आजच्या मिलेनियल जनरेशनला कदाचित हे पटणारच नाही की त्याकाळी आपले आवडते गाणे एखादयाला पुन्हा ऐकायला मिळायला कधी सहा महिने तर कधी वर्षही जायचे. कारण त्याकाळी सर्वसामान्य भारतियांसाठी रेडियो हेच मनोरंजनाचे मुख्य साधन होते. बरं रेडिओमधे सर्व प्रसारण AM Band वरुन असायचे. म्हणजे त्यात खरखर, आवाज जाणे, सिग्नल न मिळणे असे प्रकार व्हायचे. आजच्या FM Band ला ती अडचण नही कारण FM चे तंत्रज्ञान वेगळे आहे..त्यात सिग्नलना अडथळा फार येत नाही. त्यामुळे प्रसारण चांगलं होतं.
मानवाची निर्मिती झाली आणि हळूहळू त्याची बुद्धी विकसीत होत गेली तसा सर्वप्रथम तो अभियंता बनला! पावसापासून संरक्षणासाठी गुहे शोधले, दगडी हत्यारे बनवली, घर्षणातून विस्तव निर्माण होतो हे जाणून गारगोट्या वापरून विस्तव निर्माण करू लागला, अन्न शिजवू लागला,
पन्नास वर्षांपासून आपण इतिहास शिकतो आहोत,
शाहिस्तेखान कसा निसटला
.
.
.
. .
.
पन्नास वर्षानंतर शिकवणार
सलमान खान कसा निसटला!.
फरक इतकाच तो बोटांवर निसटला हा नोटांवर
महाभारत आजही किती समकालीन वाटते पहा...
दुर्योधन आणि राहुल गांधी या दोघांनाही टॅलेंटवर नाही तर जन्मसिद्ध अधिकारावर राज्य पाहिजे
भीष्म आणि एल. के आडवाणी दोघांनाही कधीच राजमुकुट मिळाला नाही पण आदर खुप मिळाला. आणि आयुष्याच्या उत्तरार्धात दोघंही असहाय्य बनले
नरेंद्र मोदी आणि अर्जुन दोघेही टॅलेंटेड. धर्माच्या पक्षात आणि उच्च पदावर पोहोचले.
कर्ण आणि मनमोहन सिंग दोघेही टॅलेंटेड पण चुकिच्या किंवा अधर्माच्या बाजुला आणि दोघेही अधर्मी लोकांनी केलेल्या उपकाराच्या ओझ्याखाली दबलेले.
अभिमन्यू आणि अरविंद केजरीवाल दोघेही युद्धात नवीन आणिअर्धवट ज्ञानाच्या जोरावर शत्रुनी पसरलेल्या चक्रव्युहात. एकट्याच्या स्वतःच्याच बळावर जिंकण्याची ईच्छा बाळगणारे अननुभवी. एक मारला गेला दुसरा बाहेर फेकला जाणार
दिग्विजय सिंग आणि शकुनी दोघेही कपटी आणि चालबाज. एक दुर्योधनाला राजा बनवू पाहत होता हा राहुलला बनवू पहातोय.
सोनिया आणि धृतराष्ट्र दोघेही पुत्रप्रेमाने अंधळे. पुत्र सक्षम आणि गुणवान नसतानाही त्यालाच समर्थन आणि पाठिंबा देतात.
आणी कृष्ण म्हणाल तर
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
तो बारामती ला आहे.........
पेण येथे ‘चिमण्या गणपती’चे मंदिर आहे. पेण-खोपोली रस्त्यावर भव्य मंदिर असून आळीकरांनी वर्गणी गोळा करून ते बांधले आहे.

