मुळात रफी व आशा हे माझे अत्यंत आवडते गायक गायिका आहेत. त्यांची अनेक अजरामर द्वंद्व गीते आहेत. त्यात ओपी ने या दोघांना भरभरून गाणी दिली आहेत ती पण एकापेक्षा एक सरस. मी ओपीचा खूप चाहता आहे आणि त्याच नात्याने माझ्या या आवडत्या संगीतकाराबद्दल लिहितोय, फक्त त्याच्या संगीताविषयी, त्याने दिलेल्या अवीट अशा चालींच्या गीतांविषयी……….
संदर्भ : एक टी.व्ही. सीरियल
एका प्रसिद्ध टी.व्ही. चॅनलवरील एक सीरियल.( नांवाची ज़रूर आहे कां ?). एका बाजूला कर्मकांडावर विश्वास नसलेलें नास्तिक मुलीकडचें कुटुंब ; आणि दुसर्या बाजूला कर्मकांडावर, पत्रिकेवर, संपूर्णपणें श्रद्धा असलेलें मुलाकडचें कुटुंब. हें सीरियलच काय , अशी अन्य अनेक सीरियल्स आहेत, जी अंधश्रद्धा, पुराणमतवादीपणा, जुनाट कालबाह्य परंपरा, अशा अनेक गोष्टी दाखवत असतात, जस्टिफायसुद्धा करत असतात. त्यांच्या सर्वांबद्दल बोलायचें-लिहायचें म्हटलें तर त्याला अंतच नाहीं. पण या विशिष्ट सीरियलबद्दल मात्र एक महत्वाचा, टाळतां न येण्यासारखा, मुद्दा असल्याकारणानें, त्याचा विचार करणें अत्यावश्यक आहे ; कारण त्याचा संबंध, स्त्रीला सासरी काय काय काँप्रोमायझेंस करावे लागतात, याच्याशी आहे.
मुलीच्या लग्नाला कांहीं लोक भातशेतीची उपमा देतात. भात आधी एका शेतात लावलें जातें, अन् नंतर रोप वाढल्यावर, तें रोप तिथून काढून, त्याचं ट्रान्सप्लांटेशन दुसरीकडे करतात. लोक म्हणतात की, त्या रोपानें जोमानें वाढावें म्हणून हें सगळें असतें. पण, त्या रोपाची, किमान सुरुवातीला तरी, काय स्थिती असते, हें कोणाला माहीत आहे काय ? आणि, लाँग-टर्ममध्ये कदाचित ती क्रिया त्या रोपासाठी फायद्याची असेल-नसेल, पण शॉर्ट-टर्ममध्ये ती क्रिया त्या रोपाला ‘ट्राउमा’ (trauma) देते की काय , व किती देते , हें कोणी पाहतें कां ?
मुलगी तिच्या माहेरी प्रेमाच्या वातावरणात वाढते, तिथें तिला तळहातावरल्या फोडासारखे ज़पलें जातें ; आणि लग्न झाल्यावर, तें घर, ती नाती, ती माणसें , या सर्वांना मागे सोडून, ती एक नव्या घरीं नवी माणसें, नवीन नाती, नवीन चालीरीती यांना तोंड द्यायला, पाऊल टाकते. तिला किती काँप्रोमाइझेस करावे लगतात ! तिला योग्यायोग्य काय वाटतें, तिची मतें काय आहेत, तिला कुठची गोष्ट आवडते कुठची नाहीं, कुठची पटते कुठची नाहीं, याचा विचार किती सासरची मंडळी करतात ? ते सुनेला किती मतस्वातंत्र्य देतात ? तिला सासरीं किती वर्तनस्वातंत्र्य मिळतें ? घर आमचें आहे, आमच्या घरात तूं आलेली आहेस, या घराच्या चालीरीती, परंपरा , आम्ही अशाच चालवणार, आणि तुला त्याच स्वीकाराव्या लागतील; काँप्रोमाइझ आम्ही काय म्हणून करायचा , तो तुलाच करावा लागेल . अशी ही ‘दकियानूसी’ , जुनाट विचारसरणी पुष्कळ ठिकाणीं दिसून येते. कोणी २१ वें शतक म्हणा वा कांहींही म्हणा, पण अजूनही कांहींकाहीं घरांमध्येतरी खचित असेंच आहे. अजूनही ! अशा घरांत, स्त्रीस्वातंत्र्याला, (म्हणजे खास करून सुनेच्या), पुरुषच काय, पण सासरच्या स्त्रियाही सुरुंग लावतात ! हाऊ सॅड् !
