हल्ली इंटरनेट वर सगळीकडेच आपल्या प्रथा परंपरांना चुकीचे ठरवण्याचे पेव फुटले आहे. त्यातीलच एक महत्वाची प्रथा म्हणजे नव्या नवरीचा गृहप्रवेश. तिचे धान्यानी भरलेले माप पाऊलानी कलंडून घरात येणे. हे असे करणे कसे चुकीचे आहे. यात कसा अन्नाचा अपमान होतो.
टेलिकॉम क्षेत्र हे देशातील सर्वाधिक ऊर्जा वापरणारे दुसर्या क्रमांकाचे क्षेत्र ठरले आहे. टेलिकॉम क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी देशातील एक तृतियांश ऊर्जा खर्च होते, असे दिसून आले आहे. देशाच्या एकूण ऊर्जा आवश्यकतेपैकी आयसीटी क्षेत्रासाठीच्या ऊर्जेचे प्रमाण येत्या दहा वर्षांत २.७ टक्के एवढे मोठे होईल, असे सरकारी आकडेवारी सांगते. मोबाइल टॉवर्ससाठी सर्वाधिक ऊर्जा लागते.
पुढच्या वर्षी बाजारात नवीन येणारी पुस्तकं… याच्या लेखकांची नावं तर वाचा…
आपल्या भारत सरकार तर्फे घेतली जाणारी एम ई ओ क्लास फोर म्हणजे मरीन इंजिनियर ऑफिसर क्लास फोर ही परीक्षा पास केल्यानंतर मला कंपनीने माझ्या सागरी जीवनातील दुसऱ्याच जहाजावर पाठविले. माझे दुसरे जहाज आईस क्लास तर होतेच पण त्याशिवाय या जहाजावरील इंजिन स्मार्ट इंजिन किंवा इलेक्ट्रॉनिक कंट्रोल्ड प्रकारचे होते. परीक्षा पास झाल्यावर पहिलेच जहाज असल्याने फोर्थ इंजिनियर म्हणून न पाठवता पुन्हा एकदा ज्युनियर इंजिनियर म्हणून पाठवण्यात आले होते. पण जहाज जॉईन केल्यानंतर पंधरा दिवसातच चीफ इंजिनियरकडून माझा रिपोर्ट मागवला गेला आणि दुसऱ्याच दिवशी फोर्थ इंजिनियर म्हणून प्रमोट केले गेले.
औषधी शेती हा पर्याय आर्थिक उन्नतीमध्ये महत्वाचा निर्णय ठरत आहे.जागतिक बाजारपेठेचा विचार करता भारतीयांना फायद्याचा ठरेल असा पर्याय आहे. अलोपेथिक औषधांचे दुष्परिणाम पाहता आज जग आयुर्वेदिक औषधांकडे आकृष्ट होत आहे.
मनुष्यबळ विकास खात्याने विश्वनाथन आनंदला डॉक्टरेट देण्याच्या प्रक्रियेत नागरिकत्त्वाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले. स्पेनमध्ये राहत असल्याने तो भारतीय नागरिक नसल्याचा जावईशोध या खात्याने लावला. केंद्रिय मंत्री कपिल सिब्बल यांनी आनंदची माफी मागत या प्रकरणावर पडदा टाकला असला तरी एकूणच खेळाडू आणि क्रीडासंस्कृती याबाबत आपल्याकडे केवढी मोठी उदासिनता आहे, हे नव्याने पहायला मिळाले.
संत आणि वारी यांचा वेध घेण्याचा केलेला छोटासा प्रयत्न…
एमपीएससीच्या परीक्षेत सोलापूर जिल्ह्यातील कचरेवाडी-मंगळवेढे इथला अभयसिंह मोहिते राज्यात प्रथम आला आहे. इथवरच न थांबता त्याला यूपीएससीची परीक्षाही द्यायची आहे.
निकालाची बातमी ऐकल्यावर नेमकं काय वाटले ?
मला आणि आई-वडीलांना अतिशय आनंद झाला. मला यशाची खात्री होतीच. पण प्रथम क्रमांक येईल असं वाटलं नव्हतं. आईला या स्पर्धा परीक्षेविषयी फारशी माहिती नाही. पण आपल्या मुलाने काहीतरी मोठं यश मिळवलं आहे याचा आनंद तिच्या डोळ्यातून दिसत होता.
अभ्यासाचे नियोजन कसं केलं ?
