(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • स्वर्गीय अटलजी

    मी भाग्यशाली होतो, १९९७ मध्ये प्रधानमंत्री कार्यालयात पोस्टिंग झाली. अटलजी प्रधानमंत्री झाले आणि

  • जाहिरात : अंदर की बात

    जाहिरातींतून जे जे येत आहे ते समाजाचे मानस ठरत आहे. केवळ मालाचे खपच नव्हे तर राजकीय, सामाजिक आर्थिक चित्राला जाहिराती रंग देत आहेत. जाहिरातीतून नको ते बिंबवलं जातय, नको त्या वस्तूंचा संग्रह वाढीस लागत आहे. शेजार्याबकडे आहे मग आपल्याकडेही हवं ही वृत्ती वाढली. जास्त जाहिरात, मोठी जाहिरात, सातत्याने जाहिरात लोकांच्या मानसिकतेवर परिणाम करत आहे, खच्चीकरण करत आहे.

  • मकान डुलु

    कितीही महत्वाचे काम असले तरी त्यांच्या नमाज पठणाची वेळ झाली की ते काम थांबवून जातात असं ऐकलं होतं पण मला तसा अनुभव कोणाकडूनच आला नाही. उलट कॉफी ब्रेक किंवा जेवणाची वेळ होतं आली की मीच त्यांना त्यांच्या भाषेत बोलायचो, मकान डुलु,मकान डुलु म्हणजे जेवायला चला जेवायला चला.

  • मेंढ्याचा गणपती

    भंडारा शहरात असलेला भृशुंड गणेश “मेंढ्याचा गणपती” म्हणून स्थानिक लोकांत प्रसिद्ध आहे. या गणपतीच्या मूर्तीला लांब दाढी आणि मिश्या आहेत.