आतां परत त्या सीरियलकडे वळूं या. आपल्या मुलाचें व सुनेचें नोंदणी पद्धतीनें झालेलें लग्नच मुळी सासरच्या मंडळींना पटत नाहीं. कायद्यानें झालेलें हें लग्न, ‘लग्नच नाहीं’ , असें जर कोणी खरोखरच्या जीवनात म्हणालें तर ? याचा अर्थ असा नाहीं कां, की कायद्यावर विश्वास नाहीं, म्हणजेच संविधानावर विश्वास नाहीं. तुझें झालेलें लग्न आम्हाला मान्य नाहीं, म्हणजेच, तुम्ही (पति-पत्नी) एकत्र रहाता, हा अनाचार आहे. आणि तुला पटत नसलें तरी, आम्ही सांगूं तसेंच तूं कबूल करायला पाहिजे, आम्ही म्हणूं तसेंच तूं वागायला पाहिजें, आम्ही सांगू, त्याच पद्धतीनें तूं (‘पुन्हां’ नव्हे, तर खरोखरचें, प्रथमच ! ) लग्न करायला पाहिजे. नाहींतर तुला आमच्या या घरात रहातां येणार नाहीं, तुला गांवही वाळीत टाकेल . Wow ! हा तर कॉग्निझेबल् गुन्हा ठरूं शकतो. सासरच्या अशा व्यक्तीचें, आणि गांवातील व्यक्तींही तशा वागल्या तर त्यांचेंही, वर्तन डिप्लोरेबल् तर आहेच; पण घरातल्या अशा व्यक्तीच्या वक्तव्याबद्दल, वर्तनाबद्दल, त्या व्यक्तीवर केसही होऊं शकेल अन् कोर्टाकडून तुरुंगवासही मिळूं शकेल; आणि वाळीत टाकण्याचा गुन्हा केल्याबद्दल गांवातील ‘पंचायती’लाही सज़ा भोगायला लागेल ! ‘खप’ पंचायतींच्या वागण्याला कायद्याची संमती नाहींच , आणि सुनेला ‘सासुरवास’ करणार्यांना, तिचा शारीरिक अथवा मानसिक छळ करणार्यांना कायदा सज़ा देतोच ! ही आजची खरी परिस्थिती आहे, हें आपण विसरतां कामा नये.
अहो, टी.व्ही. सीरियलवाले, चॅनलवाले म्हणणारच की, की आम्ही हें सर्व, सीरियलच्या टी. आर्. पी. साठी दाखवतो आहोत. पण मग, याचा अर्थ असा नव्हे काय की, समाजाला अशा गोष्टी, असें वर्तन अयोग्य वाटत तर नाहींच, पण तें पहायलाही आवडते !! ( तरच टी. आर्. पी. वर असणार ना ! ) तसें जर खरोखरच असेल, तर, ती डेंजरस बाब आहे, चिंता करायला लावणारी गोष्ट आहे.
शेवटीं, कन्क्लूजन काय ? टी.व्हीं. सीरियल काय वाटेल तें दाखवो ; ( आणि पुढेही, काय हवे तें दाखवो) ; पण, तें सीरियल समरसून पाहणार्यांनो, सावधान ! तिथें दाखवत आहेत, तसें वागायचा विचारही कोणी मनांत आणूं नये. नाहींतर, ( मुलीचा बाप काय करेल तें करो, पण, ) संविधान व कायदा त्यांना बडगा दाखवल्याशिवाय, धडा शिकवल्याशिवाय रहाणार नाहींत.
समाजातल्या व्यक्तींनी शहाणें असावें, शहाणें व्हावें ; नाहींतर, रामदासांच्या ‘तो / (ती) एक पढतमूर्ख’ ’ मध्ये एका लक्षणाची भर घालावी लागेल
- सुभाष स. नाईक Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz(W), Mumbai.
