(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • “निवेदनमय” – रत्नाकर तारदाळकर

    महाराष्ट्रातल्या काही उत्कृष्ट निवेदकांपैकी रत्नाकर तारदाळकरांच नाव हे नेहमीच अग्रकक्रमांकावर राहिलं आहे. झी गौरव पुरस्कार, राज्य शासनाचे पुरस्कार, किंवा सासंस्कृतिक कार्यक्रमात सत्कार मूर्ती वा कलाकारांची “ए.व्ही”. दाखवण्यात येते,

      July 29, 2013


  • ग्राऊंडिंग

    झोपेत असताना जहाज एकदम कशाला तरी धडकल्याचे जाणवले आणि हळू हळू धक्के लागत असल्याचा भास झाला आणि तेवढयात अचानक इमर्जन्सी अलार्म वाजायला लागला. सगळ्यांच्या केबिन चे दरवाजे एका मागोमाग उघडायला लागले आणि जो तो मस्टर स्टेशन कडे पळायला लागला होता.

      June 30, 2021


  • श्री शिवापराध क्षमापणस्तोत्रम् – १

    आदौ कर्मप्रसड्गात् कलयति कलुषं मातृकुक्षौ स्थितं मां विण्मूत्रामेध्यमध्ये क्वथयति नितरां जाठरो जातवेदाः ।
    यद्यद् वै तत्र दुःखं व्यथयति नितरां शक्यते केन वक्तुं क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो ॥१॥

    मानवी जीवनामध्ये कर्म अनिवार्य आहेत. कर्म करायचे म्हटले की त्यात दोष येणारच. काही ना काही चूक घडणारच. त्याच्या परिणामस्वरूप फळांपासून आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पश्चात्तापापासून वाचायचे असेल तर क्षमायाचना अत्यंत महत्त्वाची कृती ठरते.
    प्रस्तुत स्तोत्रात गतजन्मीच्या अयोग्य कृतींपासून आचार्य आरंभ करीत आहेत. ते म्हणतात,

    आदौ कर्मप्रसड्गात् कलयति कलुषं मातृकुक्षौ स्थितं मां- पूर्वीच्या जन्मात केलेल्या कर्मांचा फळा नुसार त्यातील वाईट कर्मांनी मला मातेच्या गर्भात आणून टाकले. विण्मूत्रामेध्यमध्ये क्वथयति नितरां जाठरो जातवेदाः -
    तेथे रक्त, मांस,मलमूत्र या सगळ्या घाणीत मी पडलेलो होतो.
    मातेच्या उदरातील जठराग्नी मला सतत जाळत होता.

    यद्यद् वै तत्र दुःखं व्यथयति नितरां शक्यते केन वक्तुं- तेथे ज्या ज्या प्रकारची अत्यंत भयानक दुःखे आहेत त्यांचे पूर्णपणे कथन कोण करू शकेल?
    या सगळ्यातून सुटण्याचा मला एकच मार्ग दिसत आहे. हे भगवान शंकरा मी आपल्या चरणी शरण आलो आहे. आपणास प्रार्थना करीत आहे ,

    क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो - श्री महादेव शंभो माझ्या अपराधांना क्षमा करा. आपण परमपवित्र आहात आपल्या चरणाशी मला पवित्र करा.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

      July 20, 2020


  • सुड्घेवू गवार ..वैरी लसूण… दावेदार मेथी (बेवड्याची डायरी – भाग – ३७ वा)

    " चौथ्या पायरीत ' आत्मपरीक्षण ' करताना अनेकांना वाटेल की आम्हाला फक्त दारू सोडायची आहे त्यासाठी हे आत्मपरीक्षण वगैरेची अजिबात गरज नाही ..दारू पिणे सोडले तर माझ्यात काहीच दोष नाहीत ..आपले कुटुंबीय देखील अनेकदा आपल्याला म्हणाले असतील ' तू फक्त दारू सोड ..बाकी सगळे चांगलेच गुण आहेत तुझ्यात ' परंतु मित्रानो आपले कुटुंबीय हे आपण दारू सोडावी यासाठी म्हणत असतात ..त्यांना हे माहित नसते कि आपल्या स्वभावातील अनेक अश्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला पुन्हा पुन्हा व्यसने करण्यास भाग पाडतात ..चौथी पायरी आपल्यास व्यसन करण्यासाठी कारण ठरणाऱ्या स्वभावदोषांची पाळेमुळे खणून काढण्यासाठी आहे ..ही विषारी मुळे जोवर आपल्या व्यक्तीमत्वात आहेत तोवर संपूर्ण व्यसनमुक्ती मिळवणे कठीण जाते ..काही दिवस व्यसन बंद ठेवता येते अनेकांना ..मात्र कायमच्या व्यसनमुक्तीसाठी ' आत्मपरीक्षण ' गरजेचे आहे ".सर देत असलेले चौथ्या पायरीचे विवेचन असलेले मला पटत होते ..

