(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • चिपळूणचा गेवळकोट

    चिपळूणपासून साधारण ४ कि.मी. अंतरावर गोवळकोटचा डोंगरी किल्ला आहे. या ५० मीटर उंचीच्या टेकडीच्या माथ्यावर असलेला किल्ला तिनही बाजुनी वस्तीने घेरलेला आहे.

  • वास्तुशास्त्र पेंटिंग – भाग ३

    वास्तुशास्त्र पेंटिंग म्हणजे काय? यावर मागील लेखात आपण माहिती घेतली. या विषयावर कोणाला फारशी माहिती नसेल. कधी फारसा विचारही कोणी केला नसेल. परंतु घर वा वास्तूची अंतर्गत सजावट करताना, भिंतींना सजविण्यासाठी पेंटिंग, एखादा आकर्षक आकार इत्यादींची योजना केलेली असते. आपल्याला वा पाहणाऱ्याला त्यातील फारसे काही समजले नाही तरी त्या अंतर्गत सजावटीच्या वातावरणात थांबल्याने काहीतरी समाधान मिळत असते. याचा अनुभव आपल्यापैकी बहुतेक जणांनी... ज्यांना स्वतःचे विचार, स्वतःचं मन आणि स्वतःची स्वप्न असतात अशा साऱ्यांनीच हा अनुभव घेतलेला असतो.

    हे असं कशामुळे घडत असतं याबद्दल अनुभव घेणारा अनभिज्ञ असतो किंवा तो फारसा विचार या मुद्द्यावर करत नाही. जर त्याच्या मुळाशी जाऊन पाहिलं तर आपल्या ध्यानी येईल त्या वास्तूच्या अंतर्गत सजावटीमध्ये भिंतीचा रंग फ्रेश आहे. आत लटकवलेली-लावलेली-अडकवलेली पेंटिंग्ज वा निसर्गचित्र वा सिन वा देखावा...... एक असो एकाहून अधिक असो... वातावरण शांत ठेवणारे असतात, आल्हाददायक असतात. खिडक्या-दरवाज्यांचे पडदे असतील तर त्यांचे रंग देखील वातावरणाला पोषक असतात.

    हा सारा प्रकार आणि हे सारं वातावरण केवळ आणि केवळ रंगयोजनांचा अत्यंत अचूकपणे-समर्पकपणे केलेला वापर होय. दवाखान्यांना हॉस्पिटल्सना पिस्ता कलर, फिक्कट हिरवा, पांढरा, ऑफव्हाईट अशाच प्रकारचे रंग दिलेले असतात. कधी आपण पाहिले आहे काय? की एकदम भडक लाल-भगवा, गडद हिरवा इत्यादी डोळ्यांना त्रास होईल अशा रंगांनी तो दवाखाना वा हॉस्पिटल सजविले आहे? असं दिसलंच तर तो डॉक्टर आणि तो दवाखाना वा हॉस्पिटल खरंच किती रुग्ण व्याधीमुक्त करेल याबाबत प्रश्नच राहील... असो.

    आपण पुढील लेख हा कोणत्या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तीने कोणत्या प्रकारचे पेंटिंग घरात लावावे यावर माहिती मिळवू.

    -शुभम भवतु
    गजानन सिताराम शेपाळ

  • श्री शिव भजन

    श्री शिव भजन

  • दिवस असा एकही जात नाही

    चुंबीलाय प्रत्येक शब्द तुमचा

    ऒठ प्रियेचे चुंबणे होत नाही.

  • विट्यातील विजयादशमी पालखी शर्यतीची परंपरा

    सांगली जिल्ह्यातील विटा (ता. खानापूर) येथे विजयादशमी दिवशी देवांच्या पालखी शर्यतीचे आयोजन केले जाते. गेल्या १५० वर्षांची परंपरा असलेल्या देवांच्या या पालखी शर्यती संपूर्ण महाराष्ट्रात सुप्रसिद्ध आहेत. विट्यातील श्री रेवणसिद्ध व मूळस्थान श्री रेवणसिद्ध या दोन देवांच्या पालखी शर्यती येथील विजयादशमीचे (दसरा) खास आकर्षण आहे.

    दसऱ्याच्या दिवशी मूळस्थानी श्री रेवणसिद्ध देवाची पालखी विट्यातील श्री भैरवनाथ मंदिरात येते. मूळस्थान रेवणसिद्ध व विटा येथील श्री रेवणसिद्ध या दोन पालख्यांची आरती झाल्यानंतर देवाच्या सासनकाठ्या, देवांना वारे घालणाऱ्या चवऱ्या, आबदागिरी, चांदीच्या काठ्या, लाल छत्र्या, हलगी व डिमडीच्या निनादात या पालख्या शर्यतीसाठी सज्ज होतात. या दोन्ही पालख्यात देवांचा मुखवटा ठेवलेला असतो. काळेश्वर मंदिराजवळ पालख्या येतात. पालख्या शर्यतीसाठी सोडण्याचा मान विठ्ठल (आबा) पाटील यांच्या कुटुंबाकडे आहे. त्यावेळी मूळस्थानची पालखी पाहुणी असल्याने या पालखीला पाच पाऊले पुढे थांबण्याचा मान दिला जातो. त्यानंतर उजव्या बाजूला मूळस्थानचे नागरिक तर डाव्या बाजूला विटेकर नागरिक पालखी घेऊन धावण्यासाठी सज्ज होतात.

    विजयादशमी दिवशी सायंकाळी 5 वाजता या दोन देवांच्या पालखींची शर्यत सुरु होते. काळेश्वर मंदिर ते खानापूर रस्त्यावरील शिलंगण मैदान हे सुमारे एक ते दीड कि.मी. अंतर कापण्यासाठी पालखीचे खांदेकरी आपले कौशल्य पणाला लावतात. शिवाजी चौक, बसस्थानकमार्गे या पालख्या शिलंगण मैदानाकडे धावतात. त्यावेळी रस्त्यात काही ठिकाणी विटेकर तर काही ठिकाणी मूळस्थान सुळेवाडीचे नागरिक विरोधी बाजूची पालखी अडविण्याचा प्रयत्न करतात. परंतु, त्यातून सुटका करुन घेत या दोन्ही पालख्या शिलंगण मैदानाकडे धाव घेतात. या मैदानात प्रथम पोहोचलेली पालखी विजयी घोषित केली जाते. त्यानंतर पाठीमागून श्री भैरवनाथ, श्री म्हसवडसिद्ध व श्री भैरोबा या देवांच्या पालख्या शिलंगण मैदानात जातात. त्याठिकाणी सीमोल्लंघनाचा कार्यक्रम होतो. आपट्यांची पाने (सोने) देऊन नागरिक एकमेकांना शुभेच्छा देतात.

