(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • वांगे अमर रहे…!

    मेहता पब्लिकेशन हाऊस आणि मी मराठी.नेट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

    लेखन स्पर्धा २०१० या स्पर्धेचा निकाल दिनांक ११-०२-२०११ रोज आला असून

    या स्पर्धेत “वांगे अमर रहे…!”

    या लेखाला उत्तेजनार्थ पारितोषक जाहीर झाले आहे.

    ………………………………

    माझी वांगंमय शेती तोट्यात गेली पण वांङ्मय शेतीला बरे भाव मिळत आहेत.

      February 14, 2011


  • वारणेचा वाघ : अण्णाभाऊ साठे

    १९८२ मधील ऑगष्टचा महिना. त्यावेळी मी मुंबईच्या जे.जे. इन्स्टिट्युट ऑफ अप्लाईड आर्ट मध्ये तिसऱ्या वर्षात शिकत होतो. अचानक मुंबई पोलिसांचा स्ट्राईक सुरू झाला. मुंबईतील सर्व दळवळण बंद झाले. लोकल, बेस्ट गाड्या, टॅक्सीज. कॉलेजमध्ये आम्हाला सांगितले की-ज्यानां शक्य आहे त्यानां लगेच घरी जावे. रस्त्यावर मिलट्रीच्या व्हॅन फिरू लागल्या. आमचे होस्टेल बांद्र्याला होते. हार्बर किंवा पश्चिम रेल्वे लोकलने आम्ही ये जा करत असू. त्यामुळे आमच्या समोर दोनच पर्याय होते.एक कॉलेजला थांबणे किंवा पायी होस्टेल गाठणे. होस्टेलची भरपूर मूले असल्यामुळे आम्ही सर्वांनी पायी जायचे ठरवले आणि हार्बर लाईनच्या रेल्वे ट्रॅकने चालत निघालो. मधले काही स्टेशन वगळता दोन्ही बाजूला अगदी ट्रॅकला लागूनच मोठी झोपडपट्टी आहे. लोकलने जाता येता रोज प्रवास करतानां अनेकांच्या चेहऱ्यावर या झोपडपट्टीवासियां बद्दलच्या तुच्छतेच्या भावना स्पष्ट दिसत. गंमत म्हणजे झोपडपट्टीतील हेच रहिवाशी आम्हा पायी जाणाऱ्या सर्वांना चहा,नाश्ता, बिस्किटे देत होते. मनात कुठे तरी अपराधी भाव प्रकटले. तेव्हांचे बोरीबंदर (आताचे सिएसटी) ते बांद्रा हे अंतर १४ कि.मी. दुपारी १२ च्या आसपास निघालेलो आम्ही बांद्र्याला सातच्या आसपास पोहचलो. पायाची पार ऐशीतैशी झाली होती.
    आज मला हे सर्व आठवण्याचे कारणही तसेच महत्वाचे आहे. सध्याच्या सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात वाटेगाव नावाचे गाव आहे. पूर्वी हे गाव कुरूंदवाड नावाच्या संस्थानात होते. भाऊराव आणि वालूबाई साठे हे याच गावात आपल्या तुकाराम नावाच्या मुलां बरोबर रहात. घरात अठरा विश्वे दारिदय त्यात गावकुसा बाहेरचं वेदनादायी जगणं. क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या क्रांतीकारी भाषणाने सर्व परीसर ढवळून निघालेला काळ होता तो. तुकाराम तेव्हा ११ वर्षांचा होता आणि गावाकडे दुष्काळ पडला. आता खायचं काय आणि जगायचं कसं? त्यावेळी सर्वांनाच मुंबईचा आधार वाटत असे. पोटाला नक्की काही तरी काम मिळत असे. पण मुंबईला पोहचायचं कसं? खिशात तर दमडी नाही !!!! शेवटी भाऊराव आपल्या बायको मुलाला घेऊन पायीच निघाले. २२७ मैलांचा पायी प्रवास करून हे कुटूंब मुंबईल पोहचले….१४ कि.मी.च्या बोरीबंदर- बांद्रा प्रवासाने आमची वाट लावली मग एवढा मोठा प्रवास या कोवळ्या तुकारामाने कसा केला असेल? तो कदाचित यासाठी केला असेल की पूढे त्याला रशियाचे आमंत्रण मिळणार होते.