    मी अनेकदा घरी राहूनच एखादा महिना किवा दोन तीन महिने दारूचे व्यसन बंद करत होतो ...मात्र ऑफिसमध्ये ..घरी ..नातलगांशी ..काही वाद उदभवले ..अथवा मनात एखाद्या गोष्टीचा तणाव निर्माण झाला की ' फक्त आजच्या दिवस घेवूयात ' असा विचार करून मी दारू पीत असे ..पुन्हा पुन्हा त्याच गुलामीत अडकत असे ..निरर्थक चिंता ..अनाठायी निराशा ..आत्मप्रौढी ..अपयशामुळे आलेले वैफल्य..सतत अवस्थ ठेवणारा तणाव ..अश्या गोष्टी निर्माण होण्यास माझ्या स्वभावातील काही वैशिष्ट्ये कारणीभूत होती ..ती शोधून व्यक्तीमत्वातून अशी वैशिष्ट्ये अथवा दोष काढून टाकण्यासाठी प्रामाणिक पणे प्रयत्न करायला हवेत असे मला वाटले ..' आत्मपरीक्षण ' हे समुद्र मंथन करण्यासारखे असते ..आपल्या अथांग अंतर्मनात दडलेले अनेक सुप्त स्वार्थ ..विकारांमुळे निर्माण झालेल्या अनैतिक कामना ..स्वकेंद्रित वृत्ती ..इतरांना दोष देण्याचे बचावात्मक तत्वज्ञान ..जवाबदारी टाळण्याची मनोवृत्ती ..मनाची अखंड चंचलता ..सतत वाटणारा हव्यास ...आणि या सर्वातून निर्माण होत असलेले ..निरंतर असमाधान ..वगैरे गोष्टी या आत्मपरीक्षणातून आपल्याला आढळून येतील ..मित्रानो आपल्या व्यक्तीमत्वात केवळ दोषच आहेत असे नव्हे ..अनेक चांगले गुण देखील असतात प्रत्येकाच्या व्यक्तीमत्वात ..प्रत्येक व्यक्तीत गुणदोष असतात ..परंतु आता एकदा व्यसनाचा गुलाम झाल्यावर आपल्यातले चांगले गुण लोप पावत चाललेले आहेत अथवा दोष इतके वाढलेले आहेत की त्यामुळे व्यक्तिमत्वातील गुण झाकले जावून केवळ दोषच समोर दिसतात ..म्हणून हे व्यक्तिमत्वातील गुण उजळून बाहेर काढण्यासाठी त्यावर असलेली दोषांची चादर हटवली पाहिजे " असे सांगत सरांनी समारोप केला ..आम्हाला डायरीत लिहिण्यासाठी प्रश्न दिला ' आपल्या स्वभावात कोणते कोणते दोष आहेत असे आपल्याला वाटते ..सविस्तर लिहा ? "

    समूह उपचार संपून जेमतेम दहा मिनिटे झाली असतील ...वार्डातील बेल वाजली ..मला समजेना हे मध्येच कशी बेल वाजली ते ..शेरकर काका म्हणाले चला भाजी निवडावी लागेल आज सर्वाना ..आठवड्याची भाजी आलीय बाजारातून ..त्यात सुड्घेवू गवार ..वैरी लसूण आणि दावेदार मेथी असेलच ..शेरकर काकांनी भाजीला दिलेली ही नावे गमतीशीर होती ..त्यांना म्हणालो असे का म्हणता ? ते मिशीत हसून म्हणाले ' आता निवडायला बसशील तेव्हा समजेलच तुला " .आम्हाला सर्वाना चार पाच जणांचा गट बनवून बसवण्यात आले ..मग कार्यकर्त्यांनी दोन पोती भरून मेथीच्या जुड्या आणून त्यातील चारपाच जुड्या प्रत्येक गटाला दिल्या निवडायला ..

