(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • आता नाही कुठे …

    आता नाही कुठे अंतराला ओल

    कसा तरी व्हावा एकमेळ

    वाढतो मी पान जेवतो न कोणी

    माझीच कहाणी मी वाचतो

  • २७ जुलै – आजचे दिनविशेष

    होजे सेल्सो बार्बोसा दिन - पोर्तोरिको

    घडामोडी
    १९९६ - अमेरिकेच्या अटलांटा शहरात १९९६ उन्हाळी ऑलिंपिक सुरू असताना सेंटेनियल ऑलिंपिक पार्क येथे गावठी बॉम्बचा स्फोट. १ ठार, १११ जखमी.
    २००२ - युक्रेनच्या ल्विव शहरात सुरू असलेल्या विमानांच्या प्रात्यक्षिकांदरम्यान सुखॉई एस.यु.२७ प्रकारचे विमान प्रेक्षकांवर कोसळले. ८५ ठार, १०० जखमी.

    जन्म
    १८९९- पर्सी हॉर्नीब्रूक, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
    १९१५- जॅक आयव्हरसन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.

    मृत्यू
    २००२ - कृष्णकांत, भारताचे उपराष्ट्रपती.
    २००३ - बॉब होप, इंग्लिश अभिनेता.

  • अमृततुल्य मैत्री

    पंच्याहत्तर वर्षांपूर्वी बालपणी या तिघांची गट्टी जमली तेव्हा मुंबईचं महानगर झालेलं नव्हतं. समुद्राकाठच्या शांत, रम्य नगरीमध्ये बाळाराम आणि माधवराव हुतूतू, आट्यापाट्या, लगोर्‍्या खेळत मोठे होत होते. त्यातच १९२३ मध्ये त्यांना कलकत्त्याहून मातृवियोगाचं दु:ख घेऊन आलेला प्यारेलाल भेटला आणि त्यांच्यातलाच झाला.

  • बालपणीची भांडणें

  • आशा आणि अपेक्षा..

    आशा आणि अपेक्षा या दोन जुळ्या बहिणी....

    जिथे जिथे आशा असेल तिथे तिथे अपेक्षा भेटणारच...

    मनुष्यप्राणी आशेवरच जगतो... आणि सतत कसलीतरी अपेक्षा करतोच करतो..

    माणुसच कशाला.. अगदी कोणताही प्राणी तेच करतो..

    आपण कोणाकडूनतरी कसलीतरी अपेक्षा करतो.. आपल्याला आशा असते की आपली ती अपेक्षा पूर्ण होईल..
    कधीकधी आशा आणि अपेक्षा अगदी १०० टक्के पावतात आणि सहजगत्या प्राप्त होतात..
    पण कधीकधी अगदीच अपेक्षाभंग होतो..

    आशा कधी निराशेत परिवर्तित होते ते कळतंच नाही..
    अशावेळी अपेक्षाभंगाचं दु:ख होतं आणि ते पचवायला फार कठीण होतं..

    अशी निराशा आणि अपेक्षाभंग आपल्या जवळच्या माणसांकडून पदरी पडला तर त्याचं दु:ख जास्त होतं..

    पण मग सुखी रहाण्यासाठी काय करायचं ?

    साधं.. सोप्प आहे..

    “आशा”च करायची नाही.. म्हणजे निराशेला आपल्याकडे येण्याचं कारणंच नाही...
    “अपेक्षा” ठेवायचीच नाही.. म्हणजे अपेक्षाभंगाचं दु:ख पचवायची वेळच येणार नाही..

    मी तेच करायला सुरुवात केलेय.. तुम्हीही करुन बघा..

    आयुष्य जास्त आनंदी होईल !!

  • असेल हरी तर देईल… (नशायात्रा – भाग ३)

    इयत्ता आठवीपासूनच अभ्यासाकडे दुर्लक्ष करत गेलो होतो, त्यामुळे दहावीत जेमतेम ५० टक्के मार्क्स मिळालेले. कॉलेजला तर आभ्यासाच्या बाबतीत आनंदीआनंदच होता, मित्र, सिनेमा आणि व्यसने अश्या उनाडक्या जोरात सुरु राहिल्या….

  • समाज भित्रा आहे का ?

    भर रस्त्यावर कोणाचीतरी लुट होते. आजूबाजूचा समाज बघून न बघितल्यासारखे करतो आणि सरळ निघून जातो आणि तो मनुष्य मार खाऊन त्याची भरदिवसा लुट होत असते हे आपण ऐकले असेल किव्वा बघितले सुद्धा असेल. मग याला आपण काय म्हणाल समाज भितो का ? घाबरतो का ?

  • प्लेगमुळे स्थलांतर

    प्लेग असाच जीव घेणारा रोग. त्याने प्रचंड संखेने बळी घेतले. आता तो काबूत आलेला आहे. त्यारोगाचे भयानक तांडव, त्यानी उडवलेला हाःहाःकार प्रत्यक्ष बघण्याचा, अण्याण्याच्या दुर्दैवी काळातून आम्ही गेलो. आता विज्ञान प्रगतीमुळे सुदैवाने तो प्रसंग दुर्मिळ झाला आहे. परंतु आज देखील त्याची आठवण अंगावर शहारे आणतात.

  • कुटील अमेरिका व दोस्त राष्ट्रांचे स्वार्थी हल्ले

    अमेरिकेला लोकशाही किवां तत्सम मानवीय मुल्यांवर फार मोठा विश्वास आहे, असे समजण्याचे कारण नाही.अमेरिकेची व तत्सम पाश्चात्य राष्ट्रांची अर्थव्यवस्था ही अरब राष्ट्रांच्या तेलाच्या भरवश्यावर जीवंत आहे. आर्थिक मंदीच्या खाईतून बाहेर निघण्यासाठी अनावश्यक बाब पुढे करून तेल उत्पादक राष्ट्रांना वेठीस धरणे सुरु केले आहे.पर्यायाने जगातील इतरही राष्ट्रे बाधित होतीलच.

    भारतीय उपखंडात तणाव तसेच शस्त्रास्त्र स्पर्धेचे वातावरण निर्माण करण्याचे महापातक अमेरिकेकडेच जाते. शस्त्र विक्रीच्या भरवश्यावर अमेरिकेची अर्धी अर्थव्यवस्था चालत असते,हे नव्याने सांगण्याची गरज नाही.

  • भारतमातेच्या वीरांगना – ३९ – चंद्रप्रभा शईकियानी

    असहकार चळवळ,मिठाचा सत्याग्रह अश्या सगळ्यात त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. त्यासाठी कारावास सुद्धा भोगला. महिलांनी स्वातंत्र्य संग्रामात सक्रिय सहभाग नोंदवावा ह्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. त्याच्याच फलस्वरूप ‘आसाम प्रादेशिक महिला समिती’ १९२६ मध्ये स्थापन केली. ज्यामार्फत महिलांच्या प्रश्नांवर काम करणे, त्यांच्यासाठी शिक्षण आणि व्यवसाय उपलब्ध करणे, बाल विवाह रोकणे ह्या सगळ्या गोष्टींवर काम सुरू केले. त्यांनी हातमाग आणि हस्तकला ह्याचे महत्व महिलांना पटवून दिले व त्यावर काम करायला प्रवृत्त केले.