    विजयादशमी दिवशी देवांच्या पालख्या पळविण्याच्या शर्यतीची परंपरा विटेकरांनी गेल्या 150 वर्षांपासून जोपासली आहे. जात, पात, धर्म, गट-तट आणि राजकारणाच्या भिंती भेदून विटेकर नागरिक ही पालखी शर्यत यशस्वीरित्या पार पाडून जातीय सलोखा कायम ठेवण्यासाठी आजही प्रयत्नशील आहेत. विजयादशमी दिवशी सांगली जिल्ह्यातील विटा शहरात जोपासलेली देवांच्या पालखी शर्यतीची परंपरा महाराष्ट्रात आजही सुप्रसिद्ध आहे. या शर्यती पाहण्यासाठी राज्यातून लाखो भाविक हजेरी लावतात.

    (-- `महान्यूज' मधील दिलीप मोहिते, विटा यांच्या लेखावर आधारित. )

  • बृहन्महाराष्ट्रातील संस्कृती वैभव – गणेशोत्सव

    १९३० ते १९४० या दरम्यान भारतीय रेल्वेच्या सेवेत रुजू झालेली अनेक मराठी कुटुंब दिल्लीत स्थायिक झाली. त्यांच्यासोबत मराठी सण, परंपरा आल्याच. याचवेळी त्यांनी गणेशोत्सवाची परंपराही सोबत आणली. दिल्लीत कामधंदा आणि राजकारण या दोन्हीसाठी मराठी माणसांची संख्या वाढल्यावर महाराष्ट्राचा सार्वजनिक गणेशोत्सव ही उत्सव संस्कृतीही इथे रुजायला लागली.

  • भारतमातेच्या वीरांगना – 7 : सुशीला दीदी

    भारतीय स्वातंत्र्य संग्रामात काकोरी रेल लूट ही एक मोठी घटना होती. त्या क्रांतिकारकांना जेव्हा फाशी सुनावण्यात आली तेव्हा सुशीला दिदींना त्यांच्या देशप्रेमाने आणि कर्तव्याने स्वस्थ बसू दिले नाही. आता त्यांनी पूर्णवेळ स्वातंत्र्य चळवळीत जीव ओतून काम करायाचे ठरविले. एका स्त्रीला सगळ्यात जवळची गोष्ट म्हणजे तिचे दागिने, ह्या घटनेच्या वकिली कामासाठी त्यांनी आपल्या सोन्याच्या बांगड्या सहज देऊन टाकल्या. आपल्या मुलीचे इंग्रजांविरुद्ध बंड आपल्या नौकरीसाठी धोकादायक ठरू शकणार होते, पण आपल्या वडिलांच्या ह्या विरोधाला न जुमानता त्या घरा बाहेर पडल्या आणि दोन वर्षे आपल्या घरी परतल्या नाही. दोनवर्षांनंतर तेव्हाच परतल्या जेव्हा त्यांच्या वडिलांनीसुद्धा आपल्या सरकारी नौकरीला रामराम ठोकला आणि पूर्णवेळ स्वातंत्रता चळवळीचे काम सुरू केले.

  • रस्टनबर्ग मधील १ वर्ष!!

