मित्रांनो प्राचीन काळी ऋषींनी संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी अनेक गोष्टी सांगून, करून ठेवल्या आहेत. आज आपण त्यापैकी गायत्री मंत्र आणि तो “संध्या” करण्या बरोबर का जोडला गेला आहे ते पाहू या….
युद्ध म्हटले की बंदुका, तोफा, मशिनगन्स, युद्धनौका,विमाने, बॉम्बस्,गडगडाट, परीसर दणाणून सोडणारे आवाज वगैरे वगैरे डोळ्या समोर येतात. या सर्व गदारोळात संगीत कसे असणार? फार फार तर मिलटरी बॅन्ड एवढाच काय तो संगीताशी संबंध असणारा भाग. बाकी सर्व मन आणि शरीराला भयकंपीत करणारेच असते. भारतीय सैन्यात असाच एक तरूण सामिल झाला होता. इराक मधल्या बगदाद शहरात रायबहादूर चुन्नीलाल नावाच्या श्रीमंत व्यक्तीच्या घरात जन्मलेल्या या तरूणाने बालपणाचा पाच वर्षांचा काळ बगदादमध्येच घालवला होता. १९३२ मध्ये रायबहादूर चुन्नीलाल मुंबईत आले व नंतर सिनेमा व्यवसायतील एक मोठे प्रस्थ बनले. बॉम्बे टॉकीज व फिल्मीस्तान या त्याकाळच्या नावाजलेल्या सिनेनिर्मितीच्या संस्थेत भागीदार झाले. तो तरूण सैन्यात दाखल झाला खरा पण त्या वातावरणात त्याचे मन रमेना. बंदुकीच्या गोळ्या वा मशिनगन्सचे आवाज त्यांच्या कानावर जेव्हा पडत तेव्हा त्याच्या मनात खोल कुठेतरी सतारीच्या तारा झंकारत….अलवार स्वरांचे सूर खुणावत…शेवटी १९४६ मध्ये त्या तरूणाने सैन्यातील नोकरीला बाय बाय केले आणि आपल्या आवडत्या क्षेत्रात काही तरी करावे म्हणून मुंबईला आला.
सुदैवाने येथे त्यानां ऑल इंडिया रेडिओत नोकरी मिळाली आणि येथूनच मदनमोहन कोहली या तरूणाचा संगीतकार मदनमोहन असा प्रवास सुरू झाला. ऑल इंडिया रेडिओमध्ये त्यांची गाठ पडली संगीतातील दोन महान दिग्गजांशी. पहिले शहनाई नवाज उस्ताद बिस्मिला खान व दुसरे उस्ताद फैय्याज खान यांच्याशी. त्याचवेळी संगीतकार रोशन देखील या रेडिओ स्टेशनवर कामाला होते. स्वत: मदन मोहन यांनी रूढर्थाने संगीताचे असे शिक्षण घेतले नव्हते मात्र या नोकरीच्या वास्तव्यात त्यांना या दोन दिग्गजाकडून संगीतातले मर्म आत्मसात केले. मदनमोहन यानां चित्रपटात संधी मिळाली ती मास्टर गुलाम हैदर या संगीतकारामुळे. मात्र संगीत दिग्दर्शनाची नाही तर गाणे गायनाची. ‘शाहीन’ नावाच्या चित्रपटात त्यांनी चक्क लताजी बरोबर ही दोन गाणी गायली. पूढे १९५० मध्ये मात्र संगीत दिग्दर्शनची पहिली संधी आंखे या चित्रपटाद्वारे मिळाली. मात्र पाच सहा वर्षे संघर्षातच गेली.
