(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • कुठे चाललाय आपला महाराष्ट्र ?

    उद्योगधंद्यात एके काळी अव्वल क्रमांकावर असलेल्या आपल्या महाराष्ट्र राज्यातून आता बरेचसे उद्योग-धंदे बाहेर जाताना दिसून येत आहेत. वीज टंचाई, पायाभूत सुविधांचा अभाव, प्रचंड प्रमाणात वाढलेला भ्रष्टाचार, कामगारांचे तंटे यासारख्या कारणांनी महाराष्ट्रातील उद्योग बाहेर जात असतानाच नुकत्याच बाहेर आलेल्या एका बातमीने महाराष्ट्राविषयीच्या चिंतेत भर घालण्याचे काम केले आहे. ही बातमी आहे गुन्हे, चोरी आणि लूटमारीची. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने जारी केलेल्या आपल्या अहवालात महाराष्ट्राबद्दल धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

    चोरी आणि लूटमारीत महाराष्ट्र राज्य देशात अव्वल ठरला आहे. २०१२ मध्ये १४ हजार ४५४ कोटी, ४८ लाख, ८० हजार रुपयांची मालमत्ता लंपास करण्यात आली. संपूर्ण देशभरातून २१ हजार ७१ कोटी, ९४ लाखांची मालमत्ता लंपास करण्यात आली. म्हणजेच २/३ वाटा महाराष्ट्राचा होता.

      July 13, 2013


  • मोतियाचे प्रकाशमान कंदील

    श्रावण संपला की पाठोपाठ सणाचा मौसम सुरु होतो. गणपती, नवरात्री आणि मग सगळ्यांचा आवडता सण दिवाळी.

    दिवाळी म्हटली की त्याच्यासोबत दिवे, पणत्या, आकाशकंदील या सगळ्या वस्तू येतातच. थर्माकोल, कागद, प्लास्टिक या निसर्गाला हानी पोहोचवणाऱ्या आकाश कंदिलांपेक्षा वेगळ्या वस्तू वापरून त्याचे आकर्षक आकाश कंदील बनवण्याचा निर्णय घेतला विलेपार्ले येथील नंदिनी जोशी यांनी.

    २०१४ च्या डिसेंबरमध्ये एका ठिकाणी नंदिनी यांनी मोत्याचे छोटे कंदील बघितले. त्यानंतर लगेचच त्यांनी अशा प्रकारचे मोठ्या आकारातले कंदील बनवायला सुरुवात केली. बघता बघता आठ महिन्यात त्यांनी २०० कंदील बनवून पूर्ण केले. त्यापैकी अनेक कंदील विकलेसुद्धा गेले.

    पहिला कंदील बनवायला नंदिनी जोशी यांना एक महिना लागला. त्याचा आकार कसा वाढवावा, एखादं डिझाईन त्या कंदिलात कसं बसवावं हे समजून
    घेण्यात महिना गेला. त्यानंतर मात्र त्यांनी मागे वळून बघितलं नाही. त्यांच्या काही मैत्रिणींनीसुद्धा यात रस दाखवला. नंदिनी यांनी स्वत:
    त्या मैत्रिणींना ही कला शिकवली आणि आज त्यांच्या मैत्रिणींचा ग्रुप तयार झाला आहे. या सगळ्यांनी मिळून गेल्या काही महिन्यांत शेकडो कंदील बनवले असून त्यातले अनेक कंदील दिवाळीच्या आधीच विकले गेले आहेत.

    या आकाश कंदिलासाठी वापरलेल्या वस्तू जितक्या भन्नाट तितक्याच याच्या डिझाईन्ससुद्धा भन्नाट असतात. विमान, मासा, हंस, गोल, षटूकोन
    असे अनेक निराळे आणि भन्नाट आकार या आकाश कंदिलात बघायला मिळतात.

    आकाश कंदिलासारख्या कलात्मक प्रकारातली त्यांची ही भरारी खरोखरच प्रेरणादायी आहे.

      October 4, 2017


  • बाल संन्यासी

    ज्युनिअर केजीची फी पाहून बाबांनी मला संन्यास घायला सांगितले आहे....

      June 28, 2016


  • मुक्ता (१९९४)

    समाजात स्त्रीवर होणार्‍या अन्याया विरोधात आवाज उठवणार्‍या विशीतल्या विद्यार्थीनीची कथा. या चित्रपटात मुक्ता या पात्राची भूमिका साकारली आहे अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने..

      May 9, 2013


  • हे माझे काम नाही

    आधी दुष्काळ मग पावसाचा कहर यामुळे भाजीपाला दुर्मिळ झाला. गृहिणींना कळेना की रोज शिजवायचे काय? असाच एका घरातला संवाद कानी पडला. आज तिसऱ्या दिवशीही तिने बटाट्याची भाजी आणि आमटी केली होती. त्याला बटाट्याची भाजी बिलकूल आवडत नसे. तिचा नाईलाज होता.

      May 20, 2024


  • महाराष्ट्रीयत्त्व म्हणजे काय रे भाऊ?

    महाराष्ट्रीयत्त्व म्हणजे काय रे भाऊ? असं कोणी वाचारलंय का कधी. मग त्याला उत्तर एकच...