    रस्टनबर्ग मधील नोकरी ध्यानीमनी नसताना, हाताशी आली, म्हणजे इथे मी इंटरव्ह्यूसाठी २००४ साली आलो होतो पण पगाराबाबत आणि तेंव्हा ती कंपनीच्या Expansion Programme मध्ये प्रॉब्लेम्स आल्याने सगळेच रहित झाले आणि माझ्या डोक्यातून तो विचार निघून गेला होता. परत पीटरमेरीत्झबर्ग या शहरात सुखनैव (??) आयुष्य सुरु झाले होते. २००५ मधील, जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात ( वास्तविक या काळात सगळा साउथ आफ्रिका सुटीवर असतो) फोन आला आणि फोनवरच पगार, इतर पर्क्स नक्की झाले आणि नोकरी पक्की झाली. जेंव्हा २००४ साली इथे २ दिवस आलो तेंव्हा मला हे शहर काही फार आवडले नव्हते, किंबहुना गावात एकच मोठा मॉल वगळता फारसे काहीच बघण्यासारखे नव्हते (अर्थात इथून ४० मैलावर सन सिटी आहे, ही माहिती होती) आणि मला तसा खास उत्साह वाटला नव्हता.
    पीटरमेरीत्झबर्ग इथली नोकरी सोडायचे नक्की केले होते कारण, इथे कामाचे स्वातंत्र्य, कामाच्या वेळा आणि वरिष्ठांची वागणूक, या पातळीवर बरेच प्रॉब्लेम्स होते आणि त्याचा निचरा होणे, केवळ अशक्य होते. थोडक्यात, एका नवीन शहराचा नव्याने अनुभव, हा विचार मनाशी बांधून, पीटरमेरीत्झबर्ग सोडले. वास्तविक, तेंव्हा माझ्याकडे कंपनीची गाडी असल्याने, ती मला परत करावी लागली. पीटरमेरीत्झबर्ग पासून रस्टनबर्ग शहर, जवळ पास ८०० किलोमीटर लांब, तिथे विमानतळ नाही तेंव्हा Intercity बसने आधी जोहान्सबर्ग इथे जायचे, तिथे मला कंपनीची गाडी न्यायला येईल आणि मग रस्टनबर्ग गाठायचे, असे ठरले. त्यानुसार मी बसने निघालो. इथली बस सर्विस अत्यंत सुंदर आणि पोटातले पाणी देखील हलणार नाही, याची काळजी घेतली जाते!!
    जोहान्सबर्ग इथे माझ्या, पहिल्या कंपनीतील, विनय थलींजा, रहात होता आणि त्याच्याकडे त्यादिवसाचा मुक्काम करायचे ठरवले. विनय, इथे २ वर्षे रहात असल्याने, तिथे चांगला स्थिरावला होता. तो, बस स्टेशनवर उतरवून घ्यायला आला आणि मला हायसे वाटले. जोहान्सबर्ग शहर म्हणजे “विराट” या शब्दाला साजेसे शहर आहे आणि जर का तुम्हाला नेमका पत्ता माहित नसला तर या शहरात, तुम्ही पार गोंधळून जायला होते. (पुढे इथे नोकरी मिळाल्यावर मला, १,२ वेळा याचा अनुभव आला होता).
    दुसऱ्या दिवशी दुपारी, केसी (वास्तविक हा गुजराती मुलगा – कमलेश,पण इथे येउन, इथल्या संस्कृतीला साजेसे नाव स्वीकारले!!) मला न्यायला आला. माझ्याकडे त्यावेळी २,३ Bags वगळता फारसे सामान नव्हते. पीटरमेरीत्झबर्ग इथे कंपनीने घर दिल्याने, काही सामान विकत घेण्याचा प्रश्नच नव्हता. जवळपास दीड तासाच्या प्रवासानंतर रस्टनबर्ग आले. वाटेत, गाडीत बसल्यावर, कंपनीची अधिक खोलवर माहिती, म्हणजे, माझ्या हाताखाली कितीजण आहेत तसेच एकूण कंपनीची कार्यपद्धतीबद्दल जुजबी माहिती मिळवली. अर्थात १ वर्षानंतर परत या शहरात आलो पण तसा फारसा आढळत नव्हता.
    इथे मला राहायला एक छोटा बंगला होता परंतु इथे माझ्यासोबत, केसी, निमेश इत्यादी ४ गुजराती मुले होती. अर्थात, माझी स्वतंत्र व्यवस्था, बंगल्याचा वरच्या मजल्यावर केली होती. ही सगळी मुले, तेंव्हा पंचविशीच्या आसपास होती पण सगळी शाकाहारी!! आमचे किचन कॉमन होते, त्यामुळे स्वयंपाक एकत्र करणे, क्रमप्राप्तच होते!! सुरवातीला फारशी ओळख नसल्याने, वागण्यात बुजरेपणा होता. पुढे निमेशशी माझे फारच जवळकीचे संबंध निर्माण झाले.
    दुसऱ्या दिवशी सरळ ऑफिस!! माझ्या खात्यात, टीना ले रुक्स (माझ्या आयुष्यात आलेली पहिली गोरी मुलगी), ली ( ही काळी मुलगी) आणि माझी रिसेप्शनिस्ट स्टेला ( ही दुसरी गोरी मुलगी) असे कामाला होते. गोऱ्या समाजाची ओळख आणि काहीप्रमाणात अंतरंग, मला इथेच लक्षात आले. इथेही सुरवातीला वागण्यात थोडा बुजरेपणा होता आणि त्यात मला तरी काहीच नवल वाटले नाही. पहिला आठवडा तर कामाचा चार्ज घेण्यात गेला. आमच्या कंपनीचा सुपर मार्केटचा व्यवसाय होता आणि त्याचा व्याप तसा खूपच मोठा होता. रिटेल आणि होलसेल, अशा दोन्ही धंद्यात कंपनीने जम बसवला होता.
    जसजसे दिवस जायला लागले, तशी वागण्यात मोकळेपणा येत गेला. मी, या गोऱ्या लोकांचे एक वैशिष्ट्य बघितले आहे, जर का तुमच्या बरोबर काम करत असतील तर इतक्या मोकळेपणी वागतात की भारतातून येणाऱ्या माणसांना सुरवातीला थोडेसे बुजल्यासारखे होते. अर्थात, मला एव्हाना, या देशात येउन, १० वर्षे झाली असल्याने, इथल्या संस्कृतीचा बराचसा अंदाज आला होता.
    जानेवारी असल्याने, इथे उन्हाळा होता. आजूबाजूचा प्रदेश खाणींचा असल्याने परिसर बराचसा रखरखाट होता. अर्थात, इथे स्थिरस्थावर व्हायला फारसा वेळ लागला नाही. घरातील नवीन मित्रांशी वागण्यातील बुजरेपण लवकरच निघून गेले. वास्तविक माझ्या आणि त्यांच्या वयात २० वर्षांचे अंतर होते तरीही मैत्री लगेच जुळली. सगळेच भारतातून आलेले आणि अर्थात माझा या देशातील १० वर्षांचा अनुभव असल्याने, ओळख मैत्रीत सहज झाली.
    संध्याकाळी घरी परतल्यावर, एकत्र जेवण करणे, हा सोहळा असायचा. अर्थात, मसाले आणि चव, अर्थात गुजराती पद्धतीची!! हळूहळू, शनिवार संध्याकाळ, मॉलवर जाण्यात जाऊ लागली. इथला मॉल जरी मोठा असला तरी डर्बन इथल्या मॉलची सर नव्हती आणि ते क्रमप्राप्तच आहे. मुख्य कारण या गावाची लोकसंख्या दीड ते दोन लाख!! अगदी आजूबाजूची गावे धरली तरी चार लाखांच्या वर लोकसंख्या नाही तेंव्हा धंदा होणार कसा!! त्यातून, इथे बाहेरून येणारे सगळे सनसिटीला भेट देणारे म्हणजे त्यांच्याकडून देखील फार अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही. असे असून देखील मॉल फार छान आहे, म्हणजे जगातील बहुतेक सगळ्या Branded वस्तू मुबलक उपलब्ध!! याचे दुसरे कारण, सनसिटी शॉपिंगच्या दृष्टीने कमालीचे महाग, त्यामुळे या गावातील सगळे इथेच खरेदीला येणार!!