    भायखळ्याच्या चाँदबिबी चाळीत या कुटूंबाला निवारा मिळाला. वडिलांच्या आग्रहामुळे तुकारामचे शिक्षण सुरू झाले होते खरे पण मागासवर्गीय मुलांना शाळेच्या आत बसायची परवानगी नव्हती त्यामुळे तुकाराम शाळेत रमला नाही. मुंबईत फिरताना दोन गोष्टींकडे तो आकर्षिला गेले, एक म्हणजे विविध राजकीय संघटना आणि दुसरे म्हणजे मूक चित्रपट. भविष्यात हाच किरकोळ देहयष्टी लाभलेला मुलगा आपल्या साहित्याने सर्व सारस्वतांची दखल घेण्यास भाग पाडणार होता. आणि तसेच घडले देखिल. वाटेगावातल्या गावकुसा बाहेरचा तुकाराम साठे स्वत:च्या प्रचंड कर्तृत्वाने अण्णाभाऊ साठे बनला. अण्णा अंर्तबाहय कम्युनिस्ट होते. पक्षाच्या सभांचे आयोजन करणे, वॉलपेंटिंग करणे, हॅण्डबिले वाटणे, मोर्चे काढणे, छोट्या-मोठ्या सभेसमोर गोष्टी सांगणे, पोवाडे, लोकगीते म्हणून दाखविणे या सर्व गोष्टींमुळे कम्युनिस्ट वर्तुळात ते सर्वांना एकदम हवेहवेसे झाले. याच काळात ते सर्वाचे आवडते “अण्णाभाऊ” झाले. अण्णाभाऊचा अवाका प्रचंड मोठा. महाराष्ट्राला ते सर्वाघिक शाहिर म्हणून जरी परिचित असले तरी त्यांचे अनेक पैलू होते. त्यांच्या प्रत्येक पैलूवर स्वतंत्र लेख होऊ शकतील. पण मला त्यांचा भावलेला सर्वात मोठा पैलू म्हणजे त्यांच्या कादंबऱ्या आणि कादंबऱ्यावर निर्मित् झालेले मराठी चित्रपट.
    अण्णाभाऊनी ग्रामीण व्यवस्थेचे अतिशय सुक्ष्मपणे निरिक्षण केले होते. तेथील व्यवस्थेचे चटकेही अनुभवले होते. त्यामुळे त्यांच्या कथा व कादंबरी लेखनात एक सहजता होती. कल्पनेने पात्र निर्माण करायची गरज त्यानां कधीच पडली नाही. १९६१ मध्ये रेखा फिल्मस ने सर्वप्रथम त्यांच्या “वैजयंता” या कादंबरीवर याच नावाचा चित्रपट काढला. याचे मूख्य निर्माते गजानन जहागिरदार हे चित्रपटसृष्टीतले मोठे नाव होते. ते निर्माते आणि दिग्दर्शक होते. पटकथा-संवाद व्यकंटेश माडगुळकर तर संगीत वसंत पवार यांचे होते. म्हणजे सर्वच दिग्गज मंडळी होती. कलाकारात अधिक शिरोडकर, अरुण सरनाईक, गजानन जागीरदार, जयश्री गडकर, दत्तोपंत आंग्रे, प्रभाकर मुजुमदार, रत्नमाला., लीला गांधी, शरद तळवलकर असा ताफा होता. ‘वैजयंता’ ही गजरा कलावंतीणीची मुलगी. एका उपेक्षित पण तितक्याच तडफदार स्त्रीची ही व्यक्तरेखा अण्णाभाऊनी अत्यंत ताकदीने रेखाटली होती. चित्रपट गाजला आणि चालला देखिल. मराठी चित्रपटसृष्टीला एक दमदार लेखक मिळाला. १९६९ मध्ये त्यांच्या तिन कादंबऱ्यावर आधारीत तिन चित्रपट आले. आवडी (टीळा लाविते मी रक्ताचा), माकडीचा माळ (डोंगरची मैना),चिखलातले कमळ (मुरळी मल्हारी रायाची). हे तिनही चित्रपट तुफान चालले. “डोंगरची मैना” अनंत माने यांनी दिग्दर्शीत केला होता. पटकथा-संवाद शंकर पाटील, गीते जगदिश खेबुडकर, संगीत राम कदम आणि अरुण सरनाईक, गुलाब मोकाशी, चित्रा, जयश्री गडकर, दादा साळवी, निळू फुले, बर्ची बहाद्दर, राम नगरकर अशी तगडी कलावंत मंडळी. मला स्वत:लाही हा चित्रपट खूप आवडला होता. अण्णाभाऊ स्वत: तमाशात होते, स्वत: उत्तम शाहीर होते, स्वत:ची अशी ठाम विचारसरणी होती, वाचनाचा आणि निरीक्षणाचा अनुभव होता त्यामुळे त्यांच्या कादबंरीतली सर्व पात्रे रसरशीत होती. खोटेपणाचा कसलाच आव नव्हता की बेगडी कृत्रीमपणा नव्हता. त्यामुळे त्यांचे साहित्य चित्रपटांचा विषय होऊ शकले……
