बागेतील तारका-
April 25, 2013
आजच्या संगणकीय व माहितीतंत्रज्ञानाच्या महायुगात अवतरलेलं जागतिकीकरण ही भांडवल, वस्तू, तंत्रज्ञान व सेवा यांना (प्रत्यक्ष मनुष्यबळ वगळता) सर्वसाधारणपणे निर्बंधमुक्त वातावरणात एका देशातून जगातल्या दुसर्या कुठल्याही देशामधे ये-जा करू देणारी, प्रामुख्याने ’आर्थिक-प्रक्रिया‘ असली तरी जीवनातील इतर क्षेत्रेही प्रभावित करण्याएवढी तिची व्याप्ति व शक्ति मोठी आहे.
January 2, 2012
माझा एक वकिलमित्र सांगत होता की, त्याच्यांकडे एक घटस्फोटाची केस आली. केस अशी होती की, नवीन लग्न झाले होते. नवरा पगार झाला की , बायकोच्या हाती द्यायचा. बायको पहिल्या चार-पाच दिवसातच सर्व पगार शॉंपिंगवर खर्च करुन मोकळी व्हायची. असे दर महिन्याला होत गेले. त्यामुळे नवर्याचे आर्थिक गणित चुकले. तो तीला म्हणाला की, ‘‘पैसे जपुन खर्च करत जा!".
बस त्यावरुन भांडण करुन बायको माहेरी गेली. तिच्या आईने जावायांना बोलावून सांगितली की, ‘‘तिची हौस-मौज करा, पैसे कमी पडले तर माझ्या कडून घ्या!’’ हे सासूबाईंचे वाक्य ऐकून मुलगा तडक उठला आणि त्याने घटस्फोटाची मागणी केली. पुढे त्यांचा घटस्फोट पण झाला. आता यात नक्की काय घडले?.. नक्की चुक कोणाची होती?.. मुलगा अत्यंत स्वाभिमानी होता. त्याने त्याचे करीयर स्वत:च्या हिमंतीवर बनवले होते. तर मुलगी अत्यंत लाडात वाढलेली होती. पुढे समुपदेशनात लक्षात आले की, मुलगी एकुलती एक..
लहानपणी ही मुलगी ज्या दुकानाच्या बाहेर उभी राहील त्या दुकानातल्या वस्तू गरज नसतांना पालक विकत घेत असायचे. ‘‘काय हवे माझ्या शोनुलिला?.. बार्बी गर्ल?’’ ओके..! लगेच तिला ती बाहुली मिळत गेली. तोंडामधुन एखादी मागणी आली की लगेच हट्ट म्हणून ती पुरवली जायाची.. या पध्दतीने ती लहानाची मोठी झाली. आणि लग्नझाल्यावर वर्षभराच्या आत माहेरी आली.
पालकांनो लहान मुलांचे मानसिक स्वास्थ आणि भावनिक स्वास्थ हे तुम्ही त्याच्यांशी लहानपणी कसे वागतात त्यावर अवलंबुन असते. पालक मुलांचे लाड करणच्या नादात कुठे थांबायचे हे सुध्दा विसरतात.
‘‘मागीतले की मिळतं’’ ही सवय जर मुलांना लागली की, पुढे हे जड जाते. अशा मुलांना वाईट सवयी लवकर लागतात आणि तर मुली लवकर बिघडतात. नकाराची सवय राहिली नाही तर मोठ्यापणी साधा प्रेमभंग सुध्दा पचवता येत नाही, ना ऑफिसमध्ये वरिष्ठांशी जुळवून घेता येते. याचे कारण पालक मुलांमुलीचे प्रत्येक प्रश्न स्वत: सोडवण्याच्या भानगडीत पडतात. कॉलनीत मुला-मुलांचे भांडण झाले तर आई लगेच शेजारच्यांशी भांडायला जाते. शाळेत थोडं टिचर रागावली की बाबा लगेच मुख्याध्यापकांना भेटतात. मुलाला एका डान्समधुन काढून दुसर्या डान्समध्ये अथवा दुसर्या परफॉर्मन्स मध्ये टाकले की लगेच टिचर्सला फोन करुन जवाब विचारतात.. या सर्वामधुन मुलांना आयती उत्तरे मिळतात. नकार पचवून घ्यायची सवय लागत नाही.