गोष्ट ३-४ वर्षापूर्वीची आहे. एका मोठ्या ग्रुप बरोबर मी या ट्रेकला गेलो होतो. एखाद्या मोठ्या ग्रुप बरोबर ट्रेकिंगला जाताना नेहमीच मी रस्ता पाहून घेण्यासाठी जात असतो. ग्रुपच्या म्हणून अनेक मर्यादा असतात. आपल्याला हवा तसा मनसोक्त वेळ मिळत नाही. हवं तेव्हा, हवं तिथे हवं ते खाता येत नाही. फोटो काढण्यासाठी हवा तेवढा वेळ मिळत नाही. एकच फायदा म्हणजे रस्ता कळतो. असाच हा भीमाशंकर ते खांडस मी ट्रेक केला. ट्रेक भर उन्हाळ्यात होता. आदल्या दिवशी आम्ही भीमाशंकरला मुक्कामी होतो. सकाळी लवकर उठून आम्ही चालायला सुरवात केली होती. आधी एकदा रस्ता चुकलो. मग पुन्हा योग्य रस्त्यावर आलो. मोठे ग्रुप बरोबर असताना असे रस्ते चुकणे योग्य नाही, पण रस्ता चुकला नाही तर ट्रेक पूर्ण झाल्यासारखं वाटत नाही. या ट्रेकचे दोन रस्ते आहेत असं ऐकतो. एक शिडीची वाट आणि दुसरी गणपती घाटाची वाट. शिडीची वाट अधिक अवघड आहे असं ऐकलय, आम्ही मात्र तुलनेनी कमी कठीण अशा गणपती घाटाच्या वाटेनीच गेलो होतो. पहिला उताराचा एक मोठा टप्पा पार करून आल्यावर थोडा पठाराचा भाग आहे. डोंगरावरून पाहताना तिथे गाव असावं असं वाटत. पण तिथे गेल्यावर असं काही नाही हे लक्षात आलं. सिंहगडावर जाताना अनेक ठिकाणी जसे लिंबू सरबत किंवा ताक विकायला माणसं बसतात, त्यांची ती कच्ची दुकानं कशी असतात तसं एक लाकडी बंधाकाम आम्हाला लागलं. कच्च बांधकाम होतं. फक्त चार खांब, त्याच्यावर तिरके टाकलेले वर काही खांब, आणि त्यांच्यावर झावळ्या. बसायला सुद्धा झाडाचं खोड आडवं टाकून आधार केलेला. जागा छान होती. आम्ही तिथे थांबलो थोडा वेळ थोडी पोटपूजा केली. आणि पुढे निघालो. पण माझ्या डोक्यातला किडा वळवळायला लागला. या ट्रेकच्या आधीच माझा एकट्यानी राजमाचीचा ट्रेक करून झाला होता. राजमाची नंतर ही भीमाशंकरची जागा डोक्यात बसली. ट्रेक यथावकाश पूर्ण झाला. आम्ही पुण्यात आलो.
आता एखादी ट्रेकिंगची कल्पना डोक्यात शिरली कि ती स्वस्थ बसून देत नाही. एकटं भीमाशंकरला जायचं. आणि आधी गेलो होतो त्याप्रमाणे नियोजन न करता रात्री मुक्कामाला ‘त्या’ ठिकाणी जायचं, आणि सकाळी उठून पुढे खांडसला जायचं!
मग एक दिवस नक्की केला. आदल्या रात्री घरातले बाकीचे सगळे झोपल्यावर मी माझी बॅग भरली. बॅग म्हणजे काय होतं, खाली अंथरायला एक घोंगडी, एक पांघरायला शाल.. खायचं सामान उद्या घरातून बाहेर पडलो कि घेऊ असं ठरवलं. आणि बॅग घराच्या दरवाज्याजवळ आणून ठेवली. सकाळी लवकर उठलो, लायब्ररीमध्ये जातो असं सांगून सकाळी लवकर बाहेर पडलो. तयार केलेली बॅग उचलून बाहेर पडलो. थेट स्वारगेटला गेलो. तिथे गेल्यावर कळलं थेट भीमाशंकर गाडी दुपारी होती, मी स्वारगेट वर पोहोचलो होतो सकाळचे सातला. थोडी संत्री, अंजीरं, थोड्या काकड्या, गाजरं असं सामान विकत घेतलं. थेट नाही तर गाडी बदलून जावू, असा विचार करून राजगुरुनगरची गाडी मिळाली. तिकडे गेलो. जाताना एसटी पंक्चर झाली. एरवी मी वैतागलो असतो. पण मला वेळ हवा होता. माझं लक्ष भीमाशंकरच्या जंगलात येणाऱ्या रात्रीवर होतं. भीमाशंकरच्या शंकराच्या मंदिरापासून ती जागा तासादीड तासाच्या अंतरावर होती, त्यामुळे भीमाशंकर हुन दुपारी दोन-अडीच पर्यंत निघालो पुढे चालायला तरी चालणार होते. यथावकाश मला राजगुरुनगरला पोहोचायला साडेनऊ झाले. मग मी तिथे पण थोडा टाईमपास केला. तिथून सुद्धा थेट एसटी नव्हतीच. पण मी विचार केला कि भीमाशंकरला जाऊन वेळ घालवावा. मग मी वडाप पकडली, तिने मला अकरापर्यंत भीमाशंकरला पोहोचवलं. अधिक वेळ न घालवता मी थेट मंदिरात गेलो. मी प्रचंड घाबरट आहे. माझा भूत-पिशाच्च वगैरेंवर अजिबात विश्वास नाही, पण त्यांच्या गोष्टी ऐकायला मला आवडतात. त्यामुळे अशा अनेक गोष्टी माझ्या कानावर पडलेल्या. एकांताच्या ठिकाणी त्या नेमक्या आठवतात. त्याच्यावर उपाय म्हणून मग मी गाणी म्हणतो, अथर्वशीर्ष, रामरक्षा म्हणतो