Ph-Res-(91)-(22)-26105365. M – (91)-9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com
या आधीच्या सुरक्षित व अभेद्य पासवर्ड कसा तयार करावा? भाग-१ या लेखात आपण सुरक्षित व अभेद्य पासवर्ड तयार करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी ते पहिले. आता आपला पासवर्ड सहजपणे लक्षात रहाणारा कसा करता येईल, त्यासाठी कोणती युक्ती वापरायची ते पाहू.
नक्की वाचा आणि सर्वांनी विचार करा
•••••••••••••••••••••••••••
एका जिगरबाज पोलीस अधिकाऱ्याने याकुब मेमनच्या अंत्ययात्रेसाठी झालेली गर्दि यावर लिहीलेला हा बेधडक लेख.
........................................................
एक फाशी…तीही दहशतवाद्याला…! शेकडो जीव घेणार्या नराधमाला. पण त्यावरही एवढा गदारोळ होईल. इतकी चर्चा होईल अशी कल्पनाही कधी पोलीसांनी केली नव्हती.
पण त्याहूनही अस्वस्थ करणारी होती ‘ती’ गर्दी. याकूब मेमनच्या अंत्ययात्रेसाठी झालेली "गर्दी",
का जमली होती ती ‘गर्दी’?
कल्याण, मुंब्रा, वांद्रे मुंबईच्या अनेक भागातून लोक याकूबच्या अंत्ययात्रेसाठी का आले?
याकूब मेमन महात्मा होता कि भारतरत्न ?
त्याच्या अंत्यविधीला इतकी गर्दी?
ही गर्दी म्हणजे भारतीय लोकशाहीचा अपमान आहे. ज्या न्यायाधीशांनी निर्णय दिला, ज्या पोलिसांनी जीवाचं रान करून तपास केला, ज्या वकिलांनी जीव धोक्यात घालून खटला लढवला.
ही "गर्दी" म्हणजे त्या सगळ्यांचा अपमान आहे.
ही "गर्दी" मुंबई बॉम्बस्फोटात जीव गमावलेल्या प्रत्येक जीवाचा अपमान आहे.
त्यांच्या नातेवाईकांचा अपमान आहे.
हा अपमान भारतीय न्यायव्यवस्थेचा आहे.
जे मुस्लिम अंतयात्रे सामील झाले, ते त्यां मुस्लिमांना भारत मान्य नाही. ते स्वत:ला भारतीय समजत नाहीत. असा अर्थ काढायचा का ..??
एक दहशतवादी, बॉम्बस्फोट घडवतो, शेकडो जीव घेतो आणि त्याला दफन करण्यासाठी इतका मोठा जमाव येतो, हे अति नाही का ?
अरे, तुमचे डोळे उघडणार कि नाही ?
देशाची वाट लागल्यावर तुम्हाला जाग येणार का.?
खरंच का जमला असेल एवढा मोठा जमाव?
मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटाचं त्या मुस्लिमांना दु:ख नाही का?
मुंबईवरचा हल्ला फक्त हिंदूंपुरता मर्यादित होता का?
मुंबईला झालेली जखम ही मुस्लिमांची नव्हती. की मग ती गर्दी समर्थन करत होती मुंबई बॉम्बस्फोटाची..?
या सर्व गोष्टींचा पोलीस म्हणुन आपण विचार केलाचं पाहिजे.
याकूबच्या अंत्यविधीला त्याच्या नातेवाईकांनी येणं हे समजू शकतो. पण मुंबईच्या प्रत्येक भागातून मुस्लिमांनी एवढी गर्दी का केली?
जमावबंदी झुगारून पोलीसांना न जुमानता गर्दी वाढत होती. गर्दी एवढी होती की दोनवेळा प्रार्थना घ्यावी लागली. याकूब मेमनसाठी एवढी प्रार्थना का?
या प्रश्नाचं उत्तर काही केल्या सापडत नाहीय...पण त्या गर्दीनं खूप चुकीचा संदेश दिला एवढं नक्की.
मुस्लीम समाजानं एक मोठी संधी गमावली असं सतत राहून-राहून वाटतंय. जर याकूबच्या अंत्यविधीसाठी गर्दी जमली नसती, तर एक कठोर संदेश गेला असता की, मुस्लीम समाज हा दहशतवादाचं समर्थन करत नाही आणि अशा कृत्यात सहभागी असणार्यांना बहिष्कृत देखील करतो.