पालक जेव्हा गरज नसतांना पाल्याचा हट्ट पुरवतात. पैसे नसतांना सुध्दा मुलांचे फाजील लाड पूर्ण करतात आणि त्याला गोंडस शब्दांची झालर देतात आणि ती झालर म्हणजे ‘‘आमचे लहानपणी असे लाड झाले नाही, मला जे मिळाले नाही ते मी माझ्या मुलां-मुलीला देईल’’ आणि या कृतीलाच पालक प्रेम करणे असे म्हणतात.
खरं तर प्रेम आणि काळजी यांचा समतोल साधायचा असतो, कारण दोघं जास्त झाले की, वाढ खुटण्याची भीती असते. मागणी आणि पुरवढा यांचा योग्य समतोल पालक आणि पाल्यामध्ये होणे गरजेचे असते.
आपण मुलांशी लहानपणी कसे वागतो त्यावर भविष्यातील त्यांची वर्तवणुक ठरत असते. म्हणून मागीतले ते मिळते ही सवय मुलांना लावु नका. मोठ्या माणसांनी, शिक्षकांनी किंवा क्लास टीचर ने त्याच्या भल्यासाठी काही ऍक्शन घेतली असेल तर त्यावेळेस टिचर्सला सहकार्य करा. कारण शेवटी मुलं मोठ्यापणी सर्वांनमध्ये मिळून मिसळून राहणं, उत्तम संवाद साधणे हे महत्वाच असते आणि याला अडथळा असतो अति लाड! अति प्रेम!! शिस्त ही प्रेमाची पहिलि कृति आहे.
-- प्रा. हितेशकुमार एस. पटले
May 16, 2017
November 12, 2010
September 27, 2011
न्यूयॉर्कमधील भारतीय वकिलातीमध्ये कार्यरत असलेल्या वरिष्ठ राजनैतिक अधिकारी देवयानी खोब्रागडे यांना त्या आपल्या मुलींना शाळेत सोडण्यासाठी निघाल्या असताना रस्त्यावर अत्यंत अपमानास्पदरित्या अटक करण्यात …..
January 8, 2014
कसय....
आपण ज्या वेळेस समोरच्या व्यक्तीनी सांगितलेल्या वेळापेक्षा पाचच मिनिटे ऊशिरा पोहचलोना.....
लगेचच बरळतील.,,
"आपल्या भारतीयांना अमुल्य वेळेची खरच किंमत नाही....
नाहीतर भारत केव्हाच पुढे गेला असता....."
आणि जर आपण वेळेपुर्वीच पाच मिनिटे पोहचुन सुध्दा जर या महाशयांना ऊशिर झाला ना...
मग हळुच निर्लज्जपणे म्हणतात......
"चालतय हो..... दहा-पंधरा मिनिटे ऊशिर होणारच...
आपण घाई केल्यास देश पुढे जाणार आहे का?"..
असतात अशीही लोक.....
घ्या सांभाळुन ......
विवेक जोशी...
December 12, 2016
पाचव्या पायरीचे विवेचन करत असताना सरांनी सांगितले की एका व्यसनीला उगाचच असे वाटत असते की आपल्या व्यसनाबद्दल कोणाला काहीच माहित नाहीय .. तो कुटुंबीय आणि जवळचे लोक सोडून इतर लोकांसमोर प्रयत्न पूर्वक चांगला वागण्याचा प्रयत्न करत असतो ..मी किती चांगला व्यक्ती आहे ..मी किती हसतमुख ..खेळकर प्रवृत्तीचा आहे हे इतरांना भासवण्याचा त्याचा आटापिटा चाललेला असतो ..अशा वेळी त्याला आपल्या चुकांचा ..व्यसनांचा तसेच व्यसनासाठी केलेल्या भानगडींचा कबुली जवाब देणे अवघड वाटते ..' तो मी नव्हेच ' असा त्याचा अविर्भाव असतो ..खरे तर कुठून ना कुठून तरी आसपासच्या लोकांमध्ये त्याच्या व्यसनी होण्याबद्दल माहिती कळलेली असते ..घरातील मोलकरीण ..सोसायटीचा वाॅचमन ...ऑफिसमधील सहकारी ..सोबत पिणारे मित्र ..अश्या लोकांकडून त्याच्या व्यसनी असण्याबद्दल व्यवस्थित माहिती पोचलेली असते सगळीकडे ..फक्त ' आपल्याला काय करायचेय ' या विचाराने लोक त्याच्या तोंडावर तशी चर्चा करत नाहीत ..किवा एखाद्याने तसा प्रयत्न केलाच तर व्यसनी त्याला अनेक समर्थने देवून उडवून लावतो ..
