(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • चढतेय विश्वचषकाची झिंग

    आयसीसी विश्वचषक स्पर्धा केवळ दीड महिन्यांवर येऊन ठेपली असताना भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड या प्रमुख दावेदारांबरोबरच इतर देशही तयारीला लागले आहेत. भारताची सध्याची कामगिरी पाहता या विश्वचषकावर धोनीच्या शिलेदारांनी नाव कोरल्यास कोणालाच आश्चर्य वाटणार नाही. प्रश्न आहे तो अंतिम अकरा जणांच्या योग्य निवडीचा.

      January 11, 2011


  • खासगी सेवेतील प्रवाशांची लूट

    अलीकडे खासगी वाहनधारकांची संख्या वाढली असली तरी सार्वजनिक प्रवासी सेवेचा लाभ घेणार्‍याची संख्या कमी नाही. त्यातही एस.टी.ने प्रवास करणार्‍यांची संख्या मोठी आहे. त्यामानाने वाहतुक सुविधा उपलब्ध होत नाहीत. या परिस्थितीचा गैरफायदा खासगी प्रवासी कंपन्यांकडून घेतला जातो. एवढेच नव्हे तर त्यांच्याकडून प्रवाशांची अडवणूक, त्यांची आर्थिक लुबाडणूक असे प्रकार राजरोसपणे सुरू असते.

      November 13, 2010


  • कमळाबाईची वटसावित्री (वात्रटिका)

    कमळाबाईची वटसावित्री (वात्रटिका)

      June 24, 2010


  • मुंबईची शान असलेला मेट्रो सिनेमा

    मुंबईत आज अशा अनेक वास्तू आहेत ज्यांनी मुंबईला उभी रहाताना पाहिलेलं आहे त्यापैकीच एक वास्तू म्हणजे “मेट्रो सिनेमा”. आज जी वास्तू मेट्रो आयनॉक्स म्हणून ओळखली जाते तिच वास्तू  जुन्या काळात मेट्रो सिनेमा म्हणून प्रसिद्ध होती.

      November 22, 2020


  • एक हटके Send off Party

    आज रात्री मला वर्षा खेरकडे Sendoff Party ला जायचंय. ती म्हणाली मैत्रि 5Gणींमधे कुणाला बोलवायचं ती योजना तूच कर बाई.

      January 6, 2025


  • रंगनाथ पठारे यांच्याशी संवाद

    रविवार, २ ऑगस्ट २०२० रोजी सायंकाळी ५ ते ६.३० या दरम्यान रंगनाथ पठारे यांच्याशी संवाद साधणार आहेत डॉ नीतीन रिंढे.

      August 2, 2020


  • काश्मिर…

    काश्मिरातील वास्तवाबाबत काही

      September 23, 2013


  • जागतिकीकरण की सांस्कृतिक अगतिकीकरण….!!!

    आजच्या संगणकीय व माहितीतंत्रज्ञानाच्या महायुगात अवतरलेलं जागतिकीकरण ही भांडवल, वस्तू, तंत्रज्ञान व सेवा यांना (प्रत्यक्ष मनुष्यबळ वगळता) सर्वसाधारणपणे निर्बंधमुक्त वातावरणात एका देशातून जगातल्या दुसर्‍या कुठल्याही देशामधे ये-जा करू देणारी, प्रामुख्याने ’आर्थिक-प्रक्रिया‘ असली तरी जीवनातील इतर क्षेत्रेही प्रभावित करण्याएवढी तिची व्याप्ति व शक्ति मोठी आहे.