वगैरे. पण अजून दिवस सुरु होता, परिसरात माणसांची वरदळ सुरु होती. मी आपला गाभाऱ्यात गेलो. फुलांचा वास त्या गाभाऱ्यात तुंबला होता. मी तिथे प्रार्थना केली, उद्यापर्यंत लक्ष ठेवून असा. बाहेर पडलो गाभाऱ्यातून. वेळ तर भरपूर होता. गुप्त भीमाशंकर पाहून येऊ असा विचार करून तिकडे निघालो. एक सांगायचं राहिलं दिवस अजून उन्हाळ्याचेच होते. पण सगळा परिसर अभयारण्याचा आहे, त्यामुळे कायम हवेत गारवा हा असतोच. गुप्त भीमाशंकरला उन्हाळ्यात पाहण्यासारख काहीच नव्हतं. धबधब्याच कोरडं पात्र. आणि गरम तापलेला काळा दगड. त्यात कातळाच्या सावलीत शंकराची छोटीची पिंड आणि समोर नंदी, नंदी मात्र उन्हात होता. तो परिसर मात्र वर्दळीपासून लांब होता, त्यामुळे शांत होता. माझ्या डोक्यात भुतांच्या गोष्टी नाचू लागल्या. मग मी ठरवून किशोर कुमारची दर्दभरी गाणी जोरात म्हणायला सुरवात केली. अशी तीन-चार गाणी म्हणून झाली. मग गाणीही आठवेनाशी झाली. तोपर्यंत साडेबारा होऊन गेले होते. मग मी एक गाजर एक काकडी खाल्ली. वेळ तर अजून भरपूर होता. मग बसून राहिलो तिथेच. वातावरण शांत होतं. मग मी मोबाईल काढला आणि अण्णांचा वृंदावनी सारंग लावला. डोळे मिटून बसलो. त्यांनतर भुतांच्या गोष्टी पण थांबल्या. आणि एकटं वाटणही बंद झालं. मग तो संपल्यावर उठलो. एक वाजून गेला होता. पुन्हा मुख्य मंदिरापर्यंत आलो. दुपारची गर्दी कमी होती. पुन्हा एकदा गाभाऱ्यात गेलो. पुन्हा तीच प्रार्थना. फक्त गुप्त भीमाशंकर पासून मुख्य मंदिरापर्यंत येताना अभयारण्यात असणाऱ्या प्राण्यांचे माहितीपर बोर्ड लावले आहेत. त्यात अनेक फुलपाखरं, पक्षी, शेकरू मुख्य. मग बाकीचे प्राणी वगैरे होते. त्यात बिबट्या सुद्धा भीमाशंकरच्या अभयारण्यात आहे असं मी वाचलं त्या बोर्डवर मग घाबरलो. माझ्याकडे कोणतही हत्यार नव्हतं. स्व संरक्षणासाठीच कोणतही साधन नव्हतं. आणि मी तर जंगलात राहायचं म्हणत होतो. एकदा विचार केला, कि नको.. आपण इथेच थांबू आणि सकाळी पुढे चालायला सुरवात करू. पण तो विचार किती क्षणभरच टिकला.
मागच्या वेळी ग्रुप बरोबर आलो होतो तो रस्ता माझ्या लक्षात होता. त्यामुळे न चुकता मी निघालो. मी गेलो होतो तो दिवस मी ठरवून विकेंड निवडला नव्हता किंवा गुरवार सुद्धा नव्हता. मी ठरवून मंगळवार निवडला. सोमवारी सुद्धा शंकराला डिमांड भरपूर. त्यामुळे मला एकटाच कुठे चाललास, एकटं फिरू नये वगैरे उपदेश देणारे कोणी भेटणार नाहीत अशी अपेक्षा ठेऊन मी गीवास निवडला होता. माझ्या नियोजित ठिकाणापर्यंत जाण्यासाठी फक्त उतरावं लागतं. आणि सगळा जंगलाचा प्रदेश असल्यामुळे कडक ऊन असून सुद्धा त्याचा त्रास असा होत नव्हता. मी अगदी आरामात चालत होतो. सूर्यास्त मला त्या स्पॉट वरून बघायचा होता. म्हणून कोणतीही गडबड न करता मी चाललो होतो. फोटो काढत होतो. जमेल तिथे जंगलाचा व्हिडीओ सुद्धा बनवत होतो. मी काही जंगलाचा अभ्यासक नाही, त्यामुळे मला पक्ष्यांची किंवा फुलपाखरांची विशिष्ट नावं काही माहिती नव्हती. पण मी असंख्य पक्षी पहिले निरनिराळ्या रंगांचे आकाराचे. फुलपाखरंही भरपूर पहिली. अगणित प्रकारची झाडं.. एकटं असलं म्हणजे हे बघता येतं. ग्रुप असेल तर ट्रेक वेळेत पूर्ण करण्यावरच सगळा भर असतो. असं भरपूर बघत मी चाललो होतो. माझ्या इतक लक्षात होतं कि पहिल्या उताराचा टप्पा पार झाला कि थोडी सपाटीची जागा आहे, कि तिथेच लगेच माझा नियोजित स्पॉट.. पण उताराचा पहिला टप्पा संपवून मी सपाटीला आलो तरी ती जागा दिसेना. रस्ता सुद्धा मळलेला वाटत नव्हता. किंबहुना मी मागे पाहिलं तर त्याला रस्ता सुद्धा म्हणणं अवघड होता. मग मात्र माझी तंतरली. तीन-सव्वातीन होऊन गेलेलं होते. आणि आताचा मुख्य प्रश्न होता रस्ता शोधायचा. अशा वेळी सगळ्यात मोठं चॅलेंज असतं ‘पॅनिक’ न होण्याचं. पण मी झालो. लगेच अस्वस्थ झालो. ‘पॅनिक’ झाल्यामुळे दिशा सुद्धा कळेनाश्या होतात. तसचं माझही झालं.