पण दुर्दैवाने असे घडले नाही....
आणि जमली ती फक्त गर्दी ...गर्दी....गर्दी.....!
गर्दी देशाविरोधाची ........................
गर्दी भारतीय घटनेच्या बहिष्काराची....
गर्दी दहशतवाद्यांचे समर्थन करणारी....
गर्दी पोलीसांना न घाबरणारी.............
गर्दी न्याय व्यवस्थेला न माणनारी........
या गर्दी वर कठोरपणे कारवाई होणे आवश्यक होते नाही तर उद्या कोणाला साधी अटक केली तरी आमच्या माणसाला अटक केली, म्हणून पण पोलीस ठाण्यात गर्दी जमली तर नवल वाटायला नको..?
या गर्दी ने असे दाखवून दिले कि पोलिस व न्यायव्यवस्था यांचे वजन कमी झाले आहे.
शत्रुघ्न माळी
पोलीस निरीक्षक
••••••••••••••••••••••••••••••••
आम्ही जाणतो की हा मजकुर जितका पाहिजे तितका नाही फिरणार कारण असे संदेश फिरायला नेटपॅक नाही...तर मनगटात जोर असावा लागतो...!!!
जय हिंद
१९४२ सालचे चले जावं आंदोलन असो वा सविनय अवज्ञा अभियान अन्नपूर्णा महाराणांची कामगिरी वाखाणण्या सारखीच होती. ह्या सगळ्या काळात त्यांना अनेकदा जेल यात्रा करावी लागली. प्रत्येकवेळी कारावसातून मुक्त झाल्यावर त्यांचा इंग्रजद्वेष आणि देशप्रेम दुपटीने वाढत होते. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्या कटिबद्ध होत्या. वेग-वेगळ्या कॉन्ग्रेसच्या सभांना त्या आवर्जून उपस्थित राहत.
जीवन हे निर्सगाने दिलेली एक सुंदर देणगी आहे. मानवाची निर्मिती हा एक अदभूत चमत्कार आहे. या जगात प्रत्येक मनुष्य हा खास व महत्वपूर्ण आहे व प्रत्येकाला आनंदाने जीवन जगण्याचा अधिकार आहे. या अधिकाराला कोणीही त्याच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही.
निसर्गाने मानवाची निर्मिती केली व त्याचा पालनकर्ताही निसर्गच आहे. निसर्गाने मानवाला भरपूर काही दिलं व तो निसर्गाचं देणं लागतो. निसर्गाचे ऋण फेडावे ते कमीच. मनुष्य जगात रिकाम्या हाताने येतो व रिकाम्या हाताने जगाला निरोप देतो. पण मागे ठेऊन जातो त्या त्याच्यासोबत जुळलेल्या त्याच्या आठवणी,त्याचे नातेसंबंध,त्याचे कर्तृत्व, त्याने घडवून आणलेला बदल इत्यादी.जीवन अस्तित्वात आहे तर मृत्यू ही अस्तित्वात आहे. जे आज आहे ते उद्या नाही. प्रत्येक गोष्टीचा अंत हा निश्चित आहे.जीवनातील आनंद हेच एक निरंतर सत्य आहे.
हे जग फार सुंदर आहे.या सुंदर जगाला बघण्यासाठी मानवाला सुंदर डोळे आणि मन ही निसर्गाने दिले आहे.पण ही सुंदरता बघण्याचा प्रयत्न फक्त त्यालाच करायचा आहे.मानवाने स्वतःवर व इतरांवर प्रेम केलं तर जीवनातील आनंदाचा मार्ग नक्कीच सापडू शकतो.शेवटी सुख,शांती व समाधान हेच जीवन जगण्याचे ध्येय असावे.
