पन्नाशी
आयुष्य पुढे धावत असते,
वय सारखे वाढत असते,
पण......
खरी मजा जगण्याची,
पन्नाशीनंतर सुरू होते ,,,,,
उच्छृंखल आणि समंजसपणा,
यामधली मर्यादा कळते,
अल्लडपणावर हलकीशी, प्रगल्भतेची झालर चढते,
खरी मजा जगण्याची,
पन्नाशीनंतर सुरू होते,,,,,
जगण्याची परिभाषा,
थोडी थोडी बदलू लागते,
काय हवे अन् काय नको,
हे नेमकेपणे कळू लागते,
खरी मजा जगण्याची,
पन्नाशीनंतर सुरू होते,,,,,,
जगणे समजुन घेण्याचे,
हेच खरे वय असते,
याच वयात आपण स्वत:साठी, जगायचे असते,
खरी मजा जगण्याची,
पन्नाशीनंतर सुरू होते,,,,,
आयुष्याच्या चित्रपटातील,
हेच मध्यंतर असते,
इथूनच पुढे,
शेवटच्या क्लायमेक्स कडे
जायचे असते,
खरी मजा जगण्याची,
पन्नाशीनंतर सुरू होते,,,,,
म्हातारे होण्याआधीचे,
हे शेवटचे तरूणपण असते,
ते, आपण मनापासून उपभोगायचे असते,
खरी मजा जगण्याची,
पन्नाशीनंतर सुरू होते,,,,,,
पन्नाशीनंतरही पावसात
भिजावेसे वाटणे,
हे मन अजुन हिरवे असल्याचे
लक्षण असते,
खरी मजा जगण्याची,
पन्नाशीनंतर सुरू होते,,,,,
पन्नाशीपुढच्या मित्र मैत्रिणींनो, एकदा तरी अवश्य वाचाच....
खरंतर हेच वय आहेन आयुष्याला चॅलेंज करायचे.
त्याने शिकवलेले अनुभव वापरून, इच्छा असल्यास चाकोरी मोडून आपल्याला आनंद मिळेल ते सुरु करण्याचे.
आयुष्याच्या विमानाचा डिसेंड सुरु व्हायला अजुन अवकाश आहे. आत्ता तर कुठे "सिट बेल्ट ऑफ" ची साईन आली आहे.
ही वेळ आणि वय आहे "क्रूझ" करायचं, नवी क्षितिज गाठायचं, नवी आव्हान स्वीकारायचं, आयुष्याकडून शिकायचं, जे शिकलो ते इतरांना द्यायचं..!
कारण पन्नाशी म्हणजे नृसिंह अवस्था.!
ना तरुण ना म्हातारा,
ना नवशिका,
ना पूर्ण अनुभव संपन्न,
ना खूप आसक्ति
ना पूर्ण विरक्ति,
ना पूर्ण सौष्ठव,
ना गलित गात्र,
आयुष्याच्या एका फेज मधून दुसऱ्या फेज मधे जायचा उंबरठा....
जमतील तसे आणि तेथे आपले अनुभव शेयर करा.
आपण आयुष्यात अनुभवलेले खड्डे चुकवायला इतरांना मदत करा,
पोरांचे मित्र व्हा,
त्यांच्या मित्र मैत्रिणींचे Buddy व्हा,
सामाजिक कार्यात सक्रीय भाग घ्या,
सभ्यतेच्या परिघात राहून बिनधास्त गॉसिप करा,
शाळेची गेट टुगेदर आयोजित करा,
ट्रेकला जा,
रिक्षा किंवा टॅक्सीवाल्यावर दादागिरी करून "आवाज कुणाचा" चे ऐन जवानीतले जोशाचे दिवस कधीतरी परत अनुभवा.
औषधे किंवा गोळ्या ज्यांच्या नाशिबी लागल्या असतील त्यांनी त्या नेमाने घ्या, पण एखाद्या पार्टीत मित्रांबरोबर कॉलेजातल्या पहिल्या क्रशची आठवण जागवताना क्वचित एखादा पेग जास्त झाला तर त्याची झिंग पण एन्जॉय करा.
पावसात भिजा,
जॉगिंग करा,
सूर्यनमस्कार घाला,
लाँग ड्राइव्हला जा,
सिनेमे पहा,
काका / काकू म्हणतील त्यांचे काका / काकू व्हा,
दादा म्हणून जवळ येतील त्यांचे थोरले बंधू व्हा,
अनुभवाचं ओझं इतरांना वाटून थोड हलक करा.