पण माझ्या हे लक्षात आलं कि पॅनिक न होणं महत्वाच. all is well वाला प्रकार स्वतःला समजावून सांगितला. दिशांचा अंदाज घेतला. आणि त्या लक्षात आल्या. आपल्या जायचं कुठे ‘खांडस’ला ते भीमाशंकरच्या नेमक्या कोणत्या दिशेला आहे हे आठवलं आणि चालायला लागलो. चालता चालता माझं मुक्कामाच प्लॅनिंग सुद्धा बदलून टाकलं. चालण्याचा वेगही वाढवला. तसा अर्धा तास चाललो आणि माझी नियोजित जागा समोर आली. भीमाशंकरच्या डोंगरावरून जिथे उतरायचं त्याच्या मागे मी उतरलो चुकून, म्हणून सगळी गडबड झाली.. मला आनंदही झाला आणि टेन्शनसुद्धा. जशी गेल्यावेळी मी ती जागा पहिली होती ती आजही तशीच होती. आजूबाजूची झुडपं वाढलेली. पण माणसाचा वावर तिथे होता एवढं काळात होतं. कारण ती जागा स्वच्छ होती. कचरा किंवा पाचोळा दिसत नव्हता. कदाचित ती छोटी टपरी शनिवार रविवार येणाऱ्या ट्रेकर्सना लिंबू पाणी किंवा ताक विकणारी असेल. आज मात्र मी सुनसान होती. चार-सव्वाचार झाले असतील. ऊन उतरतीला लागलेलं कळत होतं. पण अजून तो चांगला हातभार वर होता. सूर्यास्त व्ह्यायला अजून भरपूर वेळ होता. पण तितक्या वेळात मी खांडस पर्यंत पोहोचू शकलो नसतो. मग पुन्हा मी मुक्कामाचा विचार पक्का केला.
आता मला पुढंच टेन्शन होतं. माझ्याशिवाय आई बाबांना चैन पडत नाही. त्यांचा फोन येईल तेव्हा काय करायचं? काय सांगायचं? कोणाला फोन करायला रेंज सुद्धा मिळेना. मग मी माझी बॅग त्या टपरीच्या एका खांबाला टेकवून उभी केली. बॅगेतून एक काडकी आणि गजर घेऊन रेंज शोधायला बाहेर पडलो. अर्धा पाउण तास पायपीट केल्यावर थोडीशी रेंज मिळाली. मी विष्णूला फोन करून सांगितलं, ‘कि आई ला फोन करून सांग मुकुलच्या मोबाईलची बॅटरी संपली आहे, तो बसलाय अभ्यास करत. आणि बहुतेक तो आज रूम वरच थांबले’ आणि बाकीचं तू मॅनेज कर. उद्यापर्यंत मला फोन येता कामा नये.’ खरंच खूप चांगला मित्र आहे माझा. आई बाबांचा खरच फोन आला नाही मला. पण तेव्हढा विष्णूला फोन करून मी बॅग ठेवली होती तिथे येऊन बसलो. मग लक्षात आलं कि रात्री आपल्याला थांबायचं तर शेकोटी केली पाहिजे. आणि तर त्या अंधारात जीव नको होईल. पुन्हा मी उठलो. उन्हालाच असल्यामुळे कोरड्या लाकडांचा तुटवडा नव्हता. कोरडं गवतही तितकंच. अस सगळं साग्रसंगीत घेऊन आलो. चागला तासभर मी वाळकी लाकडं नि गवत तोडत होतो. रात्रभराची सोय करायची होती. यासगळ्यात भरपूर वेळ गेला. सूर्य बुडून गेला आणि माझ्या लक्षातही नाही. आणि खरं म्हणजे मी जिथे होतो तिथे झाडीच इतकी होती कि सूर्यास्त दिसलाही नसता. आता संधिप्रकाश पसरला होता. भूतांची दुसरी लाडकी वेळ. पहिली मध्यरात्री आणि दुसरी संध्याकाळी. मी घाबरायला सुरवात झाली. पण धीर धरून होतो मी. भीत होतो पण धीर सोडला नव्हता. कुठेतरी गुंतवून घ्यायचं म्हणून मी पुन्हा मोबाईल काढला हेडफोन कानात टाकले आणि गुलाम आली लावला. त्याच्या चांगल्या पंधरा-वीस मोठया गझल माझ्याकडे होत्या. मी त्या ऐकल्या. मग पोटात गुडगुड करायला लागलं.. मी संत्री काढली, सोलून एक एक फोड गुलाम आली च्या एका एका शेर बरोबर तोंडात टाकत होतो. गझल संपल्या. संत्री सुद्धा संपली. पोटातली गुडगुडही थांबली.