-- प्रा. हितेशकुमार एस. पटले
यंदा आमच्या पिंटुला अडीच वर्षे पुर्ण झाली. ‘ आमची मुलगी अठरा वर्ष पुर्ण झाली ‘ असे म्हणताक्षणीच पुढचे वाक्य जसे ‘ आता तिच्यासाठी स्थळ बघायला हवे ‘ आपसुकच येते , तसे पिंटु अडीच वर्षाचा झाला म्हणजे शाळेत घालायच्या वयाचा झाला , असे हल्ली समजतात . मुलाच्या जन्माचे प्लॅनिंग करायच्या आधीच त्याच्या शाळेचे प्लॅनिंग आइवडील करतात , असेही हल्ली ऐकीवात आहे . आम्ही तेवढे पुढारलेले नसल्याने शाळेचे प्लॅनिंग करायच्या आतच पिंटुचा जन्म झाला , आणि बघताबघता तो अडीच वर्षाचापण झाला . पिंटु दोन वर्षाचा झाल्यापासुनच शेजारीपाजारी आणि नातेवाइकांनी ‘आता त्याला शाळेत घाला ’ , असे सल्ले द्यायला सुरुवात केली. सहाव्या वर्षी बालवाडी आणि सातव्या वर्षी पहिली या सवयीत वाढलेल्या आम्ही या सल्ल्यांकडे दुर्लक्षच केले . पण गेल्या सहा महिन्यांपासुन मात्र लोकांनी एखाद्या पस्तिशीच्या मात्र लग्न न झालेल्या बाईकडे बघावे , तशा नजरेने पिंटुकडे बघायला सुरुवात केली , आणि नाईलाजाने आम्ही त्याला शाळेत घालायचे ठरवले .
आता एकदा शाळेत घालायचे ठरवल्यावर कुठली शाळा हा प्रश्न आपसुकच आला , आणि घरात सकाळ संध्याकाळ चर्चासत्राच्या फैरी झडु लागल्या . शेजारिपाजारीपण या चर्चासत्रात सामील झाले .या शाळेत ऐडमिशन घेतल्यावर लगेच ऐबीसीडी शिकवायला चालु करतात , इथपासुन ते या शाळेत मुलांच्या कलागुणांना अधिक वाव दिला जातो , आणि आजच्या युगात तेच आवश्यक आहे , असे सर्व प्रकारचे सल्ले आम्हाला मिळाले . कुठल्याशा शाळेत तर दहावीत मेरिटमधे आणण्यासाठी पहिलीपासुनच क्लासेस चालु करतात , आणि दहावीच्या मेरिट लिस्टमधे त्यामुळे त्या शाळेतील बरीच मुले असतात , असेही कळाले . शेवटी या सर्व सल्ल्यामधुन मार्ग काढत आमच्या घराजवळ असणार्या पण चांगल्या अशा शाळेत पिंटुसाठी एडमिशन घ्यायची आम्ही ठरवले , आणि तयारीला लागलो .
दुसर्या दिवशी सकाळी दहा वाजता फॉर्म आणण्यासाठी शाळेत पोहोचलो . चौकशी केल्यावर फॉर्म संपले ,असे कळाले . तरीसुध्दा तिथे ही मोठ्ठी रांग . थोडी अजुन चौकशी केल्यावर ही रांग दुसर्या दिवशीच्या फॉर्मसाठी असल्याचे कळाले , आणि धक्काच बसला . सौ.ला फोन करुन जेवणाचा डब्बा तिथेच आणायला सांगितला , आणि मी लगेच रांगेत लागलो . माझ्यापुढे शंभरएक लोक होते. अर्ध्यातासात मागे अजुन शंभरएक जमा झाले . सर्व लोक जेवणाचे डबे सोडाच पण अंथरुणपांघरुणपण सोबत घेउन आले होते. ही शाळा अत्यंत चांगली असुन या शाळेत एडमिशन मिळाल्यास मुलगा दहावीला मेरिटमधे येतोच याची रांगेतल्या सगळ्यांनी मला खात्री दिली . माझ्या समोर असणार््या जोडप्याने तर शाळेत एडमिशन मिळवण्यासाठी देवाला नवस केल्याचेही कळाले. मीपण लगेच देवाला नवस करुन टाकला . हो , आपण उगिचच कुठल्या गोष्ठीत कमी पडायला नको. हळुहळु दिवस चढत गेला , रांग वाढत गेली , रात्र रस्त्यावरच काढली , आणि दुसर््या दिवशी सकाळी फॉर्म मिळाल्यावर ऑलिंपिकमधे सुवर्णपदक मिळाल्यासारखा आनंद झाला . त्या आनंदातच सुवर्णपदक दाखवुन दुसर्याला आनंदाचा धक्का द्यावा , त्याप्रमाणे सौ.समोर फॉर्म फडकावला .