  • रविवार सकाळ!!‏

    प्रिटोरिया मधील जूनमधील रविवार सकाळ!! आता इथे येऊन, मला चांगली १५ वर्षे झाली. तरी अजूनही सकाळ उजाडली तरी मुंबईतील दिवस मनात नेहमी येतो. वास्तविक, इथे आता थंडीचा कडाका आहे, सकाळचे १० वाजलेत तरी लोळावेसे वाटते. हा इथल्या वातावरणाचा परिणाम!! इथे रविवारी ११ नंतर साउथ आफ्रिकेला “जाग” येते. शनिवार संध्याकाळ/रात्र बहुदा पार्टीत घालवायची, हा जणू नियम असल्यागत सगळे जगत असतात, किमानपक्षी सिनेमा तरी नक्कीच!! वर्षातील, ५२ शनिवार म्हणजे ५२ पार्ट्या, हेच इथल्या आयुष्याचे महत्वाचे सार आहे. शुक्रवार दुपार झाली की मुलगा, मुलीला घेऊन( बव्हंशी उलटे देखील!! म्हणजे मुलगी,मुलाला घेऊन!!) कुठे रात्र काढायची, याचे Plans ठरवायला लागतो.इथे, रात्रीचे जेवण साधारणपणे ७ पर्यंत घेतले जाते. नंतर मग सगळी रात्र ताब्यात घेण्यासाठी!! यातून कुठलाच समाज सुटलेला नाही. गोरे, काळे, भारतीय, सगळेच हा अलिखित नियम पाळत असतात.आठवड्याची सगळी धडपड ही शनिवार रात्रीसाठी असते!!
    सुरवातीला मला हे जमवून घेणे अवघड गेले. संध्याकाळी सात वाजता, जेवण!! मुंबईकराला त्याचे अप्रूप वाटणारच.मला तर अजूनही वाटते. अर्थात, जिथे दुपारचा “लंच” म्हणजे एखादे Sandwich, तिथे मग रात्रीचे(!!) जेवण इतक्या लवकर क्रमप्राप्तच!!
    इथल्या पार्ट्या देखील “परिटघडीच्या” असतात. मोजके बोलणे(हा ब्रिटीश खाक्या!!), त्यातून ओठातल्या ओठात पुटपुटल्यासारखे शब्दोच्चार, (गरजूंनी परदेशी जाताना, अशा बोलण्याचा सराव किंवा निदानपक्षी ऐकण्याचा सराव जरुरीचा आहे!! अनाहूत सल्ला!!) अशी सुरवात असते. जरावेळाने, संगीत (अर्थात बहुतकरून पाश्चात्य अर्थात पार्टीत गोरे किंवा काळे असेल तर!! भारतीय असतील तर “चटणी” नामक भयाण संगीताविष्कार सहन करावा लागतो!!) लागले की, हळूहळू लोकांना “कंठ” फुटायला लागतो. म्हणजे कुणी “गात” नाही पण लयीच्या अंगाने बोलणे सुरु होते. सगळा कारभार बहुतांशी उभ्यानेच!! कारण, इथे पार्टी म्हणजे, बव्हंशी Barbecue असतो. एका मोठ्या लोखंडी भांड्यात ( पातेलीपेक्षा घेर आणि आकार मोठे आणि मुख्यत: चौकोनी!!) त्यात, कोळसे घालायचे आणि पेटवायचे.
    धगधगीत निखारे व्हायला लागले की त्यावर जाळी (लोखंडाची) ठेवायची आणि त्यावर मग, चिकन,मटण,सोया, पोर्क किंवा बीफ देखील, यांचे तुकडे (थोडा मसाला लावून ठेवलेले), याला sausages, chops असे म्हणतात. भाजून करपले की काढून हातातील प्लेटमध्ये वाढून घ्यायचे. बहुतेक पार्ट्यांमध्ये हाच “मेनू” असतो. फरक, मसाल्यामध्ये!! अर्थात, हातात, ग्लास हवाच!! त्यात, कधी बियर, कधी व्हिस्की असे पेय असते. एका हातात ग्लास आणि दुसऱ्या हातात प्लेट, अशी कसरत करावीच लागते!! त्याबरोबर मग गप्पा मारायच्या, असाच बहुतेक पार्ट्यांच्या बाबतीत “सोहळा” असतो. इथे तसा औपचारिकपणा भरपूर. शक्यतो चेहऱ्याची घडी न मोडता, आपला वावर ठेवायचा आणि तत्सम पार्टी “जोक्स” एन्जॉय करायचे!!
    हे जोक्स इतके भयानक असतात की, का हसायचे? हा मला नेहमीच प्रश्न पडतो!! समजा गोऱ्या लोकांच्यात पार्टी असेल तर, तिथे त्यामानाने मोकळेपणा (क्वचित नको तेव्हढा देखील!!) आढळतो. संगीतावर, जसे जोडपे असेल त्याप्रमाणे जोड्या तयार होतात आणि लगेच पाय थिरकायला लागतात. इथे, लग्नाची/बिनलग्नाची असला “बुरसटलेला” प्रश्नच उद्भवत नाही!! नृत्य करणे, हे महत्वाचे!! आपल्याला बघताना असे वाटते की पाश्चात्य नृत्य एकसाची आणि सोपे आते पण प्रत्यक्षात असा प्रकार नसतो. Ball Dance, Salsa, Rap या सगळ्या संपूर्ण वेगळ्या नृत्यशैली आहेत. प्रत्येकाची पायाची, आणि तदनुशंगाने शरीराची हालचाल भिन्न आहे. खरे तर संगीतात देखील भिन्नता आहे. आपण बारकाईने ऐकत/बघत नाही. अनिलने देखील बरेचवेळा सहभाग घेतला आहे.
