(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • मॅडम

    मॅडम , तुम्ही फार छान दिसता जितक्या छान दिसता त्यापेक्षाही छान तुम्ही हसता

    मॅडम , तुमचंही एक घर असेल नवरा असेल , सासू असेल , सासरा असेल , दीर असेल घरात सारखी पीरपीर असेल जाऊ बाई जोरात असतील नणंद बाई तोऱ्यात असतील तुम्हाला छोटी छोटी मुलं असतील तुमच्या बागेत फुलं असतील सर्वांसाठी तुम्ही अहोरात्र झिजता

    आणि तरीही , मॅडम तुम्ही फार छान दिसता जितक्या छान दिसता त्यापेक्षाही छान तुम्ही हसता.

    तुमच्याही घरात भांड्याला भांडे लागत असणारच कुणी आपुलकीने तर कुणी द्वेषाने वागणारच कुणी रुसणार , कुणी फुगणार कुणी रागवणार , कुणी जागवणार कुणी भरवणार , कुणी जीरवणार मन मारून तुम्ही सगळ्यांचच मन राखता आणि तरीही , मॅडम तुम्ही फार छान दिसता जितक्या छान दिसता त्यापेक्षाही छान तुम्ही हसता सासऱ्याची एकादशी सासूचा प्रदोष नवरा म्हणतो मटण कर त्याचा काय दोष दीर म्हणतो गरम वाढा नणंद म्हणते उष्टी काढा आजेसासूची गोळीची वेळ मुलं म्हणती आमच्याशी खेळ नवऱ्याचाही असतो थाट नखरे त्याचे सतराशे साठ आल्या गेल्याचही तुम्ही किती बेवार बघता

    आणि तरीही , मॅडम तुम्ही किती छान दिसता जितक्या छान दिसता त्यापेक्षाही छान तुम्ही हसता

    तुम्हालाही मन आहे कोण जाणतं ? तुम्हालाही भावना आहे कोण जाणतं ? तुम्हीही माणूस आहात कोण मानतं ? त्यांना तुमचं काम हवं कमावून आणलेलं दाम हवं तुमची माया हवी तुमची अख्खी काया हवी विनातक्रार तुम्ही सारं कसं काय सोसता ?

    पण जाऊद्या , मॅडम तुम्ही फार छान दिसता
    जितक्या छान दिसता त्यापेक्षाही छान तुम्ही हसता.

    -- विक्रम पाटील

  • गुरुची भविष्यवाणी

    एक गमतीदार परंतु मनोरंजक संत कथा वाचण्यांत आली. जीवनाचे खुपसे तत्वज्ञान कळले. सारे चिंतनीय होते. एका गावांत एक थोर संत रहात होते. तत्वज्ञानी …..

  • मीडिया लाईव्ह !

    आजकाल विविध प्रसारमाध्यमांवरून प्रसारित केले जाणारे कार्यक्रम पाहिले की या माध्यमाला काही धरबंद राहिला नाही असेच म्हणावेसे वाटते. अगदी किरकोळ बाबीला अवास्तव महत्त्व देणे आणि जनतेच्या मुख्य प्रश्‍नाकडे दुर्लक्ष करणे असा प्रकार सुरू आहे.

  • काटेपुराण…

    जुन्या काळातील चित्रपटात एक सीन हमखास रहायचा, तो म्हणजे नायिका बागेत चालत असते… चालता चालता तिच्या पायात अचानक काटा रुततो… शेजारी असलेला नायक अलगद तिच्या पायातला काटा काढतो… चित्रपट पुढे सरकत जातो. थोडक्यात काय तर चित्रपटात नायक-नायिकेचे प्रेम फुलवायला आणि चित्रपट पुढे सरकवायला काटा कारणीभूत ठरतो…

  • थांब विज्ञाना, नको लावूस शोध

    बागेतील तारका- थांबव, विज्ञाना तुझे शोध

  • अनुभवांचे शब्द जाहले

    मला आजही लख्खं आठवतंय, आजीचं एक पालूपद …. तुला “अनुभव” येईल नं तेव्हां कळेल. मी म्हणायची, ‘आजी कुठून ग येईल तो अनुभव ?’
    ‘अगं, तो काही असा सांगून येत नाही वेडाबाई. तुझं तुलाच जाणवेल हो.’

