कधी कधी वाटतं… सालं हे लिखाण वगैरे सोडून द्यावं कायमचं. स्नुझ व्हावं जगाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात…..
मुंबई शहराबद्दल बरंच काही लिहिलं-बोललं गेलेलं आहे. त्यात आता ही नवी भर कशाला असं वाटणं सहाजिकच आहे. मात्र या लेखमालेत मुंबईच्या इतिहासाच्या काही महत्त्वाच्या टप्प्यांकडे नजर टाकण्याचा एक वेगळा प्रयत्न केला आहे. यामध्ये मुंबईतली दळणवळण साधने, रस्तावाहतूक, ट्राम, रेल्वे, टॅक्सी-रिक्शा यापासून थेट आत्ताच्या मेट्रोच्या होऊ घातलेल्या जाळ्याकडे एक नजर टाकलेय. मुंबईतली घरबांधणी आणि त्यातील स्थित्यंतरे, म्हाडा, मुंबईतली “चाळ”संस्कृती, सहकारी गृहनिर्माण संस्था, एसआरए, क्लस्टर कॉक्रिट टॉवर्स आणि इतर बरंच काही..... याबद्दल वाचा या लेखमालेत...
मुंबईच्या इतिहासातील रंजक गोष्टींची माहिती घेण्यापूर्वी अगदी थोडक्यात मुंबईचा इतिहास बघायलाच हवा.
शिलाहार राजवटीतील बिंब नावाच्या राजाने महिकावती (माहीम) शहर वसवले आणि तेथे किल्ला बांधून आपली राजधानी वसवली. त्याची कुटुंब देवता 'प्रभादेवी' ही होती असे म्हणतात. या राजाच्या राजवटीत लोक सुखी होते. जमीन, महसूल, न्याय वगैरेच्या बाबतीत बिंब राजा न्यायी व आदर्श होता.
नंतर अनेक राजसत्तांनी मुंबईवर राज्य केले. १७३९ साली ब्रिटीशानी मराठी राजेशाही कमकुवत झाल्याचा फायदा घेऊन साष्टी बेटावर आपला कब्जा केला. तोपर्यंत पोर्तुगीजांनी ख्रिस्ती धर्मप्रसार करण्याच्या अतिमहत्त्वाकांक्षेने आणि अतिउत्साहाने इथल्या लोकांचा अनेक प्रकारे छळ केला. त्यांनी हिंदूंची अनेक देवळेही भ्रष्ट केली. वान्द्रयापासून वसई पर्यंत अनेक ठिकाणांचे ख्रिस्तीकरण झाले होते.
पोर्तुगीजांकडून साष्टी बेटे इंग्रजांकडे गेल्यामुळे मुंबईचे गोवा झाले नाही हे आपले नशीब. ब्रिटीशांचा ख्रिस्तीकारणापेक्षा राजकारण करण्याकडे विशेष मुत्सद्दी दृष्टीकोन होता. त्यांना केवळ व्यापार करायचा नव्हता तर येथे राज्य करायचे होते. त्यामुळे त्यांनी त्याचदृष्टीने आपले हातपाय पसरायला सुरुवात केली होती.
माझगाव, परळ, वरळी हा भाग म्हणजे त्यावेळची मुख्य मुंबई. येथे कोळी, भंडारी समाज राहत होता. परळ व शिव येथे कुणबी राहत. माहीम भागात बरेचसे मुसलमान, थोडे प्रभू आणि साष्टीमधून आलेले काही ब्राह्मण अशी वस्ती होती. १६७० मध्ये सुरतेहून व्यापाराच्या निमित्ताने गुजराती बनियावर्ग येथे आला. तेंव्हापासून गुजराती वस्ती वाढू लागली.
इंग्रजांच्या ताब्यात मुंबई आली त्यावेळची मुंबईची लोकसंख्या जेमतेम दहा हजारांच्या आसपास होती. १८७५ मध्ये ती ६० हजारांवर गेली. यामध्ये ब्राह्मण, पाठारे प्रभू, पाचकळशी, माळी, ठाकूर, भोई, आगरी इत्यादि जमातीची मंडळी होती.
मुंबईत कापडाच्या गिरण्या मोठ्या प्रमाणात सुरु झाल्या आणि मुंबईची लोकसंख्या झपाट्याने वाढायला सुरुवात झाली. १९२० ते १९३० च्या दरम्यान मुंबईची लोकसंख्या १० लाखांच्या वर गेली.
