(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • Standerton – साउथ आफ्रिका – Dark Side – भाग २

    जसजसा मी कामात रुळायला लागलो तशी, विशेषत: गोऱ्या लोकांवर नियंत्रण ठेवायला जमू लागले. एक गोष्ट इथे मी स्पष्ट नक्की करतो. माझ्या बरोबरचे किंवा माझे वरिष्ठ जेंव्हा, तेंव्हा केंव्हा काम करीत त्यावेळेस, फक्त काम. अगदी प्रियकर/प्रेयसीचा फोन आला तरी जेव्हढ्यास तेव्हढे!! अर्थात, संध्याकाळचे ५.०० वाजले की ऑफिसच्या बाहेर!! इथे एकतर ऑफिस सकाळी ८.०० वाजता सुरु होते, त्यामुळे सगळेच, सकाळी लवकर घर सोडतात. जोहान्सबर्ग इथे तर सकाळी ६ किंवा ६.३० वाजता घर सोडणारे, पुढे या शहरात काम करताना बघितलेले आहे. इथेच माझी एक समजूत पार खोटी ठरली!!
    साधारणपणे असे मानण्यात येते, गोरे लोकं अतिशय प्रामाणिक आणि वक्तशीर असतात पण या मताला इथेच छेद मिळाला!! माझा स्टीवन हाच Accountant पैसे खाण्याच्या प्रकरणात पकडला गेला!! त्याचे असे झाले, तो आमच्या ऑफिसची Cash आणि Petty Cash सांभाळायचा. साधारणपणे, तो ५०,००० Cash व्यवहार बघत होता. त्याच्या या कामावर मी तसा देखरेख ठेवत असे, पण मला कधीकधी शंका यायची. एकदा त्याला, मी आणि तो, एकत्र बसून Reconcile करूया, म्हणून सुरवात केली आणि पैशात बरीच गफलत आढळली. तशी, मी त्याच्यावर प्रश्नांची फैर झोडली. लगेच मी स्टीफनला बोलावले आणि त्याच्या समोर स्टीवन कडून कबुली जवाब लिहून घेतला. तुम्हाला आश्चर्य वाटेल, परंतु फक्त ५,००० Rand (साउथ आफ्रिकन चलन) इतकीच हेराफेरी केली होती. त्याचा पगार त्यापेक्षा जास्त होता!!
    लगेच हेड ऑफिसला रिपोर्ट करणे भाग पडले. त्याला पैसे तर भरणे भाग पडलेच परंत्य “या पुढे अशी चूक करणार नाही” असे लिहून द्यायला लागले. इथे असे लिहून देणे म्हणजे स्वत:च्या पायावर धोंडा पडून घेण्यासारखे आहे. वास्तविक नोकरीच जायची पण, त्याचे त्याच सुमारास लग्न ठरले असल्याने, लिहून देण्यावर भागले!!
    या प्रकारानंतर मात्र, मी इथे जम बसवला. तशी माझी वागणूक फार ताठर नसायची. मी, एक नियम केला होता, कामाच्या वेळेत काम, नंतर एकत्र ड्रिंक्स घ्यायला बसायला, मी कधीच हरकत घेतली नाही. डेला आणि बार्बरा मात्र खरच मनमिळाऊ आणि मोकळ्या स्वभावाच्या होत्या, दोघीही सतत स्मोकिंग करणाऱ्या तरीही स्वत:चा आब राखणाऱ्या. मला महिन्यातून दोनदा जोहान्सबर्ग इथे हेड ऑफिसला मिटिंगसाठी जावे लागायचे, कधीकधी डेला देखील माझ्याबरोबर असायची. अर्थात, घरी परतायला उशीर व्हायचा, इतका की Standerton इथे पोहोचेपर्यंत रात्रीचे ८ ते ९ वाजायचे. अर्थात, घरी जाऊन जेवण करणे म्हणजे जीवावरचे दुखणे वाटायचे.