१९५६ मध्ये आला एव्हीएम या दक्षिणेतल्या प्रसिद्ध बॅनरचा किशोर व अशोक कुमार अभिनीत ‘भाई भाई’ हा चित्रपट. यातील जवळपास सर्वच ११ गाणी खूप गाजली आणि मदनमोहन यांना यशाची पहिली चव चाखता आली. “कदर जाने ना…” “ए दिल मुझे बता दे”….”थंडी थंडी हवा”…ही गाणी आजही रसिकांच्या ओठावर सहज येतात. बेगम अख्तर हा मदनमोहन यांचा विक पॉईंट. त्यांच्या गझला आणि भारतीय वाद्ये त्यांच्या नसानसात भिनलेले होते. मुशायरात म्हटली जाणारी गझल व नज्म त्यांनी चित्रपटात आणली, तेथून ती प्रेक्षकाच्या घरात व हृदयात पोहचली. याचे श्रेय संगीतातील सर्वच दिग्गज संगीतकार खुल्या मनाने मदनमोहन यानां देतात ते योग्यच आहे.
त्यानां क्रिकेटचेही अफाट वेड होते. आताचे ब्रेबॉन स्टेडियमच्या जागी पूर्वी एक मोकळे मैदान होते जिथे तासन तास मदनमोहन क्रिकेट खेळत असत. बेगम अख्तरचे सूर, सैन्यातील कठोर शिस्त आणि क्रिकेटचं वेड हे तिन्ही गुण त्याना संगीत देतानां खूप उपयोगी पडले. एस.डी.बर्मन व सी.रामचंद्र यांच्याकडे त्यांनी सुरूवातले सहाय्यक म्हणून काम केले पण त्यांच्या संगीतावर मात्र त्यांचा प्रभाव पडला नाही. अतिशय मोजक्या वाद्यमेळासह ते आपले गाणे तयार करत. सतार, तबला ढोलकी, सॅक्सोफोन यांचा अप्रतिम वापर त्याच्या संगीतात बघायला मिळतो. त्यामूळे गायकांच्या गाण्याचे आवाजाचे सर्व तपशील त्यांच्या गाण्यात आढळून येते. ‘अनपढ’ चित्रपटाचे ‘आप के नजरोमे समझा प्यार के काबील मुझे’ या एका गाण्याच्या मोबदल्यात संगीतकार नौशाद आपला गाण्याचा सर्व खजिना लुटायला तयार होते. ‘हकीकत’या युद्धाची पार्श्वभूमी असलेल्या चित्रपटातील रफीचे ‘कर चले हम फिदा जानोतन साथीयों…..’ हे गाणे म्हणजे त्यांनी भारतीय सैन्याला दिलेली मानवंदनाच आहे. तर याच चित्रपटातील ‘हो के मजबूर मुझे उसने भुलाया होगा’…….हे गाणे म्हणजे भारतीय जवानांच्या हृदयाच्या छेडलेल्या ताराच आहेत. ‘नैनिहाल’ मधील ‘मेरी आवाज सुनो’ हे रफीचे गाणे पंडीत नेहरूनां अर्पण केलेले गाणे होते….उस्ताद रईस खान यांच्या सतारीचा वापर अनेक गाण्यात त्यांनी इतका अप्रतिम केला आहे की स्वत: लता दीदी ‘आज सोचा तो आंसू भर आये’ या गाण्यातील सतारीचे सूर ऐकून हळव्या झाल्या होत्या. ‘वो चूप रहे तो’(जहाँ आरा)….’रस्मे उल्फतमे’(दिल की राहे)…..’नैनो मे बदरा छाये’(मेरा साया)….या गाण्यातील सतारीचे सूर आजही अंग मोहरून टाकतात.