    पहिल्यांदा अपरिचित/संकोची वाटते परंतु इथे तशी औपचारिकतेची बंधने नंतर गळून पडतात. परंतु गोऱ्या, काळ्या किंवा भारतीय समाजातील पार्टीची पद्धत ही बव्हंशी अशीच. प्रत्येक शनिवार याच धर्तीवर घालवली जाते. अनिल काही प्रत्येक शनिवारी असा जात नव्हता. त्याने देखील, नंतर स्वत:चे “ग्रुप्स” तयार केले. टिपिकल महाराष्ट्रीयन लोकांच्या पार्ट्या होतात. तिथे बरेचवेळा मानसिक कुतरओढ दिसते. बहुतेक सगळे, मध्यमवर्गीय संस्कृतीमधील परंतु काहीजण,इथले युरोपियन वातावरण बघून, थोडे बावचळलेले!! त्यामुळे, या संस्कृतीत वावरताना, मनाची कुतरओढ होताना दिसते. एकदम, आपली संस्कृती टाकून देता येत नाही आणि इथल्या संस्कृतीत लगेच सामावून घेणे अवघड जाते. खरेतर संस्कृती टाकायची गरज काय, हा माझा प्रश्न!!
    शुक्रवार आणि शनिवार संध्याकाळ, इथे “सोहळा” म्हणून साजरा करायची पद्धत आहे. गोऱ्या संस्कृतीने दिलेली, या देशाला देणगी!! जवळपास शतकाहून अधिक वर्षे गुलामीचे दास्य लादलेले, त्यामुळे, गोरे सोडले तर सगळ्यांचीच मानसिक स्थिती दोलायमान!! अजूनही त्या खुणा दिसतात. गोरा दिसला की दबकून बोलायचे/वागायचे, अशीच इथली मानसिक ठेवण आहे. अर्थात, असे जर असेल तर गोरे लोक, गुर्मीत राहणारच!! त्याचा प्रत्यय, आज २० वर्षे झली तरी येतो. त्यामुळे, इथल्या गोऱ्यांच्या पार्ट्या, घरे, गाड्या, राहणीमान सगळेच इतरांपेक्षा “उच्च”!!
    अजूनही, पूर्वीच्या गोऱ्या लोकांच्या वस्त्या बघितल्या तरी कल्पना येते. नुसत्या वस्त्याच नव्हे तर त्या वस्तीतील हॉटेल्स, क्लब्स, मॉल्स सगळे वेगळ्या ठेवणीचे!! इथे, सहज मनात आले म्हणून भेटायला जाणे, हि अजिबात पद्धत नाही. अगदी, आपल्या आई/वडिलांना भेटायचे झाले तरी, फोनवरून भेटायची वेळ ठरवायची, शक्यतो, शनिवार दुपार किंवा रविवार दुपार!! संध्याकाळ, सोहळ्यासाठी रिकामी ठेवायची असते!! तुम्ही, कुणाच्याही घरी, “सहज या बाजूला आलो, तेंव्हा भेटूया” असे जाता येत नाही.
    केवळ नजरेने “नापसंती” व्यक्त होते किंवा समजा गोरा असेल तर तोंडावर “नापसंती” ऐकण्याची तयारी ठेवावी!! एकांतवास या गोष्टीला, इथे अपरिमित महत्व दिले जाते, तरुणाईला!! इथे प्रत्येक वयोगटाचे समूह असतात. वयाची २१ वर्षे झाली की तो वेगळ्या गटात!! लग्न झाले की वेगळा गट!! तिशी, चाळीशीचे वेगळे गट!! इथली समाजव्यवस्थाच किडलेली आहे!! लग्न म्हणजे निरुपाय, असेच बहुतेकांचे मत आहे!! हे सगळे भारतीय संस्कृतीत राहिलेल्याला पचविणे अवघड असते.
    शनिवारच्या पार्ट्यांत ह्या सगळ्या दृष्टिकोनाचा अनुभव येतो. ह्याशिवाय इथे वेगळे आनंदनिधान नाही!! फार तर, मॉल्समध्ये जाऊन खरेदी करणे( हे मात्र प्रचंड!!), तिथेच सिनेमाला जाणे किंवा तिथेच असलेल्या अप्रतिम पब संस्कृतीचा अथवा तरुण असलात तर वेगवेगळ्या क्लब्जचा आस्वाद घेणे!! आपल्याला ह्यामागील उद्देश नेमकेपणाने कळत नाही. पण इथला समाज ह्याच संस्कृतीत सुखनैव बुडालेला आहे. आता, हि संस्कृती बरोबर की चूक, हा प्रश्न आपल्याला पडतो. त्यांना नाही!! इथे एकत्र जमलो की निदान जे संगीत चालू आहे, त्याचा मनापासून “आस्वाद” घ्यायचा असे नसून, त्यात “दिखाऊ” वृत्ती अधिक!! साहित्यावर बोलायचे ठरले (असे फार क्वचित घडते, मला असा अनुभव फक्त २ वेळा आला आहे!!) ठरले तर आवड इतकी वेगळी असते की त्यावर काय बोलायचे, हाच मला प्रश्न!! संगीत हे संगीत म्हणून ऐकण्यापेक्षा त्यातील ठेक्यालाच अधिक महत्व!!
    याचा कळस, भारतीय वंशातील लोकांना भेटल्यावर होतो. अशाच प्रकारे, अनिलची वर्षे गेली, जात राहिली. असे शेकडो शनिवार आले आणि रेनकोटवरून पाणी ओघळावे त्यप्रमाणे ओघळून गेले!! रविवार सकाळ, यातूनच उगवते. आदल्या रात्री अशाच पार्टीला गेल्याने, अंगात प्रचंड आळस भरलेला, त्यामुळे तसाच बेडवर पसरलेला!! बेडवरून खाली उतरावे, असेच वाटत नाही सकाळचे एव्हाना ९(च) वाजलेले असतात.आदल्या रात्रे थोडा पाऊस शिंपडल्याने बाहेर “गारठा” म्हणावा अशी थंडी पसरलेली!! त्यामुळे, अनिल आपले हात पसरतो आणि बाजूलाच असलेल्या सीडी प्लेयरचे बटण दाबतो!! सिस्टीममधून रागदारीचे सूर ऐकायला येतात आणि त्या सुरांच्या गुंगीत परत झोपेच्या अधीन होतो!!
    - अनिल गोविलकर