    गावात भारतीय वस्ती ( अगदी भारतीय वंशातील वस्ती धरून) जास्तीजास्त दहा ते बारा हजार, त्यामुळे गावात भारतीय हॉटेल नाही, एकच मुस्लिम धाटणीचे हॉटेल आहे आणि तिथे तर बहुतेक सगळे मांसाहारी पदार्थ, म्हणजे गुजराती मित्रांना जाणे, न जमणारे!!
    मॉलमध्ये, आम्ही मित्र जेंव्हा जायचो, तेंव्हा मात्र मी मांसाहारी खाण्याची “तलफ” भागवून घेत असे!! तिथे सिनेमा थियेटर होते पण, बहुतांशी इंग्रजी चित्रपट. जरी माझे मित्र गुजराती असले तरी त्यांच्या आवडी/निवडी टिपिकल गुजराती!! वाचनाची आवड शून्य आणि संगीताची आवड फक्त चित्रपट संगीताची आणि ती देखील, माझ्या आवडीच्या पूर्ण विरुद्ध!! अर्थात, माझ्याकडे सिस्टीम असल्याने, मी, माझ्या वरच्या मजल्यावर शांतपणे, गाणी ऐकणे किंवा पुस्तक वाचणे, इत्यादी छंद पुरवून घेत असायचो. तरीही, ऐकलेल्या गाण्याबद्दल किंवा वाचलेल्या पुस्तकाबद्दल कुणाशी काही बोलणे, केवळ अशक्य!!
    त्यातल्या त्यात, निमेशला जगजीत सिंग, अति प्रिय असल्याने, तो वर येउन, माझ्या बरोबर ऐकत असे. परंतु, एक फरक पडायचा आणि तो म्हणजे त्याची ऐकायची पद्धत आणि माझी पद्धत, यात जमीनअस्मानाचा फरक तरीही माझ्या सोबतीला कुणीतरी ऐकायला आहे, हे देखील मला बरे वाटायचे!!
    ऑफिसमध्ये आठवडाभरात रुळून गेलो, इतका की टीना आणि स्टेलाशी एकत्रित गप्पा मारायला सुरवात केली. अगदी वैय्याक्तील स्वरूपाच्या गप्पा मारायला सुरवात झाली. स्टेलाचे पहिले लग्न मोडले होते (इथला नेहमीचा रिवाज) पण सध्या एका बॉयफ्रेंडबरोबर एकत्र रहात होती ( आता परत एकटीच रहात आहे, असे समजले) तर टीना – बॉयफ्रेंड नंबर ३ बरोबर रहात होती (दोन वर्षापूर्वी त्याच्याशीच लग्न केले). यात गमतीचा भाग असा, माझ्याशी याबद्दल बोलताना, त्यांना काहीच विशेष वाटत नव्हते. टीना म्हणजे स्मोकिंगचे “आगर”, दर अर्ध्यातासाने सिगारेट आवश्यक!! माझ्या कंपनीत जवळपास, ६ तरी गोऱ्या मुली/स्त्रिया होत्या आणि त्यातील बहुतेकांची कहाणी या दोघींपेक्षा फार वेगळी नव्हती.
    पुढे, दोन एक महिन्यांनी त्यांच्या बॉयफ्रेंडशी व्यवस्थित ओळखी वगैरे झाल्या, आणि त्यांच्या घरात प्रवेश मिळविण्याइतपत मैत्री झाली. अर्थात, कामाच्या बाबतीत सगळ्या इतक्या व्यवस्थित आणि टापटीप की मला कधीही कामाबद्दल आठवण करून देण्याची वेळदेखील आली नाही, किंबहुना, काहीवेळा मलाच थोडे उशिरापर्यंत बसून, माझे काम संपवावे लागायचे!!
    अर्थात, पुढे इतर कंपन्यात अनेक गोऱ्या व्यक्तींशी ओळखी झाल्या पण माझ्या या मतात कधीही तसूभर देखील फरक पडला नाही. दोन, तीन महिन्यांनी कमलेश, निमेश आणि मी, सनसिटीला जायचे ठरविले. तसा, २००० साली, मी, स्मिता आणि आदित्य, असे तिथे फिरायला जाउन आलो होतो. परंतु मित्रांबरोबर जाणे आणि घरच्यांबरोबर जाणे, यात फरक पडतोच!!
    भारतात, सनसिटी हे साउथ आफ्रिकेतील एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे, त्यातून, मला वाटते १९९४ साली (आता मला नक्की साल आठवत नाही) तिथे ऐश्वर्या रायने मिस वर्ल्ड किताब मिळवल्यापासून तर त्याला बरीच प्रसिद्धी मिळाली आहे. तसे पाहिले तर सनसिटीचे दोन भाग आहेत. १] Sun city , २] Lost City. सनसिटी, मुळात एक हॉटेल आहे आणि त्यात, प्रचंड casino आहे!! माझ्या अंदाजाने, आफ्रिका खंडातील सर्वात मोठा casino इथे आहे, Last City म्हणजे ऐषारामाची परमावधी!!
    सनसिटी मधील हॉटेल, उडप्याचे वाटावे, इतके प्रशस्त, आलिशान असे हॉटेल आहे. मुळात, हि दोन्ही हॉटेल्स डोंगरात वसवली आहेत, त्यामुळे इथे दुपार कलंडली की लगेच थंड वारे बारमाही वाहतात. Lost City मध्ये केवळ हॉटेल, हेच आकर्षण नसून, तिथे यंत्राच्या सहाय्याने काही भागात भूकंपाचा अनुभव देतात, ठिकठिकाणी डोंगरात निरनिराळ्या प्राण्यांचे मुखडे कोरले आहेत आणि त्यात रात्री दिव्यांची रोषणाई केली जाते, तसेच इथे कृत्रिम तलाव तयार केलेला असून, त्यात कृत्रिम प्रवाहाने महाकाय लाटा निर्माण केल्या जातात, त्यामुळे पाण्यावरील खेळ खेळणे, हे दुसरे आकर्षण!!
    इथे मात्र, भारतीय पद्धतीचे जेवण मिळू शकते पण किंमती मात्र तितक्याच आलिशान!! इथेच मी, भारतातून आलेल्या चित्रपट तारकांचा शो पहिला होता, म्हणजे शाहरुख,सैफ, राणी, प्रीती वगैरे कलाकार आले होते. शाहरुखची प्रसिद्धी इथे बघून तर मला थक्कच व्हायला झाले!! असो, थोडक्यात, एकदा जाण्यासाठी हे ठिकाण ठीक आहे, ज्यांना जुगार खेळायचा आहे, त्यांना ही जागा म्हणजे स्वर्ग!!
    तसे पाहिले तर या गावात राहणे म्हणजे फार सुखाचे नाही, एकतर इतर शहरांप्रमाणे, एकदा संध्याकाळचे सहा वाजले की सगळे शहर स्वत:ला मिटून घेते!! बरे बाहेर जाऊन, विरंगुळा व्हावा, अशातले हे गाव अजिबात नाही. मॉल वगळला तर करमणुकीचे कसलेच साधन नाही आणि मॉल कितीही आलिशान झाला तरी त्यातील औत्सुक्य फार लवकर संपून जाते, मग उरतो तो कधीही न संपणारा वेळ!! मी तर सहा, सात महिन्यात कंटाळलो. त्यातून, कमलेशला नोकरीवरून काढून टाकले कारण त्याने नोकरीच्या जागी केलेली “हेराफेरी!!”
    निमेश माझ्याबरोबर असायचा पण तरीही गप्पा माराव्यात अशी काही मनापासून “आच” वाटायची नाही. अर्थात, असे मित्र देखील आवश्यक असतात. एके संध्याकाळी, अचानक माझ्या तब्येतीत थोडा बिघाड झाला आणि डॉक्टरकडे जाणे अत्यावश्यक झाले, किडनीचा जुना प्रॉब्लेम उपटला होता आणि थोडावेळ सैरभैर झाले होते आणि त्या विमनस्क क्षणी, निमेशने जी मदत केली, त्याला तोड नाही, मला लगेच गाडीत घातले, मोबाईलवरून जोहान्सबर्ग इथल्या डॉक्टरची वेळ नक्की केली आणि गाडी प्रचंड वेगाने हाकून, (जवळपास, १५० किलोमीटर अंतर आणि संध्याकाळची वेळ) मला डॉक्टर समोर उभा केला, रात्री, त्याच्याच ओळखीच्या मित्राच्या घरी राहिलो आणि दुसऱ्या दिवशी मला परत आणले.
    अखेर, प्रत्येकाला नेहमीच स्वत:चा विचार करणे आवश्यक असते आणि त्यानुसार, या गावातील माझा खेळ वर्षभरात संपला!!
    - अनिल गोविलकर

