उकड
क' च्या कथानकातली 'तुलसीभाभी' तुम्हाला आठवते का? आतासारखी चॅनेल्सची गर्दी तेव्हा नव्हती. त्यामुळे 'तुलसीभाभीने' घराघरात घर केलं होतं. त्यातला हँडसम हिरो 'मिहीर'अॅक्सिडेंटमध्ये गेला हे प्रेक्षकांना अजिबात रुचले नाही. सगळीकडे एकच चर्चा. अगदी लोकलच्या लेडीज डब्यातला तो जिव्हाळ्याचा प्रश्न झाला होता. आता सिरीअल न पाहण्याचा निर्णय कित्येकांनी घेतला आणि त्याला पुन्हा अवतरावे लागले. कसा काय ते तुम्हाला आठवत असेलच. आणि हे फक्त सिनेमा आणि सिरीअल मध्ये शक्य आहे हे मी सांगण्याची गरज नाही. नुकतीच पूर्णविराम घेतलेली मालिका, 'एका सुनेच्या पाच सासूबाई की सासूबाया? आणि त्यांच्यावर एक आई आज्जी फ्री! वाढता वाढता वाढे... जसे हनुमानाचे शेपूट. सोशल मिडियावर चेष्टेचा विषय ठरली आणि ज्या प्रेक्षकांनी स्वागत केले होते त्यांनीच 'आता पुरे करा'चा नारा दिला. तरीही काहीही हं श्री हा लाडिकपणा टीआरपी वाढवित राहिला. सध्या सुरू असलेला खंडोबाचा गोंधळ बिचाऱ्या प्रेक्षकांचा किती गोंधळ उडवतोय, पहाताय ना? देवांचा देव अशा श्रध्दास्थानी असलेल्या महादेवाचं पर्सनल लाईफ भोळ्या भाबड्या प्रेक्षकांना विचारात पाडतेय. धर्मसंकटात सापडलेल्या देवांची अवस्था सर्वसामान्यांसारखीच होतेय. हा, या सगळ्यामुळे फक्त दोन गोष्टी घडू शकतात. एक म्हणजे लोकांचा कॉन्फिडन्स वाढू शकतो आणि दुसरा मालिकेचा टीआरपी! तसेच जेजुरीला पर्यटनस्थळ बनविण्यासाठी श्रध्देपेक्षा मालिकाच धावून आली हेही एक सत्य आहे.
सम्राट अशोकाचा जीवनपट उलगडून दाखवणारी मालिका पाहताय ना, कौटुंबिक यादवीमध्ये गुरफटून कशी टीआरपी वाढवतेय ती! सध्या ती दूर्वा, ती जान्हवी, ती आदिती, ती स्वानंदी, ती म्हाळसा आणि ती बानू या सगळ्यांचे प्रॉब्लेम्स घेऊन आमचे प्रेक्षक जगतात. त्यांच्या फॅशन्स मॉलमधून घरी येतात, तर त्यातले हेवेदावे, कटकारस्थाने जेवणासोबत चघळली जातात. खरंच अपार प्रेम करतात प्रेक्षक या मालिकांवर! सगळ्या धकाधकीतून वेळ काढून टीव्ही समोर बसतात. काही कारणाने शक्य झाले नाही तर 'उद्या सकाळी बघू' असे म्हणत मनाला समजावतात. घरी असलेली मंडळी तर दुपारी सुध्दा कालचा भाग रिपीट टेलिकास्ट म्हणून आनंद घेतात. काहीजण तर भराभर कामे आटोपून टिव्ही समोर ठाण मांडतात ते सगळ्या मालिका संपेपर्यंत जागा सोडत नाहीत. मग स्वत:च्या झोपेचे बारा वाजले तरी पर्वा नसते. काल काय झाले याच्या लोकलच्या लेडीज डब्यात रंगीत चर्चा तर ऑफिसच्या लंच टाईमला चविष्ट चर्चा चालतात. म्हणजेच गप्पांचा प्राईम सब्जेक्ट म्हणजे डेलीसोप!