    अशा वेळेस, मी आणि डेला, कितीतरी वेळा पबमध्ये जाऊन, ड्रिंक्स घेत असे. त्यात तिला काय किंवा मला काय, काहीच वावगे वाटले नाही. हाच मोकळेपणा मला इथे बहुतेक सगळ्याच गोऱ्या लोकांच्या कुटुंबात आढळला. कधीकधी, स्टीफनच्या घरी जेवायला गेलो असता, त्याची मुलगी/बायको माझ्याशी अतिशय मोकळेपणी वागत असायचे. त्याच्या घरी तर २ वेळा चक्क उशीर झाला म्हणून शनिवारी रात्री झोपलो देखील होतो!!
    स्टीवनच्या लग्नात मात्र मला खऱ्याअर्थी गोऱ्या माणसाचे लग्न, अथपासून इथिपर्यंत अनुभवायला मिळाले. कदाचित, मी त्याचा वरिष्ठ असल्याचा परिणाम असेल पण लग्नाच्या आधीपासून २ दिवस,मी त्याच्या बरोबर होतो. चर्चमध्ये जाणे फारसे नवलाचे नव्हते परंतु लग्न बघणे, हा, माझ्या आकर्षणाचा भाग होता. शनिवार दुपारी सगळे मित्र, जवळचे नातेवाईक, इथल्या चर्चमध्ये जमलेंअवर मुलगा, वधू येईपर्यंत आमच्यातच गप्पा मारत होता, तशी चर्चमध्ये फारशी सजावट वगैरे नव्हती. बिशपच्या मागील स्टेजवर ऑर्गन होता, त्यापाठीमागे येशूची मूर्ती. कशी वधू चर्चमध्ये आली, तशी नवऱ्या मुलाने, तिच्या स्वागतार्थ मिठीत घेऊन, ओठांवर ओठ टेकवले आणि त्यासरशी ऑर्गनच्या घनगंभीर सुरांवर प्रार्थना सुरु झाली. संपूर्ण चर्चमध्ये त्या ऑर्गनचे सूर ऐकणे, हा एक अनिर्वचनीय अनुभव होता. त्यानंतर पुढे, अर्धा तास, तो बिशप आणि वर/वधू यांच्यात हलक्या सुरात मंत्रोच्चारण आणि शेवटी मान्यतेची ओठांवर मुद्रा उमटवल्यावर टाळ्यांचा गजर.
    अगदी थोडक्यात सगळा विधी पार पडला आणि लगेच सगळेजण इथल्या “फाल” या नदीकिनारी असलेल्या अप्रतिम हॉटेलमधील पार्टीला निघाले. (वास्तविक नदीच्या नावाचे स्पेलिंग VAAL असे आहे पण जर्मन, डच आणि इथल्या आफ्रिकान्स भाषेत V चा उच्चार F होतो!!) हॉटेलमध्ये आल्यावर लगेच स्टीवनने Champagne फोडली आणि एकच गजरात “चियर्स” सुरु झाले. लगोलग, नवपरिणीत जोडप्याने Dance Open केला. त्यांचा Round झाल्यानंतर इतर जोडपी त्यांना सामील झाल्या. इथे ड्रिंक्स घेणे, हे चहा पिण्यासारखे असते, त्यातून आज शनिवार रात्र मग काय, नृत्याला उधाण आले तर काय नवल!! मी देखील त्यात सामील झालो. अर्थात Champagne आणि त्यानंतरची स्कॉच घेतल्याचा खरा परिणाम होता.
    जसजसे दिवस जायला लागले तशी, जबाबदाऱ्या वाढायला लागल्या, डेपो भेट सुरु करणे भाग होते. डेपो सगळे अति अंतर्भागात असल्याने, जाण्याचे रस्ते मातीचे, दगडाचे आहेत. तिथे मोटार कार नेणे संय्युक्तिक नाही, त्यातून मी तर मुळातला परदेशातला!! त्यामुळे, माझ्याच ऑफिसमधील एक काळा ड्रायवर घेतला आणि निघालो. इथे या visits तशा गुप्त ठेवाव्या लागतात, कारण मी stock checking साठी येत आहे, म्हटल्यावर रिपोर्टनुसार Stock ठेवला जातो. पहिला डेपो, ऑफिसपासून १०० किलोमीटरवर होता. जातानाच लक्षात आले, मी शहरापासून पार दूर जात आहे आणि सगळीकडे राखाडी वातावरण पसरलेले आहे. इथे पहिल्या डेपोत गेलो.