  • प्रस्तावना – एका पुस्तकाची

    सत्य मिथ्या ऐसें कोणें। निवडावें।

    सत्य म्हणों तरी नासे। मिथ्या म्हणों तरी दिसे ।।

    बाळाच्या जन्मवेळी आणि पुढे प्रत्येक वर्षी साजऱ्या होणाऱ्या वाढदिवसाच्या समयी...

    तसं पाहिल तर या संपूर्ण विश्वात आपली ग्रहमाला मग पृथ्वी, नंतर सजीवप्राणी, तद्नंतर चौऱ्यांशी लक्षयोनी या सर्वातून सजीव मानव मग बुद्धीयुक्त व्यक्ती बरोबरीने सधनता, सक्षमता या मुख्य पात्रता फेऱ्या पार केल्यास आपसूकच नातेवाईक, स्नेही, जवळचे सहकारी, काही अनोळखी, मित्र-मैत्रिणी, संस्था समाज यांना जोडणारे, यांचा समुह आपले वाढदिवशी स्मरण, अभिष्ट चिंततो. त्यामुळं अवघ्या सृष्टीसापेक्ष अणुरेणूसमान आपल्या जन्माने, चैतन्यरुपी आत्म्याच्या साहाय्याने आणि मिथ्या जडत्वप्राप्त देहाला चेतना प्राप्त होते. अशाश्वत देहाच्या आणि प्रत्येक पेशीस्थित निर्मळ मनाच्या, आगमनाचे इष्ट चिंतनाने सकारात्मक स्पंदनं निर्माण होऊन, त्या व्यक्तीचे पर्यायाने समुचित विश्वाचे सत्य, आर्त मनी प्रकटावे, ही मनीषा असावी. भय, भूक, मैथुन आणि निद्रा या लक्षणाने युक्त देहाला सजीव प्राणी म्हणतात. ‘पुनरपि जननं पुनरपि मरणं’ या येरझाऱ्या आहेतच.

    चैतन्यरूपी आत्म्याच्या साहाय्याने मिथ्या जडत्वप्राप्त देहाला चेतना प्राप्त होते. अशाश्वत मृत्यूसमयी नेमका उलट प्रवाह वाहतो. मिथ्या जडत्वप्राप्त देहाच्या कुडीतून प्राण म्हणजे सत्य आत्मा निर्वाण करून समुचित विश्वात सामावून जातो. मनुष्य या देहाच्या आसक्तीने आक्रोश करतो, परंतु संत मृत्यूचा आनंदोत्सव साजरा करतात. जीव-शिवाच्या संकल्पना स्पष्ट होत नाही तोवर हे दु:ख, विलाप होणारच. जन्म-मृत्यूच्या वेळी देहाच्या (जीव) आणि सत्य आत्म्याचा (शिव) संयोग होणे क्रमप्राप्त असते. जन्मवेळी देहाच्या (जीव) आणि सत्य आत्म्याचा (शिव) संयोग होतो आणि मृत्यूवेळी सत्य आत्म्याचा (शिव) आणि देहाची पंचमहाभूते (पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश) विश्वात पुन्हा विलीन होतात. जन्म-मृत्यूच्या मधल्या आयुष्यात जीव-शिव फक्त देहधारी प्राणी म्हणून वावर करतो. मृत्यू हा विषय खरेतर आपण आनंदावर विरजण पडेल म्हणून टाळण्याचा प्रयत्न करतो. सकारात्मक दृष्टीने मृत्यूची कला शिकणे आवश्यक आहे.

    मृत्यू-संकल्पना- इथं दोन गोष्टी असतात.