  • प्रेम आंधळं असतं, हेच खरं?

    वलयांकित स्त्री-पुरुषांचं नीतिबाह्य वर्तन जनतेच्या लघुस्मरणामुळे व त्यांच्याबद्दलच्या लोकप्रियतेमुळे समाजाच्या पचनी पडतं. त्यांच्या मुलांच्या जीवनात फारसा अडथळा निर्माण होत नाही. पण सर्वसामान्यांनी त्यांचं अनुकरण केल्यास त्यांना कुजबुज, तुच्छतादर्शक कटाक्ष आणि तिरस्कारयुक्त वागणूक समाजाकडून मिळते. प्रथम-पत्नीचे व मुलांचे तळतळाट सुख लाभू देत नाहीत. आपल्या आवडत्या नायक-नायिकांच्या आयुष्याचा असला आदर्श समोर ठेवला तर आजची तरुण पिढी स्वैरच होईल. व्यक्तिस्वातंत्र्य व स्वैराचार यांच्या सीमारेषा फार अंधूक होत आहेत हे दिवसेंदिवस जाणवत आहे. त्यागमय प्रेमाऐवजी भोगवादी प्रेम स्वीकारलं जात आहे. यामागे जीवन क्षणभंगुर असण्याच्या भावनेइतकीच प्रेम क्षणभंगुर असण्याची भावना जास्त आहे.