  • इंटरनॅशनल शाळेतलं मराठी..

    इंटरनॅशनल शाळेत मराठी शिकवण्याचा अनुभव.. अमराठी मुलांचा मराठी भाषेबद्दल असलेली अढी..

  • हा छंद जीवाला लावी पिसे !

    माणसाला जीवनात आवश्यक असलेले छंद !! .. माझा लेख -आजच्या "नवाकाळ"मध्ये ! माणसाला जीवनात आवश्यक असलेल्या छंदांसंबंधी माझा एक छोटेखानी लेख,आजच्या "नवाकाळ"मध्ये छापून आला आहे. आपल्या सर्वांसाठी हा लेख खाली देत आहे. आपला अभिप्राय जरूर कळवा . तसेच आपलेही काही वेगळे अनुभव आहेत का ?1

    असे म्हणतात की शिक्षणावाचून माणूस म्हणजे अर्धाच .. पण अलीकडे असे दिसते की कसलाही छंद नसलेला निवृत्तीनंतरचा माणूसही असा अर्धाच राहतो. अचानक बी पेरून लावलेले झाड जशी लगेच फळे देत नाही तसाच छंदही निवृत्तीनंतर नव्याने लावून घेता येत नाही.
    आधीपासून त्याचे पिसे लागलेले असेल तर निवृत्तीनंतरचे आयुष्य खूप छान जाते. तो निवृत्तीच्या आधीही जपला असेल तर रोजच्या नोकरी व्यवसायात असलेल्याचीही मानसिक स्थिती उत्तम राखतो.

    गरीब माणसाला अपचनाचा त्रास होत नाही. तसा बहुतेक प्रत्येक संग्राहक हा आपल्या संग्रहाबाबत तरी गरीबच असतो. कधीच संतुष्ट नसतो. आपल्या संग्रहात अजून अमुक नाही--तमुक नाही असे म्हणत तो सदैव शोधातच असतो. त्यामुळे विविध प्रकारचे संग्रह करणाऱ्या, माझ्या बरोबरच्या सुमारे १५ /२० विविध वयाच्या मित्रांना रक्तदाब, मधुमेह, कोलॅस्ट्रॉल असले काहीच त्रास नाहीत. खरोखरच्या गरिबांची क्षमा मागून असे म्हणता येईल की जमविलेल्या वस्तूंच्या बाबतीत तरी तो सदैव दारिद्र्य रेषेच्या खालीच असतो. कुणाचा द्वेष, हेवा, मत्सर करायला मन रिकामंच राहत नाही. हे छंदामुळे घडते काय हा प्रश्न मी एका खूप मोठ्या विद्वान डॉक्टरांना विचारला तेव्हा
    त्यांनी होकारात्मक उत्तर दिले.

    माझे एक असेच वयाची ८० वर्षे ओलांडलेले छांदिष्ट मित्र एक दिवस खूप खिन्न होते. त्यांना बरं वाटत नव्हतं हे उघड होतं .मी त्यांना विचारले, काय झाले? ..बरं नाही का ? डॉक्टरांकडे जायचंय का? त्यांनी एक दीर्घ सुस्कारा घेऊन सांगितले की तसे नाही हो. एकाने मला " रशियाचे ३ कोपेकचे दोन्ही बाजूंना छापलेले आणि नाणे म्हणूनही वापरले गेलेले टपाल तिकीट " देतो म्हणून कबूल केले होते आणि दुसऱ्या कुणी तरी ५० रुपये जास्त दिले म्हणून त्याला विकून टाकले. आता बोला. ... म्हणजे " हे " त्यांचे आजारपणाचे कारण होते तर ! ... मी ही "दुःख:द " बातमी आमच्या सर्व छांदिष्टांना सांगितली. त्यामुळे " ते दु:ख " लगेच वाटले गेले. सर्वच जण कामाला लागले. कुणी मित्रांकडे विचारणा सुरू केली, विदेशात मेल गेले. इ- शोध सुरू झाले. आणि आठवड्याच्या आत ते (तसेच) तिकीट या अतिज्येष्ठ छांदिष्टांपर्यंत पोचले. खुश झालेल्या या गृहस्थांनी आम्हा सर्वांनाच आग्रहाने घरी बोलावून चहा पाजला.आता या एकाच घटनेत किती चांगल्या गोष्टी दडल्या आहेत त्याचा हिशेब न मांडलेला बरा.

