(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • जानेवारी तीस नंतर….

    श्री वसंत चिंचाळकर हे नाव ललित लेखनाच्या वाचकांना सुपरिचित आहे. निरनिराळ्या वृत्तपत्रांमधून, मासिकांमधून प्रसिद्ध होणारे त्यांचे लेखन हे चोखंदळ वाचकांच्या पसंतीस उतरलेले आहे. समाजातील स्थित्यंतरांचा त्रयस्थपणे वेध घेणारी पत्रकाराची नजर, मूल्यांच्या होत जाणार्‍या र्‍हासामुळे तळमळणारे संवेदनशील मन आणि या दोहोंची यथार्थ सांगड घालणारी बुद्धी यांचा त्रिवेणी संगम चिंचाळकरांच्या या कथांमधून वाचकाला दृष्टीस पडतो.

    जानेवारी ३० नंतर….

    लेखक – वसंत चिंचाळकर

    पाने – १६० ; किंमत- रु. १७५

    नचिकेत प्रकाशन

    ऑनलाईन खरेदी करा

  • संगीतकार कौशल इनामदार

    ‘आपल्याला संगीत जमते’, इतकेच नव्हे तर ते करण्यात आनंद मिळतो, हे ध्यानात आल्यानंतर कौशल इनामदार यांनी ‘शुभ्रकळ्या मूठभर’ हा कार्यक्रम केला. अनेक ‘साहित्यिक मूल्ये’ असणार्या कार्यक्रमांबरोबरच त्यांनी ‘मिस इंडिया’सारख्या कार्यक्रमाला दिलेले संगीतही यशस्वी ठरले.

  • नवं जीवन-धर्म

    प्रसिद्ध वैद्यानिक अल्बर्ट आइन्स्टाईन च्या पत्नीस वाटे कि आपल्या पतीला गणित येत नाही व तसेंच दिशे बद्दलचे ज्ञान अगदीच नाही असा समज होता. जेव्हा आइन्स्टाईन बाजार हाट व खरेदी करण्यास जात असत तेव्हा त्यांची पत्नी संपूर्ण खरेदीचा हिशेब करून व त्यांना समजावून सांगे आणि लिस्ट प्रमाणेच आणण्याची ताकीद पण देई इतकेच नाही तर त्यांच्या हातावर घराचा संपूर्ण पत्ता व दिशा बाण काढून न विसरण्याची ताकीद देत असे कारण तिच्या समजुती प्रमाणे ते विसराळू होतें आणि कदाचित घरचा रस्ता विसरतील म्हणून ही योजना करीत असे.

  • क्या खबर? जितनी मुर्ती उतनी कबर….

    एक इंग्रजी लेखक म्हणतो “तुमच्या राष्ट्रातील तरुण मुलं कोणती गाणी गातात यावरून तुमच्या राष्ट्राचे भविष्य कळते”. आज आपल्या देशातील तरुण मुलं कोणती गाणी गातात हो? मुन्नी बदनाम हूई… ह्याचा अर्थ स्पष्ट आहे, भविष्यात आपल्या मुन्न्या म्हणजे आपल्या आया, बहिणी, मुली बदनाम होणार. याकडे पालकांनी लक्ष्य दिलं पाहिजे. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सर्व हिंदु नेत्यांनी एकत्र यायला पाहिजे, आपापले वादविवाद चूलीत टाकून. मी मराठी, मी मराठी असं बोंबलणार्‍या नेत्यांनीसुद्धा मराठीच्या बुरख्यात मुसलमानांना प्राधान्य देऊ नये. याचे परिणाम भिषण होऊ शकतात, हे मी नाही सांगत, इतिहास सांगतो. जाता जाता इतकेच सांगतो की तुम्ही ज्या ईश्वराला मानत असाल, त्या ईश्वराला स्मरून सांगा, तुम्ही सुरक्षीत आहात का? तुमच्या आया-बहिणी सुरक्षीत आहेत का? तुमच्या आया-बहिणींची अब्रू कधीच लूटली जाणार नाही, तुम्ही कसाबसारख्या जिहादींचे शिकार होणार नाही, याची शाश्वती तुम्ही देऊ शकता का? जर याचे उत्तर “नाही” असेल तर हिंदु संघटन साधणे हाच एक अमोघ उपाय आहे. जर असे झाले नाही तर “जितनी मुर्ती उतनी कबर”.

  • भाई – व्यक्ति की वल्ली

    बर्‍याच प्रमोशनमुळे व नंतरच्या त्यावरील निरनिराळ्या टीकेमुळे चर्चा झालेला भाई—व्यक्ति आणि वल्ली हा सिनेमा पहाण्यात आला. अनेक नामवंत व्यक्तिंनी या सिनेमातील अनेक प्रसंगांवरून दिग्दर्शक महेश वामन मांजरेकर यांच्यावर यथेच्छ तोंडसूख घेत टीका केली.सिनेमा पाहिल्यावर व या सगळ्या लेखाचं वाचन केल्यावर माझ्या मनात काही मूलभूत प्रश्न उभे राहिले व त्यादृष्टीने काहि लिहिण्याचा प्रयत्न करतोय.