अनेकदा कुटुंबीय देखील बदनामीच्या भीतीने तो व्यसनात अडकल्याची बाहेर कुठे वाच्यता करत नाहीत ..कारण लोक काय म्हणतील याचा विचार असतो ..खरेतर पाठीमागे लोक बोलतातच ...शिवाय व्यसनी व्यसन करतो त्यात कुटुंबियांची काहीही चूक नसतेच त्यामुळे कोणी कुटुंबाला दोष देत नाहीतच ..कुटुंबियांना वाटते की आपण चांगले संस्कार दिले नाहीत असे लोकांना वाटेल ..खरे तर सर्वच पालक व्यसनीला लहानपणी चांगलेच संस्कार देतात ..मात्र तो त्या मोठा झाल्यावर त्या संस्कारांचे आचरण करत नाही हा काही पालकांचा दोष नसतोच .. पण पालक लोकलज्जेने व्यसनीच्या चुकांवर पांघरून घालतात..अन व्यसनी निर्लज्ज पणे व्यसन करत राहतो ..असा हा आजार आहे ..त्यामुळे पाचव्या पायरीत सांगितलेले ' कन्फेशन ' करणे व्यसनी व्यक्तीला खूप जीवावर येते ' मुझको बरबादी का कोई गम नही..गम है बरबादी का क्यू चर्चा हुवा ' ..अश्या प्रवृत्तीने तो आपल्या चुका लपवून ठेवतो ..इतरांनी त्याच्याबद्दल चर्चा करू नये असे त्याला मनापासून वाटते ..कितीही झाकले तरी कोंबडे बांग देतेच हे विसरता कामा नये ..आपल्या चुकांवर पांघरूण घालून कुटुंबीय खरे तर आपल्या व्यसनीपणाला खतपाणी घालत असतात ..
सर व्यसनी व्यक्तीच्या स्वभावाबद्दल तसेच त्याच्या कुटुंबियांच्या मनस्थिती बद्दल बारकाईने माहिती देत होते ..मला ते लागू पडते आहे हे जाणवले ..मी नेहमी बाहेरच्या लोकांमध्ये अगदी असेच वर्तन करत असे ..स्वतचा चांगुलपणा लोकांना जाणवावा असे वागत असे ..मी साधा भोळा..प्रामाणिक प्रवृत्तीचा ..जवाबदार ..सरळमार्गी व्यक्ती आहे असेच इतरांना भासवत असे ..खरेतर अनेकांना मी रोज दारू पितो ..दारूमुळे माझ्या तब्येतीवर परिणाम होतोय ..माझ्या कुटुंबात भांडणे होत आहेत ..आर्थिक दृष्ट्या कमकुवत होत चाललो आहे ..कामावर दांड्या मारण्याचे प्रमाण वाढलेय .वगैरे माहिती मिळाली असणारच ..कारण मानवी स्वभावाचे हे वैशिष्ट्य आहे की चार माणसे एकत्र जमली की ते इतरांच्या उखाळ्या पाखाळ्या काढतातच ..तेथे हजर नसलेल्या व्यक्तीच्या दुर्गुणांची चर्चा करतात ..आपल्याला समजलेली गुप्त बातमी कोणाला सांगू नकोस असे म्हणत सगळीकडे वितरीत करतात ..
फक्त त्या व्यक्तीच्या तोंडावर त्याला कोणी काही बोलत नाहीत कारण त्यांना तो आपलं अपमान करेल अशी भीती असते किवा ' ज्याचा हात तुटेल त्याच्या गळ्यात पडेल ' या उक्तीनुसार गप्प राहतात ..