    अण्णाभाऊची “फकिरा” ही सर्वाधिक गाजलेली कादंबरी होय. या कादंबरीच्या १६ आवृत्तया प्रकाशीत झाल्या. १९६३ मध्ये चित्रनिकेतन या संस्थेने ही कादंबरी रूपेरी पडद्यावर आणली. अण्णा भाऊ साठे जेव्हा मुंबईच्या ‘माटुंगा लेबर कॅम्प’ या दलित-शोषितांच्या वस्तीत कम्युनिस्ट चळवळीत कार्य करू लागले तेव्हा खर्‍या अर्थाने त्यांचे विचार क्रांतिकारक होऊ लागले. त्यावेळी लेबर कॅम्पमधील प्रमुख कम्युनिस्ट नेते/कार्यकर्ते होते आर.बी. मोरे, के.एम. साळवी, शंकर नारायण पगारे. मार्क्‍सवादी विचारांने अण्णाभाऊ प्रभवित झाले ते याच काळात. ईथेच त्यांनी पहिले गाणे लेबर कॅम्पमधील मच्छरावर लिहिले. याच लेबर कॅम्पमध्ये अण्णा भाऊ साठे, शाहीर अमर शेख व शाहीर द.ना. गव्हाणकर या त्रयींनी कम्युनिस्ट पक्षाच्या मार्गदर्शनाखाली लाल बावटा कलापथकाची १९४४ साली स्थापना केली होती. या ठिकाणी त्याची लेखणी खऱ्या अर्थाने फुलत गेली आणि धारदार पण होत गेली. अण्णा भाऊंच्या ‘इमानदार’या नाटकाचा हिंदी प्रयोग करण्यात सुप्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेते कॉ. बलराज साहनी यांनी पुढाकार घेतला होता. त्यावेळी कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित ‘इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन’(इप्टा) या संस्थेतील ते महत्वाचे अभिनेते होते. त्या नाटकात अभिनेते ए.के. हंगल यांनी महत्त्वाची भूमिका केली होती. पूढे अण्णाभाऊच्या साहित्य समर्पित वृत्तीने ‘इप्टा’चे अखिल भारतीय अध्यक्षपदही मिळाले. यापूर्वी एकाही मराठी माणसाला हा मान मिळाला नव्हता. याच ठिकाणी त्यांची ओळख ख्वाजा अहमद अब्बास या लेखक निर्माता दिग्दर्शकांशी झाली. फकिराची पटकथा ज्या तिघांनी लिहीली होती त्यात के.ए. अब्बास हे ही एक होते. कुमार चंद्रशेखर यांनी हा चित्रपट दिग्दर्शीत केला होता. १९१० मधील दुष्काळाचे चित्रण यात आले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांनी अपराधी जमाती कायदा (१८७१) आणून त्यात १९८ जमातींचा समावेश केला होता. या जाती जन्मजात अपराधी असल्याचे जाहीर केले होते. ब्रिटिशांनी निर्माण केलेल्या या कायद्या विरोधात फकिरा आपल्या मांग जातीच्या सहकाऱ्यानां सोबत घेऊन् लढला होता. मात्र आजही विषण्ण करणारी गोष्ट म्हणजे स्वातंत्र्यानंतर अपराधी जमाती कायद्याचे नाव बदलून भारत सरकारने ३१ आगस्ट १९५२ मध्ये ‘सराईत गुन्हेगारी कायदा’ असा बदल केला खरा परंतु नाव बदल करूनही कायद्यातील तरतुदी कायम आहेत. आजही या जमातीच्या बहुतांश बाया-माणसांवर गुन्हे दाखल होत असतात. फकिरात स्वत: अण्णाभाऊनी देखिल काम केले आहे व संवाद लेखनही केले आहे.