    काही गटांना लसूण सोलण्यासाठी दिले गेले ..काहींच्या पुढे गवार शेंगा ठेवल्या ..मी मेथी निवडण्याच्या गटात होतो ..जुडी सोडून आम्ही सर्वांनी मेथी निवडायला घेतली ..सुरवातीला चारपाच काड्यांची पाने मी व्यवस्थित तोडली ..मग कंटाळा येवू लागला ..बारकाईने प्रत्येक काडीची चांगली पाने खुडून ती आम्ही एका बाजूला टाकत होतो ..नंतर नंतर वाटले हे कंटाळवाणे आहे ..त्या ऐवजी गवार निवडायला जावू म्हणून मी गवार शेंगा तोडण्याच्या गटात जावून बसलो .पटापट साधारण एक इंचाचे तुकडे तोडू लागलो एका शेंगेचे ..मला गटातील एकाने थांबेवले ..म्हणाला ..अहो असे पटापट न बघता तोडू नका ..त्या शेंगेच्या शिरा देखील काढाव्या लागतात तोडताना ..नाहीतर जेवताना त्या शिरा दातात अडकतात ..

    वाटले तितके हे काम सोपे नव्हते ..मी सावकाश शिरा काढत शेंगा तोडू लागलो ..सुमारे पाच दहा मिनिटात माझा उत्साह संपला .. तेथून उठून लसूण सोलणाऱ्यांच्या गटात गेलो ..शेरकर काका त्या गटात होतो ." विजयभाऊ ..लसूण सोलून झाले की हात नीट साबणाने धुवा ..नाहीतर मग भलतीकडे हात लागून बोंबा माराल ..म्हणजे डोळ्याला वगैरे हात लावू नका धुतल्याशिवाय " ..असे म्हणत त्यांनी एक डोळा मिचकावला . लसूण सोलण्याचे कामही असे लुख्खेच वाटले मला .. अलका घरी अशी सगळी कामे किती तत्परतेने आणि कंटाळा न येत करता ते जाणवले ..आपल्या पानात आयता बनवलेले पदार्थ पडतो म्हणून कधी तो पदार्थ करण्यामागे काय कष्ट आहेत ते समजले नव्हते . ..स्त्रियांमध्ये चिकाटी हा एक विशेष गुण असतो असे वाटले ..त्यामुळेच निवडणे ..टिपणे ..सोलणे ..विणणे ..अशी चिकाटी असणारी कामे त्या सहजतेने करतात ..पुरुष अशी कामे उत्साहाने काही वेळ करेल मात्र कायम अश्या प्रकारची कामे करण्यात स्त्रियांचा हातखंडा असतो हे नक्की ..एकंदरीत शेरकर काकांनी सुड्घेवू गवार ..वैरी लसूण आणि दावेदार मेथी ही नावे का ठेवलीत ते चांगलेच समजले ...

    ( बाकी पुढील भागात )

    -- तुषार पांडुरंग नातू

    " मैत्री ' व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र , नागपूर
    संपर्क..रवी पाध्ये - ९३७३१०६५२१ ..तुषार नातू - ९८५०३४५७८५

      June 10, 2020


  • राशी व त्यांचे स्वभाव – धनु

    राशी :- धनु
    स्वामी :- गुरु
    देवता :- धरणीधर
    जप मंत्र :- ॐ ह्रीं श्रीं क्रींधरणीधराय नमः
    उपास्यदेव :- श्री दत्तात्रेय
    रत्न :- पुष्कराज

    जन्माक्षर :- ये यो भ भा भे भा भृभृं धृ ध धा धि धी ढा फा फ्र फ्रैं फि फूं फुं ही अग्नितत्त्वाची रास आहे. यावर गुरु (ज्योतिष) चा अंमल आहे. ही द्विस्वभावी राशी आहे. ही रास असलेल्या माणसाचास्वभाव काहीसा संतापी, पण याचवेळी संयमी आणि सात्त्विक असतो. माणसात अध्यात्माची ओढ दिसते. तो आशावादी असतो आणि त्याच्यात परोपकारी वृत्ती, दिलदारपणा, न्यायीपणा, उदारपणा व समाजसेवाकरण्याची वृत्ती असल्याचे दिसून येते.