‘ एवढे आनंदी होऊ नका. फॉर्मसोबतच पालकांचा इंटरव्यूपण आहे .फक्त शंभर जागा आहेत , आणि फॉर्ममात्र दोन हजार विकले गेलेत. ‘ इति सौ. या बायकांना गुप्तहेर म्हणुन सरकार अपॉइंटमेंट सरकार का देत नाही हा एक प्रश्नच आहे . ‘ पालकांचे कसले इंटरव्यु घेणार लेकाचे ‘ असे म्हणताच सौ.ने पुस्तक हातात ठेवले. बघतो तर काय ? ’ पालकांची मुलाखत , अपेक्षित प्रश्नसंच ! ’
‘ हं हे पाठ करा आता. दोन दिवसांनी इंटरव्यु आहे . ’ इति सौ.
दहावीनंतर अपेक्षित प्रश्नसंचाची अशाप्रकारे पुन्हा भेट होईल याची कल्पनाच नव्हती. या अपेक्षित प्रश्नसंचाने दहावीच्या परिक्षेत माझी पुष्कळच मदत केली होती . एकतर पुस्तक आकाराने छोटे. त्यामुळे खिशात ते सहज मावायचे. शिवाय प्रश्नांची उत्तरेपण सहजरित्या सापडायची . ( गैरसमज करुन घेउ नये . उत्तरे सहज सापडली तर अभ्यासाचा वेळ वाचतो. ) . त्यामुळे माझे हे अत्यंत फेवरेट पुस्तक . पुढे दोन दिवसरात्र मी अपेक्षित वाचुन काढले आणि इंटरव्युसाठी रेडी झालो.
“ तिथे धांदरटपणे वागु नका , उत्तरे नीट विचार करुन द्या , आपला अजागळपणा दाखवु नका ” इति सौ. आमची सौ म्हणजे आमची सल्लागार आहे . ( तिचा सल्ला ऐकल्यावर मी गार होतो. ) सर्व सल्ले ऐकतच लग्नातला सुट आणि टाय घालुन तयार झालो. भर उन्हाळ्याचे दिवस असल्याने भयंकर गरमी होत होती. पण मुलाच्या ऍडमिशनचा प्रश्न होता , मग काय करणार ? आधी दोनचार लोकांचे इंटरव्यु झाले, आणि शेवटी आमचा नंबर आला ,आणि आम्ही ऑफिसमधे शिरलो.
एका मोठ्या डायसमागे आठ लोक बसलेले पाहुन मला घामच फुटला . सहा पुरुष दोन बायका. सर्वांची वये सुमारे चाळिस ते साठ वर्षे. अत्यंत धीरगंभीर चेहेरे. हातात पेन , समोर कागदे. सर्वांच्या समोर पाण्याचे ग्लास. समोर पालकांना बसायला तीन खुर्च्या. आम्ही मुकाट्याने खुर्च्यात जाउन बसलो. मी रुमालाने घाम पुसायला लागलो. सौ. पर्सशी चाळा करत बसली आणि आमचे चिरंजीव पिंटु ( वय वर्षे अडीच ) अंगठा चोखत वर फिरणार्या पंख्याकडे बघत बसले.
” अत्यंत वाईट सवय ! ” इति खुर्ची नं १ . काळा चष्मा . मी घाबरलो. ” नाही हो . खुप जास्त घाम आला म्हणुन पुसला . नाहीतर नेहमी तो मी कपाळावरच वाळू देतो. “ मी उत्तरलो. ” त्याबद्दल नाही म्हणत मी . तिकडे बघा. “ चिरंजीव पिंटु ( वय वर्षे अडीच ) अजुनही अंगठा चोखत पंख्याकडे बघत होते. “ घरात मुलाला असुरक्षित वाटत असेल तर ती अंगठा चोखतात . तुम्ही घरात दारु पिउन आरडाओरड करता ? मारामारी वगैरे ? “ मी अजुनच घाबरलो. ” नाही हो . मी फक्त बाहेरच - म्हणजे मी दारुच पित नाही . “ मी उत्तरलो. सौ. ने डोळे वटारुन माझ्याकडे बघितले. मी बाहेर पित असल्याचे अजुनही तिला माहित नव्हते. ” अंगठा चोखणे अनुवांशिकच असणार . ” इति मी . ” कारण मीपण पाचवीपर्यंत अंगठा चोखायचो. “ काळ्या चष्म्याने माझ्याकडे अशा नजरेने बघितले कि मी ओशाळलोच .
