राशी :- तूळ
स्वामी :- शुक्र
देवता :- भगवान राम
जप मंत्र :- ॐ श्री रामाय नमः
उपास्यदेव :- दुर्गा देवी
रत्न :- हीरा
जन्माक्षर :- र रा ऋ री रि रु रू रेरो त ता तृ त्रा ति ती तु तू ते तूळ हा एक अंतराळातील तारका समूह आहे. बारा राशीतली ही एक ज्योतिष-राशी आहे. यावर शुक्र (ज्योतिष) ग्रहाचा अंमल आहे. तूळ रास कुंडली मध्ये ७ आकड्याने दर्शवतात. ही वायू तत्व असलेली रास आहे.चित्रा नक्षत्राचा तिसरा व चौथा चरण, स्वातीचे चारही चरण व विशाखाच्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय चरण मिळून ही राशी बनते. या व्यक्ती आकर्षक, सुंदर, प्रेमळ, कष्टाळू, सौंदर्यप्रेमी, न्यायप्रिय, आणि नीतिवान असतात.अंतःकरण जाणून घेण्याची हातोटी दिसून येते.
भावाने पुन्हा पोलीस स्टेशनला जाऊ का ? अशी धमकी दिल्यावर की गुपचूप त्याच्यासोबत चालू लागलो होतो खरा, पण आता पैसे कसे मिळवावेत याबद्दल डोक्यात किडा वळवतच होता . घराबाहेर रस्त्यावर असल्याने आता मी पुन्हा पैसे मागितले तर भाऊ तसाच मागे वळून पोलीस स्टेशनला जाणार यात शंकाच नव्हती ,आणि त्याला रस्त्यावर अडवणे म्हणजे गर्दी जमा करणे होते , नुकतेच मला साहेबांनी समज देऊन सोडले होते व परत लगेच त्याने जाऊन माझी तक्रार केली असती तर मला रात्रभर कोठडीत रहावे लागणार यात वादच नव्हता , मग मी असा विचार केला की आता आधी घरी जाऊ व मग एकदा घरी गेली की पुन्हा पैसे मागू या वेळी भावाला काही पोलिसांकडे जाऊ द्यायचे नाही तर अडवून ठेवायचे मग मारामारी झाली तरी हरकत नाही पण कसेही करून पैसे मिळवलेच पाहिजेत , सायंकाळपासून जे मरण्याचे नाटक सुरु केले होते त्या नादात ' टर्की ' फारशी जाणवली नव्हती , पण आता परत त्रास सुरु झाला होता ...
घरी पोचल्या बरोबर मी आधी दाराला आतून कडी लावून घेतली आणि दाराजवळच ठाण मांडून बसलो आणि भावाला म्हणालो ' तू फक्त शंभर रुपयांसाठी घरापर्यंत पोलीस आणलेस , सगळीकडे माझी बदनामी झाली , आता सगळ्यांना मी व्यसनी आहे हे माहित पडले असेल , तुलाही हेच हवे होते ना ? पण आता तरी पैसे दे , ' भावाला हे अनपेक्षित होते त्याला वाटले होते पोलसांनी दम दिल्यावर आता हा शांत बसेल . आता तो बाहेर पुन्हा पोलीस स्टेशनला जाऊ शकत नव्हता कारण मी सावध होतो आणि दारापाशीच ठाण मांडून बसलो होतो , जर त्याने मागील दाराने जाण्याचा प्रयत्न केला असता तरी मी त्याला पकडून अडवले असते , आणि मी किती खुनशी आहे हे त्याला चांगले ठाऊक होते ..
एकदा लहानपणी आभ्यास करताना असेच काहीतरी कारणावरून माझे आणि त्याचे भांडण झाले होते तेव्हा तो मला एक फटका मारून पळत असतांना मी हातात असलेले कर्कटक ( ज्याला दोन्ही बाजूनी टोके असतात ) त्याला पाठीवर फेकून मारले होते आणि ते त्याच्या पाठीत रुतून बसले होते , तसेच माझ्या बाहेरच्या मुलांसोबत झालेल्या मारामा-यांच्या वेळी भवरे खेळताना एकाच्या डोक्यात भव-याची आरी ( पुढील अणुकुचीदार टोक ) मारून त्याला रक्तबंबाळ केले होते , तर एकदा विटीदांडू खेळताना दांडूने एकाचे डोके फोडले होते, त्यामूळे भाऊ माझ्याशी झटपट करणे अशक्य होते . सुमारे रात्रीचे साडेबारा वाजले होते आणि पुन्हा घरात माझही कटकट सुरु झालेली अनेक प्रकारचे आरोप आणि पैसे मागणे चालूच होते सगळी मंडळी त्रासून गेली होती , बहिण म्हणाली मी ' चार दिवस माहेरी आले तर तू काही मला सुखाने इथे राहू देत नाहीस , मी जाते उद्याच परत " तरी माझा भाचा आणि भाची बिचारी लहान असल्याने घाबरून नुसतीच सगळ्यांच्या तोंडाकडे टकामका पाहत होती व जरा आमचे आवाज वाढताच रडत होती..