किल्ल्याबाहेरच्या आधुनिक मुंबईचा जन्म :
१८२० ते १८३० च्या दरम्यान टुमदार मुंबई शहर ४५०० चौरस मैल परिघाच्या किल्ल्याच्या आतल्या बाजूला वसलेले होते. निसर्ग सौन्दर्याने नटलेल्या मुंबईची लोकसंख्या केवळ अडीच लाखाच्या आसपास होती. किल्ल्याच्या तटबंदीबाहेर १००० यार्डापर्यंत कोणतेही बांधकाम करण्यास कुणाला परवानगी नव्हती.
१८२९ साली गव्हर्नरने आपले राहण्याचे ठिकाण किल्ल्याबाहेर हलवण्याचे ठरवले. त्याआधी जवळजवळ ७० वर्षे मुंबईचा गव्हर्नर अपोलो स्ट्रीटवर वास्तव्याला असे आणि तेथूनच मुंबईचा कारभार बघत असे. गव्हर्नर किल्ल्याबाहेर रहायला गेला म्हटल्यावर अनेक श्रीमंत लोकांनीही परळ, माझगाव, भायखळा, मलबार हिल वगैरे भागात वस्ती करायला सुरुवात केली.
एक गमतीशीर गोष्ट म्हणजे आज आकंठपणे बिअरबार संस्कृतीमध्ये बुडालेल्या मुंबईत पहिल्यांदा प्यायचा सोडा मिळू लागला तो १८३५ मध्ये. बर्फ मिळायला मुंबईकरांना आणखी २ वर्ष वाट बघायला लागली.
१८३८ साली मुंबई आणि लंडन यामधील नियमित टपाल सेवा सुरु झाली. ही आणि अशीच रंजक माहितीही बघूया कालांतराने येणार्या काही लेखांमध्ये.....
-- निनाद अरविंद प्रधान
व्यवस्थापकीय संपादक, मराठीसृष्टी
www.marathisrushti.com
मुंबईच्या रंजक इतिहासातील टप्पे - भाग १
(क्रमशः)
एका पोस्ट मध्ये वाचले होते की जेष्ठ महिना. जेष्ठ वडवृक्ष आणि जेष्ठांचा आशीर्वाद. किती गहरा अर्थ आहे ना?
रखरखता रणरणत्या उन्हाळ्यात जीव कासावीस झाला होता. मन पण उद्विग्न. कधी एकदा पावसाची सर कधी येणार आणि सगळे कसे वातावरण बदलून जाईल याची ओढ असते.
एक स्त्री म्हणून या क्षेत्रात काम करताना काही गोष्टी मला प्रकर्षाने जाणवतात. सतत सजग असावे लागते. कारण या महिला आहेत, यांना काय कळते या पुरुषी मानसिकतेचा त्रास याही क्षेत्रात असतो. थोडक्यात ‘बायकांना काय अक्कल असते?’ या दृष्टीकोनाला या क्षेत्रातही तोंड द्यावे लागते.
कर्करोगाने ग्रासलेल्या आणि अत्यवस्थ झालेल्या माझ्या जवळच्या नातलगाची शेवटची भेट व्हावी म्हणून पत्नीसमवेत मी मध्यंतरी तातडीने अमेरिकेला गेलो. न्यूयॉर्क येथे पोहोचल्यावर आंघोळ वगैरे उरकून ‘हॉस्पिस’(हॉस्पिटल नव्हे) गाठले. ज्या रुग्णांना कुठल्याही औषधोपचारांनी बरे करणे शक्य नसते आणि रुग्णाचा अंत:काळ जवळ आलेला असतो अशांना ‘हॉस्पिस’मध्ये ठेवतात. त्या ठिकाणी कुठलाही रोग बरा करणारा औषधोपचार होत नाही, परंतु अटळ असणारा मृत्यू सर्वार्थाने शांतपणे व्हावा, वेदना न होता यावा यासाठी वेदनामुक्तीच्या उपचाराची सर्व व्यवस्था हॉस्पिसमध्ये असते. (‘हॉस्पिस’ ही संकल्पना आता भारतातही रुजू लागली आहे. भारतातील काही शहरांमध्ये ‘हॉस्पिस’ आहेत.) अमेरिकेतील ‘हॉस्पिस’मध्ये रुग्ण जास्तीत जास्त किती काळ जगण्याची शक्यता आहे, याची स्पष्ट कल्पना रुग्णाच्या जवळच्या नातेवाईकांना देण्यात येते. स्वच्छ आणि टापटीप असणाऱ्या या हॉस्पिसमध्ये भेटायला जाणाऱ्या रुग्णाच्या नातेवाईकांवर वेळेचे बंधन नसते. रात्री- अपरात्री केव्हाही, कितीही नातेवाईक हॉस्पिसमध्ये जाऊन मरणासन्न रुग्णाला भेटू शकतात. रुग्णाच्या नातेवाईकांची आस्थेने विचारपूस होते. त्यांना कॉफी, केक इत्यादी पदार्थ मिळण्याची आणि विश्रांती घेण्याची स्वतंत्र व्यवस्था असते. हात र्निजतुक करण्यासाठी ठिकठिकाणी सॅनिटायझर्स ठेवलेले असतात. हॉस्पिसमधील कर्मचारी आणि नर्सेस अत्यंत अदबीने वागतात. रुग्ण मरणासन्न अवस्थेत असल्याने त्याच्या मनाने खचलेल्या नातेवाईकांची काळजी सातत्याने जाणीवपूर्वक घेतली जाते. रुग्णाच्या नातेवाईकांसाठी इंटरनेटची आणि फोनची व्यवस्था असते.