    -- भालचंद हादगे उर्फ भाली

  • अटकर बांध्याचा हंसध्वनी

    भारतीय रागसंगीतात एकूणच, बहुतेक सगळे राग हे, धार्मिक, भक्तीभाव समर्पण, प्रणयी किंवा दु:खी असेच भाव दर्शविणारे आहेत. अर्थात ह्या भावना, आपल्या संस्कृतीचा स्थायीभाव असल्याने, या भावनांचे प्रतिबिंब, कलेवर पडणे साहजिक आहे. या समजाला छेद देणारे काही राग आहेत, त्यात हंसध्वनी रागाचा समावेश होतो. एकूणच या रागाची ठेवण, आनंदी, उत्फुल्ल अशी आहे. खरेतर हा राग, कर्नाटकी संगीतातून उत्तर भारतीय संगीतात "आयात" केला गेला आहे पण, आता तो इतका चपखल बसला आहे की,अशी ओळख दिली नाही तर दुसरी बाजू ओळखणे अशक्य!!
    कितीही झाले तरी कर्नाटकी संगीत हे देखील भारतीय संगीत(च) आहे. फरक आहे तो स्वर लावण्यात, सादरीकरणात. अन्यथा स्वर तेच असतात. हंसध्वनी, कलावती सारखे राग उत्तर भारतीय संगीताने आपलेसे केले तर तिलक कामोद राग कर्नाटकी संगीतात मानाने स्थिरावला. हंसध्वनी राग, हा जसा कर्नाटकी संगीतात आहे, तसाच अगदी उचलून, उत्तर भारतीय संगीतात आणला. अर्थात मांडणी वेगळी झाल्याने सत्कृतदर्शनी, हा राग उत्तर भारतीय संगीतातलाच वाटतो. दोन्ही प्रकारात, या रागात, "मध्यम" आणि "धैवत" स्वर वर्ज्य आहेत आणि "पंचम"/"षडज" हे वादी - संवादी स्वर राहिले आहेत. "हंसध्वनी" हे नाव तसे संस्कृत भाषेच्या जवळ जाणारे असल्याने, आणि त्या अनुषंगाने विचार केल्यास, हा रागाचा अगदी प्राचीन ग्रंथांतून देखील उल्लेख आढळतो. तशी या रागाची प्रकृती "अटकर" बांध्याची आहे, एखादी सुडौल तरुणी किंचित नखरेलपणा दाखवीत राजमार्गावरून हिंडावी त्याप्रमाणे या रागाचे थोडे स्वरूप आहे. षडज, पंचम स्वरांचे प्राबल्य असले तरी जेंव्हा निषाद स्वरावर "ठेहराव" होतो, तिथे या रागाची खरी खुमारी जाणवते. आणखी थोडे शास्त्रोक्त लिहायचे झाल्यास, या रागातील "निषाद" स्वर हा चतु:श्रुतिक असल्याने, आरोह संपताना, हा निषाद अगदी वेगळा लागतो. अर्थात, श्रुती आणि स्वरांतर्गत श्रुतीव्यवस्था, हा विषय किचकट आणि प्रचंड मतभिन्नता असल्याने, इथेच थांबतो.
    या रागात, उस्ताद अमीर खान साहेबांनी "जय माते" ही चीज गायलेली आहे. चीजेची सुरवात त्यांनी मध्य लयीत केली आहे. खरेतर पूर्वी, राग हा मध्य लयीत(च) सुरवात करून गात असत.
    वास्तविक पाहता उस्ताद अमीर खान साहेबांची शैली आणि या रागाचा स्वभाव, हे समीकरण काही जुळणारे नव्हे पण तरीही या रागातील गंभीर भाव शोधून काढून, "जय माते" सारखी बंदिश सादर केली आहे. या गायकाची शैली हे बहुतांशी "मंद्र" सप्तकात किंवा "शुद्ध स्वरी" सप्तकात फिरणारी. आवाज अति खर्जातील असल्याने, आणि ठाय लयीत गाणे सादर करण्याची प्रवृत्ती असल्याने, बरेचवेळा या गायकावर टीका देखील झाली आहे परंतु रागाचे शुद्धत्व, स्वरांचे लगाव आणि "राग" सादर करण्याकडे ओढा असल्याने, आजही यांची गायकी अजोड मानली जाते.
    ही बंदिश ऐकताना देखील आपल्याला हेच मिळेल. लय अगदी संथ, त्यामुळे आपण प्रत्येक स्वराचा नुसता आनंदच नव्हे तर प्रत्येक स्वर "न्याहाळू" शकतो. प्रत्येक स्वराला विस्तार करण्याची संधी, हा गायक देतो आणि असे फक्त ठाय लयीतच शक्य असते. इथे प्रत्येक तान, बोलतान, आणि हरकत ऐकण्यासारखी आहे. तान घेतली जाते पण लयीशी अचूक गणित जुळवून!! वेगळ्या शब्दात, इथे "तान" या अलंकाराला वेगळे अस्तित्व नसून स्वरसमुच्चाय बांधून, त्याला अनुलक्षून तान घेतली जाते. तसेच सरगम देखील या विचाराने घेतली आहे. रागसंगीतात स्वत:चे अढळ स्थान निर्माण करणारा हा गायक आहे.