असो, परंतु या अशा भाबड्या प्रेक्षकांना गुंतवून ठेवणाऱ्या या मालिकांचा तटस्थपणे विचार केला तर 'हसावं की रडावं' हा प्रश्न पडल्याशिवाय रहात नाही. अगदी प्राईम टाईममध्ये घराघरात पाहता गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरू असलेल्या मालिका पहाता, मुबलक जाहिराती, मागील भागात, पुढील भागात असे म्हणत कूर्मगतीने चाललेले कथानक केवळ पंधरा ते वीस मिनिटांचा अर्धा तास करीत असते. आता संपेल असे वाटत असतानाच 'कहानी में ट्विस्ट' म्हणत उपकथानकाचा जन्म होतो. तुम्हा-आम्हा सर्वांना कळून चुकते, 'आमटीत पाणी घालून वाढविली आहे आणि पांचट लागू नये म्हणून वरून तिखट मीठ!' पण आश्चर्य हे की मूळची चव संपली हे कळूनसुध्दा सवयीचे गुलाम झालेले आम्ही प्रेक्षक तसेच चिकटून राहतो.
कधी कॉमेडीची बुलेट ट्रेन, चला हवा येऊ द्या म्हणते तसेच फू बाई फू म्हणत हास्यसम्राट हसवणूक करतात की फसवणूक कोण जाणे? ज्येष्ठ श्रेष्ठ कलाकार आणि कलाकृतींची चेष्टा आणि पाणउतारा म्हणजे विनोद, असे समीकरण तयार होतेय की काय अशी भीती वाटते. दर्जेदार विनोद लोकांना समजत नाहीत असा गोड गैरसमज तर नाही ना यांचा? खरंच राहून वाटतं आज पु.ल. किंवा अत्रे असते तर यांचे कान धरून म्हणाले असते, अरे काय हे? कुठे नेऊन ठेवलाय विनोद आमचा!'
डिटेक्टिव मालिकांचं तर विचारूच नका. वर्षानुवर्षे एकाच डायलॉगवर चालतात, 'कुछ तो गडबड है, दया दरवाजा तोड दे.' आँखे उघडून अस्मिता गुन्हेगारीला आळा घालण्याचा प्रयत्न करते खरी, परंतु प्रेक्षकांची आँखे उघडतात की गुन्हेगारीची नवनविन तंत्र गरजूंना मिळतात हा खरा प्रश्न आहे.
भूतप्रेत, बुवाबाजी, तांत्रिक-मांत्रिक हे खेळसुद्धा रात्री किंवा दिवसा चालत असतात. अंधश्रध्दा निर्मूलन कि अंधश्रध्दा प्रसारण? सिगारेट पॅकवरच्या लेबलप्रमाणे 'धुम्रपान हानिकारक आहे' एवढे म्हणून विक्री सुरू. 'देशी दारूचे दुकान, परवाना क्रमांक ...... ' म्हणत राजरोस विक्री सुरू. यासारखेच नाही का ते?
पूर्वी फक्त दूरदर्शनच्या काळातल्या 'हमलोग, सर्कस, मालगुडी डेज, तेनाली रामा' अशा अनेक मालिका आजही आठवतात. त्यांनी समाजाला सुसंस्कार दिले आणि अनेक चांगले कलाकारही चित्रपट दृष्टीला दिले. आतासुद्धा काही मालिका चांगले विषय मांडतात, मनोरंजन बरोबरच समाज शिक्षणही देतात. मात्र त्यांची संख्या नगण्य आहे हे दुर्दैव! बाकी बहुसंख्य मालिका केवळ आणि केवळ टिआरपीकडे लक्ष ठेवून मागणी तसा पुरवठा करताना दिसतात.
कधी कधी मनात विचार येतो, आपण प्रेक्षक आपला महत्त्वाचा वेळ आणि पैसा खर्च करून अलगद त्या गुंत्यात गुंतत जातो. त्यांचा टिआरपी वाढतो आणि आमचा केवळ टाईमपास होतो. बुद्धीला टाळे लावून डोळे आणि कानांचे मनोरंजन हाच मनोरंजनाचा अर्थ लावला जातो का ? पाहताना विचारही करायला हवाच ना? म्हणूनच म्हणावेसे वाटते, माणसाचा तिसरा डोळाही उघडा असायलाच हवा. आणि टीआरपी च्या हवेत तरंगणाऱ्या 'कांहीही....' ला 'काही ही चालणार नाही' हे सांगायला हवे.