मुख्य म्हणजे हसत रहा.
एकदा मनाशी पक्के बांधले की पन्नाशीचा घाटमाथा म्हणजे, पालिकडल्या उताराची सुरुवात न वाटता अलिकडचा चढ चढून शिखर सर केल्याचा आनंद देऊ शकतो. पन्नाशी टेंशन न रहाता सेलिब्रेशन बनते.
आणि मग पन्नाशी हा फक्त एक आकडा रहातो...
जस्ट अनदर ब्लडी नंबर...
म्हणूनच म्हणतो .....
ENJOY YOUR
पन्नाशी पुढे ....
तू पाप की पुण्य ?....कळेना .
तू स्वार्थ की परमार्थ ?.... कळेना.
तू विष की अमृत ? ......कळेना.
तू छंद की आसक्ती ?....कळेना.
तू ध्यास की भास ?....... कळेना.
तू आस की आभास ?......कळेना.
तू नस की फास ?......कळेना.
तू श्वास की भ्रमनिरास ?.....कळेना.
तू मृगजळ की शाश्वत ?...... कळेना.
तू शांती की तगमग ?....... कळेना.
तू तहान की तृप्ती ?.......कळेना.
तू पर की आप ?........ कळेना.
तू रोग की ईलाज ? .... कळेना.
तू मोह की विरक्ती ?.....कळेना.
तू भोग की योग ?.......कळेना.
तू पीडा की सुख?...... कळेना.
तू स्वप्न की सत्य?.... कळेना.
तू दाह की शीतल ?....कळेना.
तू वेगळी की समरस?..... कळेना.
तू कोडं की तोड ?......कळेना.
तू भविष्य की आयुष्य ?.....कळेना.
तू प्रीत की जीव ?..... कळेना.
तू माझी की मी तुझा? ....कळेना.
आपण एकरूप की एक ?.... कळेना.
--विशाल झावरेपाटील
मराठीतील पहिले वृत्तपत्र ‘दर्पण’ पंडित बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी प्रकाशित केले. ठाण्यात मात्र पहिले वृत्तपत्र २२ जुलै १८६६ रोजी निघाले. त्या वृत्तपत्राचे नाव होते ‘अरुणोदय.’ हे वृत्तपत्र काशिनाथ विष्णू फडके यांनी काढले. त्यांनी जांभळीनाक्यावरील पोलिस चौकीजवळ आपला छापखाना टाकला. फडके यांचे हे वर्तमानपत्र ठाणे जिल्ह्यातील पहिले साप्ताहिक होय.
"ह्या इंग्रजी सरकारचे डोके तर ठिकाणावर आहे ना?"
"ने मजसी ने परत मातृभूमीला...."
"राष्ट्रस्वातंत्र्य द्या, हिंदभूला नवे!
धर्म-स्वातंत्र्य तें हिंदभूला हवे!
ज्ञानस्वातंत्र्य ती प्रार्थुनी मागते!
हिंदभू वांछिते सकल स्वातंत्र्य तें!"
लेखणीची धार ही नेहमीच आपले काम चोख बजावत आली आहे. आपल्या स्वातंत्र्य संग्रामात या लेखणीने खूपच मोलाची कामगिरी बजावली आहे, मग ती टिळकांची लेखणी असो ज्यांनी केसरीच्या अग्रलेखातून इंग्रजी सरकारला खडसावून विचारले, किव्हा सावरकरांची लेखणी जिने प्रत्येक भारतीयांच्या मनात घर केले. मराठीतील राष्ट्रकवी कवी गोविंद ह्यांच्या कविता क्रांतिकारकांसाठी स्फूर्तिगीते ठरल्या. अश्याच आहेत आजच्या आपल्या असमी कवियत्री कुंतला कुमारी सबत.
८ फेब्रुवारी १९०० साली त्यांचा जन्म जगदलपूर येथे एका ब्राम्हण परिवारात झाला. ह्यांच्या जन्मआधीच त्यांच्या पालकांनी ख्रिस्त धर्म स्वीकारला. वडील डॅनियल सबत हे व्यवसायाने वैद्य होते तर आई मोनिका सबत गृहलक्ष्मी होत्या. कुंतला देवीच्या जन्मानंतर लगेचच सबत परिवार बर्मा ला स्थलांतरित झाले. तिकडे त्यांच्या वडिलांनी दुसरे लग्न केले आणि कुंतलादेवी आईबरोबर खुरदा येथे परत आल्या. स्त्री शिक्षणाला काहीही महत्व नसतांना कुंतलादेवीच्या आईंच्या अग्रहास्तव कुंतलादेवींचे शिक्षण अतिशय उत्तम प्रकारे झाले. त्या डॉक्टर झाल्या. त्याच बरोबर त्या बहुभाषी होत्या. त्यांना ओडिया, हिंदी, बंगाली, इंग्लिश आणि ब्राम्हीस भाषा अवगत होत्या.