    एम.एस. सुब्बलक्ष्मी हे नाव तसे भारतीयांना अपरिचित असू नये. "वातापी गणपती भजेहम" ही रचना , तशी त्यांच्या उतरत्या वयाच्या काळात गायलेली आहे पण तरीही स्वरावरील पकड तसेच लयीवरील ताबा विलक्षण म्हणायला हवा. कर्नाटकी संगीतात, बहुतांशी रचना या मध्य लयीत सुरु करतात, याउलट उत्तर भारतीय संगीतात सुरवातीला "आलापी" साठी भरपूर अवसर असतो. अर्थात या दोन्ही शैलीत आणि सादरीकरणात भरपूर फरक आहे. साधारणपणे, सामवेदातील ऋचा पठनातून या शैलीचा उगम झाला असे म्हटले जाते आणि वीणा वादनातून रचनांची निर्मिती झाल्याचे मानले जाते. याचा परिणाम असा झाला, कर्नाटकी संगीतात, रचना सादर करताना, साथीला म्हणून, "वीणा","बांसरी"."व्हायोलीन" तसेच "घटम","खंजीरा", "मृदुंगम" इत्यादी तालवाद्ये वापरली जातात. या सगळ्याचा परिपोष प्रस्तुत रचनेत आपल्याला मिळतो.
    मी मुद्दामून, "वातापी गणपती भजेहम" हीच रचना निवडली आहे कारण, याच रचनेचा आधार घेऊन, पुढे अनेक रचना तयार झालेल्या दिसून येतील. तसे बघायला गेल्यास, documentation या दृष्टीने, पंडित शारंगदेव यांच्या लेखणीतून उतरलेला "संगीत रत्नाकर" या ग्रंथात कर्नाटकी संगीताची पाळेमुळे वाचायला मिळतात. अर्थात त्या बाबत आणखी इथे लिहिणे थोडे अप्रस्तुत ठरेल.
    प्रस्तुत गाणे म्हणजे या रागाचे लक्षण गीत असे म्हणता येईल. "जा तोसे नही बोलू कन्हैय्या" ही लताबाई आणि मन्ना डे यांनी गायलेले युगुलगीत म्हणजे रागदारी संगीत, सुगम संगीतात कसे वापरावे, याचा सुंदर वस्तुपाठ आहे.
    "जा तोसे नहीं बोलू कन्हैय्या,
    राह चलत पकडे मोरी बैय्या".
    तीन तालात सुरु होणारी ही रचना, खरे तर एक नृत्यगीत आहे पण तरीही ऐकताना, नृत्याचे बोल आणि सरगम, याचा फारच बहारीने उपयोग करून घेतलेला आहे. लताबाई काय किंवा मन्ना डे काय, दोघेही गायक, शास्त्रीय संगीताची आवश्यक तितकी तालीम घेऊनच या सुगम संगीताच्या क्षेत्रात आले. सुगम संगीतात, गायकी किती दाखवायची आणि कशाप्रकारे रंजकतेने मांडायची, यासाठी हे गाणे नक्की अभ्यासपूर्ण आहे. गाण्यात, दीर्घ ताना आहेत, वक्र गतीच्या हरकती आहेत पण हे सगळे, गाण्यात अलंकार म्हणून न वावरता, त्या गाण्याला पूरक असे यांचे अस्तित्व आहे.
    युगुलगीत हे नेहमी एकमेकांच्या गायकीला "पूरक" असे असते, निदान असावे. त्यादृष्टीने बघायला गेल्यास, या गाण्यात, दोन्ही गायकांनी ज्या प्रकारे, ताना किंवा हरकती घेतल्या आहेत, त्या खास ऐकण्यासारख्या आहेत. कधीकधी तर, संपूर्ण तान न घेता, मध्येच तान खंडित करून, रचनेतील ताण वाढवीत, सुंदररीत्या मांडणी केली आहे. इथेच तुमच्या गायकीचा खरा "कस" लागतो. तान घेताना, तुम्हाला एक सांगीतिक "अवकाश" मिळालेला असतो परंतु अशा काही प्रसंगी, तो अवकाश मध्येच खंडित करून, क्षणात दुसऱ्या गायकाने नवीनच हरकतीची निर्मिती करून ऐकणाऱ्याला स्तिमित करायचे, हा खेळ फारच बहारीचा झाला आहे.
    "राम कहिये गोविंद कही,
    करम की गती न्यारी संतो।
    बडे बडे नयन दिये मिरगन को
    बन बन फिरत उधारी".