” तुमचे छंद काय आहेत ? “ इति घारे डोळे खुर्ची नं ३ . आता आली पंचाइत . अपेक्षितमधे हा प्रश्नच नव्हता . काय उत्तर द्यावे या विचारात माझ्या तोडुन निघुन गेले “ रमी खेळणे . पण मी पैसे लावुन नाही खेळत . समोरचे गोखले खेळतात. ” माझे उत्तर ऐकताच घारे डोळे काहीतरि पुटपुटले आणि वहीत काहीतरी लिहिले . मी इकडे घाम पुसुन परेशान . पिंटुचे काम आपले चालुच .
” आता शेवटचा प्रश्न “ पुन्हा खुर्ची नं १ “ याच शाळेत प्रवेश घ्यावा असे तुम्हाला का वाटले ? ”
थॅंक गॉड ! एकतरी प्रश्न अपेक्षितमधला विचारला . मी पाठांतर चांगले केले होते. मी चालु केले . “ जगात पैलु पाडलेले आणि पैलु न पाडलेले अशी दोन प्रकारची रत्ने असतात . दोन्हींचा गुणधर्म रत्नाचाच असला तरी पैलु पाडलेले रत्नच चकाकते. काचेच्या तुकड्याला जरी पैलु चांगले पाडलेले असतील तर तोही चकाकतो. तेव्हा काच असली तरी चांगल्या प्रकारे पैलु पाडलेली असेल तर ती चकाकेल , आणि रत्न असेल पण त्याला पैलु पाडलेले नसतील तर ते चकाकाणार नाही . आमच्या मुलाच्या व्यक्तिमत्वाला या शाळेत चांगले पैलु पाडले जातील ,याची आम्हाला खात्री आहे , म्हणुन आम्हाला या शाळेत प्रवेश हवा आहे. “
हुश्श ! माझा मला अभिमान वाटला . किती अवघड वाक्य , पण मी करेक्ट म्हणुन दाखवले.
“ लिस्ट परवा सकाळी लागेल “ घारे डोळे .
तीन दिवसांनी लिस्ट लागली . सर्वात शेवटचे नाव पिंटुचे बघुन मी खुश. पेढे घेउन घरी आलो. सौ. ला म्हणालो. ” बघ . मी एवढा छान बोललो , म्हणुन प्रवेश मिळाला . ” “ कपाळ माझ ! अहो , मी रेखाला फोन केला होता काल . तिचा नवरा नगरसेवक आहे , त्यांनी फोन केला काल शाळेत , आणि शेवटच्या क्षणी पिंटुचे नाव ऍड करायला लावले . जा त्यांना आधी पेढे देउन या .”
आमच्या बायकोची पण कमाल आहे. पण जाऊद्या , कसा का असेना , आमचा पिंटु एकदाचा शाळेत जाऊ लागला.
-- निखिल मुदगलकर
ज्या दिवशी क्लॉक अडव्हान्स होते त्या दिवशी सर्व इंजिनियर आणि इंजिन क्रृ ला एक तास लवकर सुट्टी मिळते कारण जहाज नेहमी खोल समुद्रात असते पण डेक ऑफिसर चार चार तासाची वॉच ड्युटी करत असल्याने त्यांना वीस वीस मिनिटे वॉच वर लवकर यावे लागते. जेव्हा क्लॉक रिटार्ड म्हणजे एक तास मागे केले जाते त्या दिवशी रात्री घड्याळाचे काटे उलटे फिरवले जातात. रात्री बारा वाजता काटे फिरवून अकरा वाजेवले जातात. असे बोलतात
बऱ्याचदा मुलीला इंग्लिश माध्यमात टाकलेले असेल आणि त्याचवेळी मुलाला ज्यावेळी इंग्लिश माध्यमात टाकायची वेळ येते तेव्हा हीच मंडळी मुलीचे नाव तिथून काढून त्याजागी मुलाला टाकतात आणि परंपरेने अन्याय होत असलेली स्त्री
Copyright © 2025 | Marathisrushti