    छंदांमुळे उच्चनीचतेची भावनाही कमी होते. एका चर्मकाराच्या दुकानातील संत रोहिदासांच्या चित्राशेजारी लावलेल्या एका वेगळ्याच दिव्याची चौकशी मी रस्त्यात त्याच्या शेजारी बसून करत होतो. शेजारून जाणाऱ्या माझ्या ऑफिसातील एका सेवानिवृत्त जनरल मॅनेजरला हे खटकले पण माझ्या ते लक्षातही आले नाही. पितळी ओतकाम, वेल्डिंग, पॉलिशिंग अशा गोष्टींमुळे होणारे कुंभारवाड्यातील प्रचंड प्रदूषण मला जाणवत नाही आणि त्याचा मला कधी त्रासही होत नाही.

    रात्री झोपतांना , उद्या आपल्याला केवढी कामे करायची आहेत याचा केलेला विचार ,मला जगण्याची उमेद, आत्मविश्वास,सकारात्मक दृष्टी अशा गोष्टी देतोच पण हा विचार करता करता झोप कधी लागते ते कळतही नाही. .. मग कसली गोळी घेताय राव .... आणि कशाला ?
    आज १० / १२ वर्षांच्या मुलांनासुद्धा निराशा ग्रासते. या वयाची मुले आत्महत्या करतात. काय भयंकर आहे हे ? पूर्वी दिवसातून एकदा जेवायला मिळणं ही सुद्धा चैन वाटावी अशा परिस्थितीत जगणारी लाखो मुले होती. फाटके कपडे, पडझडीचे घर, घरात वीज-पाणी नाही,
    अभ्यासाला वह्या- पुस्तके नाही, अनवाणी / छत्रीशिवाय कित्येक मैल चालत शाळा गाठायची, अभ्यासाला वेळ आणि जागाच नसायची. तरीही मुले आत्महत्या करीत नव्हती. अशा दयनीय परिस्थितीतही त्यांचे आपले असे एक छोटेसे विश्व असे. अशा मुलांकडेही स्वतः:चे असे काहीतरी "जमवलेले" असे. गावाकडची मुले गुंजा , दगड गोटे, पक्ष्यांची पिसे, रंगीबेरंगी दगड, बिट्टी- पारिंगा अशा कुठल्यातरी बिया,सागरगोटे, पिंपळाची जाळीदार पाने तर शहरात मुले बसची तिकिटे,टपाल तिकिटे, चॉकलेटच्या चांद्या, नाणी, पत्ते , बांगडीच्या
    रंगीबेरंगी काचा, क्रिकेटपटूंचे पेपरात आलेले फोटो,मोरपिसे, पिंपळाची जाळीदार पाने,शंख-कवड्या ,काड्यापेटीवरील चित्रे,सिगारेटची पाकिटे ( त्यावेळी या पाकिटांवर वैधानिक इशारा नव्हता तरीही केवळ पाकिटे जमवतो म्हणून ही मुले धुम्रपानाकडे वळत नसत.) ...... असे काय काय जमवीत असत. अहो तेव्हा त्यांना हा केवढा प्रचंड खजिना वाटत असे. कुठल्याही आर्थिक परिस्थितीतील ही मुले या
    आघाडीवर तरी श्रीमंत असत.

    आज सामान्य आर्थिक परिस्थितीतील पालकांना सुद्धा मुलांना ८-१० हजारांचा मोबाईल घेऊन द्यावा लागतो. नवे युनिफॉर्म्स, पुस्तके, वह्या, अत्यंत आकर्षक अशी दप्तरे, पेन्सिल-पेन-खोड रबर-वॉटर बॅग - रेनकोट- छत्र्या-बूट- चपला , स्कूल बस, पॉकेट मनी, वाढदिवसाचे खर्च, पिकनिकचे खर्च अशा अनेक खर्चिक गोष्टींसाठी, ऐपत असो नसो, पालक प्रचंड पैसा खर्च करतात. तरीही मुले आणि त्यामुळे पालक सुखी नाहीत. प्रचंड पैसा खर्चूनही ही मुले मनाने श्रीमंत होत नाहीत. कार्यानुभव म्हणून अनेक गोष्टी ही मुले आणि पालक सक्तीने करतात --मार्कांसाठी करतात पण आनंदासाठी नाही. या मुलांना पुन्हा छंदांकडे वळविले तर ?