    १९७० मध्ये “वारणेचा वाघ” आला. ब्रिटिश सैन्यात नेमबाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सत्तूने नंतर ब्रिटिश सत्तेला सळो की पळो करून सोडले. नतंर हाच सत्तू वारणेचा वाघ म्हणून ओळखला गेला. हा सत्तू बघतानां मला नेहमी बिरसा मुंडा आठवत असे. ज्याला सत्तूनं त्याच्या आईच्या पोटात वाढवला,त्यानेच सत्तूचा खून केला. बिरसाला देखिल त्याच्याच भाईबंदाने पकडून ब्रिटिशाच्या हवाली केले होते. परकिय शत्रूपेक्षा असे घरभेदी लोक हे नेहमीच देशाचे महाभयंकर शत्रू असतात. यांचे वशंज आजही आम्हाला बघावयास मिळतात. ‘अलगूज’ कादंबरीवर आधारीत “अशी ही साताऱ्याची तऱ्हा” १९७४ मध्ये प्रदर्शीत झाला होता. अण्णाभाऊंच्या निधना नंतर बऱ्याच वर्षांनी म्हणजे २०१० मध्ये त्यांच्या “चित्रा” या कादंबरीवर आधारीत याच नावाचा चित्रपट आला. पटकथा-संवाद राज काझी यांचे तर दिग्दर्शन राज कुबेर यांचे होते. निर्माता एम.अली शेख यांच्या या चित्रपटात अंकुश चौधरी, अंजली उजवणे, अतुल इंगळे, कुलदिप पवार, डॉ.विलास उजवणे, मधु कांबीकर इत्यादी कलावंताच्या भूमिका होत्या. अण्णाभाऊंच्या एकूण आठ कादंबऱ्यावर चित्रपट निर्माण झाले. मराठी चित्रपटातील हा एक विक्रमच म्हटला पाहिजे की एकाच लेखकाच्या इतक्या कादंबऱ्या चित्रपटाच्या विषय होऊ शकल्या.
    चित्रपटांसाठी नाटयमय घटनां फार आवश्यक असतात. अण्णाभाऊंच्या कादंबऱ्यातील प्रत्येक घटना आपल्या समोर एक चित्र उभे करतात. पटकथा म्हणजे असे छोटे प्रसंगच असतात. ज्याला चित्रपट भाषेत scene असे म्हटले जाते तर अनेक छोटे छोटे shot मिळून एक scene तयार होतो. अण्णाभाऊच्यां कांदबरीत असे नाट्यमय सिन असत ज्यामुळे दिग्दर्शाकांचे निम्मे काम आगोदरच पूर्ण होई. घटना वास्तवादी असत आणि या प्रत्येक प्रसंगातुन ते आपली भूमिका स्पष्टपणे मांडत. त्यात कसलाही दिखावूपणा वा नाटकीपणा नसल्यामुळे ते सर्वसामान्य प्रेक्षकांच्या थेट मनाला भिडत असत. भारतीय संस्कृतीतील “जात” हे वास्तव त्यांच्या इतके त्यांच्या काळात प्रभावीपणे मोजक्याच साहित्यकारानां मांडता आले. ते जर अधिक जगले असते तर चित्रपट कथानां कदाचित वेगळे आयामही मिळाले असते. अण्णाभाऊंचा धारदार आवाज, त्यांचे पाठांतर, पेटी, तबला, ढोलकी, बुलबुल ही वाद्ये वाजवण्याची कला या गुणांमुळे जनमानसात शाहीर म्हणून ते प्रचंड लोकप्रिय होते. बंगालचा दुष्काळ, तेलंगण संग्राम, पंजाब-दिल्लीचा पोवाडा, अंमळनेरचे हुतात्मे, काळ्या बाजाराचा पोवाडा, ’माझी मैना’ हा संयुक्त महाराष्ट्र चळवळीवरील छक्कड, कामगार चळवळीवरील ‘एकजुटीचा नेता’ ते हिटलरच्या फॅसिझम विरोधात स्टॅलिनग्राडचा पोवाडा, बर्लिनचा पोवाडा, चिनी क्रांतीवरील ‘चिनी जनांची मुक्तिसेना’ हे गौरवगान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील गाजलेले ‘जग बदल घालुनी घाव-सांगुनी गेले भीमराव’ अशी अनेक गाणी, कवने, पोवाडे अण्णा भाऊ साठे यांनी रचले. वाटेगाव ते मुंबई असा चालत पायी प्रवास करणारे अण्णाभाऊ नंतर आत्मविश्वासाने एकटेच विमान प्रवास करुन रशियाला गेले तत्पूर्वीच त्यांची `चित्रा’ ही कादंबरी रशियन भाषेत प्रकाशित झाली होती. तेथे त्यांनी 'शिवचरित्र' पोवाड्यातून सांगितले त्याचे रशियन भाषेत भाषांतर झाले. रशियात गेल्यानंतर अण्णांचं चांगलं स्वागत झालं. भारतात परत आल्यावर त्यावर आधारित 'माझा रशियाचा प्रवास' हे प्रवासवर्णनही त्यांनी लिहिलं.