    महाराष्ट्रात राहून जो मराठी बोलतो... इथली संस्कृती पाळतो आणि तिचा मान राखतो तोच महाराष्ट्रीयन.

      March 6, 2015


  • सुप्रसिद्ध क्रिकेटपटू सर जॅक हॉब्ज

    जॅक हॉब्स यांच्या खेळाचा प्रोफाइल पाहिला तर थक्क व्हायला होते. त्यांनी ६१ कसोटी सामन्यामध्ये ५६.९४ या सरासरीने ५,४१० धावा केल्या त्यामध्ये त्यांची १५ शतके आणि २८ अर्धशतके होती. त्यांची कसोटी समान्यांमधील सर्वोच्च धावसंख्या होती २११ .

      December 16, 2021


  • आपण

    आधीच्या पिढीत जन्माला आलो आहोत..

    आपल्याला विधात्याचे विशेष आशीर्वाद प्राप्त आहेत..

    आपण कधी जीव खाऊन पळत शाळेतून क्लासेसना गेलो नाही.

    शाळा सुटल्यावर छान रमत गमत, खेळत घरी गेलो आहोत..

    आपण आपल्या खर्‍या मित्रमैत्रिणींसोबत खेळलो, नेट फ्रेंड्स सोबत नाही..

    तहान लागल्यावर नळाचे पाणी पिणे आपल्यासाठी सेफ होते,

    आपण कधी बिसलेरी घेतली नाही..

    आपण चार जणांत एकाच ग्लासातून उसाचा रस प्यायलो

    पण आजारी नाही पडलो..

    आपण रोज पोटभर भात खाऊनही कधी जाडे नाही झालो..

    आपण अनवाणी फिरलो तरी कधी पायाला काही झाले नाही..

    आपल्याला हेल्दी राहण्यासाठी कधी कॅल्शिअम घ्यावे लागले नाही..

    आपली खेळणी आपणच बनवली. दोन रिकाम्या काडेपेट्या सुध्दा आपल्यासाठी गाडी किंवा पिस्तूल बनायच्या..

    आपण खूप जास्त वेळ आपल्या पालकांसोबत आनंदाने घालवला..

    आपल्या जवळ मोबाइल, काँप्युटर, इंटरनेट वगैरे कधीच नव्हते

    कारण आपल्या जवळ खरे मित्रमैत्रिणी होते..

    आपण मित्रमैत्रिणींच्या घरी कधीही जायचो, खेळायचो, तिथेच जेवायचो.
    आपण कधी फोन करुन येऊ का म्हणून विचारले नाही..

    आपण एक अदभुत रसायन आहोत, कारण आपणच आहोत एक अशी पिढी,
    ज्यानी आपल्या पालकांची आज्ञा पाळल्या,आणि तरी खूप मस्तीही केल्या.......

    आपण भले स्पेशल नाही पण 'लिमिटेड एडिशन' तर नक्कीच आहोत..!!!

    आपली एकच पिढी अशी आहे ज्यानी कमी श्रीमंतीत बालपणाचा मनमुराद आस्वाद घेतला,
    व्हर्चुअल लाईफ ऐवजी खरे तारूण्य अनुभवले
    आणि आता उतार वयात आधुनिक विज्ञानाचा आनंद घेत आहोत ...

    आपणच फक्त "कमतरतेतली गंमत आणि मुबलकतेतली जंमत" अनुभवली..

    आणि शेवटी.....

    आठवतंय का आपण 'मदर्स डे'
    कधी साजरा केल्याचा ???
    नाही..
    कारण आई शिवाय आपलं जग नव्हतं....

    बरोबर ना.....??

      May 25, 2017


  • एसओएस (SOS) चिल्ड्रेन्स व्हिलेज, परगुरपाडा, अलिबाग

    खरी समाजसेवा ही कुठल्याही जात, रंग, धर्म, वंश, प्रादेशिकतावाद किंवा अगदी राष्ट्रवाद या पारंपारिक बंधनांच्या पलीकडची असते. कारण मानव कुठलाही आणि कसाही आणि कसाही असो त्याच्या गरजा आणि समस्या सारख्याच असतात अनेक आंतरराष्ट्रीय सामाजिक संस्था आज भारतातील विविध स्तरांमधील लोकांसाठी कार्यरत आहेत, आणि समाजसुधारणा क्षेत्रातील अनेक विकासकामांना आज गती आणि जागतिक स्वरूप प्राप्त झाले आहे.

      August 25, 2011


  • निवडणूक प्रक्रियेत सुधारणा अत्यावश्यक आहे.

    भारत हा लोकशाहीप्रधान देश आहे.लोकशाहीत लोकांच्या मताला महत्व आहे,पण जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीप्रधान देशात लोकशाही मुल्यांचा लोप होत आहे.लोकशाहीला बळकट व प्रभावशाली करण्यासाठी काही महत्वपूर्ण बदलांची गरज आहे.भारतातील आजची परीस्थीती पाहता सर्वप्रथम निवडणूक प्रकियेत तसेच लोकांच्या मतदान अधिकारात काही क्रांतिकारी बदल करणे आवश्यक आहे.

      March 8, 2011