    " हा छंद जीवाला लावी पिसे" असे कुणी म्हटले तरी मी मात्र " घेई छंद मकरंद" असेच म्हणणार !

    --मकरंद करंदीकर. अंधेरी पूर्व, मुंबई.

  • भारतमातेच्या वीरांगना – २७ – अहिल्याबाई रांगणेकर

    १९४२ चा वणवा भारतभर पेटला. अहिल्याबाई त्यावेळी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेज ला शिकत होत्या. विद्यार्थ्यांनी सुद्धा ह्यात भाग घ्यावा म्हणून सगळ्या विदयार्थ्यांना एकत्रित केले आणि “चलेजाव” चळवळीत भाग घेतला, साडे तीन महिन्यांचा तुरुंगवास भोगावा लागला. फ्लस्वरूप फर्ग्युसन कॉलेज ने त्यांना पुढील शिक्षणासाठी बंदी केली.

  • विकल जोगिया

    "तो हाच दिवस हो, तीच तिथी, ही रात; ही अशीच होत्ये बसले परी रतिक्लांत;
    वळूनी न पाहतां, कापीत अंधाराला, तो तारा तुटतो - तसा खालती गेला.
    हा विडा घडवुनी करिते त्याचे ध्यान, त्या खुल्या प्रीतीचा खुलाच हा सन्मान;
    ही तिथी पाळिते व्रतस्थ राहुनी अंगे, वर्षांत एकदां असा "जोगिया रंगे."
    माडगूळकरांच्या या अजरामर ओळी खरेतर, 'जोगिया" रागाची एकही छटा दर्शवत नाहीत. त्यादुष्टीने, या कलाकृतींचा एकच एक ठाम अन्वयार्थ लावणे, हे त्या कलाकृतीवर काहीसे अन्याय करणारे असते आणि बहुदा हा एक (एकमेव नव्हे) निकष, उत्तम कलाकृतीबाबत मांडता येईल. आस्वादाच्या दृष्टीने हे गुंतागुंतीचे होऊ शकते परंतु सतत वेगवेगळ्या अर्थछटा दृग्गोचर होणे, हे आव्हानात्मक देखील असू शकते. एका बाजूने मांडायचे झाल्यास, कविता काय किंवा संगीत निर्मिती काय, याची निर्मिती ही नेहमीच "अबोध" मनातून होत असते आणि त्याचे चलनवलन नेमके शब्दबद्ध करणे, निरातिशय जिकीरीचे होऊ शकते आणि परत त्यात व्यक्तिपरत्वे अनुभूती येउन, मग अन्वयार्थ अधिक अवघड होऊ शकतो. पण, हीच कलेची खरी "मजा" आहे, हे लक्षात घेतल्यास, बऱ्याच शंकांचा निचरा होऊ शकतो.
    जोगिया रागाबाबतची माझी भूमिका यावरून लक्षात येणे शक्य आहे. "गंधार" आणि "निषाद" स्वर वर्ज्य असलेल्या या रागात, "कोमल रिषभ" आणि "कोमल धैवत", या स्वरांचे प्राबल्य आहे, इतके की, जरी "षडज","मध्यम" हे स्वर या रागांचे "वादी - संवादी" असले तरी मनात तरळत राहतात, ते हेच कोमल स्वर आणि या स्वरांवर घेतलेला "ठेहराव". संस्कृत ग्रंथानुसार रागाचे वर्गीकरण "भैरव" थाटात केलेले आहे आणि बहुदा याचा परिणाम असावा, पण रागाची वेळ ही, पहाटेचा पहिला प्रहर सांगितलेला आहे. आता, याच अनुषंगाने बघायचे झाल्यास, वर दिलेल्या माडगूळकरांच्या ओळी किती अन्वर्थक ठरतात, हे सहज ध्यानात येऊ शकेल. या रागाची खरी ओळख दाखवायची झाल्यास, "प ध नि ध प" किंवा "प ध म रे सा" या स्वरसंहतीचा मागोवा घेत राहिले तर समजून घेता येईल.