    तपासात फार चुका नव्हत्या, तशी मी इथल्या पबकडे मोर्चा वळवला. साधारणपणे पब म्हटल्यावर जे काही चित्र डोळ्यासमोर येते, त्याला संपूर्ण छेद देणारा इथला पब आहे. मी, भारतात गिरगावात करेल वाडीत राहतो आणि तिथे बरेच वर्षे देशी दारूचा गुत्ता चालत होता, त्यामुळे भारतातला गुत्ता तसा माझ्या परिचयाचा होता. इथे त्याचीच आवृत्ती दिसली. अत्यंत गचाळ वातावरण, कितीतरी काळे लोक किळसवाण्या पद्धतीने झिंगत होते, एकाद्या टेबलावर शिळी बियर ग्लासातून टेबलावर पडलेली असल्याने, त्याचा अत्यंत उग्र दर्प येत होता. त्यांचे बोलणे देखील लडबडलेल्या जिभेने ओंगळ स्वरात चाललेले होते. मला तर ५ मिनिटांतच मळमळायला लागले. इतकी वर्षे, पीटरमेरीत्झबर्ग,डर्बन आणि रस्टनबर्ग या शहरात राहिल्यानंतर हा अनुभव मन ढवळणारा होता. कशीबशी कामे आटोपली आणि तासाभरात बाहेर येउन, स्वच्छ श्वास सोडला!!
    नंतर लक्षात आले की इथल्या घरांत अजूनपर्यंत वीज पोहोचली नाही!! कारण वीज घेणे परवडत नाही, इतकी हलाखीची परिस्थिती आहे. काही घरांत गेलो असता, याची प्रचीती आली. असे असले तरी आमची बियर घेणे,हे सत्कर्म व्हायलाच हवे आणि या बियर सेवनाला चक्क घरातून हार्दिक पाठींबा!! रोज, साधा ब्रेडचा रोल खायला मिळणे, ही इथे चैन आहे!! चक्क पाण्यातून ब्रेड खाणाऱ्या व्यक्ती, मी प्रत्यक्ष पहिल्या आहेत. मला नेहमी या विषम आर्थिक परिस्थितीचे नवल वाटते. कुठे ती ऐषोआरामाची सन सिटी आणि कुठे इथली भयाण परिस्थिती!!
    कसलाच मेळ बसत नव्हता. पुढे जसजशा माझ्या visits वाढायला लागल्या तशी इथल्या श्रीमंती राहणीच्या मागील अस्तर दिसायला लागले. इथल्या झोपड्या सगळ्या चिखलाच्या भिंतीने बांधलेल्या , सिमेंट परवडणे शक्यच नाही!! बरे इथे असे एखादे गाव आहे, अशातला भाग नाही!! अशी गावेच्या गावे याच हलाखीत रहात असतात. अशा परीस्थितीत इथे गुन्हेगारी वाढली तर काय नवल!!
    इथे भर दिवसा देखील प्रवेश करणे, म्हणजे मनावर दडपण यायचे. नोकरीचा भाग म्हणून इथे येणे आवश्यक होते. त्यातून, आमची बियर हलक्या प्रतीची असल्याने, शहरात कुठेच बियर विकण्याचा प्रश्नच नव्हता. इथले काळे देखील दिसायला उग्र!! सतत बियर सेवनाने,तांबारलेले डोळे, त्यातून काळ्यांचा खर्जातील आवाज!! सुरवातीला तर मी फारसा बोलतच नव्हतो. त्यातून, इथले काळे इंग्रजी असे काही बोलायचे की एक शब्द कळेल तर शपथ!! बरेचसे काळे, आफ्रिकान्स भाषा बोलतात, आणि तिथे तर माझी बोंब!! काही आफ्रिकान्स शब्द मी शिकलो तरी शेवटपर्यंत नवशिकाच राहिलो.
    - अनिल गोविलकर