राजा मेंहदी अली खान, राजेन्द्र कृष्ण आणि कैफी आजमी या तिन गीतकारां सोबत त्यांचे खूप सुंदर असे टयुनिंग होते. यांच्या सोबत केलेली सर्वच गाणी खूप गाजली. त्यांनी संगीत दिलेल्या चित्रपटातील काही चित्रपट वगळता सर्वच खूप ब्लॉक बस्टर असे नव्हते. मात्र त्या चित्रपटातील गाणी खूप गाजली. लोक चित्रपट विसरले पण गाणी नाही विसरले. जवळपास १०० चित्रपटानां संगीत दिलेल्या मदनमोहन यानां पुरसकार मात्र कमीच मिळाले. १९७० मधील आलेल्या “दस्तक” चित्रपटातील “बयाँ ना धरो या गाण्याने” मात्र त्यानां राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला. ‘आप की नजरो ने समझा’…(अनपढ) आणि ‘लग जा गले की’…(वह कौन थी?) या दोन गाण्यानां फिल्म फेअर नॉमिनेशन मिळाले पण पुरस्कार नाही मिळाला. अनेकदा अनेकानां नाही मिळत पुरस्कार पण त्यामुळे त्यांच्या स्थानाला काहीच धक्का पोहचत नाही. ….आजच्या काळातही जेव्हा एक १०-११ वर्षांची मुलगी अत्यंत तन्मयतेने “लग जा गले की आज ये”….. गाऊ लागते तेव्हा तिला हेही माहित नसते की ज्या संगीत दिग्दर्शकाचे ती गाणे गात आहे त्याकाळात तिच्या वडीलांचाही जन्म झाला नसेल. काही संगीतकार, साहित्यीक वा विचारवंत हे कालातीत असतात. खरं तर ५१ वर्षे हे काही असं एक्झीट घेण्याचं वय नाही. मदनमोहन खूप लवकर हे जग सोडून गेले.. त्यांच्या मृत्यू नंतर अनेक गझला, नज्म, कविता, शायरी यानां अनाथ् झाल्या सारखं वाटलं असेल.
-दासू भगत (२५ जून २०१७)
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती यावर्षी साजरी होत आहे. यानिमित्ताने संयुक्त राष्ट्र संघाच्या (युनो) मुख्यालयात एक दिमाखदार सोहोळा होणार आहे.
युनोमध्ये डॉ. आंबेडकर यांची जयंती पहिल्यांदाचा होणार असून या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळाही उभारला जाणार आहे.
युनोमध्ये कल्पना सरोज फौंडेशन आणि फौंडेशन फॉर ह्युमन होरायझन यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती साजरी केली जात आहे.
या संदर्भात भारतीय प्रशासनाला युनोच्यावतीने देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, भारतातील अब्जावधी लोकांचे आयकॉन असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती जगभर पोहोचवण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी जगभरातील ४० देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
या सोहळ्याच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारा जपण्यासाठी समाजात काम करणाऱ्या जगभरातील मान्यवरांचा सत्कार होणार आहे. अशा १२५ जाणांची जगभरातून निवड केली गेली आहे. डॉ. आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त १२५ जणांना त्यांच्या नावाचा ‘डॉ. आंबेडकर रत्न पुरस्कार’ दिला जाणार आहे.
संयुक्त राष्ट्र संघाच्या मुख्यालयात सध्या नेलसन मंडेला आणि मार्टिन ल्युथर किंग यांचे पुतळे आहेत. या ठिकाणी आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारला जाणार आहे. ही बाब तमाम भारतीयांसाठी आणि मराठी माणसांसाठी अभिमानाची आहे.
यासाठी कल्पना सरोज यांनी पुढाकार घेतला आहे. युनोच्यावतीने त्यासंदर्भात त्यांना मान्यता दिली गेली आहे. प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर डॉ. आंबेडकर यांचा पुतळा त्या ठिकाणी उभारला जाईल.
स्त्री-पुरुष संबंधांचा व त्यांच्यातील नात्याचा गाभा काय, याचा शोध घेण्याचा प्रयत्न आजवर अनेकांनी केला आहे आणि अजूनही करत आहेत. स्त्री-पुरुषांचे शारीरिक मीलन अपत्यप्राप्तीपर्यंत जाते. म्हणून त्यांच्यातील नाते नैसर्गिक आहे, अशी पुरुषी समाजाची धारणा असते. पण जे नैसर्गिक आहे, ते नैतिक कशावरून? स्त्री-पुरुष संबंध नैसर्गिक अवस्थेत परिपूर्ण असू शकत नाहीत. त्यावर प्रेम, आदर, समानता हे संस्कार झाले, तरच ते नैतिक होतात. निव्वळ नैसर्गिक संबंध ही प्रकृती आणि अनैसर्गिक मार्गाने मिळालेले सुख ही विकृती होय. पण जेव्हा या संबंधांवर प्रेम, विश्वास आणि आदर याचा साज चढवला जातो, तेव्हाच ती संस्कृती ठरते.