    तर असा हा बहुमूखी प्रतिभावंत फार कमी काळ जगला. आताच्या काळा प्रमाणे आपल्या आयुष्याचे जर २५ वर्षे या प्रमाणे तीन टप्पे केले तर आपले सुरूवातीची २५ वर्षे पदवी/पदविका प्राप्त करण्यातच जातात. अण्णाभाऊ गेले तेव्हा ते फक्त ४९ वर्षांचे होते. म्हणजे त्यांची किशोर अवस्थेतील १४ वर्षे वजा केली तर ३५ वर्षे शिल्लक राहातात ज्याकाळात त्यांनी ३५ कादंबर्‍या, ८ पटकथा, ३ नाटके, एक प्रवासवर्णन, १३ कथासंग्रह, १४ लोकनाट्ये, १० प्रसिद्ध पोवाडे व १२ उपहासात्मक लेख लिहित चळवळीही केल्या. हे सर्व करतानां एकांत, निवांत, टेबल खूर्ची, गादी,लोड तक्के, कपाटं अशा कुठल्याच गोष्टी त्यांच्या जवळ नव्हत्या, होती ती फक्त प्रतिभा !!!!

    या लोक विलक्षण कलावंताला मानाचा मूजरा.

    -दासू भगत (१८ जुलै २०१७)

      January 5, 2018


  • लोकल प्रवाशांसाठी हेलिकॉप्टरचे महाकाय पंखे !

    नवे केंद्रीय मंत्रिमंडळ अस्तित्वात आल्यावर काही मंत्र्यांचे थेट कामाला लागणे लक्ष वेधून घेते. वृत्तपत्रे आणि चॅनेलीय मुलाखती, सत्काराच्या प्रचंड सभा, कार्यकर्त्यांच्या बैठकी, मोठमोठे दौरे असल्या गोष्टी टाळून काही मंत्र्यांनी आपल्या खात्याच्या कामात स्वत:ला झोकून दिले आहे. त्यात श्री. सुरेश प्रभू यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. त्यांनी रेल्वे खात्याचा पदभार स्वीकारल्यापासून रेल्वेचा कारभार सुधारण्यासाठी अत्यंत तळमळीने अनेक गोष्टी सुरु केल्या आहेत. सरकते जिने,उद्वाहने,आरक्षण,तिकिटांचे प्रकार, प्रवासात लहान मुलांसाठी दुधाची सोय, वायफायची सुविधा, प्रवासात विविध गोष्टींची उपलब्धता , स्वच्छ पाणी, फलाट सुशोभित करणे,इत्यादी अगणित नवीन गोष्टी प्रभू यांनी केल्या आहेत. ते अनेक नवीन नवीन प्रयोग करीतही आहेत. रेल्वेचा वेगळा अर्थसंकल्प मांडण्याचा ९२ वर्षांचा प्रघात मोडून ते देशाचे आणि रेल्वेचे काही कोटी रुपये वाचविणार आहेत. अर्थसंकल्पाच्यावेळी त्यांना अफाट प्रसिद्धी मिळत होती ती बंद झाली तरी देशाचा फायदा त्यांना महत्वाचा वाटतो हे महत्वाचे आहे.

    असाच एक छोटासा पण महत्वाचा प्रयोग त्यांनी रेल्वे फलाटावर केला आहे.आश्चर्य म्हणजे त्याची कुणीही अगदी वृत्तपत्रांनीही दखलच घेतलेली नाही.सतत नकारात्मक गोष्टींचा आक्रस्ताळी आणि बटबटीत मारा करणाऱ्या बहुतेक वृत्तवाहिन्यांना यात अजिबात रस नसावा.

    हा वेगळा प्रयोग असा- रेल्वे फलाटावरचे सध्याचे पंखे हा एक अत्यंत विनोदी प्रकार आहे. अगदी पंख्याखाली तुम्ही उभे राहिलात तर २ /३ माणसांना थोडासा वारा मिळतो. कित्येक पंखे तर हवा काढून घेण्यासाठी बसविले असल्यासारखेच वाटतात. काही नुसतेच गरगरा फिरत असतात. लाखो पंखे पुरविणाऱ्या कंपन्यांची चांदी करणारा पण प्रवाशांसाठी निरुपयोगी असा हा मामला ! बरे अनेक पंखे बसविल्यामुळे विजेचा वापरही अमर्याद होतो.

    प्रभूजींनी यासाठी स्थानकांवर हेलिकॉप्टरच्या पंख्यांच्या आकाराचे प्रचंड पंखे बसवायला सुरुवात केलेली दिसते. छत्रपती शिवाजी टर्मिनसवर ३ पात्यांचा तर अंधेरी स्थानकात ६ पात्यांचे ३ असे एकूण ५ प्रचंड पंखे बसविण्यात आले आहेत. या महाकाय पंख्यांमुळे हजारो चौरस फुटांच्या क्षेत्रात कुठेही एकसारखा आणि पुरेसा वारा लागतो.पंख्याखाली जाऊन उभे राहावे लागत नाही. एवढ्या भागातील सुमारे २५ / ३० पंखे यामुळे काढून टाकता आले आहेत त्यामुळे विजेचीही बचतच होणार आहे,यामुळेच प्रभूजींकडून अशा वेगळ्या कामाच्या अपेक्षा वाढतात. स्वातंत्र्यापासून अनेक रेल्वेमंत्री हे उत्तरप्रदेश आणि बिहारचे होते. त्यांनी कोण काय म्हणेल याची तमा न बाळगता आपापल्या राज्यातील लोकांना रेल्वेमध्ये भरभरून नोकऱ्या दिल्या. प्रभूजींनीही महाराष्ट्र ( विशेषतः कोकण-- मालवण) आणि गोव्यातील तरुणांना रेल्वेमध्ये अशाच नोकऱ्या द्याव्यात आणि आशीर्वाद घ्यावेत.