  • इंद्रवज्र

    रंग खरा काय माझा
    ठाव मजला नाही
    एकचं रंग अंगी लेणे
    हे मला मंजूर नाही
    रंग काय कातडीचा
    हे कुणा ठाऊक नाही
    नका पारखू त्याने माणसा
    तो माझा अंतरंग नाही
    छटा अनंत काळजाला
    इंद्रवज्र व्यापून राही
    दे धीराने वेळ थोडा
    कुंचल्यात आहे काही
    हा असा नि तो तसा
    जन्मण्या ना जात काही
    असतेच कुठे नाव त्या रंगा
    जळ निर्मळ वाहे प्रवाही!!
    -- वर्षा कदम.
  • मृत्यु आणि स्वा. सावरकर

    स्वातंत्र्यवीर सावरकार यांचा जीवनभर मृत्यूशी जवळचा संबंध होता, असें म्हणावयास कांहीं हरकत नाहीं. क्रांतीचा पथ म्हणजे मृत्यूच्या हातात हात घालून चालणेंच की. आणि , हा पथ त्यांनी विचारपूर्वक स्वीकारलेला होता.

  • मीडिया लाईव्ह !

    आजकाल विविध प्रसारमाध्यमांवरून प्रसारित केले जाणारे कार्यक्रम पाहिले की या माध्यमाला काही धरबंद राहिला नाही असेच म्हणावेसे वाटते. अगदी किरकोळ बाबीला अवास्तव महत्त्व देणे आणि जनतेच्या मुख्य प्रश्‍नाकडे दुर्लक्ष करणे असा प्रकार सुरू आहे.

  • सेंद्रिय शेती आणि फायदे

    कृषिप्रधान देश म्हणून भारताला सर्व जगात ओळखले जाते. देशानी कृषी तंत्रज्ञान आणि संशोधनात चांगलीच प्रगती केली आहे. बऱ्याच राज्यात कृषीविद्यापीठे उभारून कृषी व्यवस्थापनाचा दर्जा व्यवसायाभिमुक करण्याचा प्रयत्न चालू आहे. यावरून भारताची कृषीक्षेत्रातील वाटचाल बऱ्याच प्रमाणात स्वालंबी होण्याच्या दिशेने होत आहे. आणि हा एक चांगला मापदंड आहे !

  • हजार पाचशेच्या नोटा

    माझ्याकडेही आहेत
    काही हजार पाचशेच्या नोटा
    चलनातून बाद झाल्या तरी
    तो माझा पैसा नाहीये खोटा

    समारंभात कौतुक होऊन
    बक्षिस मिळालेली एखादी नोट
    प्रमोशन नंतरच्या पहिल्या
    वाढलेल्या पगाराची एखादी नोट

    शेवटची आवराआवरी करताना
    आईच्या उशाशी सापडलेली नोट
    देवळाच्या पाय-या चढताना
    सापडलेली एखादी शुभशकुनी नोट

    ब्यूटी पार्लरची पायरी चढून
    तशीच उतरुन वाचवलेली एक नोट
    श्रीगुरुंना गुरुदक्षिणा दिल्यावर
    त्यांनी हातात घेऊन परत दिलेली नोट

    अशा ह्या हजार पाचशेंबरोबर
    इतरही छोट्या छोट्या नोटा आहेत
    ह्यात राखीपौर्णिमेच्या
    अन् भाउबीजेच्याही नोटा आहेत.

    सा-या ठेवल्यायत मी जपून
    कधीतरी काढून डोळे भरुन बघते
    आठवणींचा उघडतो खजिना
    अन् मी त्यात अगदी रमून जाते

    ह्या नव्हत्या जमवल्या मी
    वेळप्रसंगी उपयोगी पडण्यासाठी
    रक्कमही इतकी मोठी नाही
    मुलाबाळांच्या कामी येण्यासाठी

    हा पैसा काळा नाही,
    तर चमकदार, रंगीबेरंगी आहे
    चलनातून रद्द झाला असला तरी
    माझ्या लेखी तो अमूल्य आहे

    नोटा बदलून आणल्या तर
    ठेवणीतला सुगंध राहणार नाही
    न बदलता ठेवल्या तर
    किंमत शून्याच्या वर होणार नाही

    विचारात पडलं मन
    पैशाचं अवमूल्यन व्हायला नको
    अन् आठवणींचा खजिनाही माझा
    असा रिक्त, सुनासुना व्हायला नको.

    मग पटकन निर्णय घेतला
    नोटा बदलून त्याचा खाऊ आणला
    आनंद पेरला खूप चेह-यांवर सिग्नलवर खूप मुलांना वाटून टाकला.

    अस्मिता शरद देव
    ठाणे, दि.२०/११/२०१६.