इतक्यात पुढचे दार बाहेरून कोणीतरी वाजवले , मी खूप घाबरलो , इतक्या रात्री कोण म्हणून , पण पुढे होऊन दार उघडण्याची हिम्मत नव्हती माझी , पुन्हा पोलीस आलेत की काय ही शंका होती , वडील पुढे झाले आणि त्यांनी दार उघडले तर दारात माझा मित्र उभा होता ( हा माझा लहान पणा पासूनचा मित्र , रेल्वे क्वार्टर्सच्या समोरच्या स्टेशन वाडीत राहायचा आणि तो देखील माझ्यासारखाच बिघडलेला होता , तो माझा गांजा , दारू , गर्द या सगळ्या व्यसनात आणि इतर अनेक बाबतीत पक्का साथीदार होता , याच्या वरूनच मी अय्युबशी मारामारी केली होती, १२ वी नंतर याचे वडील गेल्याने याला त्यांच्या जागी प्रेस मध्ये नोकरी लागली होती , त्यामूळे व्यसनासाठी पैसे मिळवण्यात त्याला काही अडचण येत नसे ) तो एकदम मला रागवत म्हणाला ' काय रे तुषार , काय नाटक चालवले आहेस तू हे , किती त्रास देतोस घरच्यांना ? , हे चांगले नाही " असे बोलताना त्याने माझ्याकडे पाहत हळूच डोळा मारला , मग म्हणाला ' चल जरा बाहेर रेल्वे स्टेशनवर फिरून येऊ , जरा शांत होशील " त्याच्या डोळा मारण्याचा अर्थ मला समजला होता माझ्या ब्राऊन शुगरची सोय होणार होती .
आई आणि भाऊ देखील लगेच त्याला म्हणाले ' हो रे बाबा , याला जरा समजाव चांगले , सकाळपासून आमचे डोके खातो आहे ' .मी लगेच चप्पल घालून बाहेर पडलो ,बहुधा सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला असावा . बाहेर रेल्वे स्टेशनवर पार्सल विभागाच्या मागे जेथे पार्सलची पोती वगैरे ठेवलेली असत तिथे कधी कधी आम्ही ब्राऊन शुगर ओढायला बसत असू त्या ठिकाणी मित्राने मला नेले आणि मग खिश्यातून ब्राऊन शुगरच्या पुड्या काढल्या म्हणाला ' मी जरा नशिक शहरात मामा कडे गेलो होतो माझ्या , आता घरी आलो तर समजले की तू काहीतरी भानगड केलीस , पोलसांनी धरून नेले , आधी पोलीस स्टेशनला गेलो , तिथे चौकशी केल्यावर समजले की तूला सोडून दिले , मला माहित होते तू नक्की टर्कीत असशील , म्हणून तुला पाजायला आलो " मला एकदम हायसे वाटले. वा मित्र असावा तर असा .
आम्ही दोघे गप्पा मारत ब्राऊन शुगर प्यायलो माझा त्रास बंद झाला . सुमारे तासाभराने मी घरी आलो तेव्हा एकदम शांत झालेला होतो . घरच्या लोकांनाही नवल वाटले की मित्राने याला असे काय समजावले की एकदम शांत झाला . सगळे समाधानाने झोपी गेले , मात्र मी जागाच होतो ' सकाळी भाऊ कामावर गेल्यावर , मला नक्की पैसे मिळतील याचा विचार करत होतो तसेच आता आपल्याला पैसे मिळणे दिवसेंदिवस अधिक कठीण होत चालले आहे तेव्हा एखादी नोकरी केली पाहिजे असा निश्चय मनाशी केला .मात्र दुसऱ्या दिवशी घडले भलतेच.
