सवाई हा फक्त एक उत्सवच नाही तर महोत्सव आहे .. गेली ६० वर्षे दर वर्षी नित्य नियमाने सवाई च्या सर्व मैफिली जागवणारे अस्सल रसिक हे ह्या उत्सवाचे वैशिष्ठ्य ..
खाणे आणि गाणे ह्या दोन महत्वाच्या गरजा इथे उत्तम रीतीने पुरविल्या जातात ...
पुरण पुळ्या , उकडीचे मोदक , उपवासाचे पदार्थ , साबुदाणे वडे , बटाटे वडे .. घरगुती जेवणा पासून भेळ , गरम शेंगा दाणे .. सर्व खवय्यांना नेहमीच आकर्षित करतात ... जोडीला वाफाळलेला गरम फक्कड चहा किंवा सुवासिक कॉफी !!
बहुतेक फक्त ह्याच संगीत महोत्सवाला अनेक परिवार- मित्र-मैत्रिणींचा घोळका एखादी पिकनिक कम मैफिल म्हणुन एकत्र बसलेला दिसतो ! वर्षात फक्त एकदाच शास्त्रीय संगीत ऐकणारे ह्या महोत्सवाला भेटतात .. काही लोकांच्या ओळखी- भेटी तर दर वर्षी फक्त ह्या महोत्सवा च्या दरम्यान होतात !
जागा पकडण्या साठी दोन-तीन तास आधी येऊन चादर अंथरून त्यावर झोपून राहणारे रसिक .. बरोबर निवडायला आणलेली भाजी , पालेभाजी कधी लोकरी चे स्वेटर विणण्याचे साहित्य .. अजून कुठली घरची कामं , ऑफिसची कामं घेऊन शांत पणे ते करत बसलेले "रसिक" हे फक्त सवाई लाच दिसतात...
ह्यात भर म्हणजे ...आजकल अनेक लोकं लॅपटॉप / टॅब / आय पॅड घेऊन काहीतरी काम केल्या सारखे दाखवत सवाई चा "आनंद" घेत असताना दिसतात .. काही लोकं गाणं ऐकण्या पेक्षा ते कुठल्या तरी मोबाईल / स्मार्ट फोन नी रेकोर्ड करण्यात जास्त मश्गुल असतात !
लांब लचक फोटो लेन्स बरोबर गळ्यात कॅमेरा अडकवून (उगाचच) इकडून तिकडे धावणार्या यौवना .. युवक हजेरी लावतात .. तर काही फक्त खाण्या च्या स्टॉल्स वर मुक्कामाला येतात !
हि असली दृष्य फक्त सवाईतंच बघायला मिळतात !
मग खाणे असो वा गाणं .. रसिक नित्य नियमाने सवाई च्या वारी साठी आतुरतेने वाट पहात असतात
तर.... भेटूया नक्की ... १२ ते १५ डिसेंबर !
-- संगीत संगीत या WhatsApp Group वरुन
कॉग्रेस चा “आदर्श”
मुळातच ख्याल गायकी हा अवघड गायन प्रकार. या गायकीने अडीच-तीन तास श्रोत्यांना खिळवून ठेवणे आणखी अवघड. पंडित भीमसेन जोशी यांनी 50 वर्षांहून अधिक काळ श्रोत्यांना ख्यालगायकीने खिळवून ठेवलं. हिमालयाच्या उंचीचं गान कर्तृत्व असलेल्या पंडितजींना इतर अनेक नामचीन पुरस्कारांबरोबरच ‘भारतरत्न’ ही लाभले. संगीताच्या नभांगणातून अस्तंगत झालेल्या या महान कलाकाराला वाहिलेली श्रद्धांजली.