आम्ही सकाळी ११ च्या सुमारास हॉस्पिसमध्ये पोहोचलो आणि दुपारी ४.२५ वाजता माझ्या पत्नीची वहिनी निवर्तली. हॉस्पिसमधल्या सुंदर, शांत आणि आरामदायी वातावरणात हळूहळू श्वास मंद होत तिला मृत्यू आला. योग्य प्रमाणात वेदनाशामके दिल्यामुळे मृत्यू येताना तिच्या चेहऱ्यावर अथवा शरीरावर कुठलीही वेदना अथवा घुसमट जाणवली नाही. हॉस्पिसमधील डॉक्टर जवळच होते. त्यांनी व्यवस्थित तपासले आणि ‘सॉरी’ म्हणून मृत्यू झाल्याचे जाहीर केले.
मृत्यू एक-दोन दिवसांत येईल, याची पूर्वकल्पना दिलेली असल्यामुळे फ्यूनरलची व्यवस्था आधीच करून ठेवली होती. न्यूयॉर्कमधील लाँग आयलन्ड या भागात असलेल्या ‘फ्यूनरल होम’ या संस्थेस अंत्ययात्रेचे कॉन्ट्रॅक्ट दिले होते. दु:खाचा पहिला आवेग ओसरल्यावर फ्यूनरल होमच्या व्यवस्थापकास फोन केला गेला. काही मिनिटांच्या आत सुटाबुटातील एक तरुण आणि त्याचा साहाय्यक शववाहिका घेऊन आले. त्याने डेथ सर्टिफिकेट ताब्यात घेतले. मृतदेहाचा ताबा घेतला. चेन असलेल्या कापडी बॅगेत मृतदेह काळजीपूर्वक ठेवून तो शववाहिका घेऊन गेला. जाताना त्याने हळुवारपणे सर्व नातेवाईकांचे सांत्वन केले आणि अत्यंत खुबीने पुढील कार्यक्रमाची माहिती दिली.
शास्त्रशुद्ध पद्धतीने मृतदेह स्वच्छ करण्यात आला. काही रासायनिक द्रव्ये शरीरात सोडली गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी काही जवळचे नातलग फ्यूनरल होममध्ये गेले. त्या मृत शरीरास साडी-चोळी नेसवण्यात आली. फ्यूनरल होममधील प्रशिक्षित कर्मचाऱ्यांनी मृतदेहाला चक्क मेकअप केला. मखमली पेटीत पहुडलेला तो मृतदेह एखाद्या सुंदर बाहुलीसारखा दिसत होता. दुपारी २ ते ४ आणि संध्याकाळी ४ ते ७ या वेळेत त्या मृतदेहाच्या अंत्यदर्शनाचा (viewing) चा कार्यक्रम होता. सुंदर मखमली पेटीत मृतदेह ठेवला होता. ज्या हॉलमध्ये मृतदेह ठेवला होता, तो हॉल उंची फर्निचर, गुबगुबीत गालिचे आणि चांगल्या आसन व्यवस्थेने सजवला होता. फ्यूनरल होमचे सर्व कर्मचारी सुटाबुटात होते. इमारतीच्या समोर सुमारे २०० गाडय़ा उभ्या राहतील, अशी पार्किंगची सोय होती. प्रवेशद्वारावरील दोन तरुणी अंत्यदर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येकाचे अदबीने स्वागत करीत होत्या. अमेरिकेतील भारतीय मंडळीसुद्धा सुटाबुटात आली होती. येताना अत्यंत शोभिवंत असे फुलांचे मोठे गुच्छे मृतदेहाशेजारी ठेवण्यासाठी आणत होते. शवपेटीच्या मागे अमेरिकेचा राष्ट्रध्वज होता. मंद आवाजात श्रीमद्भगवद्गीतेच्या १५ व्या अध्यायाची सीडी लावलेली होती. वातावरणात खिन्नता होती पण कुठल्याही प्रकारची भयाणता, भीती, दडपण जाणवत नव्हते.