    १) मृत्यूचा क्षण-कालरूपी घोडा

    सरतां संचिताचें शेष । नाहीं क्षणाचा अवकाश।

    भरतां न भरतां निमिष्य । जाणें लागे ।।

    २) मृत्यूची जागा

    नित्य काळाची संगती । नकळे होणाराची गती ।

    कर्मासारिखे प्राणी पडती । नाना देसीं विदेसीं ।।

    एकदा इंद्रसभेत सर्व आमंत्रित देव येतात. विष्णु आपल्या गरुडाला महालाबाहेर सोडून सभेत जातात, तर इतरांबरोबर यमदेवसुद्धा आपल्या रेड्याला महालाबाहेर बांधतात. यमदेवाची नजर बाहेर झाडावर बसलेल्या कावळ्यावर पडते. ते चिंताक्रांत होतात आणि सभेस जातात. चाणाक्ष कावळ्याच्या नजरेतून ही गोष्ट सुटत नाही. यमदेवाच्या चिंताक्रांत नजरेने कावळा चांगलाच घाबरतो. त्याला मृत्यूभयाने घाम फुटतो. ते विष्णू वाहन गरुड पाहतो आणि तो कावळ्याला भीतीचे कारण विचारतो. कावळा इतिवृत्त कथन करतो. गरुड म्हणतो त्यात काय एवढं, आमचे विष्णुदेव जगाचे प्रतिपालक आहेत आणि मी त्यांचा आवडता गरुडवाहन आहे मी तुला मदत करतो. गरुड कावळ्याला पाठीवर बसवून काही क्षणातच गरुडभरारीने खूप दूरवर मेरुपवर्तावच्या गुहेत नेवून लपवतो आणि निश्चिंत रहा इथे यमदूतच काय प्रत्यक्ष यमदेवसुद्धा तुला नेऊ शकणार नाहीत. तुझा मृत्यू टळला असे आश्वस्त करून पुन्हा सभास्थानी येतो. सभा संपल्यावर यमदेव पुन्हा बाहेर येऊन झाडावर कावळा आहे का ते पाहतात. तो नाही म्हणून गरुडाकडे चौकशी करतात. गरुड छद्मीपणे हसून त्यांना कसे फसविले या आविर्भावात तो तर लांब मेरुपवर्तावर गेला असे सांगतो आणि यमदेव निश्वास सोडतात. आनंदलेल्या यमदेवांना पाहून गरुड आश्चर्याने विचारतो की काय झाले? तर यमदेव उत्तरात त्या कावळ्याची घटका भरली होती पण माझ्या अंदाजाने त्याचे मृत्यूस्थळ मेरुपवर्तावर होते आणि हा अजून इथे कसा? माझा अंदाज चुकतो की काय म्हणून चिंतेत होतो. मृत्यूचा क्षण किंवा स्थान आपल्याकडे येते किंवा आपण त्यास्थळी जातो.

    रामचरित मानस मध्ये संत तुलसीदास म्हणतात.

    तुलसी जसी भवतव्यता। तैसी मिलई सहाय।

    आपनो आवई ताही पही। ताई तहा लै जाय।

    कालरूपी घोडा देहाला मृत्यूकडे घेऊन जातो, मृत्यूचा क्षण उधारीने मिळू शकत नाही. एक चतुर मनुष्य मृत्यूसमयी दारी आलेल्या यमदूताला वाक्चातुर्याने गुंगवतो, यमदूताला बोलण्यात गुंतवून चहात गुंगीचे औषध घालतो, आणि त्याला गुंगी येते. हा चतुर मनुष्य यमदूताच्या यादीतील प्रथम असलेले आपले नाव फाडून सर्वात शेवटी खाली चिकटवतो. यमदूताला फसवण्याचा प्रयत्न करतो. थोड्या वेळाने यमदूत शुद्धीवर आल्यावर कामाची घाई करतो आणि त्याला सोबत येण्याचे फर्मावतो. चहाच्या मैत्रीची आठवण देत तो मनुष्य त्याला यादीनुसार बाकीच्यांना अगोदर घेऊन जा, मग माझा नंबर आल्यावर मला ने असे सुचवतो. मैत्रीला जागून यमदूत त्याच्या विनंतीनुसार ठीक आहे, यमदूत ग्लानी उतरल्यावर त्याच्याशी मैत्रीखातर यादी उलटी वाचतो आणि तिथे त्याचा खालून प्रथम क्रमांक लागतो. मी शेवटाकडून सुरुवात करून मग तुला नेतो असे सांगतो तर या चतुर मनुष्याने केलेली चतुराई त्याच्याच अंगलट येते कारण फेरफार केलेल्या यादीत खालून पहिला नंबर याचाच असतो. अशा रीतीने काहीही केले तरी मृत्यूक्षण चुकत नाही, आयुष्यात उसनं, उधारी मिळत नाही.

    मृत्यूची घटिका सांगू शकत नाही. ‘मापी लागले शरीर’ जन्माचा दिवस काळ वेळ आधुनिक शास्त्राने सांगता येते पण आज कुठलेही असे शास्त्र नाही की, जे मृत्यूची वेळ आणि दिवस सांगू शकते. आपण मृत्यूच्या क्षणाची असावधता बाळगतो. मृत्यूचा क्षणाचं दैन्य जीवाला एकट्याला सहन कराव लागत.

    कर्म, धर्म आणि काम याद्वारे मनुष्याने कितीही उत्तुंग यश प्राप्त केले, तरीही मृत्यू अटळ आहे. सत्कर्म करून अशी उंची प्राप्त करून घ्यावी की मृत्युरूपी घटनेचा आनंदसोहळा गोड मानून घेण्याचा सल्ला संत देतात. आपल्या देहातील आत्मा गेल्यावर देहातील चैतन्य नष्ट होते पण आत्मा चैतन्यरुपी असेल तर जन्म-मरणाच्या फेऱ्या चुकवू शकतो.

    असो ऐसे सकळही गेले। परंतु येकचि राहिले।

    जे स्वरुपाकार जाले। आत्मज्ञानी।।

    अखिल विश्वात सदेह चिरंजीवित्व प्राप्त झालेले फक्त अश्वत्थामा आहेत, परंतु आपण चैतन्याने चिरंजीव होण्याचे कष्ट घेतल्यास मृत्यू अटळ आणि आनंददायी मानायला शिकू.

    सदर पुस्तक परमार्थस्वरूप अध्यात्माचे दाखले देत मृत्यूपूर्व तसेच मृत्यूपश्चात सुनियोजित व्यवहारिक कर्मकांडे त्यांचा मूळ शब्दसंग्रह आणि कृतीसहित प्रस्तुत करताना लेखकाने कोणताही अभिनिवेश न बाळगता मृत्यू या दुर्लक्षित विषयावर अनुषंगिक विवेचन प्रसिद्ध करताना पुस्तक परिपूर्ण करण्यावर विशेष भर दिला आहे, त्याचे सुजाण वाचकांनी स्वागतच करावयास हवे.