( बाकी पुढील भागात )
-- तुषार पांडुरंग नातू
दरवर्षी होणार्या साहित्य संमेलनामधील एक लोकप्रिय घटक म्हणजे विविध परिसंवाद. या परिसंवादांमध्ये वक्ते बोलतात.. श्रोते ऐकतात. पण श्रोत्यांना आपली मतं मांडण्याची संधीच कुठे उपलब्ध नसते. आपल्याला असं नाही का वाटत…. आपल्यालाही इथं संधी मिळावी? अनेकांना वाटतंही. पण सांगणार कोणाला?
प्रत्यक्ष संमेलनाच्या व्यासपीठावर नाही तर नाही.. पण निदान आपल्या मराठीसृष्टीद्वारे हजारो वाचकांपर्यंत ही मतं मांडण्याची सोय आता उपलब्ध आहे. आपली ही मतं आम्ही थेट पोहोचवणार आहोत संमेलनाच्या आयोजकांपर्यंत.. आणि पर्यायाने या परिसंवादांच्या वक्त्यांपर्यंतही…
‘बिग बॉस’ मधील उत्तान, अश्लील चाळे आणि ‘राखी का इन्साफ’ मधील असभ्य, मानहानीकारक वक्तव्ये यामुळे या दोन्ही कार्यक्रमावर बंदी घालण्याची मागणी पुढे आली. त्या निमित्ताने वाहिन्यांवर अंकुश ठेवण्याचाही मुद्दा ऐरणीवर आला. खरे तर वाहिन्यांवरील कार्यक्रमाच्या प्रसारणावर कायद्याने अंकुश ठेवायला हवा किंवा त्या संदर्भात आचारसंहिता तयार करून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हायला हवी.
तरुणांचे मानसिक आरोग्य सांभाळा....
आज जागतिक मानसिक आरोग्य दिन !
या वर्षा साठी WHO ने थीम दिलीय ते बदलत्या जगात तरुणांचे मानसिक आरोग्य .....
या जगात शाश्वत फक्त 'बदल' आहे. कधी तो खूप हळू असतो तर कधी खूप जोरात. इंटरनेट च्या भन्नाट क्रांती ने हल्ली जग भयंकर वेगाने बदलत आहे. 6 महिन्यांपूर्वी नवल असलेली गोष्ट आजच out dated होते आहे. या बदलत्या जगात या वर्षी WHO ने दखल घेतली आहे ती तरुणांची....
आजची तरुण पिढी गृहीत धरली आहे ती वयवर्षं 14 ते 29. मुळात या वयात जग बदलू अथवा न बदलू पण त्यांच्या अंतर्गत मनपटला वर त्यांचं स्वतःच सारं विश्वच बदलत असतं. शारीरिक आणि मानसिक स्थित्यंतरे होतात ती नेमकी याच वयात. अंतर्गत सोबत बाह्यजग देखील झपाट्याने बदलत असेल तर त्यांना तो वेग साधावाच लागतो. नाहीतर मागे पडतात मग गर्तेत जातात.....
तरुण म्हणजे घराचे आणि राष्ट्राचे भावी आधारस्तंभ ! या स्थंभा चा पायच कमजोर राहिला तर तो इतरांना सोडा, स्वतःला देखील आधार देऊ शकत नाही. कधी ते व्यसनांच्या जाळ्यात अडकतात तर कधी आत्महत्या करतात. वाममार्गाला जाऊन स्वहस्ते स्वआयुष्याला तिलांजली देतात.
WHO ने दिलेली वयोमर्यादा पाहता, 30शी ओलांडलेल्या प्रत्येक व्यक्तीवर कळत नकळत पालकत्व येतं. मग त्या मुलांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणं प्रत्येकाचं कर्तव्य ठरतं. राहिलं आजूबाजूच्या, कामाच्या ठिकाणच्या किंवा समोर दिसणाऱ्या पण किमान आपापल्या Friend List मधील जे तरुण आहेत त्यांची काळजी घेणं तर आपल्याला शक्य आहे न? हात पुढे करा, कुणीतरी गरजवंत नक्की पकडेल !
करून तर बघा, तुम्हाला स्वतःला स्वतःचे मोठेपण जाणवेल. तुम्हाला स्वतःचा अभिमान वाटेल. एक वेगळं समाधान लाभेल.....