    "करम की गती न्यारी" कविता म्हणून फारच सुंदर आहे. याच्या सुरवातीला, पारंपारिक भजनी ठेक्यात, "राम कहिये, गोविंद कहिये" या ओळी ऐकायला मिळतात पण, त्या ओळी हंसध्वनी रागाशी नाते सांगत नाहीत. लगेच लताबाईंची अप्रतिम आलापी ऐकायला येते आणि पाठोपाठ ही रचना सुरु होते. सुरवात तर पारंपारिक केरवा तालात होते परंतु पहिल्या अंतरा जिथे संपतो तिथे हाच ताल "दुगणित" जातो आणि लय देखील वाढते.
    तसे बारकाईने पाहिले तर, ही रचना काही वेळा रागाची बंधने सोडून वेगळी होते, जे सुगम संगीताच्या संस्कृतीस सुसंगत आहे म्हणा. एकुणात ही रचना, हंसध्वनी रागाशी नाते सांगते असे म्हणता येईल. अर्थात, संगीतकाराच्या शैलीनुसार (संगीतकार हृदयनाथ मंगेशकर) गाण्यात नेहमी प्रमाणे अनेक, गुंतागुंतीचे सांगीतिक वाक्यांश आहेत, जेणेकरून, रचना हळूहळू अवघड बनत जाते. परंतु तालाच्या मात्रा आणि त्यानुरून येणाऱ्या हरकती, फारच विलोभनीय आहेत.
    मराठी चित्रपटातील एक अजरामर गाणे - "आली हासत पहिली रात".
    "आली हासत पहिली रात
    उधळत प्राणांची फुलवात".
    गाण्याची चाल बघायला गेल्यास, त्यात फारशा गुंतागुंतीच्या ताना नाहीत, अपवाद गाण्याच्या सुरवातीचा असामान्य आलाप. असला अवघड आलाप केवळ लताबाईच घेऊ शकतात. तो आलाप संपतो आणि गाणे अतिशय द्रुत लयीत सुरु होते आणि गाण्याची गंमत सुरु होते. सुरवातीला, मी हंसध्वनी रागाचा "स्वभाव" आनंदी, उत्फुल्ल असा केला आहे आणि हे गाणे त्या वर्णनाला पूरक असे आहे. तसे बघितले तर गाण्याची चाल फार गुंतागुंतीची नाही पण गाण्यातच अतिशय सुंदर असा गोडवा आहे जेणेकरून ऐकणारा गाण्यात गुंगून जातो.
    आशा भोसल्यांनी काही नाट्यगीते गायली आहेत आणि ती रसिकांच्या मनात दीर्घकाळ ठाण मांडून बसली आहेत. "झाले युवती मन दारुण रण" ही गाणे तर अतिशय लोकप्रिय झाले आहे. आशाबाईंच्या वडिलांनी लोकप्रिय केलेली चाल ही हंसध्वनी रागाशी साद्धर्म्य दाखवते. अगदी त्याच धाटणीवर आशाबाईंनी हे गाणे गायले आहे. मुळातला अति गोड राग आणि त्यात आशाबाई गायला!! आशाबाईंचा धारदार आवाज या गाण्यात अतिशय खुलून आहे, तसेच त्यात घेतलेल्या चक्राकार ताना देखील सुंदर आहेत आणि त्यांच्या गायकीची परिक्रमा वाढवणाऱ्या आहेत.
    "शुर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती,
    देव देश आणि धर्मापायी प्राण घेतले हाती".
    कवियत्री शांताबाई शेळक्यांच्या सहज, ओघवत्या आणि प्रासादिक शैलीत लिहिले गेलेले हे गाणे परत एकदा हंसध्वनी रागाची खेळकर प्रकृती दाखवणारे आहे. हृदयनाथ मंगेशकर यांनी तशी एकुणातच फार कमी गाणी गायली आहेत आणि त्यातील हे एक लक्षणीय गीत. चाल संगीतकार आनंदघन (लता मंगेशकर) यांनी बांधली असून, चाल गीतातील आशयाशी सुसंगत आहे. अतिशय द्रुत लयीत गाणे आहे आणि त्याला घोड्याच्या टापांचा ताल दिलेला आहे जो बऱ्याच चित्रपट गीतांतून वापरलेला आपल्या आढळून येईल.
    भारतीय रागसंगीतात सर्वसाधारणपणे भक्तीभाव, समर्पण वृत्ती किंवा मुग्ध, संयत असा शृंगार अथवा विरहाची भावना, याचा भावनांचा परिपोष आढळतो परंतु अशा वेळी "हंसध्वनी" सारख्या आनंदी, उत्फुल्ल अशा रागाचे वेगळेपण लगेच वेगळे अस्तित्व जाणवते आणि हेच या रागाचे खरे वैशिष्ट्य होऊन बसते.
    - अनिल गोविलकर