    इदं न मम

    लेखक - श्री घनश्याम परकाळे

    श्री घनश्याम परकाळे यांच्या कॉमन मॅन या ललित लेखन संग्रह इ-पुस्तकातील हा लेख.
    हे इ-पुस्तक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...

    https://marathibooks.com/books/common-man-by-ghanashyam-parkale/

    किंमत : रु.१५०/
    सवलत किंमत : रु.७५/-

  • एक अविश्वसनिय कलाकृती : मोढेरा सुर्यमंदिर

    आपल्या देशात एवढया सुंदर कलाकृती आहेत/होत्या ना की त्या जगातील सात आश्चर्य आहेत ना सुद्धा मागे सोडतील ,पण तरीही आपल्याला पाहायचं काय असतं ताज महाल ,असं नाही की ताजमहाल सुंदर नाही ,पण डोळे उघडून बघा ,ताजमहाल पेक्ष्या कितीतरी सुंदर वास्तू/मंदिरे भारतात आहेत ,डोलदार पणे दिमाखात अजुनही आपले गतवैभव सांभाळत उभे आहे,विचार करा ,हे परकीय आक्रमणकर्ते ,इंग्रज जर भारतात नसते आले तर आपले किती तरी मंदिरं आता पण दिमाखात उभे असते ,असो ....
    तर भारतात खुप सुर्यमंदिरंआहेत पण त्यातल्या त्यात मुख्य दोन सुर्यमंदिर आहेत ,एक उडीसा मधलं कोणार्क चं सुर्यमंदिर आणि दुसरं गुजरात मधील मोढेरा चं सुर्यमंदिर ....
    अहमदाबाद पासुन हाकेच्या अंतरावर असलेल्या मेहसाना जिल्ह्यातील मोढेरा मधे हे सुर्यमंदिर १०२२-१०६३ च्या दरम्यान सोळंकी राजा भीमदेव पहिला ह्यांनी बांधलं ,सोळंकी घराणे हे सूर्य उपासक होते आणि म्हणुनच भीमदेव पहिला ह्याने हे मंदिर भगवान सुर्याला समर्पित केलं ,(मंदिर कुणी बांधलं ह्या मध्ये मतांतरे आहेत ,गूगल किंवा इतर माहिती स्त्रोत मध्ये आणि मंदिर परिसरात असलेल्या शिलालेखात तफावत आहे ,वरील माहिती ही मंदिर परिसरात असलेल्या शिलालेखावरून घेतली आहे....)
    मंदिर परिसरात शिरताच आपल्याला दिसतं ते सुंदर हिरवेगार गार्डन ,मंदिर परिसर विविध झाडांनी वेढलेला आहे ,गार्डन संपवून आपल्या नजरेत भरतं ते अतिसुंदर असं मंदिर आणी त्याच्यासमोर असलेल भव्य रामकुंड , मंदिर मुख्यतः तीन भागात व्यापलेल आहे, प्रवेश करताच दिसते ते रामकुंड हे पाण्याचे मानव निर्मित तळे, त्यानंतर सभामंडप आणि शेवटी गूढमंडप अथवा गर्भगृह. सभामंडपामध्ये अतिशय सुरेख असे कोरीव खांब आहेत. गर्भगृहात प्रदक्षिणेसाठी चिंचोळा मार्ग आहे.
    असं म्हणतात की हे मंदिर अश्या प्रकारे बनवलं गेलं होतं की २१ जून ला सूर्याचे पहिले किरण नृत्यमंडपातून आत येऊन त्या काळी गर्भगृहात असलेल्या सुर्यदेवाच्या सोन्याच्या मूर्तीच्या मुकुटावर असलेल्या हिऱ्यावर पडत असे आणी ते किरण त्या हिऱ्यावरून परावर्तीत होऊन पूर्ण गर्भगृह उजळुन निघत असे,किती नयनरम्य दृश्य असेल ते ,आपण आता फक्त कल्पनाच करू शकतो....
    सूर्य जिथे दुपारी बरोबर डोक्यावर येईल अशा ठिकाणांमधे कर्कवृत्त हे सर्वात उत्तरेकडील अक्षवृत्त होय. कर्कवृत्तावर २१ जून(वर्षातील सर्वात मोठा दिवस ) ह्या दिवशी मध्यान्ही सूर्य बरोबर डोक्यावर येतो....आणी ह्याच वृत्तावर हे मंदिर उभारलेलं आहे ,तेही त्या काळी कुठलेही आधुनीक तंत्रज्ञान नसतांना....
    हे मंदिर मारू गुर्जर स्थापत्य शैली मध्ये बनवलं गेलं आहे ,मंदिराच्या समोरच्या भागात सुर्यकुंड किंवा राम कुंड आहे ,स्थापत्य कलेचा एक अदभुत अविष्कार म्हणजे हे सुर्यकुंड ,ह्या कुंडात १०८ छोटे छोटे मंदिरं आहेत आणी कुंडात जायला पायऱ्या आहेत ,हे कुंड आणी त्या त्या पायऱ्या एवढया कोणबद्ध आहेत की सुमारे बाराशे वर्षांपूर्वी अशी कोणती टेक्नॉलॉजी त्यांनी वापरली असेल की सर्व पायऱ्या एकदम एकसारख्याच ,राम कुंड किंवा सूर्य कुंड बनवतांना पण खुप विचार केला गेला ,कुंडात १०८ मंदिरं आहेत ते सर्व १२ राशी आणी ९ नक्षत्र (१२*०९) ला ध्यानात घेतलं आहे ....
    भीमदेवांनी कुंड बनवतांना एक विचार केला की सर्व लोकांना तिर्थ यात्रा करणे शक्य नाही म्हणून कुंडातच सर्व मंदिरं बनवले ,आणी कुंड बनवतांना ह्या कुंडात ७ समुद्राचं पाणी ,विविध पवित्र नद्यांचे पाणी टाकण्यात आले ,आणी असं म्हणतात की तेंव्हा पासून त्या कुंडाचं पाणी कधीच आटत नाही.....