माझा पहिला प्रयत्न
विरहाचया वणव्यात पेटलेल्या मनाच एक गाण.
संध्याकाळी पावणेसातची वेळ, ठाणे स्टेशन. ठाण्याहून सुटून बदलापुरला जाणारी ६.५१ ची गाडी ३ नंबर प्लॅटफॉर्मच्या इंडिकेटरवर लागलेली, पण प्रत्यक्षात लांबून नुसते लाइटचे डोळे मारत होती. स्टेशनात माणसांचा पूर ! ट्रान्सहार्बर लाईनवाले, बोरिवली - ठाणे बसने आलेले, सी.एस.टी.हून येऊन मुद्दाम या गाडीसाठी ठाण्याला उतरलेले असे वेगवेगळ्या ठिकाणचे थकलेभागले जीव गाडीकडे डोळे लावून उभे होते. दुनिया गेली तेल लावत, कुणाचं काही का होईना, आत्ता मला घरी पोचायचय अशी भावना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होती. ६.५१ ला सुटणारी गाडी ६.५० ला फलाटावर लागली आणि धडाधड उड्या मारून लोक गाडीत चढले. सगळ्या सीटस् फुल झाल्या. दरवाजे सुद्धा लोकांनी ब्लॉक केले. जिथे तीनच माणसं आरामात उभीयेत असे काही मोजके दरवाजे उरले होते जिथून माणसं आत जायला वाट काढत होती. आता कुठल्याही क्षणी गाडी सुटायला हवी, पण तो क्षण येणार कधी अशा विचाराने माणसं सिग्नलकडे डोळे लावून बसली होती. इतक्यात उतरत्या जिन्यावरून एक कुटुंब जवळपास धावत फलाटावर उतरत होतं. एक उंचापुरा, धिप्पाड जवान. त्याच्या हातात एक ट्रॉलीवाली जड बॅग आणि खांद्यावर एक मोठी सॅक होती. त्याच्या बरोबर बांधणीचा, सुती पंजाबी ड्रेस घातलेली एक मुलगी, त्याची बायकोच होती ती. तिच्या खांद्यावर आठ- नऊ महिन्यांचं एक गुटगुटीत बाळ खांद्याला घट्ट मिठी मारून गाढ झोपलं होतं. त्याचं बाळसं थेट बाबासारखं होतं. आणि त्यांच्याबरोबर एक टिशर्ट घातलेला पोरगेलसा तरुण, बहुतेक तिचा भाऊ. ते प्लॅटफार्मवर पोचले आणि तो उंचापुरा तरुण पटकन् समोर असलेल्या तीन माणसं उभी असलेल्या दरवाजातून आत शिरला. त्या दरवाज्याला थोडी गर्दी कमी होती. तरी ती बॅग आत घेताना त्याची थोडी झटापटच झाली. त्याच्याबरोबरचा तो मुलगा म्हणाला, " कल्याणला उतरता येईल का रे ह्या गाडीने? " तो तरुण झटकन तोंड वळवून दरवाजाजवळच जागा मिळाली तिथे उभा राहिला आणि बायको कुठे दिसतेय ते बघायला लागला. एकूणात दिसत असं होतं की, त्याला अनपेक्षितपणे सुट्टी संपवून, सगळा बाडबिस्तरा गुंडाळून घरून निघायला लागलं होतं. बहुतेक सैन्याची नोकरी होती आणि ताबडतोप हजर राहायचं फर्मान आलं होतं. काय असेल ते, पण बऱ्याच काळाने आला होता, थोडाच काळ थांबला होता आणि बऱ्याच काळासाठी लगेच निघून जात होता एवढं नक्की. इकडे गाडी सुटायच्या आधी झटकन् पाण्याची बाटली घ्यायला म्हणून प्लॅटफॉर्मवरचा तो मुलगा स्टॉल शोधायला गेला आणि पुढच्याच क्षणी दरवाज्याजवळ उभा असलेला तो उंचापुरा तरुण आणि प्लॅटफॉर्मवर उभी असलेली त्याची बायको ह्यांची नजरानजर झाली.आता हा आपल्याला परत कधी भेटणार हे भाव तिच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होते. त्याने तिच्याकडे बघून, " चल निघतो" अश्या अर्थाने मान वळवली आणि तिच्या डोळ्यात टचकन् पाणी आलं. एवढं नितळ पाणी गालावरून ओघळताना मी अलिकडे पाहिलच नव्हतं. नकळत, मी स्तब्ध !