      January 2, 2012


  • वेडात मराठे

    1. रविवारची गाफील सकाळ:-

    ते सगळं अशाच एका आळसटलेल्या रविवारी सूरू झालं... सोनाली स्वयंपाकाच्या तयारीत, संगणकावर ह्रूदयनाथ मंगेशकरांची गाणी आणि मी मस्त चहा पीत, पेपर वाचत बसलो होतो. चिन्मयी आली आणि म्हणाली " बाबा school मध्ये Elocution Competition अाहे, मराठा history च्या topic वर speach तयार करायचीय. मला help कर ना"
    मी " हूं...help? आईला विचार.. आई छान सांगेल"
    माझं वाक्य पूर्ण व्हायच्या आत आतून एक खरमरीत आणि निर्वाणीचा ईशारा आला " तो पेपर बाजूला ठेव आणि ती काय सांगत्येय ते नीट ऐक"
    मग मी योग्य तो निर्णय घेतला...म्हणजे पेपर बाजूला ठेवला.
    "काय यार एवढ्या लहान मुलांना लिहून देणार? CBSC वाले पण YZ आहेत. एकदा पंजाब history, एकदा गुजराथ history....... आणि ते पण पोरांनीच करायचं कधी project तर कधी हे असलं Elocution.... कोणाच्या बापानी शिकवल्येय अशी history"
    हो.... यात जरा त्रागा जास्त झाला पण मघाशी मी पेपर बाजूला ठेवला ही काही माझी माघार न्हवती हेही मला कूठेतरी दाखवून देणं गरजेचं होतं.
    सोनाली शांतपणे " हो ना? मग तू शिकव ना तीला एखादी गोष्ट तूला हवी तशी....पीलू आपलं आहे आपणच त्याला घडवायचं... " (दरम्याने संगणकावर वेडात मराठे वीर दौडले सात गाणं सूरू होतं) "आता हे गाणं बघ.. सांग याची एक गोष्ट तीला समजेल तशी..ती सांगेल शाळेत. शिवचरित्राची पारायणं केली आहेस म्हणतोस तर बघूयाच तू कशी शिकवतोस ही history तीला"
    आपल्याला असं clean bold करण्याची हूकमी कसब बायकोच काय ती जाणे. पण गोष्ट मात्र खरी होती, मलाही पटली होती. आता मात्र वेडात दौडलेल्या सात मराठ्यांची गोष्ट चिन्मयीला शिकवायचीच असं ठरवून टाकलं.

    2. फिरंगी भाषेच्या वेढ्यात:
    सुरूवात लगेचच केली. आधी चिन्मयीला घोड्याच्या टापांच्या ठेक्यावर मंगेशकरांनी बसवलेलं गाणं परत ऐकवलं. तीलाही आवडलं. मग सुरूवात तीला गोष्ट समजावून सांगायची...
    " ही ना सात खूप शूर मराठा सरदारांची आहे, ते रागाच्या भरात चाळीस हजार शत्रू सैन्यावर चालून गेले."
    चिन्मयी " बाबा चाळीस हजार म्हणजे? "
    मी "Fourty thousand"
    आता मात्र चिन्मयी अवाक्...
    " but why baba? How can they be so stupid? मरणार नाहीत का ते?"
    नकळत काटा टोचावा तसा तीचा "Stupid" शब्द मला टचकन् टोचला. कुसूमाग्रजांनीही त्यांना "वेडात" दौडले असंच म्हटलं होतं. पण ते "वेड" आणि या "Stupidity" यातला फरक मला खूप कासावीस करत होता. तीला चाळीस हजार म्हणजे forty thousand सांगणं मी समजून घेऊ शकत होतो पण तीच्या सात मराठ्यांचा आवेश न समजण्यानं मी इतका अस्वस्थ का होतो? कुठली तरी मनोमन जपलेली मौल्यवान् वस्तू हरवल्यावर वाटतं तसं वाटायला लागलं. इंग्रजी माध्यमात शिकणार्या माझ्या पिलापर्यंत काही गोष्टी माझ्या मराठीतून पोचणारच न्हवत्या. "इतक्या उपरी बदफैली केलीया मारले जाल" या शब्दातली जरब तीला कधीच जाणवणार न्हवती.
    "आधी लगीन कोंडान्याचं" या शब्दातला रांगडा निर्धार तीला कळणार न्हवता. "लाख जावोत पण लाखांचा पोशिंदा राहो" म्हटल्यावर तीला दोन हातात दांडपट्टा घेतलेला बाजीप्रभू दिसणार न्हवता. निव्वळ इतिहास रंजनापलिकडे जाऊन या गोष्टी आम्हाला काही मूल्य शिकवून गेल्या. आणी त्या मूल्यांसाठी म्रुत्यूच्या दाढेत प्राण वैरून बसणारी ही माणसं हा आमचा वारसा होता. आज मात्र हा अनुवंशिक ठेवा मी पुढे देऊ शकत नाहीये असं वाटलं. रहाणीमान फक्त भाषेच्या विळख्यात न्हवतं, तर वेढा होता त्या भाषेबरोबर आलेल्या पाश्चात्य संस्कारांचा..........