मला झोप कधीच त्रास देत नाही. माझ्या आयुष्यात तिच्याइतकी कार्यक्षम कोणीच नाही. डोळे मिटले कि मला झोप लागते. पण आज जास्तीत जास्त जगायचा माझा विचार होता. साडे आठलाच मध्यरात्री सारखा अंधार पडला होता. कुठून तरी मला कोल्हेकुई सुद्धा ऐकू आली. प्रचंड घाबरून मी जागेवरून उठलो. जमवलेली लाकडं एकत्र केली. गावात घेतलं आणि आणि जाळ तयार केला. शेकोटी करण्याआधी ती जागा स्वच्छ करून घेतली. थोडा खड्डा खणून त्यात एक जाड लाकडाचा बुंधा उभा केला. बाजूनी थोडी कमी जाड रचली सगळ्याच्या मध्ये गावात भरलं. आणि माझ्या हातानी निर्माण केलेलं ते शिल्प पेटवून दिलं. मधलं गावात भुरभूर पेटून गेल, पण माझी मेहनत वाया गेली नाही. जसं अपेक्षित होतं तसचं ते पेटलं. त्याच्या उजेडात माझी झोपयची जागा थोडीची साफ करून घेतली. साफ म्हणजे काय, दगडं थोडी बाजूला करायची इतकंच. बरोबर आणलेलं घोंगडं खाली अंथरलं आणि त्याच्यावर जाऊन बसलो. मी किती घाबरलो होतो हे मला सांगायची गरज वाटत नाही. ते कोणालाही कळू शकतं. बेक्कार घाबरलो होतो. ते इसापनीतीतल्या गोष्टीत बघा सश्याच्या पाठीवर झाडाचं पान पडत, आणि तो पळत सुटतो तसं प्रत्येक छोट्या मोठ्या आवाजाला माझं होत होतं. पूर्वी ऐकलेल्या सगळ्या गोष्टीतली भूतं समोर नाचायला लागली. पूर्वी एकदा ‘कोकणातले देव’ नावाचं पुस्तक मी वाचलेलं, त्यात भूतांचे प्रकार, त्यांना ओळखायचं कसं, ते सापडण्याची ठिकाणं, त्यांचे अॅक्टिव्ह होण्याचे काळ अशी सगळी रंजक माहिती त्यात होती. एरवी स्मरणशक्ती इतकी साथीला येणार नाही. पण एकटा असलो कि ती तत्परतेने येते. त्या ‘कोकणातले देव’ मधली एकेक भूतं मला समोर दिसायला लागली. शेवटी मी आडवा झालो. कुशीवर झोपलो आणि डोळ्यासमोर पेटवलेली शेकोटी येईल असा झोपलो. झोप येत नव्हतीच. झोपण्याचा प्रयत्न केला पण ती काही साथ देईना. शेवटचा निर्वाणीचा प्रयत्न केला तो ही फेल. मग पुन्हा उठून बसलो. हॅरी पॉटर ज्याप्रमाणे वॉल्डमॉर्ट समोर आल्यावर आनंदाचे प्रसंग आठवतो त्याच प्रयत्नात मी पण लागलो. कानात हेडफोन होतेच. आता कुमार गंधर्वांचा ‘श्री’ सुरु होता. मी ऐकलेल्या रागांपैकी सर्वात गंभीर राग. म्हणजे तो सुरु झाला कि वातावरण गंभीर होऊन जातं. पण मी तो बदलला नाही. डोळ्यासमोर शांत पेटलेली शेकोटी. पण डोळ्यात आनंदाचे प्रसंग आणि कानात श्री! आजूबाजूला नाचत असलेले ‘कोकणातले देव’ सुद्धा माझ्या कानाला कान लावून ‘श्री’ ऐकण्याच्या धडपडीत आहेत असा मला भास झाला. माझी भीती सुद्धा गेली. धीर करून मी अंगावर घेतलेलं पांघरूण बाजूला केलं. आणि उठून उभा राहिलो. हेडफोन कानात होतेच. मग मी शेकोटीच्या आसपासच चालत राहिलो. गोल फिरत राहिलो. शेकोटी दृष्टीआड जाऊ दिली नाही. लघु आणि दीर्घ शंका व्यक्त करून आलो. भीती आता गेली होती. कानात श्री सुरु असल्यामुळे भीतीदायक असे कोणतेही आवाज आता येत नव्हते. पेटलेल्या लाकडाचा उजेड जिथे पर्यंत आहे त्याच्या पलीकडचं काही दिसतं नव्हतं. त्यामुळे भीती कमी झालेली.