    एखाद्या कलाकाराची एखाद्या रचनेशी कायमची नाळ जुळते आणि ती रचना म्हणजे त्या कलाकाराच्या व्यक्तिमत्वाची नाममुद्रा म्हणून प्रस्थापित होते. पंडित भीमसेन जोशींची "पिया के मिलन की आस" ही रचना इतकी लोकप्रिय झाली की इतर कुणा गायकाने, ती रचना गायला दहादा विचार करावा. जोगिया रागाचा "अर्क" म्हणजे ही रचना, असे म्हणता येईल. विशेषत: तार सप्तकातील ठेहराव आणि आस, फारच अप्रतिम आहे.
    ज्या रागांत भावनिक आवाहन आहे, असेच राग बहुतांशी वेळा या गायकाने निवडल्याचे सहज ध्यानात येऊ शकते. आता, रागामध्ये भाव किंवा मूड का निर्माण होतो, हा संगीत सौंदर्यशास्त्रातील जटील प्रश्न आहे. परंतु, अनवट रागांपेक्षा प्रचलित राग, हे रसिकांच्या मनावर दीर्घकाळ राज्य करू शकतात आणि त्यानुसार रागांची निवड करणे, हे धोरण या गायाकाच्याच बाबतीत नेमकेपणी दिसून येते. अर्थात, अशा प्रकारच्या निवडीने, गायनात साचेबद्धता येण्याचा धोका निर्माण होतो पण पंडितजींनी त्याबाबत सावधगिरी बाळगून, त्यात नाविन्य आणण्याचा यशस्वी प्रयत्न केला, हे देखील समजून घेता येते. एकूणच संपूर्ण गायनाचा विचार केला तर, तानांची गुंतागुंत, आग्रा घराण्याच्या आघातयुक्त आणि पुनरावृत्त स्वरांच्या परिणामांवर अवलंबून असलेल्या तानांच्या अंगाने जाते, असे म्हणता येईल. शिवाय त्यात भर आहे, ती आवाजाच्या लगावातील विरोधसंबंधामुळे अवतरणाऱ्या नाट्यात्मतेची. बोल-लय, बोलतान वा तिहाई वगैरेंवर फारसा भर नाही परंतु अंतिम परिणाम रंगदार होतो की नाही, हीच कसोटी अखेरची असते आणि तिथे मात्र पंडितजी बाजी मारून जातात. ठुमरी अंगाने जाणारी रचना पण तरीही शब्दाचा आशय बघता, त्यानुसार केलेले असामान्य सादरीकरण, असेच इथे म्हणता येईल.
    भारतीय संगीतरचनाकारांना त्यांच्या शास्त्रोक्त संगीताकडील झुकावानुसार जोखणे योग्य आणि गरजेचे आहे, हा अत्यंत चुकीचा समज आहे. परंतु दुर्दैवाने, भारतीय रागसंगीताचे ज्ञान वा तत्संबंधीची सर्वसाधारण माहिती असणे, याला एक योग्यता-निकष म्हणून बरीच प्रतिष्ठा लाभली आहे. मग, संगीतरचनाकार कुठल्याही संगीतकोटीत काम करीत असू दे. या दृष्टीने विचार करता, संगीतकार ओ.पी. नैय्यर यांचा विचार, रचनाकार म्हणून करताना, विश्लेषण करणे आवश्यक ठरते. वास्तविक त्यांची सगळी कारकीर्द बघितली तर आणि प्रसिद्धीचा अदमास घेतला तर, त्यांची गणना, तालाचे बादशहा म्हणून करण्यात येते आणि अर्थात ती फार एकांगी आहे. प्रस्तुत गाणे, "रात भर का है मेहमां अंधेरा" - चित्रपट "सोने कि चिडिया", मुद्दामून ऐकायला हवे.
    "रात भर का मेहमां अंधेरा,
    किस के रोके रुका है सवेरा".