("ठाणे वैभव" च्या सौजन्याने)
-- नूतन बांदेकर
नोकरी
मुंबईच्या अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय स्मारकारचे भुमीपुजन येत्या शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असून या भुमीपुजनासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या देशभरातल्या १९ ठिकाणांवरील माती आणि विविध नद्यांचे पाणी आणले जाणार आहे. अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा असलेले हे देखणे स्मारक साकारण्यासाठी तब्बल ३६०० कोटी खर्च केले जाणार असल्याची माहिती शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आणि आ. विनायकराव मेटे यांनी दिली. मुंबईतील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
आंतराष्ट्रीय दर्जाचे हे स्मारक गरगाव चौपाटीपासून ३.६ किलोमीटरवर समुद्रात असलेल्या एका पाण्याखालच्या दगडावरील १५.८६ हेक्टरवर उभारले जाणार आहे. जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांच्या हातून शिवरायांचा अश्वारूढ पुतळा साकारला जाणार आहे. या चौथऱ्यासहित या स्मारकाची उंची २१० मीटर उंच असून पुतळा १२६ मीटर, तर फक्त चौथऱ्याची ८४ मीटरचा असणार आहे. एकूण ३६०० कोटी रुपये खर्च करून हा प्रकल्प साकारला जाणार असून यापैकी पहिल्या टप्प्यात २५०० कोटींचा खर्च केला जाणार आहे. पहिल्या टप्प्याचे काम १९ फेब्रुवारी २०१९ ला पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न असून दुसऱ्या टप्प्यात उर्वरित ११०० कोटींचा खर्च केला जाणार आहे. समुद्रातील या स्मारकासाठी तांित्रक समितीचीही स्थापना करण्यात आली असून ईजीआयएस या फ्रान्सच्या कंपनीद्वारे स्मारकाचा आराखडा तयार केला जाणार आहे. येत्या दोन महिन्यांत कामाला सुरूवात होईल, अशी माहिती मा. मेटे यांनी दिली.
शनिवारी पंतप्रधानांच्या हस्ते या स्मारकाचा भुमिपुजन सोहळा पार पडत असून त्यासाठी महाराजांचे वास्तव्य असलेल्या शिवनेरी, रायगड, सिंधुदुर्ग, पन्हाळा, राजगड, प्रतापगड या गडकिल्ल्यांसह शिखर शिंगणापूर, तुळजापूर, सिंदखेड राजा, कराड, जेजुरी, देहू आळंदी, रामटेक, वेरूळ, नािशक, आग्रा, तंजावर आणि श्री शैलम या ठिकाणांवरून माती आणली जाणार आहे. यासह राज्यातील विविध नद्यांचे पाणी भुमीपूजनासाठी वापरले जाणार असल्याचेही मा. मेटे यांनी सांगितले. येत्या गुरूवारी (२२ डिसेंबर) या साऱ्या वस्तूंच्या कलशांचे मुंबईत आगमन होणार असून त्या कलशांचे भव्य स्वागत करण्यात येईल, असेही ते म्हणाले. तसेच २३ डिसेंबराला हे सर्व कलश गेट आॅफ इंडीया येथे आणण्यात येतील. भुमिपुजनाच्या दिवशी मुख्यमंत्री हे कलश पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हाती सुपूर्द करणार असून त्यांच्या हस्ते या कलशातील माती, दगड आणि पाण्याने भुमीपूजन सोहळा पार पडेल.
छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनपट असेल स्मारकाचे आकर्षण
छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनपट उलगडणारा अर्ध्या तासाचा लघुपट हे या स्मारकाचे आकर्षण असणार आहे. थ्री डी आणि फोर डीच्या सहाय्याने शिवकालीन वातावरणाची निर्मिती करणारा एक लाईट व साऊंड शोही या ठिकाणी सादर केला जाणार आहे. याशिवाय दररोज दोनशे कलाकाराच्या माध्यमातून राज्यभिषेकाचा प्रसंगही सादर केला जाणार असून स्मारकाच्या ठिकाणी दोन जेटींसह हेलीपॅडही उभारले जाणार आहे. या शिवाय येणाऱ्या पर्यटकांसाठी उपहारगृह तसेच वैद्यकीय सेवेची व्यवस्थाही करण्यात येणार आहे.