    3. फिरंगी भाषेतला "एल्गार":
    मग विचार केला की जे आपल्याला कळलं आणी भावलं ते चिन्मयीला कळेल असं म्हणजे इंग्रजीतच का सांगू नये?
    थोडं वाचन सूरू केलं. इंग्रजांच्या इतिहासातही अशा एका बेदरकार साहसाची नोंद आहे. क्रेमियाच्या युद्धात असेच सहाशे इंग्रज सैनीक शत्रू सैन्याच्या महासागरावर चालून गेले होते. लाँर्ड टेनीसन नावाच्या कुण्या गोर्यानं त्यांची शौर्यगाथा " March of light brigade" नावाच्या कवितेत व्यक्त केली आहे. ( wiki वर अवश्य वाचा). तो म्हणतो " Into the valley of death rode the six hundred". हे वेडात दौडलेल्या सात मराठ्यांसारखच होतं. फरक इतकाच की ते सहाशे होते आणी आमचे फक्त सातच होते. मग तर या सातांची गोष्ट इंग्रजीत सांगायलाच हवी. शिवाय भारतातील बर्‍याच बिगर मराठी लोकांना ही गोष्ट माहीतच नाहीये.
    लाँर्ड टेनीसनच्या भाषेचा प्रभाव होताच. आता कुसूमाग्रजांची मनोमन माफी मागून लिहायला बसलो. पहाता पहाता Seven maratha warriors इंग्रजीत अवतरले......

    With the blazing swords those
    rose out of their sheathers
    Oh they were so fearless
    Seven maratha warriors

    They saw their commander bit sombre
    But his eyes were red with anger
    They saddled the horses
    with javelines that were longer
    With the whirls of dust
    they disappeared into frontiers
    Oh they were so fearless
    Seven maratha warriors

    Leaving behind their
    dumbfounded army
    Vengeance to concur
    same treacherous enemy
    They took on the battle
    in enemy yard so galantly
    Like seven fireballs
    Blew away enemy barriers
    Oh they were so fearless
    Seven maratha warriors

    Their bravery leaves the
    Trail till the horizon
    The wind is humming
    Songs of the martyrdom
    A tribute to them for
    for selfless heroism
    We salute them,
    Those braveheart warriors
    Oh they were so fearless
    Seven maratha warriors

    4. समर्पण
    चिन्मयीला आता Seven maratha warriors जरा चांगले समजले आणि आवडले आहेत. तीच्या elocution मध्ये तीनं त्यांची शौर्यगाथा इंग्रजी कवितेसह न अडखळता सांगीतली. त्यामुळे आम्ही तीघं जरा खूष आहोत.
    पण या अंतरिक्षात आमच्या सारखे कूणी आई बाप अडखळले, तडफडले किंवा कासावीस झाले असतील तर त्यांच्या पर्यंत हा अनुभव पोचावा अशा ईच्छेपोटी हा "Forward" प्रपंच करीत आहे...........इदं न मम असं म्हणून......

    जय महाराष्ट्र

    SEVEN MARATHA WARRIORS
    वेडात मराठे अर्थात्- Seven Maratha Warriors

    -- WhatsApp वरुन आलेला मेसेज मला आवडला म्हणून शेअर केला.

    -- सुशांत

      July 1, 2017


  • चिऊताई

     चिऊताई आणि मानवाचा संबंध फार जवळचा असावा. निदान आपल्या भारतीय संस्कृतीत तरी तो फार जवळ्चा आणि लिव्हाळ्याचा असल्याच जाणवत. म्ह्णूनच तर आपण चिमणी सारख्या छोट्याश्या निरूपद्रवी पक्षालाही आपल्या ताईची उपमा देतो. भारतीय सभ्यतेत ताईच स्थान हे आईच्या तोलामोलाच मानल जात हे वेगळ सांगायला नको

      January 1, 2014