अलका भांडणात आमचा आवाज वाढला की शेजारचे लोक ऐकतील या भीतीने चूप बसत असे ..सुरवातीला तर तिने माहेरी देखील माझ्या पिण्याबद्दल वाच्यता केली नव्हती ..सगळे काही छान आहे असेच भासवले होते ..माझ्या आईबाबांनी देखील कधी इतर नातलगांकडे माझ्या पिण्याचा विषय काढला नव्हता ...इतरांना समजले तर बदनामी होईल या भीतीने त्यांनी माझ्या चुकांवर पांघरून घालण्याचाच प्रयत्न केला होता ..पाचव्या पायरीत स्पष्टपणे म्हंटले होते की आपल्या चुका मोकळेपणी कबूल केल्या पाहिजेत तरच पुढे जाता येते ..अल्कोहोलिक्स अॅनाॅनिमस मध्ये केले जाणारे शेअरिंग हा पाचव्या पायरीचाच एक भाग आहे ...प्रत्येकाने निर्भयपणे शेअरिंग करणे गरजेचे असते ..
सरांचे बोलणे सुरु असताना एकाने हात वर करून विचारले ' सर हे जे ईश्वर ..स्वतः ..व आदरणीय व्यक्तीजवळ चुकांची तंतोतंत कबुली दिली असे म्हंटले आहे.. ते तीन भाग का केले आहेत ..? " सरांनी त्याचे उत्तर दिले ..म्हणाले खरेतर जेव्हा आपण ईश्वरी संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो सर्वव्यापी ईश्वर ' यत्र ..तत्र ..सर्वत्र ' आहे असे म्हंटले होते ..म्हणजे प्रत्येक जीवात ते सर्वशक्तिमान चैतन्य वसलेले आहे ..तेव्हा चुकांची कबुली देताना नेमकी कोणाजवळ द्यावी हा प्रश्न पडतो ..किवा कोणाजवळही दिली तरी चालते का ? असा संभ्रम निर्माण होतो .. यासाठी गोंधळ होऊ नये म्हणून हे तीन भाग आहेत ..पहिल्या भागातला ईश्वर म्हणजे आपले जवळचे कुटुंबीय ज्यात पत्नी ..आईवडील .भावंडे येतात ..आपण घरी अनेकप्रकारचे बेताल वर्तन केले आहे ..आपल्या वागण्याने कुटुंबियांना खूप त्रास झाला आहे
..आर्थिक ..मानसिक ..कौटुंबिक ..शारीरिक ..सामाजिक..आणि अध्यात्मिक या साऱ्या पातळ्यांवर जसे आपले नुकसान झालेय तसेच त्यांना देखील या सगळ्या पातळ्यांवर आपल्यामुळे त्रास झालेला आहे .. त्यांनी जेव्हा जेव्हा आपल्याला विरोध केला ..प्रतिकार केला तेव्हा तेव्हा आपण आक्रस्ताळे पणाने ..आक्रमकपणे ..त्यांना चूप बसवले आहे ..किवा त्यांनी आपल्याबद्दल चर्चा सुरु करतच तेथून काढता पाय घेतला आहे..त्यांना आपल्यामुळे त्रास होतोय हे कधीच त्यांच्या समोर मान्य केलेले नाहीय ..तर त्यांच्यामुळेच आपल्याला त्रास होतोय असा कांगावा केला होता आपण ..पाचव्या पायरीचे आचरण करताना आपण जवळच्या नतलगांपुढे आपण त्यांना दिलेल्या त्रासाची कबुली देणे अपेक्षित आहे ..त्यामुळे त्यांना दिलासा मिळतो ..तसेच आपण मनापासून सुधारू इच्छितो हे त्यांना समजते ..त्यांचा आपल्यावरील गमावलेला विश्वास परत मिळण्यास सुरवात होते ..आपल्या वागण्याबद्दल आपल्याला खरोखर पश्चाताप होतोय याची खात्री वाटते ..
आता दुसऱ्या भागात " स्वतः जवळ कबुली दिली " असा उल्लेख आहे ..म्हणजे केवळ नातलगांकडे कबुली देणे पुरेसे नाहीय तर ..आपल्याला स्वतःला ते आतून ..अंतर्मनातून पटले पाहिजे ..अगदी मनाच्या खोल गाभार्यातून आपण चुकलो आहोत हे वाटले पाहिजे ..केवळ पाचव्या पायरीत सांगितले आहे म्हणून नव्हे ..किवा आपण व्यसनमुक्ती केंद्रात आलोत म्हणून नव्हे ..अथवा आता आपल्याला कबूल करण्याखेरीज काही पर्याय उरला नाही म्हणून ..इतरांनी लवकर आपल्यावर विश्वास ठेवावा म्हणून ..आपल्याला माफ करावे म्हणून ..पश्चाताप झालाय असे दाखवावे म्हणून नव्हे तर .मनापासून आपण चुकलो आहोत याची खोल जाणीव व्हावी अशी अपेक्षा आहे ..