      December 6, 2016


  • वलयांकितांच्या सहवासात – लेखमालेची ओळख

    सुप्रसिद्ध शब्दांकनकार प्रा. नीतिन आरेकर यांनी घेतलेला, वलयांकित व्यक्तींच्या सर्वसामान्यांना माहित असलेल्या व्यक्तिमत्त्वापलिकडे जाऊन घेतलेला शोध…..

      May 7, 2020


  • स्वभावदोष हाकलणे.. (बेवड्याची डायरी – भाग ४५ वा)

    काल समूह उपचार संपल्यावर आम्ही सगळे डिस्चार्ज होणाऱ्या व्यक्तीला स्वत:च्या पत्नीचा फोन नंबर देणाऱ्या पाटील भोवती गोळा झालो होतो ..सगळे त्याला तू मूर्ख आहेस असे म्हणत होते ..तो खजील होऊन बसला होता ..शेरकर काका अशी मस्करी करण्याची संधी सोडत नाहीत ...ते पाटील ला म्हणाले ..तुला पुढची बातमी तर सरांनी सांगितलीच नाहीय ..मला ऑफिस मधून असे समजलेय की तो दारू पिवून तुझ्या घरी पण गेला होता ..आणि तुझ्या पत्नीकडे उधार पैसे मागत होता ..तुझ्या पत्नीने त्याला पैसे न देता घरातून हाकलले ..नंतर तिला खूप राग आला तुझा आणि तिने सरांना फोन करून तुला किमान सहा महिने तरी इथे ठेवावे अशी विनंती केली आहे ..हे ऐकून पाटील चक्क रडू लागला ..आता अजून सहा महिने वाढले उपचारांचे हा मोठाच धक्का होता ..मग तो शेरकर काकांच्या मागे लागला ..तुम्ही खरे सांगा ..अजून काय म्हणाली माही पत्नी सरांना ? कधी फोन केला होता तिने ? वगैरे प्रश्न विचारू लागला ..त्याची केविलवाणी अवस्था पाहून सर्वांनी त्याची खूप मजा केली ..मग एकेक जण असे डिस्चार्ज होणार्या व्यक्तीला घरचा फोन नंबर व पत्ता दिल्याने पूर्वी घडलेले ऐकीव किस्से सांगू लागले .. एकाने असा घरचा पत्ता घेवून उपचार घेणाऱ्या व्यक्तीच्या घरी जावून खोटीनाटी करणे सांगून पैसे घेतले होते ..एकाच्या सांगण्यावर विश्वास ठेवून उपचार घेणाऱ्या व्यक्तीला खरोखर डिस्चार्ज केले होते ..नंतर ते दोघेही नियमित एकमेकांना भेटू लागले ..दोघांचेही दारू पिणे सुरु झाले त्यामुळे ..हे किस्से ऐकून मी मनाशी ठरवले की इथे उपचार घेणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला कितीही चांगला मित्र असला तरी आपल्या घरचा पत्ता व फोन नंबर द्यायचा नाही ..इथे राहताना मित्र निवडताना देखील काळजी घेणे गरजेचे आहे ..जे लोक अजूनही नकारात्मक विचार करतात ...गंभीरतेने उपचार घेत नाहीत ..थेरेपीज बुडवतात अशा नाठाळ लोकांपासून चार हात दूर राहिलेले बरे ..

    आजच्या समूह उपचारात सरांनी फळ्यावर अल्कोहोलिक्स अॅनाॅनिमसची सहावी पायरी लिहिली.. ज्यात म्हंटले होते की '"परमेश्वराच्या मदतीने आम्ही आमचे सगळे स्वभावदोष काढून टाकण्यास पूर्णपणे तयार झालो " फळ्यावर पायरी लिहून होताच सरांनी मोठा सुस्कारा सोडला ..म्हणाले खूप कठीण काम आहे हे ..व्यसनी व्यक्तीला केवळ व्यसनमुक्तीच नव्हे तर एक आदर्श जीवन जगण्यास प्रेरणा आणि मार्गदर्शन देणाऱ्या या बारा पायऱ्या कोणी पूर्ण प्रामाणिकपणे आचरणात आणल्या तर तो नक्कीच ' संत ' बनेल ..अर्थात आपल्याला जरी संत बनायचे नसले तरी एक सर्वसामान्य आयुष्य समाधानाने आणि प्रसन्नतेने व्यतीत करायचे आहे ..त्यामुळे जास्तीत जास्त प्रामाणिकपणे या सूचनांचे पालन करण्याचा प्रयत्न करायला हवा ..असे म्हणतात की एक व्यसनी व्यक्तीकडे जन्मतः नैसर्गिक इच्छा आणि आकांक्षा इतर व्यक्तीपेक्षा जास्त प्रमाणात असतात .. तो स्वताच्या इच्छापूर्ती साठी अधिक आग्रही असतो ..कदाचित त्यामुळेच तो जास्त जिद्दी ..हट्टी बनलेला असतो ..त्याला प्राप्त झालेल्या अतिरिक्त बुदिमत्तेचा वापर करून तो नेहमी स्वता:च्या इच्छेनुसार जगण्याचा प्रयत्न करतो ...शिवाय संवेदनशील व हळवा असल्याने छोट्या छोट्या गोष्टीत तो पटकन रागावतो ..निराश होतो ..दुखी: होतो ..वैफल्यग्रस्त होतो या सर्व नकारात्मक भावनांचा परिणाम म्हणून तो सहजगत्या व्यसनांकडे आकर्षित होतो