तळ टीप :- 70/80 विषयावर हलक्या फुलक्या पोस्ट लिहिल्या नंतर आज एका जड विषयावर, जड भाषेत भाष्य करण्याचे कारण, सर्व FB परिवाराला समजावे की,
मी हुशार आणि बुद्धिजीवी वग्रे सुद्धा आहे.
अधून मधून अशी वैचारिक पोस्ट टाकली तर त्या लोकांना "साहित्यिक" म्हणून मान्यता देखील मिळते, म्हणे...
विनोद डावरे, परभणी.
##सहजच सुचलं - 81
नववर्षाच्या शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने एका मित्राला फोन केला. शुभेच्छा दिल्यानंतर सगळे म्हणतात तसं तो मला ‘सेम टू यू’ म्हणेल या आशेने मी काही क्षण थांबलो. पण कसलं काय, तो अत्यंत त्रासिक आवाजात चिरकला ‘अरे, कोणतं नविन वर्ष? कोणाचं नविन वर्ष? हे त्या इंग्रजांच्या बाळांचं नववर्ष आहे, आपलं नाही. आपलं नववर्ष सुरु झालं की शुभेच्छा दे.’ असं म्हणून त्याने रिसीव्हर आदळला. मी त्याचा कडवट झालेला चेहरा डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करू लागलो. माणसं काही कारण नसताना अशी सतत वैफल्यग्रस्त असल्यासारखी का वागतात? त्यांना आनंदाची अॅलर्जी असते का? थोडंही नाउमेद न होता 'मित्र' नावाच्या आणखी एका प्राण्याला फोन लावला. शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद देण्याचं सौजन्य त्याने दाखवलं खरं, पण त्याचबरोबर ‘आम्ही एक जानेवारीला नाही, तर गुढीपाडव्याला नववर्षाचा आनंद मनवणार आहोत’ हे सांगायला तो विसरला नाही. मला माझ्या अनेक मित्र-मैत्रिणींना नववर्षाच्या शुभेच्छा द्यायच्या होत्या, पण ‘हे नववर्ष आमचं नव्हे’ हे ऐकून माझा उत्साह हळूहळू मावळू लागला.
आम्ही असे का वागतो? आयुष्याच्या क्षणभंगूरतेची यथार्थ जाणीव असल्यामुळे स्वतःच्या विवंचना विसरण्यासाठी एकत्र येऊन चार घटका आनंद मनविण्यासाठी मुद्दाम घडवून आणल्या जाण्याऱ्या विविध आनंदोत्सवांना धर्म आणि जातींमध्ये बुडवून काढण्याची आम्हाला का इच्छा होते? एका धर्माचे लोक आनंद मनवत असताना दुसऱ्या धर्माच्या लोकांनी त्यावेळी आनंद मनवू नये असं कोणत्या धर्मग्रंथात लिहिलं आहे? एखाद्या महोत्सवाचा खऱ्या अर्थाने आनंद लुटण्यासाठी तो महोत्सव आधी ‘आपला’ असायला पाहिजे ह्यालाच सर्वधर्मसमभाव म्हणायचं का? आनंद वाटण्याऐवजी आम्ही आनंदोत्सवांना वेगवेगळ्या प्रकारची लेबलं लावून त्यांच्या वाटण्या करतो आणि त्यानंतर आनंदी राहायचं की दिवसभर आंबट चेहरा करून बसायचं हे ठरवतो. ज्यांना भूतकाळात खितपत पडायची सवय नसते त्यांच्यासाठी आयुष्यातला प्रत्येकच दिवस हा नववर्षाचा पहिला दिवस असतो !
केवळ ‘आमच्या’ नव्हे आणि ‘त्यांच्याही’ नव्हे तर ‘आम्हा सर्वांच्या’ नववर्षानिमित्त सर्व मित्र-मैत्रिणींना मन:पूर्वक शुभेच्छा !
-- श्रीकांत पोहनकर
98226 98100
shrikantpohankar@gmail.com
शनिवारवाड्यातील गणेश महालात इंग्रज व पेशवे यांच्यात १७९० मध्ये ऐतिहासिक तह झाला होता. इंग्रज अधिकारी चार्ल्स मॅलेट आणि सवाई माधवराव पेशवे यांच्यातील या तहाचे हुबेहूब चित्र इंग्रज चित्रकार थॉमस डॅनिअल यांनी या तहानंतर १५ वर्षांनी काढले. विशेष म्हणजे थॉमस डॅनिअल या तहाच्यावेळी पेशव्यांच्या दरबारात उपस्थित नव्हते. तरी त्यांनी काढलेले हे चित्र अजरामर ठरले. याचे कारण थॉमस डॅनिअल यांचा बारकाईने अभ्यास करण्याची वृत्ती आणि त्यांची सृजनशीलता.
