फार पूर्वीच्या काळी बार्टर पध्दत होती. गव्हाच्या बदल्यात कापूस किंवा तांदूळाच्या बदल्यात मातीची भांडी अशी वस्तूंची देवाणघेवाण होत असे. पण किती गहू देऊन किती कापूस घ्यायचा हे त्या वस्तूंचा ढीग लावून त्यांच्या आकारामानावरुन ठरवणं चुकीचं ठरत असे.
मी रोजच जय जय स्वामी समर्थ आणि जय शंकर महाराज यांची मालिका बघते ऐकू येत नाही पण ओठांच्या हालचाली वरून समजून घेते. प्रसंग असा एका माणसाचे दैन्य दूर करण्यासाठी तो शंकर महाराज यांच्या कडे येतो आणि विचारतो की माझे दैन्य कधी संपणार? ते म्हणतात की मी मेल्यावर तुझे दैन्य संपेल. मी आवाक झाले. पुढे त्याचे दैन्य कसे संपते हे कळते.
मुक्तांगण ही संस्था चालु करुन लहान मुलांमधील मुलपण जपण्याचा प्रयत्न करीत असताना सौ स्वाती लेले यांनी अधिक खोलात जावून तळागाळातील महिलांच्या उन्नतीसाठी सखी चा मंच उभारायचे ठरवले व या कामी त्यांना त्यांच्या जीवाभावाच्या तेरा मैत्रिणींची साथ मिळाली. सखी ने कुठलीही जहिरातबाजी न करता अलिबागमधील गरजु महिलांच्या सक्षमीकरणासाठी व त्यांना नियमीत रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी अनेक योजना राबवल्या आहेत.
येणाऱ्या जानेवारीत मुंबईतील गिरणी कामगारांच्या ऐतिहासिक संपाला ३९ वर्ष पूर्ण होतील. या संपाला २५ वर्ष झाली (१८ जानेवारी २००७) तेव्हा संवेदनशील लेखक जयंत पवार यांनी महाराष्ट्र टाईम्समधे लिहिलेला लेख त्यांच्या परवानगीने खाली उद्धृत करत आहे.
त्यामुळे आंघोळीचे खालील प्रकार वापरता येतील.
1 - काकड स्नान - या स्नानात पाण्याच्या थेंबांना आपल्यावर शिंपडून स्नान केले जाऊ शकते.
2 - नळ नमस्कार स्नान - यात तुम्ही नळाला नमस्कार करण्याने आंघोळ झाली असे समजण्यात येईल.
3 - स्पर्शानुभूती स्नान - या प्रकारात आंघोळ केलेल्या व्यक्तीला स्पर्श करून
"त्वं स्नानम् मम् स्नानम्" बोलल्याने आंघोळ झाली असे मानण्यात येईल॥
4. जल स्मरण स्नान - हे उच्च कोटीचे स्नान असून अंथरूणात राहूनच पाण्याने आंघोळ करतोय या स्मरणानेच आंघोळ झाली असे होईल..... हे स्नान सुट्टी च्या दिवशी केल्याने विशेष लाभ मिळतो असे अनेकांचे मानने आहे ....
मराठी चित्रपट हा ग्लोबल होतो आहे यासाठी अनेक बाबी कारणीभूत आहेत. माध्यमं आणि वेबसाइट्स सुद्धा यामध्ये महत्वाची कामगिरी पाडत आहेत, कारण गेल्या काही वर्षांमध्ये मराठी माध्यमांचा उदय होऊन चित्रपटाला मोठी बाजारपेठ मिळाली आहे.

स्वतंत्र भारतातल्या पहिल्या महिला मुख्य मंत्री - सुचेता कृपलानी
अखिल भारतीय महिला काँग्रेस च्या स्थापक - सुचेता कृपलानी
संविधान सभा सदस्य - सुचेता कृपलानी
आपली ओळख आपल्या कामातून उभ्या केलेल्या भारतमातेच्या वीरांगना सुचेता कृपलानी
२५ जून १९०८ साली पंजाब अंबाला येथे एका बंगाली ब्रम्हओ परिवारात त्यांचा जन्म झाला. सुचेता मुजुमदार अतिशय हुशार, आपल्या विचारांशी ठाम तरीही मृदू स्वभावाच्या होत्या. अगदी लहानपणी त्या थोड्या एकट्या राहत, बुजऱ्या स्वभावाच्या होत्या, पण वेळेबरोबर आणि बदलणाऱ्या परिस्थिती बरोबर त्यांनी स्वतःला घडवलं. पुढे जेव्हा कुठलाही राजनैतिक निर्णय घेण्याची वेळ येई, त्यावेळी मात्र त्या कधीही हृदयाने विचार न करता अतिशय कोठारपणे आणि बुद्धीला प्राधान्य देऊन विचार करत. त्यांचे वडील जरी इंग्रजांच्या सरकारात काम करत होते तरी मनाने ते राष्ट्रवादी होते. तेच गुण सुचेता मध्ये आले.
त्यांचे शिक्षण दिल्ली, लाहोर अश्या ठिकाणी झाले. वयाच्या २१व्या वर्षी त्यांना स्वातंत्र्य संग्रामात उडी घ्यायची होती, पण त्याचवेळी त्याच्या वडिलांचा आणि बहिणीचा मृत्यू झाला,घराची जवाबदारी त्यांच्यावर आली. बनारस हिंदू युनिव्हर्सिटी मध्ये त्या शिकवू लागल्या.
