगीतभूषण पं. राम मराठे

    रामभाऊंच्या आक्रमक आणि तडफदार गायकीला ‘झंझावात’ हाच शब्द योग्य ठरेल. आयुष्याच्या अखेरपर्यंत पांढरी चार आणि प्रसंगी काळी तीन पट्टीमध्ये रात्री 9 ते पहाटे 4 पर्यंत, विलक्षण ताकदीने आणि दमसासाने गायची अद्भुत क्षमता रामभाऊंकडे होती. या सादरीकरणात कधी बालगंधर्व आणि मास्टर कृष्णरावांची लडिवाळ गायकी, कधी नोम तोम युक्त आलापी आणि लयदार तिहाया घेणारी आग्रा गायकी, कधी लयदार आणि बुद्धिनिष्ठ रंजक ग्वाल्हेर गायकी अशी चतुरस्र गायकी रामभाऊ श्रोत्यांपुढे अत्यंत सहज ठेवून थक्क करायचे.

      June 24, 2022


  • पोलीस राइस

    .

      December 1, 2010


  • नाचावेसे वाटले म्हणून

    अगदी शिरीष कणेकरांच्याच शब्दांत सांगायचे तर आजकालच्या भेसळीच्या आणि बनावटीच्या कलियुगात आम्हाला अतिशय शुद्ध आणि सात्विक स्वरुपात कॅब्रे आणि तत्सम नृत्यप्रकार दाखविल्याबद्दल माझ्या आधीच्या दोन (पक्षी : माझे पप्पा व माझा थोरला चुलतभाऊ),माझी व माझ्या नंतरची एक (पक्षी : माझा धाकला आत्तेभाऊ ) अशा आमच्या चार पिढया हेलनच्या कायमस्वरुपी ऋणात आहेत.

      January 10, 2025


  • जल्लोषाला हवी जबाबदारीची जोड

    गणेशाची लोकप्रियता चराचर व्यापली असून त्याच्या मूर्तीत अनेक लोभस रूपं दिसतात. लंबोदर, सुपासारखे कान असलेला, भक्तांवर दया करणारा, प्रकृतीपुरूषांच्या पलीकडचा असा हा गणेश सुखकर्ता आणि दु:खहर्ता आहे. पृथ्वीतलावरील त्याचे आगमन जल्लोषात पण जबाबदारीने साजरे करायला हवे. आजच्या असुरक्षित सामाजिक वातावरणात तर जल्लोषाला जबाबदारीचे भान असण्याची नितांत गरज आहे.

      September 13, 2010


  • ये रे घना, घेऊन ये रे पावसा !

    सर्वांचा आवडता पाऊस कुठे लपला आहे?

      May 6, 2013