स्मारकाची वैशिष्ट्ये
जलदुर्गाशी साध्यर्म असणारी दगडातील समुद्र तटबंदी.
आई तुळजाभवानी मंदीर.
कला संग्रहालय.
ग्रंथ संग्रहालय.
मत्स्यालय
अॅम्पिथिएटर / हेलीपॅड.
आॅडीटोरीअम.
लाईट व साऊंड शो.
विस्तीर्ण बाग बगीचे.
रुग्णालय
सुरक्षा रक्षक निवासस्थाने.
आयमॅक्स सिनेमागृह.
प्रकल्प स्थळ ठिकाणी २ जेट्टी.
चौथऱ्यामध्ये वेगवेगळ्या मजल्यावरून दृश्यावलोकनासाठी सोय.
पर्यटकांना प्रकल्प स्थळाकडे जाण्यासाठी गेट वे आॅफ इंडीया, नवी मुंबई व इतर ठिकाणाहून जाण्याची व्यवस्था
स्मारक ठिकाणी शिवकालिन वातावरण निर्मिती
पाल, माणूस आणि महापुरुषांची वाटणी निद्रापुराण आता ऐकूया ऑडिओ स्वरुपात...
लेखक - नितीन साळुंखे
आवाज - माधुरी लोणकर
उष्ण तापमानात शरीराला थंडावा मिळवून देण्यासाठी आपण बऱ्याच वेळेला थंड पेय पितो. मात्र बाजारात मिळणारी थंड पेय अनेकदा आरोग्यास हितकारक ठरतीलच, असे नाही. आपल्या आयुर्वेदात सांगितलेल्या घटकांपैकी एक घटक सध्या लोकांनी आवर्जून वापरण्याची गरज आहे. तो म्हणजे वाळा.
२१ व्या शतकात जागतिक महाशक्ती बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भारतात, शिक्षणाच्या क्षेत्रात नवीन प्रयोगाची गरज नाही काय ? वाढत्या लोकसंख्येबरोबर शासनासामोरील समस्यांचे डोंगर वाढत आहे. गाव तिथे शाळा, हे धोरण असल्याने बऱ्याच शाळांत विध्यार्थी संख्या नाममात्र दिसते. १० ते ५० पटसंख्या असलेल्या शाळांचे प्रमाण भरपूर आहे. शासनाच्या नवीन धोरणानुसार ६० पटसंख्ये पर्यंत दोन शिक्षक, हे धोरण असले तरी इयत्ता ४ आणि शिक्षक २ ह्याचा कोठेही मेळ बसत नाही.
काही व्यक्तींना सतत नवनवीन प्रयोग करायला आवडतात, अशी माणसं जेव्हा इतरांपेक्षा वेगळं काम करतात तेव्हाच ते सर्जनशील ठरतात; त्यासाठी पणाला लागते ती प्रयत्नांची काष्ठ, संयम, आणि आपलं लक्ष्य गाठण्याची वृत्ती….
इथे आल्यापासून एक चांगली सवय लागलीय मला ..लवकर उठण्याची ..सकाळी साडेपाचला बेल वाजण्यापूर्वीच मला जाग येवू लागली आहे ..विशेष म्हणजे उठल्यावर एकदम फ्रेश वाटते ..याचे कारण रात्री वेळेवर झोप हे असावे बहुतेक ..तसेच इथे मी सगळ्या कौटुंबिक व इतर प्रकारच्या चिंतांपासून दूर असल्याने मनस्थिती देखील चांगली राहतेय ..घरी असताना रात्री कितीही दारू प्यायलो असलो तरी लवकर झोप लागत नसे ..लागली तरी ती झोप नव्हती तर दारूच्या नशेत शरीर मन शिथिल होणे असे ..त्यामुळे सकाळी उठल्यावर प्रचंड थकवा जाणवे..मन देखील विषण्ण असे ..डोळ्यांची चुरचुर ..अंगदुखी ..पित्तप्रकोप अशी सगळी लक्षणे जाणवत ..अंथरुणातून उठूच नये असे वाटे ..अलकाने खूप तगादा लावल्यावर मी नाईलाजाने उठत असे ..आता ही लवकर उठण्याची सवय अशीच ठेवायची असे मी ठरवले होते मनाशी ..मी लवकर उठतो म्हणून माॅनिटरने मला बेल वाजल्यावर इतरांना उठवण्याची देखील जवाबदारी दिली होती ...हे दुसर्यांना उठवण्याचे काम गमतीशीर होते ..विशेषतः काही आळशी लोक उठायला खूप कंटाळा करत असत ..कितीही हाक मारला तरी नुसते ..हु..हम्म ..पाच मिनिट ..अशी सवलत मागत असत ..