    ..स्वताच्या इच्छेने जीवन व्यतीत करता यावे या अट्टाहासामुळे तो सहजगत्या खोटे बोलतो ..ढोंगीपणा करतो ..दुहेरी व्यक्तिमत्व बनते त्याचे ..त्यातूनच अनेक प्रकारचे स्वभावदोष निर्माण होतात त्याच्या स्वभावात ..पुढे व्यसनाच्या काळात तो पूर्णतः निर्ढावतो ..अनेक स्वभावदोष त्याच्या वागण्यात इतरांना जाणवतात ..आता जरी आपण इथे उपचार घेताना व्यसनमुक्त असलो तरी जोवर या स्वभावदोषांची आपण दखल घेत नाही आणि ते काढून टाकण्याचा प्रयत्न करत नाही तोवर आपले व्यसन वारंवार सुरु होण्याचा धोका कायम आहे ..वैचारिक आणि भावनिक संतुलन साध्य करणे आपल्याला आवश्यक ठरते ..सांगा बरे आपल्यात कोणते कोणते स्वभाव दोष आहेत असे आपल्याला वाटते ? सरांच्या या प्रश्नावर एकेकाने उत्तर देण्यास सुरवात केली ..खोटे बोलणे ..बाता मारणे ..दिवास्वप्ने पाहणे ..अतिआत्मविश्वास ..स्वतःला शहाणा समजणे ...दोषारोप करणे ..इतरांच्या भावनांची पर्वा नसणे ..आत्मकेंद्रित वृत्ती ..कृतघ्नता ..आळशीपणा ..कामचुकारपणा ..बेजवाबदारपणा ..असमंजसपणा ..उतावळेपणा .आर्थिक गैरव्यवहार करणे ..पैश्यांची अफरातफर करण्याची वृत्ती ...चैनीवृत्ती ..अय्याशी वृत्ती ..चालढकल करण्याची वृत्ती ..कमी कष्टात जास्त पैसे मिळावेत अशी इच्छा असणे ..झटपट सुख मिळावे अशी लालसा ..इतरांवर दादागिरी करणे ..माझेच म्हणणे खरे असे वाटणे . ..सतत असुरक्षित वाटणे ..वार्डातील सगळे पटापट ऐकेक स्वभावदोष सांगत होते ..सर ते फळ्यावर लिहित होते ..पाहता पाहता मोठीच यादी तयार झाली ..

    त्या यादीकडे पाहत हसून सर म्हणाले " बापरे ! .तुम्ही सर्व खूपच प्रामाणिकपणे सांगितले आहेत आपले स्वभावदोष .आता हाच प्रामाणिकपणा हे स्वभावदोष निघून जाण्यासाठी वापरला पाहिजे ..यापैकी काही ना काही दोष प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीत देखील असतात ..मात्र त्यांचे हे दोष त्यांना व्यसनाकडे नेण्यास प्रवृत्त करत नाहीत कारण त्यांना व्यसन करू नये हे भान असते ..व्यसनामुळे आपले शारीरिक.. आर्थिक ..मानसिक.. कौटुंबिक ..सामाजिक पातळीवर नुकसान होऊ शकते याची त्यांना पूर्ण कल्पना असते ..किवा व्यसन करणे योग्य नाही हा संस्कार त्यांच्या मनावर लहानपणापासून पक्क कोरला गेला असतो ..त्यामुळे त्यांचे स्वभावदोष जरी इतरांसाठी घातक..त्रासदायक असले तरी त्यामुळे ते व्यसन करतील असा धोका नसतो ..आपल्या बाबतीत मात्र ' आधीच मर्कट ..त्यात मद्य प्यायला ' असे घडलेय ..त्यामुळे आता हे मर्कटपण काढून टाकले तरच आपली व्यसनमुक्ती सहजपणे टिकते ..तसेच समाधानी आणि स्वतःसाठी तसेच इतरांसाठी उपयुक्त असे आयुष्य घडवण्यास आपल्याला मदत मिळते ..