मी कोणतीही शिकवणी लावली नव्हती. स्वअभ्यासावरच मी हे यश मिळवलं आहे. विविध दर्जेदार पुस्तकं, अवांतर वाचन, वर्तमानपत्र यांचं नियमित वाचन केलं. लायब्ररीतून या परीक्षेसंबंधी अनेक पुस्तके शोधली. अशा स्पर्धापरीक्षांना बसणाऱ्या इतर मित्रांचंही खूप सहकार्य लाभलं. मी कधीही लवकर उठून किंवा रात्री जागून अभ्यास केला नाही. त्यापेक्षा दिवसभरात मिळणाऱ्या वेळेचा जास्तीत जास्त उपयोग कसा करून घेता येईल, याकडे लक्ष दिलं. मोबाईलवर कमीत कमी वेळ घालवणं, टाइमपास करण्याऐवजी अभ्यास आणि पुरेशी विश्रांती असा दिनक्रम ठेवला.
अभ्यास करताना कोणत्या अडचणी आल्या ?
मी याआधीही दोनवेळा या परीक्षेला बसलो होतो. आधीच्या प्रयत्नात अपयश आले तेव्हा वाईट वाटलं. आपण कमी पडतोय अशी भावना मनात निर्माण झाली. पण ज्या विषयांमध्ये अपयश आलं त्यांचा अधिक अभ्यास केला. चुकांचे विश्लेषण करून त्या टाळण्याचा प्रयत्न केला.
नोकरी आणि अभ्यास हे दोन्ही एकाचवेळी कसं सांभाळलं ?
मी २०११ साली विक्रीकर निरीक्षक आयुक्त आणि २०१३ ला सहाय्यक गटविकास अधिकारी या पदावर नियुक्त झालो. परंतु ही नियुक्ती होण्याआधीचे दिवस मी अभ्यासाचा पाया पक्का केला होता. नोकरी करताना संध्याकाळी मिळणाऱ्या ४-५ तासांचं अभ्यासासाठी योग्य नियोजन केलं.
स्पर्धापरीक्षांमध्ये लेखी परीक्षेबरोबरच मौखिक चाचणी हा महत्वाचा भाग असतो. त्यासाठी काय मेहनत घेतली?
विविध तज्ज्ञमंडळींकडून आणि सिनियर्सकडून मला मौखिक चाचणीसाठी मार्गदर्शन मिळालं. अनेक मॉक इंटरव्ह्यूज मी दिले. त्यातून हावभाव आणि उच्चार यात योग्य त्या सुधारणा करू शकलो. कारण उच्चारांबरोबरच तुमच्या चेहऱ्यावरील भाव आणि शारीरिक हालचाली यांतून अनेक गोष्टी दिसत असतात.
इंजिनीअर असूनही प्रशासकीय सेवाक्षेत्राकडे कसा वळलास?
इंजिनीअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला असताना माझ्या मनात या क्षेत्राविषयी आकर्षण निर्माण झालं. मशिन्सच्या सान्निध्यात करिअर करण्यापेक्षा लोकांशी संवाद साधावा आणि त्यांच्यासाठी काहीतरी करावं अशी भावना मनात निर्माण झाली. त्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो.
स्पर्धापरीक्षा देत असलेल्या विद्यार्थ्यांना तू काय सांगशील?
मी त्यांना एकच गोष्ट सांगेन, दोस्तांनो, यशाला शॉर्टकट नसतो. कष्टांना पर्याय नाही. अपयशाचा न्यूनगंड बाळगू नका. सततचा सराव आणि यश मिळविण्याची अंतर्गत प्रेरणा खूप महत्वाचे आहेत. प्रामाणिक प्रयत्न केल्यावर यश मिळतंच.
प्रशासकीय सेवेच्या माध्यमातून समाजासाठी काय करणार आहेस?
मी कॉम्प्युटर इंजिनीअर आहे. सध्या प्रशासनात सुरू असलेल्या कॉम्प्युटरायझेशन प्रक्रियेचं महत्वही मी जाणून आहे. मी यासाठी अधिकाधिक प्रयत्न करेन. त्यातून वेळ वाचेल आणि प्रशासनात पारदर्शकता येण्यास मदत होईल. तसंच शिक्षणक्षेत्रासाठी काही काम करावं अशी माझी इच्छा आहे. मी ज्या भागातून आलो आहे, तिथे अजूनही शिक्षणासाठी फारसं पोषक वातावरण नाही. आपल्या देशात आणि राज्यात अनेक ठिकाणी हीच परिस्थिती आजही आहे. ती मला बदलायची आहे. शिक्षण प्रसारासाठी मी जास्तीजास्त प्रयत्न करेन.
इतर आवडी-निवडी काय आहेत ?
मला ट्रेकिंग आवडतं. मला रोजच्या कामांसाठी लागणारा उत्साह आणि उर्जा त्यातून मिळते.
- दीपक गायकवाड
Copyright © 2025 | Marathisrushti