    सूर्य कुंडानंतर येतो नृत्य मंडप ह्या नृत्य मंडपात ५२ खांब आहेत जे वर्षातील ५२आठवड्यांना दर्शवतात ,ह्या खांबांवर अतीशय बारीक कोरीवकाम ,नक्षीकाम केलेलं आढळतं, ह्या खांबांची रचना अश्या प्रकारे केलेली आहे की वरतुन खाली बघितलं तर हे खांब गोलाकार दिसतात आणि खालुन वर बघीतल्यास हेच खांब अष्टकोणी दिसतात ....
    खांबांवर रामायण ,महाभारतातील महत्त्वपूर्ण प्रसंग कोरलेले आहे ,आणी नृत्यमंडपाच्या छतावर देखील असेच महत्वपूर्ण प्रसंग कोरलेले आहेत छताची रचना देखील खूप वेगळी आणी कलात्मक पध्दतीने केलेली आहे,मंदिरातील दगड ,खांब हे लॉक पद्धतीने एकमेकांत घट्ट बसवलेले आहेत ,आणी ते एवढे वर्ष होऊन सुध्दा उत्तम आहे ...
    नंतर येतो गर्भगृह ,त्या काळी गर्भगृहात सुर्यदेवांची सोन्याची मूर्ती होती जी आक्रमनकर्त्यांनी लुटून नेली ,मंदिराची नासाधुस केली आणी त्याच्यामुळे आता खंडित झालेल्या ह्या मंदिरात पूजा करणे निषिद्ध आहे,गर्भगृहात आधी जेथे मूर्ती होती तिथे आता दरवाजा बसवुन ते बंद केल्या गेलं आहे ....
    मंदिराच्या गर्भगृहात सूर्य,इंद्र ,विष्णु आणि इतर देवदेवतांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत ,त्या काळात कुठल्याही आधुनिक साहित्या शिवाय एवढी सुंदर आणी बारीक कलाकुसर तेही दगडावर ,विश्वास करायला पण खूप कठीण जातं, बाहेरच्या बाजूलापण पूर्ण बाजुंनी सुर्यदेवांच्या बारा प्रतिमा कोरलेल्या आहेत ज्या वर्षातील बारा महिन्यांचे प्रतीक आहे आणी सोबतच दहा दिशांच्या बाजुला दहा दिशांचे दिगपाल देखील कोरलेले आहेत ,प्रत्येक दिगपालांसोबत त्यांचे वाहन देखील भिंतींवर कोरलेले आहे ,भिंतीवर सुर्यदेवांची रथारूढ प्रतिमा देखील कोरलेली आहे त्या रथाला ७ अश्व जोडलेले आहेत जे सात वारांचे प्रतीक आहे ,पूर्ण गर्भगृहाभोवती ३६४ हत्ती आणी एक सिंह कोरलेला आहे हे हत्ती आणी सिंह वर्षातील ३६५ दिवसांचे प्रतीक आहे ,मंदिराच्या भिंतीवर इतरही काही देव देवतांच्या महत्वपूर्ण प्रतिमा कोरलेल्या आहेत ,ह्या सर्व मूर्त्यांच्या सर्वात वरच्या बाजूला विणाधारी सरस्वती मातेची मूर्ती कोरलेली आहे ,ज्याचा अर्थ होतो की आम्ही शिक्षणाला सर्वांत वरचं स्थान देतो ....
    मंदिरावर मुख्यतः धर्म ,अर्थ ,काम ,आणी मोक्ष ह्या विषयानुसार प्रतीमा कोरलेल्या आहेत.
    मंदिरावर त्या काळचे सामाजिक जीवन देखील कोरलेलं आहे ,एका ठिकाणी नृत्य करणाऱ्या स्त्रिया कोरलेल्या आहेत ,त्या एवढया सारख्या कोरलेल्या आहेत की असं वाटतं की त्या एका लयीत नृत्य करत आहे ,आणी त्याच बाजुला पुरुष नृत्य करतांना दाखवले आहे ,ज्यात एकही मूर्ती दुसऱ्या मूर्तीसोबत मॅच होत नाही,म्हणजे पुरुष ऑर्गनाईज्ड नसतात हे सुचवलेलं आहे.....
    हे एवढं सुंदर मंदिर सर्वांत पहिले मोहम्मद गझनी ने लुटलं , नंतर मंदिर परत बनवण्यात आले ,त्या नंतर मंदिर परत धर्मांध मुर्ख खिलजी ने लुटले ,आणी ह्या वेळी त्याने फक्त लुटच नाही केली तर मंदिराची भरपूर लुट केली आणी आपल्या वैभवाला गालबोट लावलं ,त्यानंतर ब्रिटिश आणि इतरही लोकांनी हे मंदिर लुटलं ,एवढी लुटा लूट होऊन देखील मंदिर अजून दिमाखात उभं आहे ....
    #मंदिर परिसरात एक छोटंसं संग्रहालय देखील आहे ,त्यात विविध काळात सापडलेल्या मुर्त्या आहेत ...
    #जर तुम्हाला इतिहासाची आवड असेल ,तर मोढेरा नक्कीच तुम्हाला आवडेल .
    कसे जाल :मंदिर अहमदाबाद पासून खूप जवळ आहे (अंदाजे १००किमी) मेहासाना पासून मोढेरा साठी सिटी बसेस सुरू असतात, तुम्ही मेहसाना मधुन खाजगी रिक्षा करून देखील जाऊ शकता, पण बस चा पर्याय योग्य आहे ....
    मंदिर पूर्ण हफ्ता उघडे असते आणी संध्याकाळी ६:०० पर्यंत मंदिर परिसरात प्रवेश दिला जातो.…..
    संध्याकाळी मंदिरावर लेसर शो दाखवतात ज्यात मंदिराचा इतिहास आणी इतर माहिती दाखवल्या जाते ,तो लेझर शो एवढा जबरदस्त असतो की तुम्ही आपोआपच म्हणाल की ये लेझर शो नहि देखा तो कुछ नही देखा....
    उत्तरायण काळात इथे गुजरात सरकार तर्फे सांस्कृतीक महोत्सवाचे आयोजन असते ....
    प्रो टिप:शक्यतो मंदिर बघायला सकाळी सूर्योदय जेंव्हा होतो तेंव्हा जा किंवा संध्याकाळी सूर्यास्तानंतर जा,सुर्यमंदिराची खरी महती सूर्योदयाच्या वेळीच कळते .....
    #अमिताभ बच्चन उगाच नाही म्हणत खुशबू गुजरात की आणी कुछ दिन तो गुजारिये गुजरात मे ...
    -–नितीन काकड