त्या निष्णात डॉक्टर होत्याच त्याशिवाय मनातून समाजसेविका होत्या. त्यांच्या प्रत्येक कामातून, लिखाणातून ह्याची जाणीव होत राहते. १९२८ साली त्यांचा विवाह त्यांचेच गुरू श्री कृष्णा प्रसाद ब्रम्हचारी ह्यांच्याशी झाला. त्या दिल्ली निवासी झाल्या.
गांधीजींच्या प्रभावामुळे कुंतलादेवी ह्यांनी आपल्या लेखणीतून इंग्रजांविरुद्ध लिखाण करायला सुरुवात केली. त्यांच्या लिखाणाचे मुळ उद्दिष्ट युवकांना प्रेरित करणे, भारतमातेच्या स्वतंत्रते बद्दल लिहिणे, क्रांतीकारकांना प्रेरणा देणे हेच होते. समाजातील चुकीच्या रूढी जसे की, बाल विवाह, विधवा विवाह, स्त्री शिक्षण, जातीय वादा विरुद्ध सुद्धा त्यांनी आपले प्रखर मत आपल्या लेखणीतून प्रकट केले. भारती तपोवन संघ ची स्थपना केली जेणेकरून ओडिया साहित्य प्रकाशात येईल, त्याचे संवर्धन होईल. १९३८ साली वयाच्या केवळ ३८ व्या वर्षी त्यांना देवाज्ञा झाली.
लेखणीच्या साह्याने जी युद्ध लढली जातात, ते नेहमीच समाज प्रवर्तक ठरतात. समाजाला नवीन विचार, प्रेरणा देणारे ठरतात. आपल्या लेखणीचा समाजहितासाठी वापर करणाऱ्या ह्या भारतमातेच्या विरांगनेला माझे कोटी कोटी नमन.
|| वंदे मातरम् ||
सोनाली तेलंग
२७/०६/२०२२
संदर्भ:
१. inuth.com
२. wikipedia.com
१९९२ म्हणजे नव्वदीच्या दशकात ज्या गावात शिक्षणाला फारसं महत्व दीलं जात नव्हतं त्या काळात रीटायर्ड मेजर श्री. महादेव गोविंद तोडकर ( MG आण्णा ) यांनी ग्रंथालयाची स्थापना केली आणी गावाला ज्ञानाच्या व्दारात उभा करण्याचं काम केलं. ज्ञानाचं दान तरूणांच्या पदरात देवून त्यांना सुशिक्षीत, सुसंस्कृत बनवण्याचं पहीलं पाउल नव्वदीच्या दशकात त्यांनी टाकलं.

जीवन लेख महालेख
रविवारचा दिवस होता. मुलाची सायकल रिपेअरिंग ला घेऊन गेलो. दुकानामध्ये खूपच गर्दी होती. सर्वच्या सर्व सायकल लहान मुलांच्याच रिपेअरिंगला आलेल्या. मोठी सायकल रिपेअरिंगला दिसलीच नाही. लहान्यांच्याच सायकलींची गर्दी होती. वाट पाहण्या शिवाय दुसरा पर्याय नव्हता.
एक मुलगी
एक मुलगी चालते आहे आपला रस्ता
खोल शांतशा डोहातील ती तरंग नुक्ता
जंतर मंतर जादू तंतर नाही तिला ठाव
तिचे तिला ठावूक आहे आपले कुठले गाव
होऊन अधीर वाऱ्यासोबत ती भांडत बसते
आपले खेळ ती ताऱ्यासोबत मांडत असते
व्यक्ती आणि समाज हे नेहमी परस्परावलंबी असतात. प्रत्येक व्यक्ती एकेकटी आदर्श, सदगुणी झाली की समाज आदर्श होतोच. मात्र व्यक्तीच्या विकासाकरिता सामाजिक परिस्थितीदेखील चांगली असली पाहिजे. म्हणूनच की काय, भारतीय संस्कृतीमध्ये वैयक्तिक पूजा-अर्चा करताना जे श्लोक म्हटले जातात त्यांचा सामाजिक आशयही मोठा असतो.
Copyright © 2025 | Marathisrushti