तिसऱ्या दिवशी दुपारी दोन वाजता क्रिमेशन होते. स्थानिक ब्राह्मणांनी फ्यूनरल होममधील हॉलमध्ये काही धार्मिक विधी केले. मंत्रघोषात शवपेटी बंद करण्यात आली. त्या वेळी सर्व भारतीय आणि अमेरिकन मंडळींनी हात जोडून नमस्कार केला. शवपेटी एका लांब रुंद शववाहिकेत ठेवण्यात आली. शववाहिका मार्गस्थ होण्यापूर्वी शववाहिकेबरोबर असलेल्या गाडय़ांचा जो ताफा होता, त्या ताफ्यातील प्रत्येक चालकाच्या हातात क्रिमॅटॉरिअमपर्यंत जाण्याचा मार्ग आणि नकाशा दिला गेला. शववाहिका मुख्य रस्त्याला लागण्यापूर्वी विशिष्ट प्रकारचे दिवे लावून गाडय़ांचा ताफा मार्गस्थ झाला. प्रचंड ट्रॅफिक असूनही या अंत्ययात्रेतील गाडय़ांच्या ताफ्याला कुणीही ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करीत नव्हते. उलट सन्मानाने पुढे जाण्यासाठी मार्ग मोकळा करीत होते. क्रिमॅटॉरिअममध्ये जाण्यापूर्वी शववाहिका मृताच्या घरापाशी गेली. घराच्या दरवाजात फ्यूनरल होमच्या कर्मचाऱ्यांनी गुलाबाची फुले ठेवली. काही काळ सर्वजण स्तब्ध उभे राहिले आणि पुन्हा गाडय़ांचा ताफा मार्गस्थ झाला.
सुमारे ३५ मैलांवर असलेल्या क्रिमॅटॉरिअममध्ये सर्वजण पोहोचले. पुन्हा मंत्रपठण होऊन विद्युत दाहिनीमध्ये हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार पार पडले. फ्यूनरल होमच्या सर्व कर्मचाऱ्यांनी हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार होण्यासाठी साहाय्य केले. मंत्रपठण होत असताना मान खाली ठेवून आणि अदब दाखवून आपल्या धार्मिक भावनांचा आदर राखला जात होता.
विद्युतदाहिनी असलेली इमारत भव्य नक्षीकाम केलेली होती. एखाद्या चर्चसारखी तिची रचना होती. सभोवती सुंदर फुलांची बाग होती, कारंजी होती. हल्ली दफन करण्यासाठी जमिनीचा तुटवडा असल्याने पुष्कळ अमेरिकन लोकही पुरण्याऐवजी विद्युतदाहिनीमध्ये दहन करण्याचा पर्याय स्वीकारत आहेत. काही दिवसांपूर्वी ‘न्यूयॉर्क टाइम्स’मध्ये विद्युत दहन करण्याच्या पर्यायावर एका पत्रकाराने भलामोठ्ठा लेख लिहून विद्युतदहनाची आवश्यकता असल्याचे ठासून सांगितले होते.
ज्या दिवशी दहन झाले त्याच्या दुसऱ्या दिवशी अस्थी देण्यात आल्या. व्यवस्थितपणे एका खोक्यात प्लॅस्टिकच्या झिपलॉक असलेल्या पिशवीत पॅक करून अस्थी देण्यात आल्या. या अस्थींबरोबर डेथ सर्टिफिकेट आणि क्रीमेशन सर्टिफिकेट एका फाईलमध्ये देण्यात आले. ही सर्व कामे फ्यूनरल होमच्या कर्मचाऱ्यांनी केली होती. मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना कुठलीही तसदी नव्हती. या सर्टिफिकेटबरोबर फ्यूनरल होमतर्फे सांत्वनाचे पत्र होते आणि एका भल्या मोठय़ा पुडय़ात केक्स्, बिस्किटे, कुकीज वगैरे पदार्थ दिले होते.