    पुढे सर म्हणाले या पायरीत म्हंटले आहे की परमेश्वराच्या मदतीने हे स्वभावदोष काढून टाकायचे आहेत ..म्हणजे आपल्याला स्वताच्या बळावर हे करता येणे कठीण आहे ..कारण सध्या आपले स्वभाव दोष हे आपले शस्त्रे किवा अस्त्रे बनली आहेत..आनंदाने जीवन व्यतीत करता यावे यासाठी आपण या शस्त्रांचा वापर ..गैरवापर करत आलो आहोत ..अशी शस्त्रे स्वतःहून त्यागण्यास आपले अंतर्मन सहजासहजी तयार होणार नाही...व्यसनमुक्तीचा आणि स्वभावदोष काढून टाकण्याचा काहीही संबंध नाही असे आपल्याला वाटेल ..जगत माझ्यापेक्षा जास्त स्वभावदोष असलेली अनेक माणसे आहेत ..त्यात काय विशेष ? ..प्रत्येक व्यक्तीत असतातच स्वभावदोष अशी समर्थने मनात तयार होऊ शकतात ..या समर्थानांच्या आड लपून आपण स्वभावदोष काढून टाकण्याच्या बाबतीत चालढकल करू शकतो ...हे स्वभावदोष काढून टाकताना खूप मानसिक त्रास होईल आपल्याला ..तरी आपली ही शस्त्रे त्यागणे गरजेचे आहे हे लक्षात घेतले पाहिजे ..

    ( बाकी पुढील भागात )

    -- तुषार पांडुरंग नातू

    " मैत्री ' व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र , नागपूर
    संपर्क..रवी पाध्ये - ९३७३१०६५२१ ..तुषार नातू - ९८५०३४५७८५

      July 8, 2020


  • अधिकारी असावा तर असा!