रात्रभर मला नीट झोप अशी लागलीच नाही. भीतीने असेल किंवा शेकोटी विजेल या भीतीने असेल पण मी तासातासाने जागा होत होतो, शेकोटी व्यवस्थित करून पुन्हा येऊन झोपत होतो. असा किती वेळा उठलो माझ्या लक्षात नाही. टक्क जाग आली तेव्हा झुंजूमुंजू झालं होतं. शेकोटी विजून गेलेली. फक्त निखारे थोडे शिल्लक होते. रात्री थंडी भरपूर पडली होती. माझे हात आखडले होते थंडीनी. मग मी पुन्हा थोडं गावात आणून शेकोटी पुन्हा पेटवली. थोडं शेकलं अंग! तोंड धुतलं, चूळ भरली. पुन्हा दोन गाजरं आणि अंजीरं खाल्ली. हे सगळे सोपोस्कर होईपर्यंत सूर्य उगवलाच. मी फार वेळ न घेता आवरलं, शेकोटी पाणी मारून पूर्ण विजावली. पुढे चालायला सुरवात केली. आता कसलंच टेन्शन नव्हतं. आता रस्ता चुकण्याची भीती नव्हती. ‘कोकणातल्या देवांची भीती नव्हती. जंगलातल्या प्राण्यांची भीती नव्हती. मला खांडसला पोहोचायला नाऊ वाजले. लगेचच कर्जतला जाणारी वडापसुद्धा मिळाली. कर्जत स्टेशन वर पोहोचतोच तोपर्यंत मुंबई कडून कोणती तरी एक्सप्रेस आलीच. गाडी लगेच सुटेल या भीतीनी मी तसाच तिकीट न काढताच चढलो. मला बसायला सुद्धा जागा मिळाली, आणि पुण्यात शिवाजी नगरला स्टेशन वर एकही तिकीट चेकर नव्हता!!
(घरी कोणालाही माहिती नव्हतं म्हणून मी असा असा फिरून आलोय याचे सर्व पुरावे मी नष्ट केले विष्णू सोडून. म्हणून केवळ ब्लॉग आकर्षक व्हावा यासाठी फोटो वापरतो आहे. मी काढलेला एकही फोटो ठेवला नाही सर्व डिलीट करून टाकले. काही फोटो गुगल वरून घेतलेले आहेत, तर काही मी दुसऱ्या ठिकाणी काढलेले फोटो आहेत..)
एकदा एक ससा
निवडणूकीला उभा
कासव होते विरोधी
घेत पाण्यावर सभा
जंगलात म्हणे देईन
प्राण्यांना बांधून घर
फळे वाटून कासवाने
भरपूर केला प्रचार
आश्वासनांची वाटून
स्वप्ननगरी खैरात
ससा झोपला बागेत
जोराजोराने घोरत
कासव मोठे हुशार
त्याने दिला कानमंत्र
ऑनलाईन प्रचाराचे
आणले नविनच तंत्र
सशाच्या झोपीने बघा
पडे मतांचा भोपळा
कासवाची निघे रॅली
प्राणी विजयी सोहळा
-- विठ्ठल जाधव.
संपर्क: ९४२१४४२९९५
शिरूरकासार, बीड
योग्य वेळी हातात पडलेलं एखादं पुस्तक, खरंच, आपलं आयुष्य पूर्ण बदलून टाकू शकतं!
स्वामीजींनी एक उत्तम गोष्ट केली ती म्हणजे त्यांनी या कर्मयोगाची व्याख्या केली नाही. जर मला काही कृती करायची असेल तर आधी मला हे कळणे गरजेचे आहे की हे माझं कर्म आहे. तेव्हाच मी करु शकेन. पुन्हा कर्माची कल्पना ही निरनिराळ्या राष्ट्रात निर निराळी असते.
हा विशाल समुद्र आहे
आणि हे माझे इवलेसे अश्रू.