( बाकी पुढील भागात )
-- तुषार पांडुरंग नातू
" मैत्री ' व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र , नागपूर
संपर्क..रवी पाध्ये - ९३७३१०६५२१ ..तुषार नातू - ९८५०३४५७८५
July 1, 2020
ढोल आणि मालवणी मुलुख यांच नातं तसं प्राचिनच....
पण तुम्ही बघितलेला ढोल आणि मालवणी ढोल यात जमिन अस्मानाचा फरक आहे....
आत्ताचा अभिप्रेत ढोल सर्वानाच माहित आहे पण मालवणी ढोलाची माहिती सांगतो...
मिऴालाच तर फोटोही देईन.....
पहिला महत्वाचा फरक बांधणीचा
.. याच खोड...बहुधा फणसाचे.... पूर्णपणे आतुन पोकळ लाकुड कातुन ढोलाच्या साईज मधे आणणे एक कलाच होती.... आणी त्यातुन निघणार्या
रामरामरामरामरामरामरामराम...
आवाजानेच सुतार समाजाला..रामकातयो..... म्हणजेच रामखातयो..... हे नाव मिळालं असावं......
त्यातही श्रिमंतांचा ढोल तांब्याचा.
.. हे वेगळ वैभव.... वेगळा नाद....
दुसरी गोष्ट कुडा..... म्हणजे त्याला लावावं लागणारे चामडे.... यात एका बाजुला बैलाच ... काठीने वाजवाण्याचं.... तर दुसर्याबाजूने बकर्याचं कातडं.... हातानं वाजवण्याचं......
आणी खास त्यांना बांधणिसाठी काकर..... बारीक चांबड्याची दोरी न गाठ बांधलेली अखंड काकर... हे ढोलाच्या मालकाचे वैभव....
आता शेवटची गोष्ट.... कुडाप....
म्हणजे ढोल वाजवायची काठी. खास माडाच्या शेल्यापासुन... म्हणजे ज्या भागाला नारळ लटकलेले असतात, त्यापासुन बनवलेले....... अत्यंत मजबुत, हलकी, सहज ऊपलब्ध आणि महत्वाचे म्हणजे अजिबात गाठ नसलेली....
तर असा ढोल जेव्हा देवळात वाजायचा तेव्हा 4 ते 5 किमी सहज ऐकू जायचा.....
आता गेले तेदिवस....
फोटोसुद्धा शोधुन मिळेना या ढोलांचा....
आता महत्वाचा फरक आवाजाचा.... आश्या ढोलातुन येणारा आवाज एका वेगळ्या लयीत रामरामरामरामरामरामराम.
असा आवाज देय़ील... फक्त मन लाऊन ऐका.....
तर आताचे सिंथेटिक ढोल... डमडमडमडम किंवा ढमढमढमढमढमढम असा आवाज देईल....
आणी असाच नाशिक ढोल ताफ्यातला ढोल देवळात वाजतांना सहज एखादा मालवणी म्हातारा बरळतोच....
अरे मायझयानु हयते कसले ढोल.? ... हयते डबे वाजयताय.......
सरले रे ढोलाचे दिवस..... आता रवले ते आठवणी.......
खरच माझ्या कोकणच आणखी एक वैभव काळाआड गेलय....
बापूर्झा.....
डॉ बापू भोगटे....
February 28, 2017
जेव्हा वैद्यकीय व्यवसायाचे व्यापारीकरण असा शब्दप्रयोग केला जातो तेव्हा हसावे की रडावे हे कळत नाही. कोणत्या व्यवसायाचे व्यापारीकरण झाले नाही. कोणत्या क्षेत्रास ह्या व्यापारीकरणाने सोडले आहे. सन्माननिय समजली जाणारी क्षेत्रे उदा. न्याय, शिक्षण, सामाजिक इ. क्षेत्रे यापासून मुक्त आहेत असे म्हणता येईल का.
June 19, 2013
Copyright © 2025 | Marathisrushti