    वास्तविक त्यांच्या संगीताचा ढंग बघता, त्यांना भारतीय रागसंगीत वा संबंधित बाबींचे फार तीव्र आकर्षण आहे,असे दिसत नाही. त्यामुळे, त्याच्या रचनांचे प्रामुख्याने दोन भाग पडतात. एक तर, ते राग वापरतात, कारण विशिष्ट गीतप्रकार हाच मुळी एखाद्या रागात वा त्याच्या सावलीत मुरलेला असतो दुसरा भाग म्हणजे चाल अवतरते आणि नंतर त्यात रागाची बीजे सापडतात. प्रस्तुत गाणे दीपचंदी तालात बांधलेले आहे पण या गाण्याच्या बाबतीत, असे ठामपणे म्हणता येईल, गाण्याची लयच मुळी अशा प्रकारे बांधली आहे की तालवाद्य नसले तरी चालले असते!!
    गाण्याचा मुखडा, जर बारकाईने ऐकला तर ध्यानात येईल, इथे राग जोगिया आणि त्याचे स्वर केवळ आधार म्हणून घेतलेले आहेत. गाण्याची सुरवात अति तार स्वरांत सुरु झाली तरी गाण्याचा "मुखडा" घेताना, मात्र एकदम खालच्या सुरांत आणि शांतपणे सुरु होते.राग जोगिया इथे स्पष्टपणे दिसतो. पण पहिला अंतरा सुरु होण्याआधीचे, जे वाद्यमेळातून संगीत आपल्या समोर येते, ज्यात "कोरस" संगीताचा वापर केला आहे, तिथे तर स्पष्टपणे, ऑपेरा संगीताचा प्रभाव जाणवतो. याचा वेगळा अर्थ असा घेता येईल, रचनाकार, इथे गाण्याच्या अंतिम सादरीकरणाला महत्व देत आहे आणि त्यासाठी मग कुठूनही सांगीतद्रव्य उचलण्याची तयारी आहे, मग त्यात सुरवातीला ज्या रागाचा आधार घेतला आहे, त्याला सहज बिनदिक्कतपणे बाजूला सारण्याची हिम्मत आहे. याचाच दुसरा दृश्य परिणाम असा दिसतो, नैय्यर यांनी आकर्षक सांगीत विलासासाठी प्रचलित रागांत का होईना, पण नवे मुखडे समोर आणले असेही दिसत नाही. नवीन मुखडे बंधने, हे अनेकदा, सर्जनशिलतेचे उदाहरण म्हणून दाखवता येते. या संगीतकाराचे प्रयत्न याबाबतीत तरी कमी पडले, असे म्हणायला जागा आहे.
    सुप्रसिद्ध गायकनट बालगंधर्वांनी गायलेले आणि अतिशय लोकप्रिय झालेले "वद जाऊ कुणाला शरण" हे पद या रागावर आधारलेले आहे. खरतर, गाण्याचे ध्वनिमुद्रण काहीसे सदोष आहे पण तरीही खास वैशिष्ट्ये नक्कीच समजून घेता येतात. या गाण्याची चाल बघितली तर "जोगिया/कलिंगडा" या दोन्ही रागांचा आढळ या रचनेत ऐकायला मिळतो. अर्थात, रचनेचा मुखडा मात्र नि:संशय जोगिया रागावर आहे आणि याच रागाची दाट सावली आहे.
    "वद जाऊ कुणाला शरणागत, करी जो हरण संकटाते;
    मी धरीन चरण त्याचे, अग सखये".
    बालगंधर्वांनी लयसिद्धी प्राप्त होती. विशिष्ट मात्रांचे तालावर्तन सुरु झाले की त्याचे स्पंदन अंगी भिनल्यासारखे कायम राखणे, तबलजीने कसेही आड वाजवले तरी सुखाने गात राहायचे त्याना जमते, हे इथे लक्षात येते. मात्रांच्या सूक्ष्म कणांशी क्रीडा करणे, ही खास लयकारी पण शब्दांची किंवा अक्षरांची फेक जरा इकडे, तिकडे केल्याने सबंध तालावर्तन कसे उठून येते, हे देखील ऐकण्यासारखे आहे. सुरावटींचा पुनरावतार असावा, पण त्यांची पुनरावृत्ती टाळावी, हे एक कालासुत्र, त्यांच्या गाण्यात प्रत्ययाला येई.