काही जण वैतागून ..मला म्हणत ...यार तू रातको सोता है या नही ? ..एकाने तर मला चक्क शाप दिला होता ..तू चैन से सोनेवालो कि निंद हराम करता है ..तूझे कभी चैन नही मिलेगा ..एकदोन महाभाग असे असत की अजिबात त्यांच्यावर कसलाही परिणाम होत नसे ..शेवटी त्यांच्या तोंडवर थेंबभर पाणी शिंपडले की मग डोळे उघडत ते ..मला हे उठवण्याचे काम करतोय म्हणून काहींनी मला गमतीने ' मुर्गा ' म्हणजे ' कोंबडा ' म्हणण्यास सुरवात केली होती ..अर्थात मी हे काम उत्साहाने आणि हसतमुखाने न चिडता करत होतो ..सरांनी काल दिलेल्या प्रश्नानुसार मी येथे राहताना थेरेपीजच्या वेळा सोडून एक दिनक्रम लिहिला होता ..त्यात सकाळी पीटी झाल्यावर सूर्यनमस्कार ..दुपारी वाचन ..सायंकाळी मोकळ्या वेळात ..थोडा वेळ हास्यविनोदात सामील होणे ..थोडा वेळ कॅरम खेळणे ..टी.व्ही पाहणे ..आणि रात्री झोपण्यापूर्वी येथे जे जे शिकतो आहे त्याबाबत डायरीत नोंदी ठेवणे सगळे लिहिले होते .
आज समूह उपचारांच्या वेळी सरांनी ' फक्त आजचा दिवस मधील शेवटची तीन वाक्ये फळ्यावर लिहिली .
१० ) फक्त आज मी स्वतःसाठी अर्धा तास देईन ..या अर्ध्या तासात मी माझ्या आयुष्याचा चांगला अर्थ घेण्याचा प्रयत्न करेन .
११ ) जे चांगले आहे ..सुंदर आहे त्याचा आस्वाद घेण्यास मी घाबरणार नाही
१२ ) मी ज्या प्रमाणे जगाला देईन ..त्या प्रमाणे जग मला देईल ..यावर मी विश्वास ठेवेन .
रोजच्या रोज स्वताच्या जिवनाबद्दलच्या चिंतना साठी दहावी सूचना आहे असे सांगत सर म्हणाले ..दिवसभरात केव्हाही मोकळा वेळ असेल तेव्हा आपण किमान अर्धा तास तरी चिंतन केले पाहजे ..म्हणजे आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा घेणे ..माझे दिवसभराचे वर्तन तपासणे ..मी कोणाशी कसा वागलो ..काय बोललो याचे परीक्षण करणे होय ..तसा प्रत्येक माणूस नकळत असे चिंतन करतच असतो ..मात्र बहुधा असे चिंतन करताना तो दिवसभरात स्वताच्या मनाविरुद्ध घडलेल्या घटना आठवतो ..अपमान जनक प्रसंगांची उजळणी करतो ..इतरांनी त्याच्याशी केलेल्या वाईट वर्तनाचा विचार करून स्वताचे काय चुकले आहे हे न समजून घेता ...इतरांच्या चुका शोधून ..एकतर रागाची ..बदल्याची ..किवा निराशेची भावना मनात जोपासतो ..त्या ऐवजी माझ्या आयुष्याचा चांगला अर्थ घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे ..दिवसभरात घडलेल्या घटनांमधून मी काही सकारात्मक शिकतोय का ? मला भेटलेल्या व्यक्तींच्या वागणुकीतून मी काही धडा घेतोय का ?तसेच मी केलेल्या चुका उद्या कशा टाळता येतील ..आसपासच्या सर्वांशी आपुलकीचे संबंध कसे जोपासता येतील ..याचा विचार करणे म्हणजे सकारात्मक चिंतन होईल ..