विशेष म्हणजे मॅलेटने सुरुवातीला हे चित्र काढण्याची जबाबदारी जेम्स वेल्स या स्कॉटिश चित्रकारावर टाकली होती. जेम्स वेल्सच्या निधनानंतर १७९५ मध्ये ती जबाबदारी थॉमस डॅनिअलच्या शिरावर आली. कॅनव्हासवर तैलरंगात काढलेले हे चित्र थॉमस डॅनिअल यांनी १८०५ मध्ये पूर्ण केले. थॉमस डॅनिअल यांनी हे चित्र इंग्लंडमध्ये काढले आणि त्यासाठी त्यांनी अनेकदा भारतात प्रवास केल्याची नोंद आहे.
हे दुर्मिळ चित्र सुमारे दोनशे वर्षे उपलब्ध झाले नव्हते. इंग्लंडमधील टेट या आधुनिक चित्र संग्रहालयात काही वर्षांपूर्वी प्रदर्शित करण्यात आल्यावर ते पुन्हा जगासमोर आले. या चित्राच्या फोटोकॉपीवरुन भारतीय संशोधकांनी त्याचा बारकाईने अभ्यास केला. १९७७ मध्ये महाराष्ट्र टाइम्सच्या दिवाळी अंकात 'एक दरबारचित्र आणि चरित्र' या लेखाद्वारे द. ग. गोडसे यांनी या चित्रावर प्रकाशझोत टाकला होता.
एक कलाकृती म्हणून हे चित्र अमूल्य असले तरी अभ्यासकांना त्यात अनेक विसंगती आढळल्या. शनिवारवाड्याच्या गणेश महालातील खांब सुक्ष्म कोरीव नक्षीकामाने सजवण्यात आले होते. पण थॉमस डॅनिअल यांच्या चित्रातील खांब रोमन पद्धतीचे दिसतात. महालाच्या छतावर दाखवण्यात आलेल्या गायी परदेशाती तोंडावळ्याच्या आहेत. पेशव्यांच्या दरबारात येताना जोडे बाहेर काढून येण्याचा रिवाज होता, पण या चित्रात इंग्रज अधिकारी चार्ल्स मॅलेट मात्र जोडे घालून बसलेला दिसतो. अशा अनेक विसंगती असल्या तरी चित्राचे महत्व कमी होत नाही.
इंग्लंडमधील “टेट” या आधुनिक चित्रसंग्रहालयातील हे चित्र पाहण्यासाठी लिंक:
भारतीय संगीतातील सात सूर कोणाकडुन, कसे आले ह्याबाबत एका संस्कृत श्रुती साहित्यात उल्लेख आहे असं ‘केसराचा पाऊस’ ह्या मारुति चितमपल्लींच्या पुस्तकात वाचलं
कुमार दिघे यांचा जन्म ११ ऑक्टोबर १९३३ रोजी कराची येथे सीकेपी कुटुंबात झाला .त्यांच्या आधीच्या चार पिढ्या कराची येथे रहात होत्या .फाळणीमुळे कुमार दिघे पुणे येथे आले व मामाच्या आश्रयाने राहू लागले .त्यांनी एस .पी .महाविद्यालयातूनएम .ए .पर्यंत शिक्षण पूर्ण केले .शिक्षण घेत असतानाच कुमार दिघे अभिनयाच्या क्षेत्राकडे आकर्षित झाले
नव्या मंत्रिमंडळाच्या स्थापनेचा मुहूर्त निश्चित झाला की त्यातील खात्यांविषयी स्पर्धा सुरू होते. मंत्र्यांच्या दृष्टीने विशिष्ट खाती खास महत्त्वाची असतात. अशी खाती निधीचा मोठा ओघ असणारी असतातच पण मलिदा खाण्यासाठी सहाय्यभूत ठरतात. त्याच वेळी मंत्रिमंडळात नाईलाजाने घ्यावे लागलेल्यांच्या पदरी ‘उपेक्षित’ खाती टाकली जातात. असा हा खातेवाटपाचा खेळ नेहमीच रंगत राहतो.
Copyright © 2025 | Marathisrushti