  • मिसळमॅच

    संगीतामधे शब्दामधून अर्थ समजतात तर सुरांमधुन भावना प्रकट होतात. सुरांच्या अंगाने शब्द गुंफले तर शब्दाच्या अर्थछटा सुस्पष्ट सुरांच्या साथीने संगीत प्रगल्भ होते. तस्सच, फरसाणाच्या अर्थपूर्ण शब्दांमधे तर्रीच्या झणझणीत भावना जुळून आल्या की मग काय विच्चारता!

  • कहाणी वसुंधरादेवीची.

    शुक्रवार, २२ अेप्रिल २०११ रोजी, ४२ वा जागतिक वसुंधरा दिवस साजरा केला जाणार आहे, त्या निमित्ताने, अध्यात्मिक शैलीत लिहिलेली, आिण ही वसुंधरा स्वच्छ करा, स्वच्छ ठेवा आिण स्वच्छच राहू द्या हा संदेश देणारी कहाणी.

  • भरतनाट्यम

    सध्याच्या तांत्रिक युगात आपली कलात्मकता जोपासून त्यात करिअर करायचं असल्यास गरज असते ती तिव्र इच्छाशक्तीची. सातत्याने प्रयत्न, अॅकेडेमिक पातळीवर अभ्यास आणि रियाझ केला तर आपली कला किंवा आवड कायमस्वरुपी आपल्या आयुष्यात टिकवता येते. आत्मिक सुख देणारी भरतनाट्यम ही अशीच एक कला. यात भाव-रस-राग-ताल, कथानक किंवा एखादा वर्तमान मुद्दा सादर करण्यासाठी नाटकाचा समावेश केला जातो. कल्पकता आणि नवनिर्मिती हा नृत्यकलेचा आत्मा आहे. नटराज हे या नृत्यशैलीचे दैवत मानले जाते.

    भरतनाट्यम ही एक अभिजात दक्षिण भारतीय नृत्यशैली आहे. या शैलीचा उगम दक्षिण भारतातील मंदिरांमध्ये झाला. भरतनाट्यम ही नृत्यशैली भरतमुनींच्या नाट्यशास्त्र या प्राचीन ग्रंथावर आधारित आहे. भरतनाट्यमचे सादरीकरण कर्नाटकी संगीताच्या साथीने होते. अलरिपु, वर्णम, पदम, तिल्लाणा ही भरतनाट्यमची विविध अंगे आहेत.

    भाव - राग - ताल हे भरतनाट्यमचे तीन मुख्य अंग असतात. भ म्हणजे भाव, र म्हणजे राग, त म्हणजे ताल आणि नाट्यम म्हणजे अभिनय करुन सादर केलेले नृत्य. या अंगांच्या आद्याक्षरावरून भरत-नाट्य असे नाव पडले. दुसऱ्या मतानुसार भरतमुनी जनक असल्याने भरताचे नाट्य म्हणून यास भरतनाट्यम म्हटले जाते. या नृत्यास दासीअट्ट्म व सदिर या नावानेही ओळखले जाई.

    भरतनाट्यम चे विद्यार्थी सुरुवातीस घुंगरूंशिवाय नाचणे शिकतात. ज्यावेळी गुरूस वाटते की विद्यार्थ्याची पुरेशी तयारी झालेली आहे तेव्हा गुरू विद्यार्थ्याकडून सलंगाई पूजा करवून घेतात व त्यावेळी घुंगरू प्रदान केले जातात. अधिक खडतर शिक्षणानंतर विद्यार्थ्याने एकट्याने किंवा एकटीने संपूर्ण कार्यक्रम करणे अपेक्षित असते. याला आरंगेत्रम असे नाव आहे. आरंगेत्रम नंतर गुरू आपल्या शिष्यास इतर कार्यक्रमांतून नृत्य करण्यास परवानगी देतात.

    चिदंबरम येथील प्राचीन मंदिरातील मूर्ती हे भरतनाट्यम या नृत्यप्रकाराचे मूळ प्रेरणास्त्रोत. या नृत्यप्रकाराचा प्रसार व विकास तमिळनाडू येथील देवदास्यांनी केला. पूर्वीच्या काळी हा नृत्यप्रकार देवदास्यांनी प्रसारित व विकसित केल्यामुळे त्याला मान दिला जात नसे. परंतु २० व्या शतकाच्या सुरुवातीला कृष्ण अय्यर आणि रुक्मिणी देवी यांच्या प्रयत्नाने या नृत्यप्रकाराला पुन्हा प्रस्थापित केले गेले.

    नाट्य, नृत आणि नृत्य हे सुध्दा भरतनाट्यमचे तीन भाग आहेत.

    नाट्य : नाट्याद्वारे कलाकार एखादी कथा सादर करतो.
    नृत : यात तालाचा वापर केला जातो.
    नृत्य : नाट्य व नृत याचे मिश्रण म्हणजे नृत्य.

    -- पूजा प्रधान