युद्ध म्हटले की बंदुका, तोफा, मशिनगन्स, युद्धनौका,विमाने, बॉम्बस्,गडगडाट, परीसर दणाणून सोडणारे आवाज वगैरे वगैरे डोळ्या समोर येतात. या सर्व गदारोळात संगीत कसे असणार? फार फार तर मिलटरी बॅन्ड एवढाच काय तो संगीताशी संबंध असणारा भाग. बाकी सर्व मन आणि शरीराला भयकंपीत करणारेच असते. भारतीय सैन्यात असाच एक तरूण सामिल झाला होता. इराक मधल्या बगदाद शहरात रायबहादूर चुन्नीलाल नावाच्या श्रीमंत व्यक्तीच्या घरात जन्मलेल्या या तरूणाने बालपणाचा पाच वर्षांचा काळ बगदादमध्येच घालवला होता. १९३२ मध्ये रायबहादूर चुन्नीलाल मुंबईत आले व नंतर सिनेमा व्यवसायतील एक मोठे प्रस्थ बनले. बॉम्बे टॉकीज व फिल्मीस्तान या त्याकाळच्या नावाजलेल्या सिनेनिर्मितीच्या संस्थेत भागीदार झाले. तो तरूण सैन्यात दाखल झाला खरा पण त्या वातावरणात त्याचे मन रमेना. बंदुकीच्या गोळ्या वा मशिनगन्सचे आवाज त्यांच्या कानावर जेव्हा पडत तेव्हा त्याच्या मनात खोल कुठेतरी सतारीच्या तारा झंकारत….अलवार स्वरांचे सूर खुणावत…शेवटी १९४६ मध्ये त्या तरूणाने सैन्यातील नोकरीला बाय बाय केले आणि आपल्या आवडत्या क्षेत्रात काही तरी करावे म्हणून मुंबईला आला.
सुदैवाने येथे त्यानां ऑल इंडिया रेडिओत नोकरी मिळाली आणि येथूनच मदनमोहन कोहली या तरूणाचा संगीतकार मदनमोहन असा प्रवास सुरू झाला. ऑल इंडिया रेडिओमध्ये त्यांची गाठ पडली संगीतातील दोन महान दिग्गजांशी. पहिले शहनाई नवाज उस्ताद बिस्मिला खान व दुसरे उस्ताद फैय्याज खान यांच्याशी. त्याचवेळी संगीतकार रोशन देखील या रेडिओ स्टेशनवर कामाला होते. स्वत: मदन मोहन यांनी रूढर्थाने संगीताचे असे शिक्षण घेतले नव्हते मात्र या नोकरीच्या वास्तव्यात त्यांना या दोन दिग्गजाकडून संगीतातले मर्म आत्मसात केले. मदनमोहन यानां चित्रपटात संधी मिळाली ती मास्टर गुलाम हैदर या संगीतकारामुळे. मात्र संगीत दिग्दर्शनाची नाही तर गाणे गायनाची. ‘शाहीन’ नावाच्या चित्रपटात त्यांनी चक्क लताजी बरोबर ही दोन गाणी गायली. पूढे १९५० मध्ये मात्र संगीत दिग्दर्शनची पहिली संधी आंखे या चित्रपटाद्वारे मिळाली. मात्र पाच सहा वर्षे संघर्षातच गेली.
१९५६ मध्ये आला एव्हीएम या दक्षिणेतल्या प्रसिद्ध बॅनरचा किशोर व अशोक कुमार अभिनीत ‘भाई भाई’ हा चित्रपट. यातील जवळपास सर्वच ११ गाणी खूप गाजली आणि मदनमोहन यांना यशाची पहिली चव चाखता आली. “कदर जाने ना…” “ए दिल मुझे बता दे”….”थंडी थंडी हवा”…ही गाणी आजही रसिकांच्या ओठावर सहज येतात. बेगम अख्तर हा मदनमोहन यांचा विक पॉईंट. त्यांच्या गझला आणि भारतीय वाद्ये त्यांच्या नसानसात भिनलेले होते. मुशायरात म्हटली जाणारी गझल व नज्म त्यांनी चित्रपटात आणली, तेथून ती प्रेक्षकाच्या घरात व हृदयात पोहचली. याचे श्रेय संगीतातील सर्वच दिग्गज संगीतकार खुल्या मनाने मदनमोहन यानां देतात ते योग्यच आहे.