    अनेक रेल्वे मंत्र्यांनी गाड्यांना " आपला ठसा " उमटविणारी नावे दिली. श्रीम. ममता बॅनर्जीं यांनी दिलेले "दुरांतो " हे नाव काय आहे असा प्रश्न कुणी विचारला नाही. प्रभूजींना अशी विनंती आहे की त्यांनीही मराठी, मालवणी, कोंकणी भाषा व संस्कृती दर्शविणारी नावे रेल्वे गाड्या--सेवांना द्यावीत !

    प्रभूजींकडून इतकी अपेक्षा म्हणजे फार नाही !

    -- मकरंद शां. करंदीकर

      June 6, 2017


  • फ्लेअर्ड नाईट

    डोंगर माथ्यावरून निघणाऱ्या ज्वाला डोंगराच्या पायथ्यावरुन, मध्यावरून का निघत नसाव्यात याचे कुतूहल वाटू लागले पण लगेचच तो डोंगरच जर बाहेर पडणाऱ्या तप्त लाव्ह्या पासून बनला असेल असं वाटून मला पडलेले कुतूहल लगेचच शमले. बराच वेळ जहाज ज्वालामुखीचा उद्रेक झालेल्या बेटाच्या दिशेनेच चालले होते पण जहाजाची दिशा बदलली असल्याचे जाणवले कदाचित कॅप्टन ब्रिजवर गेला असावा आणि त्याने जहाज बेटाजवळून न नेता लांबून वळवण्यासाठी सूचना दिल्या असाव्यात.

      September 8, 2021


  • एक निरागस मुल

    “मामाचं गाव” “आजोळ” अशी नावं रिसॉर्टला दिली म्हणजे एक विशिष्ट, टिपीकल ग्राहकवर्ग हुकमी आकर्षित होतोच होतो...कोकण किंवा विदर्भ-खानदेशातील गावं सोडून जमाना झालेली, मुंबई-पुण्यात सेटल झालेली, वीकऐंडला हाफपॅन्ट घालून फिरणारी मंडळी...आपल्या मुलांना आपल्या बालपणीच्या आठवणी सांगून त्या अनुभवाच्या जवळपास नेण्याचा आटोकाट प्रयत्न करणारी, तुटलेल्या नात्यांचे धागे जोडण्यासाठी धडपडणारी अशी ही निरागस मंडळी असतात...अशा रिसॉर्टवर जाण्यासाठी हजारो रुपये भरुन बुकींग करतात...

    तिथे गेल्यावर शेणाने सारवलेल्या जमिनीवर बसतात, धाप लागली तरी विहीरीचं पाणी शेंदतात...श्वास वरखाली झाला तरी “तुला सांगतो अश्विनी, आमच्या लहानपणी माणगावला मामाकडे गेलो की मी दहा दहा बादल्या पाणी काढायचो विहीरीतून” असं सांगत असतो. चि.अश्विनी मात्र How to fetch water from well? चा व्हिडीओ युट्यूबवर शोधत असते.

    सकाळी मऊभात-तूप-मेतकुट खाताना त्याला त्याची अलिबागची इंदूमावशी आठवत असते. तिच्या हातच्या मऊभात मेतकुटाची चव तो इथे शोधण्याचा एक निष्फळ प्रयत्न करुन बघतो..ब्रेकफास्टला पास्ता नसल्याने किंचित नाराज झालेलं त्याचं पोरगं, बापाला बरं वाटावं म्हणून मनाविरुध्द मऊभात गिळत असतं.

    इको-टुरिझमच्या अद्ययावत गोठ्यातल्या देशी गायी बघून त्याला बाबूकाकांचा जुना गोठा आठवतो, गायीच्या मानेची पोवळी खाजवत तो पोरांना बाबूकाकांची “यमुना” गाय त्याकाळी पाच शेर दूध कशी द्यायची हे आठवून सांगतो. पोरं शेणामुताच्या वासाने गुदमरत उसने हास्य आणून माना डोलवत असतात.

    दुपारी कॉटेजमधे चटई टाकून तो पडतो आणि शहरात आयुष्य घालवलेल्या बायकोला जुन्या आठवणी सांगत बसतो. ती जांभया देत ऐकत बसते..