तेवढ्यात त्याने तिच्याकडे बघून बाळाकडे हात दाखवत काहीतरी खूण केली. बाळ प्लॅटफॉर्मवरच्या गोंगाटाची तमा न बाळगता गाढ झोपलेलं होतं. तिनं अधीर होत बाळाला उठवायचा प्रयत्न केला. बाळानं अजिबात दाद लागू दिली नाही. ती हताश झाली. इतक्यात गाडीचा हॉर्न वाजला आणि गाडी सुटली. त्याने दरवाजातून बाहेर डोकावत आतून नाईलाजाने हात हलवला. तितक्याच नाईलाजानं बाळाला पुन्हा हलवत ती म्हणाली, " तो बघ, बाबा टाटा करतोय तुला. " अचानक बाळाने मान वर केली आणि डोळे तसेच बंद ठेवून ते खुदकन् गालातल्या गालात हसलं आणि पुढच्याच क्षणी पुन्हा निवांत झालं. पुढच्या क्षणी त्या तरुणाच्या डोळ्यात ज्यांचं वर्णन नेमकं शब्दात करता येणार नाही असं काहीतरी दिसायला लागलं. जेमतेम दोन - तीन मिनीटात हे घडून गेलं. पण जे पाहिलं ते पुर्वी कधीच अनुभवलेलं नव्हतं. बाळाकडे पाहात हात हलवणारा तो उंचापुरा तरुण, टचकन् डोळ्यात पाणी आलेली ती बांधणीच्या सुती ड्रेसमधली सहधर्मचारिणी आणि गालातल्या गालात क्षणभरासाठीच खुदकन् हसलेलं ते बाळ यांचे चेहरे मला जसे दिसले तसे दाखवणारे इमोटिकॉन्स अजून वॉटस् अॅप किंवा फेसबुकवर मला सापडत नाहीयेत !
..............................
©डॉ. प्रसाद भिडे
..............................
फेसबुकवरुन आलेला हा लेख. आवडला म्हणून शेअर केला..
बागेतील तारका- थांबव, विज्ञाना तुझे शोध
हकार कायद्यातील नविन बदलानुसार, वार्षिक सर्वसाधारण सभा भरवण्याकरिता मुदतवाढ देणेची तरतूद नाही. परंतु, कोव्हीड-१९ च्या पार्श्वभुमीवर कायद्यात केलेल्या बदलाने सर्व गृहनिर्माण संस्थांना वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यास ३१ मार्च, २०२१ पर्यंत सुट देऊन मोठा दिलासाच दिला आहे. तसेच, काही मार्गदर्शक सुचना देखील केल्या आहेत. तथापि, सदर सुचना सर्वसामान्य सदस्यांना माहित नसल्याने बरेच गोंधळून जातात. कायदे तज्ञाचा सल्ला न घेता, इतर कमेटी सदस्यांचा विचार न करता फक्त स्व:ता कायद्याच्या बडग्यापासून वाचण्यासाठी कमेटी सदस्यत्वाचा राजीनामा देतात.
Copyright © 2025 | Marathisrushti