    अधिकारी असावा तर असा! 'या' जिल्ह्यात ना ऑक्सिजन ,ना बेड चा तुटवडा,
    हे सर्व शक्य झालं आहे ते जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांच्या प्रयत्नांमुळं.
    ऑक्सिजनसाठी कधीकाळी दुसऱ्या जिल्ह्यांवर अवलंबून असणाऱ्या या जिल्ह्यानं आता ऑक्सिजन प्रकल्पही उभा केला आहे. हे सर्व शक्य झालं आहे ते जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांच्या प्रयत्नांमुळं
    नंदूरबारः संपूर्ण देशाला सध्या करोना संसर्गानं ग्रासलं आहे. करोना संकटावर मात करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न राज्यातून होत आहेत. मात्र, ऑक्सिजन, रेमडेसिवीरचा तुटवडा, बेडची कमतरता या समस्यांनाही आरोग्य प्रशासनाला तोंड द्यावे लागत आहे. मात्र, महाराष्ट्रातील नंदूरबार या जिल्ह्यात मात्र पूर्णपणे वेगळी परिस्थीती आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांच्या नियोजनामुळं जिल्ह्यातील करोना परिस्थिती नियंत्रणात आहे.
    आदिवासी बहुल परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदूरबार जिल्ह्यात मागील वर्षी अपुऱ्या यंत्रणेसह करोनाचा लढा दिला. मागील वर्षी फक्त २० बेड असलेल्या नंदूरबारमध्ये आता रुग्णालयात १ हजार २८९ बेड, कोविड केअर सेंटरमध्ये १ हजार ११७ बेड आणि ग्रामीण रुग्णालयात ५ हजार ६२० बेड उपलब्ध आहेत. करोना महामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सक्षम आरोग्ययंत्रणा उभी केली आहे. इतकंच नव्हे तर, महाविद्यालये, हॉटेल, सोसायटी आणि मंदिरांमध्येही बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. तर, ७ हजारांहून अधिक आयसोलेशन बेड आणि १,३०० आयसीयू बेड्स उभे केले आहेत.
    ऑक्सिजनसाठी कधीकाळी दुसऱ्या जिल्ह्यांवर अवलंबून असणाऱ्या या जिल्ह्यानं आता ऑक्सिजन प्रकल्पही उभा केला आहे. हे सर्व शक्य झालं आहे ते जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांच्या प्रयत्नांमुळं. राज्यभरात नंदूरबार मॉडेल राबवण्याची गरज आहे.
    २०१३च्या बॅचचे आयएएस अधिकारी आणि मुंबईतील केईएम रुग्णालयातून एमबीबीएसची पदवी मिळवणारे डॉ. भारुड यांनी करोना महामारीच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता लक्षात घेत डिसेंबरपासून त्यांनी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यास सुरुवात केली. नंदूरबारमध्ये मागील वर्षी सरासरी १५- २० आरटीपीसीआर टेस्टची क्षमता होती. आता जवळपास करोना चाचण्यांची क्षमता थेट १०० पटीने वाढून १५०० पर्यंत गेली आहे. हे सगळं डॉ. भारुड यांच्या प्रयत्नानं शक्य झालं आहे.
    डॉ. भारुड यांनी जिल्हा विकास निधी आणि एसडीआरएफच्या निधीतून ३ ऑक्सिजन प्रकल्प उभे केले आहेत. या प्रकल्पाच्या माध्यमातून ३ हजार प्रतिमिनिट ऑक्सिजन तयार होते. ऑक्सिजन बनवण्यासाठी लिक्विड टँक बसवण्याचेही काम हाती घेण्यात आलं आहे. तसंच, कोविड रुग्णांसाठी मागील ३ महिन्यात २७
    रुग्णवाहिका खरेदी केल्या आहेत.
    डॉ. राजेंद्र भारुड यांचा जन्म नंदुरबार जिल्ह्यातील एका आदिवासी कुटुंबात झाला आहे. त्याच्या जन्माच्याआधीच त्यांच्या वडिलांचे निधन झालं आहे. त्यांच्या आईनंच त्यांचं पालनपोषण केलं आहे. डॉ. राजेंद्र हे मुंबईत शिक्षणासाठी आल्यानंतर जीएस मेडिकल कॉलेजमध्ये त्यांनी एमबीबीएसचं शिक्षण पूर्ण केलं. कॉलेजच्या शेवटच्या वर्ष असतानाच त्यांनी यूपीएससी परिक्षेत उत्तीर्ण झाले.
    डॉ. भारुड साहेबांचा आदर्श लाचखाऊ शासकीय अधिकार्यांनी घ्यावा.गरीब जनतेला लुबाडन्यातच धन्यता मानणार्या कलीयुगाच्या प्रतिनिधीनो जागे व्हा.
    संतोष द पाटील

      September 27, 2021


  • पतंजली

    एका गावात Nirma आणि Wheel दाम्पत्याला Rexona नावाची सुंदर मुलगी असते,

    तिचे प्रेम Margo आणि Hamam यांच्या देखण्या Cinthol वर असते.. तर Cinthol, आपला "Life Boy" होणार या कल्पनेने Rexona हरकून गेलेली असते..

    501 नावाची तिची आत्या मध्यस्थी करून त्यांचे लग्न जमवते.

    Rexona व Cinthol दोधेही खूप आनंदित होतात

    आणि

    Medimix गावातल्या Santoor सिनेमागृहासमोर असलेल्या Fair & lovely उद्यान कार्यालयात धुमधडाक्यात विवाह संपन्न होतो..

    Lux, Dove, Dettol, Savlon, Tide, Fa, Jo सर्व या आपल्या बिरादरीतील मित्र परिवारास ते दोघेही विवाहाचे आमंत्रण देतात ...

    नव विवाहित आपल्या स्वप्न नगरीतल्या "PEARS" या बंगल्यात सुखाने वैवाहिक जीवन जगत असतात..

    सर्वांचा गुण्यागोविंदाने व्यवसाय चालू असतो....

    २५ वर्षा नंतर त्यांना एक मुलगी होते व ती या सगळ्यांचे १२ वाजवते....

    तीचे नाव .....

    पतंजली

      September 28, 2016


  • ऑनलाईन भाजी मार्केट

    online-vegetable-market
    ह्या Online Market मध्ये भाजी किती स्वस्त मिळते.....

      October 4, 2016