    इथला सूर्यास्त त्याला चौल रेवदंड्याची आठवण करुन देतो. नानाकाकांनी अशाच एका सूर्यास्ताच्या वेळी “समुद्राला रत्नाकर का म्हणतात?”ती त्याला ऐकवलेली गोष्ट मुलांना चौथ्यांदा सांगतो....

    सकाळी निघताना याचा पाय तसा निघत नसतो आणि मुलं बॅगा भरत असतात. त्याच्या नकळत त्याच्या बायकोला…“ममा नेक्स्ट टाईम अॅटलिस्ट मेघालय किंवा उटी तरी बघ हं...प्लीज” असं मुलीने बजावलेलं असतं.

    “कसं वाटलं मामाचं गाव?” या त्याच्या प्रश्नावर मुलं अबोलपणे मान डोलावतात...तो खुशीत येउन गाडी रिसॉर्टबाहेर काढून मार्गस्थ होतो... कारण, खरंतर मुलांपेक्षा त्यालाच गरज असते आजोळची, मामाच्या गावाची...त्याच्या मुलांना मामाचं गाव म्हणजे त्याचा हिरानंदानी मधला फ्लॅट इतकंच माहिती असतं. त्यांच्या अनुभवविश्वाच्या टप्प्यात तेच असतं... पण यालाच खरी गरज असते जुन्या आठवणींना उजाळा देण्याची...काळाच्या ओघात तुटलेले सांधे कृत्रिम वंगण घालून जोडता येतायत का ते बघण्याची...भुतकाळात गेलेलं मन साधारण कोपरखैरणे आलं की वर्तमानात येतं..उद्याचं प्रेझेंटेशन डोळ्यासमोर नाचू लागतं. HR चे ईमेल्स, परवाची VP सोबतची मिटींग...आणि एक निरागस मुल पुन्हा डांबरटपणाचा बुरखा घेऊ लागतं...

      June 12, 2017


  • संस्थेच्या सदस्यत्वाचा राजीनामा

    केंद्र शासनाच्या सूचनेवरून सहकार कायद्यात २०११-२०१२ पासून २०१९-२०२० पर्यत मोठ्या प्रमाणावर सुधारणा करण्यात आल्या. बऱ्याच सुधारणा अमलात आणण्याआधीच नविन सुधारणा करण्यात आल्या. त्यामुळे अनेकदा सदस्यांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण होते. बऱ्याच सहकारी गृहनिर्माण संस्थेमध्ये काम करण्यास सदस्य उत्सुक नसतात. त्यात वारंवार होणारे बदल याची काहीही कल्पना नसते. संस्थेमध्ये उपविधीची प्रत मागणी केल्यास उपलब्ध होत नाही. काही संस्थाचा पत्रव्यवहार पाहून तर मला असे आढळून आले की, बरेच जण उपविधीला कायदा समजतात. अनेक संस्थांमध्ये तर त्यांचा स्वत: तयार केलेला कायदा चालतो. जे कायद्याने चुकीचे आहे. प्रत्यक्षात (कायदा) महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६०; (रुल्स) महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१, (बाय लॉज) उपविधी, परिपत्रके, आदेश या सर्व वेगवेगळ्या असून या बाबी एकत्र पहाव्या लागतात. तरीही कधी मनात आले की निवडणूक किंवा सर्व पदाधिकारी यांनी एकाच वेळी राजीनामा देणे आणि सरकारी अधिकृत व्यक्ती संस्थेत आणले म्हणजे खूप चांगले केले असे वाटत असले तरी काही महिन्यांनी पुन्हा संस्थेच्या सदस्यांना पुढाकार घ्यावाच लागतो.

      July 28, 2021


  • भेसळ

    काल बायकोने ठाण्याहून खरवस मागवला होता... रात्री टी.वी . पहाता पहाता तो आम्ही चापला.
    "कसा मस्त आहे की नाही ?"
    "हो ....छान आहे". दुधात जिलेटिन घालून केलेला "चिक" व त्यापासून बनवलेला खरवस मी पहिल्या चमच्यात ओळ्खला होता. पण बायको समोर हो ....छान आहे असे म्हणावे लागले.

    आमच्या गोठ्यात ( एके काळी ) वर्षाला ४ /५ म्हशी वीत असत. आणि मग खरवस, नासकोणी, खरवसाची बर्फी असे विविध प्रकार आई / आजी करत असत.

    हे खरवस बनवणारे रोज २०० /२५०किलो खरवस बनवतात. तो दादर पर्यन्त अनेक "हाटेलात" पुरवतात.

