जीवन हे निर्सगाने दिलेली एक सुंदर देणगी आहे. मानवाची निर्मिती हा एक अदभूत चमत्कार आहे. या जगात प्रत्येक मनुष्य हा खास व महत्वपूर्ण आहे व प्रत्येकाला आनंदाने जीवन जगण्याचा अधिकार आहे. या अधिकाराला कोणीही त्याच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही.
निसर्गाने मानवाची निर्मिती केली व त्याचा पालनकर्ताही निसर्गच आहे. निसर्गाने मानवाला भरपूर काही दिलं व तो निसर्गाचं देणं लागतो. निसर्गाचे ऋण फेडावे ते कमीच. मनुष्य जगात रिकाम्या हाताने येतो व रिकाम्या हाताने जगाला निरोप देतो. पण मागे ठेऊन जातो त्या त्याच्यासोबत जुळलेल्या त्याच्या आठवणी,त्याचे नातेसंबंध,त्याचे कर्तृत्व, त्याने घडवून आणलेला बदल इत्यादी.जीवन अस्तित्वात आहे तर मृत्यू ही अस्तित्वात आहे. जे आज आहे ते उद्या नाही. प्रत्येक गोष्टीचा अंत हा निश्चित आहे.जीवनातील आनंद हेच एक निरंतर सत्य आहे.
हे जग फार सुंदर आहे.या सुंदर जगाला बघण्यासाठी मानवाला सुंदर डोळे आणि मन ही निसर्गाने दिले आहे.पण ही सुंदरता बघण्याचा प्रयत्न फक्त त्यालाच करायचा आहे.मानवाने स्वतःवर व इतरांवर प्रेम केलं तर जीवनातील आनंदाचा मार्ग नक्कीच सापडू शकतो.शेवटी सुख,शांती व समाधान हेच जीवन जगण्याचे ध्येय असावे.
-- प्रा. हितेशकुमार एस. पटले
बायको गावंढळ असो वा उच्च शिक्षीत,सर्व बायकांचे डोके देव एकाच फँक्टरीत बनवतो !!!!
लक्ष देऊन वाचा,भातात पाणी जास्त झाल्यास...तांदूळ नवीन होता,चपात्या कडक झाल्यास... मेल्याने चांगले दळून दिले नाही,चहा गोड झाल्यास...साखर जाड होती व तो पातळ झाल्यास...दुधात पाणी जास्त होतं,लग्नाला किंवा Function ला जाताना...
-कुठली साडी नेसू?
मला चांगली साडीच नाही!
घरी लवकर आल्यास...आज लवकर कसा आलात?
उशीर झाल्यास.... इतका वेळ कुठे होतात?
एखादी वस्तू स्वस्त आणल्यास... तुम्हाला सगळे फसवतात... महाग आणल्यास... तुम्हाला कुणी आणायला सागितलं होतं?
जेवणाचं कौतुक केल्यास... मी दररोजच करते.
नावं ठेवल्यास...तुम्हाला मेलं माझं कौतुकच नाही कशाचं...
एखाद काम केल्यास... एक काम कधी धड करत नाही...
ते न केल्यास...तुमच्या भरवशावर राहिले तर एकही काम होणार नाही...
बघा, तुमची बायको / तुम्ही या निकषात बसता का ?
स्वत: ची काळजी घ्या, शांत रहाण्याचा प्रयत्न करा.भिऊ नका देव तुमच्या पाठिशी आहे...
मराठी ही केवळ व्यावहारिक भाषा असून चालणार नाही तर ती ज्ञानभाषाही झाली पाहिजे. त्यासाठी निरनिराळ्या विषयातील ज्ञान मराठीत उपलब्ध झाले पाहिजे. मराठीतून उच्च शिक्षण उपलब्ध झाल्यास समाजातील एका मोठ्या वर्गाला त्याचा खूप फायदा होऊ शकतो. किंबहुना समाजाच्या दृष्टीनेदेखील हे आवश्यक आहे कारण सध्याच वर सांगितल्याप्रमाणे शिक्षण आणि आरोग्यसेवा या चैनीच्या गोष्टी झालेल्या आहेत. याचा दुसरा फायदा म्हणजे मराठी शाळा बंद होण्याचे प्रमाणही कमी होऊ शकेल कारण प्रगतीच्या संधी मराठीतूनही उपलब्ध होतील.