मी या विशाल समुद्राकडे पाहतो
आणि कविता लिहीतो.
सण-उत्सवांच्या आपल्या भारतीय परंपरांचा मागोवा घेतल्यास असे लक्षात येते की प्रत्येक प्रथेमागे एक उदात्त हेतू आहे. कित्येक धार्मिक सणांचा संबंध निसर्गाशी जोडलेला आहे.
स्मिता दोडमिसे
लहानपणी दसऱ्याचे सोने वाटायला घ्यायचे आणि हेच सोने ही कल्पना रुजली. मी ती आपट्याची पाने बघून विचार करायचे, की याचे कानातले कसे होतील आणि मग ते कानात हातात घातल्यावर कसे चमकतील. कारण हे सोनं आहे, हे आईकडून कळाले होते आणि आईच्या तोंडून माझ्या सोन्याच्या बांगड्या, सोन्याचे कानातले असेही ऐकलेले. मग माझ्या चिमुकल्या मेंदूला त्रास देत मी ते शोधायचे की या पानाच्या बांगड्या कशा होतील. थोडे मोठे झाल्यावऱ कळायला लागले की हे म्हणजे झाडाचे पान आहे. आपट्याचे पान याला सोन्याचे झाड म्हणतात आणि आई घालते ते सोने वेगळे. हे प्रथेतील सोने आहे.
आपल्या प्रत्येक प्रथेमागे कार्यकारणभाव आहे. निसर्गाने आपल्याला बहाल केलेला अमूल्य ठेवा जतन केला जावा, त्याचे उपयोग आपल्याला व्हावेत, यासाठी त्यांच्या या प्रथांमधील समावेशाला काही शास्त्रीय कारणे आहेत. निसर्गातील अगदी वनस्पतींचा विचार करायचा झाल्यास आपल्या अवतीभोवती अशा कित्येक औषधी वनस्पती आहेत की ज्यांचे जाणीवपूर्वक संवर्धन करणे आपल्याच फायद्याचे ठरणार आहे. तसे पाहायला गेले तर नुसते झाडे लावा, ही झाडे जपा असे सांगून कोणी त्या झाडांचे रक्षण केले नसते. केवळ उपदेश केला अन् महत्त्व सांगितले म्हणून त्याचे महत्त्व पटले, हा मनुष्यसुलभ स्वभाव नाहीच. मानवाच्या या स्वभाव वैशिष्ट्यांचा सूक्ष्म अभ्यास केलेल्या आपल्या पूर्वजांनी मग या सर्व गोष्टींचा संबंध सण-उत्सव, धार्मिकता यांच्याशी जोडला आहे. दैवीकोपाला माणूस घाबरतोच, त्यामुळे मानवी जीवनाला आवश्यक व उपयुक्त अशा गोष्टींच्या संवर्धनाचा संबंध सणावारांशी जोडलेला आहे. निसर्गातील विविध गोष्टी अन् सणांचा फार सुरेख परस्पर संबंध जोडलेला आपण बघत आलेलो आहोत, जसे गणेशोत्सवात पत्री, दूर्वा, श्रावणात बेल, गुडीपाडव्याला कडुनिंब; तर दसरा म्हणजे आपट्याचे पान! या सर्व बाबींचा इतका खोल संस्कार आपल्या मनावर झाला आहे की तो सण म्हटला की ती वनस्पती आपल्या नजरेसमोर येते. या पाठीमागची कारणमीमांसा केली असता, असे लक्षात येते की या सर्व वनस्पती औषधी आहेत, म्हणजेच या सर्वऔषधी वनस्पतींचे संवर्धन करावे, ही एक दूरदृष्टी या रुढींपाठीमागे दिसते. दसऱ्याला सोन्यासारखा मान असणारे, लुटता येणारे म्हणजे सोने म्हणजे "आपट्याची पाने'
शमी वृक्ष
अज्ञातवासात पांडवांनी शमी वृक्षाच्या ढोलीमध्ये आपली शस्त्रे लपविली व दसऱ्याच्या दिवशी ती बाहेर काढली. त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी "शमीवृक्षाचे पूजन करायचे' ही लहानपणापासून मनावर ठसलेली गोष्ट. मोठे झाल्यावर मग राजस्थानातील चिपको आंदोलनाची गोष्ट वाचनात आली. राजस्थानातील पर्यावरणप्रेमी लोकांनी "खेजडी' या त्यांच्या आराध्यवृक्षाच्या रक्षणासाठी बलिदान केले. आजही अंगावर रोमांच उठावे अशी ही घटना. "खेजडी' म्हणजे काय तर शमी वृक्ष. तेथील राजाने जेव्हा बांधकामासाठी झाडे तोडायचे फर्मान काढले तेव्हा सैनिकांनी झाडे तोडू नये म्हणून स्त्री-पुरुषांनी त्या वृक्षांना मिठ्या मारल्या व तीनशे एक लोकांनी प्राणार्पण केले; पण खेजडी वृक्ष वाचवले. असा हा "शमी' वृक्ष तेव्हापासून खरंच मनाच्या तळाशी जाऊन बसला अन् मनापासून आराध्यवृक्ष वाटायला लागला. शमीच्या सालींचे अनेक औषधी उपयोग आहेत. आयुर्वेदामध्ये दमा, कुष्ठरोग, कोड, मनोविकार यावर शमीचे साल गुणकारी असल्याचे सांगितले आहे.