    आता विचार करा, २०० कि. खरवस बनवायला किमान १०० कि. चीक हवा, त्यासाठी कमीत कमी ५० म्हशी व्यायला पाहिजेत, त्यासाठी किमान ५००० म्हशी गोठ्यात हव्या. असे अनेक खरवस वाले मुंबापुरीत आहेत. मला तरी हे केवळ अशक्य वाट्ते.....एवढ्या म्हशी बाळगण्या परीस तो गोठ्याची जागा विकून बक्कळ पैसा कमवेल.

    थोडा विचार + विचारपुस करता "जिलेटिन" + दुध = खरवस हा फॉर्मुला समजला.

    बाटली बंद "लोणची" आणि त्यावर तरंगणारे तेल पाहून मला असाच संशय आला. गोडेतेलाची किंमत, लोणच्यामधील तेलाचे प्रमाण व लोणच्याची किंमत ह्याचा मेळ लागेना......

    दोन चार ठिकाणी चाचपणी केली. मग उलगडा झाला. लोणच्या मध्ये वापरले जाणारे तेल गोडेतेल (शेंगदाणा) नसून सरकीचे (कापुस बी) असते.

    बाजारात लस्सी प्यायची म्हट्ले की मला आठवण होते "सायट्रिक acid" ची.
    ब्लोटिंग पेपर + सायट्रिक acid = फक्कड लस्सी.

    हेच सायट्रिक आसिड दूधाच्या भुकटी बरोबर आले की "छास " तय्यार. ताक प्यायल्यावर जिभेवर कडवट आंबट चव राहिली कि ओळखा ही सायट्रिक आसिड ची कमाल.

    हे सायट्रिक आसिड / चुन्या बरोबर "पाणी-पुरी" मध्ये सापड्ते. चुना मिर्ची म्हणून न सायट्रिक आसिड चिंच म्हणून आपण पितो .....भैय्याजी थोडा पानी और.....कारण ही दोनिही रसायने मिर्ची व चिंचे पेक्षा खूप स्वस्त आहेत.

    ऊसाचा रस ऊन्हाळ्यात चांगला. पण काही "कलाकार" ह्यामध्ये "सॅकरिन" वापरतात्..... थोड्या रसात भरपूर पाणी + सॅकरिन = भरपूर रस व भरपूर नफा. पण ह्याचा वापर एवढा सर्रास नाही.

    टोमॅटो सॉस केवळ "भोपळ्या पासून" बनवतात म्हणुनच हॉटेलातून बाटल्या भर्भरून ठेवलेला असतो व परवडतो.

    नेस्ले / एच्.एल्.एल. इ. कंपन्या टोमॅटो सॉस टोमॅटोपासून बनवत असतील ही...

    ही थोडी झलक.

    एक चुना सोड्ल्यास ह्यामधील कोणतीही भेसळ शरीरास विशेष हानी कारक नाही. फक्त फसवणुक आहे .

    शरीरास विशेष हानी कारक भेसळी विषयी परत केंव्हा तरी.

    तो पर्यन्त "वडापावाच्या" लसूण चट्णीत लाकडाचा / नारळ /खोबरे / शेंगदाणा व समप्रमाणात लाकडाचा भुसा / बारीक केलेला पुठ्ठा नाही ना ? एवढी खात्री करा झाले.

    संकलन - दिपक कोटमे, कोपरगाव

      November 12, 2016


  • बाल निरीक्षणगृहास (रिमांड होम) आयएसओ

    सार्वजनिक क्षेत्रात सेवा देणार्‍या उद्योगांनी गुणवत्तेचे निकष पूर्ण केल्यास संबंधित संस्थेला आयएसओ ९००१/२००० मानांकन मिळत असते. खाजगी संस्थेबरोबर शासकीय संस्थाही आता आयएसओ मानांकन मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. ठाणे जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांना मिळणारे आयएसओ मानांकन म्हणजे खाजगी सेवा क्षेत्रा इतकेच तोडीस तोड सेवा देऊन नागरिकांच्या सेवेला सदैव हजर असल्याची ती एक पोचपावतीच होय.

      October 29, 2010


  • मुक्तांगण, अलिबाग

    मुलांचं मन फुलपाखरांसारखं चंचल आणि रंगीबेरंगी असतं. आपण फुलपाखराला पकडायचा प्रयत्न केला तर सहजासहजी ते आपल्या हातात येत नाही, तसंच मुलांना जर अतिशय कडक पध्दतीने शिस्त लावायचा प्रयत्न केला तर ती मनाने पालकांपासून दूर होत जातात.

      June 29, 2011


  • टेकडीचा गणपती

    नागपूर शहरात मध्यवर्ती असलेले सिताबर्डी नावाच्या टेकडीवरचे हे मंदिर. साधेच परंतु ऐसपैस असे आहे.

      October 25, 2012