दरम्यानच्या काळात त्यांच्या विवाह श्री जे. बी. कृपलानी ह्यांच्याशी झाला. ह्या दोघांच्या विवाहाला त्यांच्या घरच्यांपासून गांधीजींपर्यत सगळ्यांचा विरोध होता, पहिले कारण श्री कृपलानी सुचेताजींपेक्षा २० वर्षांनी मोठे होते आणि दुसरे कारण श्री कृपलानी गांधीजींचा उजवा हात म्हणवले जात आणि त्यांना असे वाटले की एकदा का लग्न झाले की कृपलानींचे देशसेवेतील लक्ष कमी होईल, त्यावर सुचेता म्हणाल्या, "की तुम्ही असा विचार करा की आता तुम्हाला २ नाही तर ४ हात मिळतील कामाला." त्या जसं बोलल्या तसंच वागल्या. लग्ना नंतर त्यांनी स्वतःला पूर्णपणे देशसेवेच्या कामात झोकून दिले.
१९४० साली त्यांनी अखिल भारतीय महिला काँग्रेस ची स्थापना केली. त्याच्या माध्यमातून देशातील महिलांना स्वातंत्र्य संग्रामात भाग घ्यायला प्रेरित करणे, महिलांचे संघटन मजबूत करणे इत्यादी कामे केली. १९४२ च्या चले जावं आंदोलनात त्यांनी सक्रिय भाग घेतला, परिणामस्वरूप त्यांना १ वर्ष सश्रम कारावास भोगावा लागला. तुरुंगातून आल्यावर त्या पूर्णवेळ गांधींबरोबर विविध चळवळीत काम करत होत्या. देशाच्या विभाजनाच्या वेळी सुद्धा त्यांनी गांधींबरोबर पूर्णवेळ काम केले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर चीन युद्धाच्या वेळीसुद्धा त्यांनी त्यांची राजनैतिक जवाबदारी सांभाळत आपल्या मनाच्या जवळचे काम म्हणजे देशसेवा सतत करत राहिल्या.
१९६३ ते १९६७ त्यांनी उत्तर प्रदेश च्या मुख्यमंत्री म्हणून धुरा सांभाळली. १९७१ पर्यत त्या विविध राजनैतिक जवाबदाऱ्या सांभाळत होत्या. १९७१ साली त्यांनी राजकारणातून संन्यास घेतला. कुठे थांबायचे हे फार कमी लोकांना कळते, कदाचित सुचेतजींना भविष्य समजले होते. १९७४ साली दिल्ली येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
आपल्या कामातून आपली प्रतिमा बनवणाऱ्या, अगदी लहान वयातच मोठ्या जवाबदाऱ्या पार पडणाऱ्या, आपल्या वागण्या-बोलण्यातून देशातील महिलांचा सन्मान वाढविणाऱ्या भारतमातेच्या ह्या वीरांगनेला माझी शब्दसुमानांजली.
|| वंदे मातरम् ||
-- सोनाली तेलंग.
०५/०७/२०२२.
संदर्भ :
१. Bharatdiscovery.org
२. Wikipedia.org
३. inuth.com
ज्येष्ठ दादा अंबाणी चिकन बिझिनेसमध्ये उतरल्याने ज्या अभिजनांना सारं काही ब्रँडेडच हवं असतं आणि जे त्यांचं स्टेटस सिम्बॉल असतं त्यांच्यासाठी पर्वणी ठरणार आहे. पुण्यातल्या अभिजनांसाठी खाईन तर चितळेंचीच बाकरवडी अन्यथा नो वे. म्हणजे असं की खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी,अशी ब्रँडेडच हवं असं वाटणाऱ्यांची किमान चिकनच्या बाबत तरी (दाखवण्यापुरती )सध्यस्थिती आहे.
होऊर..... म्हणजेच तुमचो पूर...
कधी काळी कोकणात घे म्हणान पाऊस ऒतायचो...... अगदी १५-२० ईंच दिवसाक.. मग जा भंगसाऴीक पानी येय तेका होऊर म्हणत...
२-२ दिवस हायवे बंद... आणि आता पोयचे मुगडे भरले की बोंबाटतत पूर पूर पूर.....
अरे पानी येवंदे तरी, साताट वर्षापूर्वीच्या अॉक्टोबरच्या पूरानंतर पानीच येऊक नाय.... पानी येऊन २-३ दिवस मळ्यात रवाक व्हया मळकी बसाक व्हयी , तर पोरला मरतला, तर भात पिकतला.......
तेवा माझ्या भावांनो, निदान म्हापूरूषाकडचो कुडाळवाल्यानी टाकलेलो कचरो सोनवड्याच्या मळ्यात जावक व्हयो....
म्हणान तरी पूर येवंदे.......
बापूर्झा
डॉ. बापू भोगटे....
आमच्या खामगाववरून आषाढी एकादशीला दरवर्षी विशेष यात्रा स्पेशल रेल्वे गाडी सोडण्यात येते. २००३ पासून रेल्वे प्रशासनाने खामगाव ते पंढरपूर ही गाडी सुरू केली आहे. सुरुवातीला एक फेरी सोडण्यात आली. परंतु नंतर दरवर्षी खामगाव, शेगावसह बुलडाणा आणि अकोला जिल्ह्यातून वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांचा प्रतिसाद पाहता आणि रेल्वेला मिळणारे उत्पन्न पाहता रेल्वे प्रशासनाने या फेऱ्या वाढवल्या आहेत. अाता चार फेऱ्या धावतात. बरे असो.
Copyright © 2025 | Marathisrushti