लयकारीची सूक्ष्म क्रीडा, हा विशेष इथे प्रत्ययाला येतो. आवाज फार बारीक नाही पण लगाव नाजूक आहे. विशेष म्हणजे त्यात अस्थिरता नाही. पट्टी उंच आहे पण तरीही मध्यममार्ग आहे. आवाज सहजपणे हलका होतो. आवाजात काही वेळा असे आढळते, त्याला स्वरावर स्थिर करून बघितले की तो जडावतो. तसे इथे काहीच घडत नाही. सहजपणे, दुसऱ्या स्वरावर जाणे, तिथे हलकीशी हरकत घेणे आणि त्यातून लय लांबविणे, इत्यादी अनेक सांगीत सौंदर्यवाचक क्रिया, या गाण्यात सहज ऐकायला मिळतात.आशयनिश्चिती करणारा एक काहीसा अमूर्त घटक म्हणजे त्यांच्या गायकीतील उत्कटता. तसे बघितले तर, उत्कटता ही मनोवृत्ती सर्जनशिलतेची पूर्वअट असते. बालगंधर्व जे काही गात असत, त्यात एक उत्कटता, एक भारलेपण होते आणि ते ऐकणाऱ्यापर्यंत संक्रांत होणे, ही अपरिहार्यता होती. तसे बघितले तर संगीताचा आशय, गवयी-गाण्याचा नाही. पण तरीही त्या गायनाची सावली सादरीकरणावर पडलेली आढळते.
    "गुंज उठी शहनाई" चित्रपटातील "कह दो कोई ना करे यहां प्यार" या गाण्यातून आपल्याला जोगिया रागाची ओळख करून घेता येते. संगीतकार वसंत देसायांनी या गाण्याची तर्ज बांधली आहे आणि मोहम्मद रफीनी गायले आहे. मुळात रफीचा पहाडी, दमदार आवाज, आणि गाण्याची रचना देखील त्या गळ्याला सुयोग्य अशी असल्याने, हे गाणे खूपच लोकप्रिय झाले.
    "बिखर गये बचपन के सपने, अरमानो की शाम ढले;
    कही सजे बारात किसीकी, कही किसीका प्यार जले;
    कह दो कोई ना करे यहां प्यार
    इस में खुशिया है कम, बेशुमार है गम;
    एक हंसी और आंसू हजार".
    गाणे पहिल्या सुरापासून वरच्या सप्तकात गायले गेले आहे आणि तिथे आपल्याला जोगिया रागातील, ज्याला "आस" म्हणतात अशा सुरांची भेट होते.
    असेच एक गाणे "दिल एक मंदिर" या चित्रपटात आहे - "दिल एक मंदिर है" याच ओळीने गाणे सुरु होते. इथे एक गंमत बघता येते. वरील गाण्याच्या चालीतील सूर आणि या गाण्याच्या चालीतील सूर, एकमेकांशी ताडून बघितले तर खूप फरक आढळतो पण तरीही गाण्याच्या एका वळणावर, आपल्याला या रागाचे सूर आढळतात.
    "जानेवाले कभी नहीं आते,
    जानेवालो की याद आती है;
    दिल एक मंदिर है, दिल एक मंदिर है
    प्यार की जिसमें होती है पूजा, ये प्रीतम का घर है
    संगीतकार शंकर/जयकिशन यांनी या गाण्याची चाल बांधली आहे आणि तशी चाल काही फार अवघड नाही पण गाणे आपल्या मनावर विलक्षण परिणाम करते. ही किमया संगीतकाराची. या संगीतकार जोडीबद्दल एक गोष्ट अवश्यमेव सांगायलाच हवी. चित्रपट गीत हे प्रामुख्याने चित्रपटातील कथेला पूरक असे माध्यम आहे आणि ही जाणीव यांच्या प्रत्येक रचनेत आढळून येते.
    -- अनिल गोविलकर