दुपारी एक वाजता जाणाऱ्या सेकंड इंजिनियर कडून हॅन्ड ओव्हर आणि माझ्याकडून टेक ओव्हर सुरु झाले. खाली इंजिन रूम मध्ये वेगळी लिफ्ट मेन डेकवरून खाली इंजिन रूम चे पाच मजले. दुसऱ्या मजल्यावर कंट्रोल रूम च्या खाली आणखी तीन मजले.
१) आर्टिक समुद्रातील बर्फ वितळणे त्यावर वैज्ञानिकांचा अंदाज असा आहे कि जर वितळनारया बर्फाची जाडी कमी कमी होत गेल्यामुळे जागतिक उष्णतेचेच्या प्रमाणात वाढ होईल कारण ते सूर्याचे किरणे परावर्तीत कमी प्रमाणात करतील…..
वाचा…..
अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मध्ये सौ. इंदिरा दास यांनी लिहिलेली ही कविता
नतमस्तक तुझ्या चरणी हे प्रभू मी सदा
बरसणार कारे सुखाचा यंदा ।।
भिजले कारे काळी माती
होतील कारे तडे हद्दपार
उगवतील कारे टपोरे मोती
बनेल शिवार हिरवे गार
नको गुरांचे हाल अन् खेळ जिवाशी औंदा
बरसणार कारे पाऊस सुखाचा यंदा...।। १ ।।
देशील कारे आनंद आमुच्याही वाटी
भरशील कारे पैशानी झोळी मोठी
नको तो अवकाळी पाऊस
नको तो गारपिटाचा मारा
नको कर्जबाजार अन् फाशीचा फंदा
बरसणार कारे पाऊस सुखाचा यंदा...।।२।।
पेरीन मी बियाणे पांघरुन काळी माती
वाढतील रोपे शेतामंदी करतील दाटी वाटी
करीन मी मशागत अन् कापणी मळणी
भरीन माझे घरकुल धानियांच्या कणग्यांनी
नको करु देवा चुराडा सपनाचा अन् नशिबाचा सौदा
बरसणार कारे पाऊस सुखाचा यंदा...।।३।।
देवानी दिल रे परी दैवानी नेलं
सौदा कराया मंदीमंदी आला दलालं
झाला दलालं शिरीमंत, मी मात्र कंगाल
फेडू कसे कर्ज आता, झालो मी हवालदिल
देवा नको हा नशिबाचा सौदा अन् दलालीचा धंदा
बरसणार कारे पाऊस सुखाचा यंदा...॥४॥
- सौ. इंदिरा दास मैत्री गार्डन, ठाणे
(अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मधून)
राशी :- मकर
स्वामी :- शनि
देवता :- ब्रह्ममातृक
जप मंत्र :- ॐ श्री वत्सायउपेन्द्राय नमः
उपास्यदेव :- हनुमान
रत्न :- नीलम
जन्माक्षर :- भो ज जा जी ख खा खि खीखे खो खु ग गा ग्र गृ गी ग्रीं गि गं या राशीवर शनि (ज्योतिष) चा अंमल आहे. व्यवहारी, धोरणी, महत्त्वाकांक्षी, शिस्तप्रिय. मेंढा आणि अर्ध शरीर माझा असा याचे बोधचिन्ह आहे. मकर राशीचे लोक खूप व्यवहारी, धोरणी, महत्त्वाकांक्षी, शिस्तप्रिय, संयमी असे असतात. मकर राशीच्या लोकांना सगळ्या गोष्टींबद्दल थोडीशी निराश वृत्ती असते.
मुलांसाठी मनोगत
(हे मनोगत जरी विद्यार्यांसाठी असले तरी पालकांनी ते मुलांना -४-५ पासूनच्या – वाचून त्याचा अर्थ नीट समजावून सांगावा.)