' जे चांगले आहे ..सुंदर आहे त्याचा आस्वाद घेण्यास मी घाबरणार नाही ' हे वाक्य वाचल्यावर बहुतेक लोकांच्या मनात सुंदरता म्हणजे ' स्त्री ' चे सौंदर्य येवू शकते ..या सूचनेत सुंदरता या संकल्पनेत अनेक गोष्टी येतात ..तसेच या वाक्याचा असा ही अर्थ निघतो की ' जे वाईट आहे ..गलिच्छ आहे त्याचा आस्वाद घेण्यास मी घाबरेन ' म्हणजेच ज्या ज्या गोष्टीना समाजाने ..नैतिकतेने ..अथवा आपल्या संस्काराने वाईट म्हंटले आहे त्या सर्व गोष्टींपासून मी दूर राहीन .. समाज ज्याला चांगले म्हणतो ..सुंदर म्हणतो त्याचा आस्वाद घेईन ..यात विविध कलांचा आस्वाद ..निसर्गसौंदर्य ..भूतदया ..चांगल्या प्रकारच्या खाण्याच्या विविध गोष्टी ..संगीत ..वाचन ..समाजसेवा ..वगैरे गोष्टी येतात ..आपण व्यसन करत असताना नेमके ' जे वाईट आहे ..गलिच्छ आहे ' अश्या गोष्टी करत गेलो ..त्या ऐवजी आता चांगल्या आणि सुंदर गोष्टीत रस घेणे अपेक्षित आहे ...
शेवटचे वाक्य होते ' मी ज्या प्रमाणे जगाला देईन ..त्या प्रमाणे जग मला देईल यावर मी विश्वास ठेवेन ' म्हणजे क्रिया -प्रतिक्रियेच्या सिद्धांतावर माझा विश्वास असला पाहिजे ..मी जर जगाला प्रेम ..आपुलकी ..माया ..दया ..करुणा ...देत गेलो तर नक्कीच या गोष्टी मलाही मिळतील ..मात्र मी जर द्वेष ..तिरस्कार ..राग ..वंचना ..फसवणूक ..निर्भत्सना ..कटुता देत गेलो तर मलाही कधीतरी असेच मिळेल जगाकडून हे आपण सदैव लक्षात ठेवले पाहिजे ..आपल्या चांगल्या कर्मांनीच आपले भविष्य घडत जाते ..हे लक्षात ठेवून आपली भावना आणि कर्मे याप्रती जागरूक राहणे महत्वाचे आहे ...
( बाकी पुढील भागात )
-- तुषार पांडुरंग नातू
" मैत्री ' व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र , नागपूर
संपर्क..रवी पाध्ये - ९३७३१०६५२१ ..तुषार नातू - ९८५०३४५७८५
शेवटी Bangalore मधे राहून ऐवढ समाजाल की, जर तुमच्या मनातच, तुमच्या विचारताच आपल्या भाषे बद्दल आदर आसेल, तर कुठल्या ही नेत्याला ह्याचा मुद्दा करुन आपली राजकीय पोळी भाजता येणार नाही.
आपण काय आणि कशी सुरवात करतो त्यावर आपल्याला मीळणारा Response Depend असतो, आपल्या कडील Conductor च “किधर जाना है” म्हणून सुरवात करत असतील तर कसा होणार उद्दार. म्हणून आपल्या कड़े मराठी पाट्या साठी, रेडियो वरील गाण्या साठी, मराठी चित्रपटांसाठी उठ सुट संघर्ष करावा लागतो. जेवाठा मराठी चा गर्व तेवाठाच हिंदी चा अभिमान ही आपण बाळगायला हवा पण अतिरेक नको.
पेटू द्या मायबोली मराठी च्या उद्धारा साठी रणसंग्राम, पण होऊ देऊ नका इतर भारतीय भाषांवर हल्ला बोल
Copyright © 2025 | Marathisrushti