(२७ नोव्हे.२०१० साली चतुरंग लोकसत्ता मधे सदर लेख मी प्रसिद्ध केला होता. तो पुन्हा या ठिकाणी देत आहे.)
-- चिंतामणी कारखानीस
नवीन घर घेणाऱ्यांनो सावधान !!! सर्व मराठी मध्यमवर्गीयांसाठी महत्त्वाचा सल्ला
इलेक्शनच्या तोंडावर अनेक राजकीय नेत्यांनी या बिल्डर-डेव्हलपरकडे ठेवलेले पैसे परत मागायला सुरुवात केली आहे. त्यामुळे अनेक बिल्डर-डेव्हलपर्सच्या पायाखालची माती सरकली आहे. कारण त्यांनी विकसित केलेल्या अनेक गृहसंकुलांमध्ये गिऱ्हाईकच नाही. कोटींच्या घरातले फ्लॅट इथेकुणाला परवडणार आहेत?
पण राजकारण्यांना इलेक्शनसाठी त्यांचं काळं धन परत करण्याशिवाय गत्यंतर नाही, त्यामुळे बिल्डर-डेव्हलपरला जागांचे भाव खाली आणण्याशिवाय गत्यंतर नाही. त्यामुळे रिअल इस्टेट म्हणजे राहत्या जागांचे भाव झपाट्याने खाली येणार यात शंकाच नाही.
शहापूरमध्ये तीन महिने पाण्याचं प्रचंड दुर्भिक्ष्य असतानाही तिथल्या एका मोठ्या प्रोजेक्टसाठी त्या बिल्डरने तर आघाडीच्या हिंदी सिनेमा नटीचा चेहरा वापरून लोकांनी स्वस्तातले फ्लॅट घ्यावेत म्हणून जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. सोबत कार, दागिने, किचन अक्सेसरीज वगैरे निःशुल्क देण्याचं आमीषही दाखवलंय.
पण मराठी मध्यमवर्गीयांनो सावधान. हीच वेळ आहे एकजूट दाखवण्याची. या जाहिरातींना भुलून धावू नका. कारण बड्या बिल्डर-डेव्हलपर लॉबीची नुकतीच एक गोपनीय मीटिंग झाल्याचं समजतं. त्यात त्यांनी जागांचे भाव ५० टक्क्यांपर्यंत उतरू द्यायचे नाहीत, अशी स्ट्रॅटेजी आखल्याचं समजतं. केवळ २५ टक्क्यांपर्यंत भाव उतरवले तर मिडलक्लास जागांवर उड्या मारेल आणि रिअल इस्टेट तेजीत येईल अशी त्यांची योजना आहे. पण मराठी मध्यमवर्गीयांनो ध्यान्यात घ्या.
तुम्ही एकजूट ठेवा. जागांचे भाव आता आहेत त्याच्या निम्मे येईपर्यंत घाई करू नका. हा गेम ऑफ पेशन्स आहे. प्रचंड होल्डिंग कपॅसिटी असलेले बिल्डर जिंकतात की घरांची गरज असलेला सर्वसामान्य जिंकतो, हे आता लोक बघतायत. यात काही बँकाही भरडल्या जाण्याचा
संभव आहे. बिल्डरांना कोट्यवधी रुपयांचं कर्ज देणारी एक बँक सध्या डगमगते आहे. अनेक बँकांना गिऱ्हाईके नाहीत. कारण ज्यांच्याकडे काळा पैसा आहे, असेच लोक सध्या जागा विकत घेताहेत. इथल्यापेक्षा दुबईतले घर स्वस्त झाले आहे.
मराठी मध्यमवर्गीयांनो जागांचे भाव कृत्रिमरीत्या वाढवणाऱ्या बिल्डरांना नमवण्याची हीच संधी आहे. तुम्ही जर एकजूट दाखवून पेशन्स दाखवला आणि जागांचे भाव ५० टक्के खाली आल्याशिवाय नवे घर घेणार नाही अशी धमक दाखवली तर सर्वसामान्य लोकांना ग्राण्टेड धरणाऱ्या बिल्डरांना कायमचा धडा शिकवता येईल.
भाजप-सेना युती टिकणार की तुटणार? भाजपही आगामी काळात ‘परिणाम’ दाखविण्यास सिद्ध!
‘वृत्तनिवेदक – दिपक वेलणकर” असं ऐकताक्षणीच डोळ्यासमोर येतं एक भारदस्त व्यक्तीमत्वं ज्यांना आवाजाची अनमोल देणगी आहे, ज्यात अनोखेपण लपलंय.
Copyright © 2025 | Marathisrushti