साम, दाम, दंड आणि भेद या आयुधांवर आधारित असलेलं राजकारण…गुन्हेगारी पार्श्वभूमीचा ठपका पुसण्यासाठी राजाश्रय हे एक पूरक आणि पोषक साधन…असुशिक्षित, असुशील व गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले नेते, ज्यांना समाजसेवेची ओढ,आवड अथवा समाजाशी कसलीही बांधिलकी नाही,..जनतेच्या अडी-अडचणी, दैनंदिन समस्या, सामाजिक प्रश्नांची जाण व समज नसलेले नेते जनतेचे नेतृत्व करण्यास लायक असतील का?
एके दिवशी शालू मला काॅलेजच्या काॅरीडाॅरमध्ये भेटली.तिचासारखाच भोळाभाबडा, हसरा चेहरा अावाजही अगदी तिचासारखाच क्षणभर वाटलं तूच तर नाहीस ना.शालू मला बबोलून निघून गेली मी माञ माझ्याच तंद्रीत तिथेच उभा राहून भूतकाळाची पाने चाळत होतो. एखाद्या चलचिञपटाप्रमाणे माझ्या डोळ्यासमोरून चिञे जावीत तशी काॅलेजच्या अाठवणी भुर्रकन निघून गेल्या अाणि अाठवले काॅलेजचे ते सोनेरी क्षण...............
जीवनरूपी काटेरी वळणावर मार्गक्रमण करत असताना .वळीवाच्या पावसाप्रमाणे तू माझ्या जीवनात अालीस .बरं वाटलं जीवन जगण्याचा खरा अर्थ कळला.प्रेम भावना काय असतात हे तू माझ्या जीवनात अाल्यावर कळले.खरया अर्थाने जीवन जगण्याला अर्थ अाला तूझ्यामुळेच. काॅलेजचे दिवस कसे भूर्रकन निघून जायचे काही कळायचे नाही.काॅलेजच्या पायरया उतरतच तूझी नजर मला धुंडाळायची. काॅलेजमध्ये मी दिसलो नाही तर तूझं मन लागायचं नाही. मी तुझ्याशी अबोला धरलो तर तू माझ्यावर रागावयाचीस. माझ्या हृदयी अाजही रंगतोय तु मांडलेल्या प्रेमाचा खेळ. हातात कुंचला अाणी कॅन्व्हास घेतला की तूच माझ्या डोळ्यासमोर तरळायचीस अन तूच माझी मोनालीसा व्हायचीस अन मी तूझा पिकासो. अापलं नातं लाजाळूच्या पालवीप्रमाणे कधिच कुणाला न समणारं. अापल्या नात्याचा अंत वाईट अाहे हे माहीत असतानाही अापण दोघांनी ते विष प्यायलो. अाणि अाज ते माझ्या जिव्हारी येतय.वाटलं नव्हतं तूझ्यासारखी सखी माझ्या जीवनात येवून कधिच न शमनारं प्रेमाचं वादळ उठवून देईल. प्रेमाच्या राज्यात सर्व काही सुरळीत चालत असताना वाटलं नाही असा डाव अर्ध्यावर सोडून जाशिल. कधि पुसटशी कल्पनाही केली नाही कि अापण एकमेकांपासून ईतके दूर जावू. खरंच वास्तव काती कटू असते पण वास्तव नाकारता येत नाही. तुझ्या लग्नाला पाच सहा वर्षे लोटली असतील कदाचित तू सूखी असशील तूला माझी अाठवणही येत नसेल पण मी माञ तूझ्याच अाठवणीच्या साह्याने कित्येक राञ जागून काढल्या. अाठवतोय का तूला तो निरोपाचा दिवस मी तूझ्या रूमवर अालो होतो.डोक्यात एकाच विचाराने थैमान घातले होते तू मला सोडून जाणार .काय बोलावं काय नाही काही सुचत नव्हतं. हृदय भरून अालं होतं डोळ्यासमोर सगळीकडे काळोख दिसत होता.कुठं जावं नि काय करावं काही सूचत नव्हतं. वाटलं नाही जगू शकत तूझ्याविना पण तूझा तो हसरा चेहरा मला जगण्याची नवी उम्मेद देवून जातो.
जेंव्हा अाठवणीच्या सागराला भरती येते
तेंव्हा कशात मन लागत नाही तुला येवून भेटावेसे वाटते पण उजाडणारा प्रत्येक दिवस मला जीवंत जाळत असतो
तुझी ती अबोल प्रित स्मरताना...........................
Copyright © 2025 | Marathisrushti