त्यानां क्रिकेटचेही अफाट वेड होते. आताचे ब्रेबॉन स्टेडियमच्या जागी पूर्वी एक मोकळे मैदान होते जिथे तासन तास मदनमोहन क्रिकेट खेळत असत. बेगम अख्तरचे सूर, सैन्यातील कठोर शिस्त आणि क्रिकेटचं वेड हे तिन्ही गुण त्याना संगीत देतानां खूप उपयोगी पडले. एस.डी.बर्मन व सी.रामचंद्र यांच्याकडे त्यांनी सुरूवातले सहाय्यक म्हणून काम केले पण त्यांच्या संगीतावर मात्र त्यांचा प्रभाव पडला नाही. अतिशय मोजक्या वाद्यमेळासह ते आपले गाणे तयार करत. सतार, तबला ढोलकी, सॅक्सोफोन यांचा अप्रतिम वापर त्याच्या संगीतात बघायला मिळतो. त्यामूळे गायकांच्या गाण्याचे आवाजाचे सर्व तपशील त्यांच्या गाण्यात आढळून येते. ‘अनपढ’ चित्रपटाचे ‘आप के नजरोमे समझा प्यार के काबील मुझे’ या एका गाण्याच्या मोबदल्यात संगीतकार नौशाद आपला गाण्याचा सर्व खजिना लुटायला तयार होते. ‘हकीकत’या युद्धाची पार्श्वभूमी असलेल्या चित्रपटातील रफीचे ‘कर चले हम फिदा जानोतन साथीयों…..’ हे गाणे म्हणजे त्यांनी भारतीय सैन्याला दिलेली मानवंदनाच आहे. तर याच चित्रपटातील ‘हो के मजबूर मुझे उसने भुलाया होगा’…….हे गाणे म्हणजे भारतीय जवानांच्या हृदयाच्या छेडलेल्या ताराच आहेत. ‘नैनिहाल’ मधील ‘मेरी आवाज सुनो’ हे रफीचे गाणे पंडीत नेहरूनां अर्पण केलेले गाणे होते….उस्ताद रईस खान यांच्या सतारीचा वापर अनेक गाण्यात त्यांनी इतका अप्रतिम केला आहे की स्वत: लता दीदी ‘आज सोचा तो आंसू भर आये’ या गाण्यातील सतारीचे सूर ऐकून हळव्या झाल्या होत्या. ‘वो चूप रहे तो’(जहाँ आरा)….’रस्मे उल्फतमे’(दिल की राहे)…..’नैनो मे बदरा छाये’(मेरा साया)….या गाण्यातील सतारीचे सूर आजही अंग मोहरून टाकतात.
राजा मेंहदी अली खान, राजेन्द्र कृष्ण आणि कैफी आजमी या तिन गीतकारां सोबत त्यांचे खूप सुंदर असे टयुनिंग होते. यांच्या सोबत केलेली सर्वच गाणी खूप गाजली. त्यांनी संगीत दिलेल्या चित्रपटातील काही चित्रपट वगळता सर्वच खूप ब्लॉक बस्टर असे नव्हते. मात्र त्या चित्रपटातील गाणी खूप गाजली. लोक चित्रपट विसरले पण गाणी नाही विसरले. जवळपास १०० चित्रपटानां संगीत दिलेल्या मदनमोहन यानां पुरसकार मात्र कमीच मिळाले. १९७० मधील आलेल्या “दस्तक” चित्रपटातील “बयाँ ना धरो या गाण्याने” मात्र त्यानां राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला. ‘आप की नजरो ने समझा’…(अनपढ) आणि ‘लग जा गले की’…(वह कौन थी?) या दोन गाण्यानां फिल्म फेअर नॉमिनेशन मिळाले पण पुरस्कार नाही मिळाला. अनेकदा अनेकानां नाही मिळत पुरस्कार पण त्यामुळे त्यांच्या स्थानाला काहीच धक्का पोहचत नाही. ….आजच्या काळातही जेव्हा एक १०-११ वर्षांची मुलगी अत्यंत तन्मयतेने “लग जा गले की आज ये”….. गाऊ लागते तेव्हा तिला हेही माहित नसते की ज्या संगीत दिग्दर्शकाचे ती गाणे गात आहे त्याकाळात तिच्या वडीलांचाही जन्म झाला नसेल. काही संगीतकार, साहित्यीक वा विचारवंत हे कालातीत असतात. खरं तर ५१ वर्षे हे काही असं एक्झीट घेण्याचं वय नाही. मदनमोहन खूप लवकर हे जग सोडून गेले.. त्यांच्या मृत्यू नंतर अनेक गझला, नज्म, कविता, शायरी यानां अनाथ् झाल्या सारखं वाटलं असेल.