आपटा
संस्कृतमध्ये आपट्याला "अश्मंतक' म्हणतात. अश्मंतकाचा शब्दशः अर्थ दगड किंवा खडक फोडणारा असा आहे. या अर्थाप्रमाणेच याची उपयुक्तता देखील आहे. पहिला उपयोग म्हणजे या वृक्षाची मुळे जमिनीत खोलवर जाऊन खडकाच्या फटीत देखील वाढतात, त्यामुळे खडकसुद्धा फुटतात. खडकाळ माळरानावर जिथे दुसरे झाड फारसा टिकाव धरणार नाही तिथे "आपटा' तग धरतो. त्यामुळे उघड्या बोडक्या माळरानावर वृक्षारोपण करण्यासाठी "आपटा' हा एक आदर्श वृक्ष आहे. या गुणधर्माप्रमाणे आपट्याचा औषधी गुणधर्म असा आहे की मूतखडा होऊ न देणे व झाला असेल तर तो जिरविण्याचे सामर्थ्य आपट्यामध्ये असते. म्हणजेच दोन्ही अर्थाने "आपटा' उपयोगी आहे. याचबरोबर पित्त व कफदोषांवर तो गुणकारी आहे. त्याची साले, पाने, शेंगा, बिया औषधात वापरतात. या औषधी गुणधर्माबरोबरच त्याचे इतरही गुणधर्म आहेत. आपट्याच्या लाकडाचा उपयोग पूर्वीपासून शेतीची अवजारे करण्यासाठी होतो.जनावरांनी ही पाने खाल्ली तर त्यांच्या साठीही ती पौष्टिकच असतात. असा हा बहुगुणी "आपटा'!
परंतु पूर्वजांनी पाडलेल्या या पायंड्याचा अर्थ आपण समजावून न घेता केवळ अंधानुकरण करत आलो आहोत. त्यामुळे झाले काय तर दसऱ्याला आपटा हवा, या हव्यासापोटी आपट्याच्या पानांची, फांद्यांची वारेमाप तोड केली जाते. आपटा म्हणून आपट्याबरोबरच "कांचन' या आपट्या सारख्या वृक्षाच्या पानांचीही तोड केली जाते. अशा तोडीमुळे आपण खूप प्रमाणात निसर्गाचे व पर्यायाने आपले नुकसान करत आहोत, हे कोणी लक्षातच घेत नाही; पण आता आपण हे सर्व थांबवायला हवे. दसऱ्याला सोने म्हणून आपट्याची पाने देण्याऐवजी आपट्याचे रोप द्यायला हवे. नुसते रोप देऊन घेऊन हा प्रश्न सुटणार नाही; तर त्या रोपाचे रोपण जवळच्या माळरानावर, मोकळ्या खडकाळ जागांवर करायला हवे. त्यामुळे जमिनीचे संरक्षण व त्याच्या औषधी गुणधर्मांमुळे आपले संरक्षण असा दुहेरी हेतू साध्य करता येईल. तेव्हा निश्चय करा, या दसऱ्यापासून "आपट्याच्या झाडाची पाने, फांद्या न तोडता आपण एकमेकांना आपट्याची रोपे देऊया व या सोन्याचे रक्षण करूया! तरच खऱ्याअर्थाने आपला दसरा साजरा होईल. हे सगळे बघितले की पुनश्च प्रकर्षाने वाटायला लागते, की खरंच आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये उत्सव, निसर्ग व पर्यावरणरक्षण यांची सुरेख सांगड घातली गेली आहे. पर्यावरण संतुलन; तसेच मानवी स्वास्थ्य आणि समृद्धी यासाठी महत्त्वाच्या वृक्षांना सांस्कृतिक महत्त्व दिले आहे. तेव्हा आपणही या झाडांची बेसुमार तोड न करता, उगाच पत्री तोडून कचरा निर्माण करण्यापेक्षा त्यांचे संवर्धन करण्याचा संकल्प करूयात.
सोन्यासारख्या निसर्गाचे रक्षण करून सोन्यासारखे वर्तन करूयात.
-- स्मिता दोडमिसे
Copyright © 2025 | Marathisrushti