-दासू भगत (२५ जून २०१७)
टी. व्ही. आणि केबलवरील मालिका आणि आयटम सॉंग ऐकून, पाहून समाजाची अध्यात्मिक प्रगती होण्याऐवजी अधोगती होत आहे. याची प्रत्येक सुजान नागरिकांनी जाणीव ठेवणे ही काळाची गरज बनली आहे.
२७ ऑक्टोबरच्या लोकसत्तेतील लोकरंग पुरवणीतील एका लेखात श्री अशोक शहाणे यांनी लिहिले आहे की “सी-डॅक वाल्यांनी मराठीची वाट लावली… सगळ्याच भारतीय भाषांची वाट लावली”. यात तथ्थ्य किती हे त्यांचे त्यांनाच माहित पण वस्तुस्थिती अशी आहे की आज संगणकाशिवाय पर्याय नाही.
आजच एक बातमी वाचली नांदेड जिल्हा परिषदेने उपक्रम सुरु केला आहे रात्री ७ ते ९ या वेळात टी व्ही बंद ठेवायचा. त्या साठी झेड पी च्या शाळेत शिकणारी मुले प्रत्येक घरी जाऊन हात जोडणार आहेत. या सिरियल्सनी मुलांच्या आभ्यासावर परिणाम होत आहे म्हणून हि शक्क्ल लढवण्यात आले आहे.
सिरियल्सची दुखणी उपचाराच्या बाहेर गेल्यावर हा डोस झेड पीच्या शिक्षण विभागाने देण्याचा प्रयत्न केला आहे . इडीयट बॉक्स णी माडलेला पसारा आता आवरण्याच्या बाहेर गेला आहे. अमेरिका, इंग्लंड मधे या विषयी जागृती आधीच सुरु झाली आहे. नो टी व्ही अवर तसेच नो टी व्ही डे येथे साजरे केले जातात. भारतात मात्र पालकाच टी वहीच्या आहारी गेले आहेत. आधी त्याचेच प्रबोधन करावे लागेल असे दिसते.
दिल्ली व मराठी माणूस यांचे नाते अतूट आहे. या संबंधाचा ऐतिहासिक मागोवा घेतला तर १७०७ सालापासून १८०३ सालापर्यंतचा सलग कालखंड डोळयासमोर येतो. शहेनशहा औरंगजेबच्या मुत्युनंतर येसूबाई व इतर २०० जण दिल्लीत डेरेदाखल झाले आणि हेच दिल्लीचे पहिले मराठी निवासी होत. १७०८ ते १७६९ या काळातील अंतोजी माणकेश्वर, महादेव हिंगणे, महादजी अशा चतुर, मुत्सद्दी सरदारांनी पेशव्यांच्यावतीने दिल्लीत अंमल केला. मराठी वकिलातीचे हे पहिले पाऊल म्हणावयास हरकत नाही.
विकसित देशांमधील ई-कचर्याचा भारत हा सर्वात मोठा ग्राहक आहे. मोबाइल फोन, लॅपटॉप, टेलिव्हिजन आणि खराब झालेल्या कॉम्प्युटरमुळे मोठं संकट निर्माण झालं आहे. या संकटापासून दूर रहाण्यासाठी काही ठोस प्रयत्न न झाल्यास येणारा भविष्यकाळ धोकादायक आहे हे निश्चित !!!
Copyright © 2025 | Marathisrushti