  • अडई (खाद्ययात्रा)

    एक वेगळा पौष्टिक खाद्यपदार्थ

  • ब्लँकआउट ( बेवड्याची डायरी – भाग २४ वा )

    काही जण तर या ‘ ब्लँकआउटच्या ‘ अवस्थेत एका गावातून रेल्वेत बसून दुसर्या गावी जातात ..तेथे दारू उतरली की भानावर येतात ..त्यांना आपण या गावी का आणि कसे आलो हे देखील आठवत नाही ..याच अवस्थेत काही जणांच्या हातून रागाच्या भरात खून ..एखाद्याला जबरी मारहाण असे गुन्हे घडू शकतात..वस्तूंची तोडफोड फेकाफेक ..काहीजण खिश्यातील सगळे पैसे उडवतात..

  • फॅंड्री : एक गडद वास्तववाद

    प्रत्येक पातळीवर अव्वल दर्जाचा असणारा फॅंड्री जागतीक स्तरावरही आपले नाव कोरण्यास समर्थ आहे. मनोरंजनाच्या पलीकडे जाऊन आपल्या आसपास रोजचं मरण जगत असलेल्या वंचितांचे हे भीषण वास्तव अंतर्मुख करणारे असल्याने हा आगळा-वेगळा फॅंड्री एकदा तरी नक्कीच बघायला हवा.

  • श्रीकृष्ण जन्मकथा

    श्रीकृष्ण जन्मकथा श्रीकृष्ण जन्मकथा सांगतो ऐका विनवितो श्री विष्णु अवतार घेतो ह्या सृष्टीवर १ दुष्टांचा होई अनाचार पृथ्वीते होई पापभार त्यांचा करण्या संहार परमेश्र्वर अवतरती २ कंस राजा दुष्ट स्वतःस समजे श्रेष्ठ प्रजेला देई कष्ट स्वार्थापोटी ३ छळ करु लागला जनांचा लुटमार अत्याचार छंद त्याचा खूनही करी साधूसंतांचा दुष्टपणे ४

  • नवरात्री उत्सव ………!!

    सर्व भारतीय उत्सवात नवरात्री हा महत्वाचा आहे . नव ( नऊ ) रात्री हा उत्सव साजरा केला जातो . खरे तर नवरात्र वर्षातुन पाच वेळा येते पण फक्त दोनच महत्वाचे मानले जाते १) वसंत नवरात्र २) शरद नवरात्र .

  • देवीच्या ५१ शक्तिपीठांची निर्मिती

    भगवान शंकराच्या आहुतीने मंत्र वगळून पुढील आहुती सुरु झाल्या आपल्या पतीचा झालेला हा अपमान मात्र सतीला सहन झाला नाही व संतापाने तिच्या अंगाचा भडका उडाला. क्रोध अनावर

    झाला आपल्याच वडिलांकडून झालेली ही मानहानी सहन न होऊन सतीने त्याच यज्ञ मंडपात देह त्याग करण्याचे ठरविले व तिने यज्ञकुंडात आत्मसमर्पण केले.

  • भारतीय नृत्यशैली – कथक

    कथक ही एक भारतीय नृत्यशैली आहे. भारतातील आठ शास्त्रीय नृत्य प्रकारांपैकी कथक एक आहे. कथक ही प्राचीन शैली मानली जाते कारण तिचा उल्लेख महाभारतातही केलेला आहे.हल्लीच्या काळात या नृत्यप्रकारामधून कृष्ण कथा सादर केल्या जातात.कथक ह्या शब्दाचा उगम 'कथा कहे सो कथक' असा सांगितला जाते. म्हणजेच हावभाव आणि हाताच्या व पायाच्या हालचाली वापरून कथा सांगणाऱ्या व्यक्तींपासून कथक हा शब्द आला असे म्हटले जाते. याचाच दुसरा अर्थ कथा सांगणारी शैली म्हणजे कथक असा होतो.

    कथकची तीन प्रमुख घराणी आहेत - जयपूर, लखनउ आणि बनारस. फारसे प्रचलित नसलेले रायगढ घराणे ही कथक या नृत्यशैलीचे उगमस्थान आहे.

    जयपूर घराणे : राजस्थानमधील राजा कच्छवा यांच्या दरबारात ज्या विविध प्रकारचे फुटवर्क,चक्कर आणि तालाच्या विभिन्न प्रकारांचा उगम झाला ते जयपूर घराणे. पखवाज हे वाद्य जयपूर घराण्यातील नृत्यप्रकारात जास्त वापरले जाते.

    लखनऊ घराणे: अवध राज्यातील नवाब वाजिद अली शाह यांच्या दरबारात ज्या कलात्मक रचना, ठुमरी या अभिनयांबरोबर शाब्दिक अभिनय व काही वैशिष्ट्यपूर्ण रचनांचा उगम झाला ते लखनऊ घराणे. सध्याच्या काळात अच्छन महाराज यांचे पूत्र पंडित बिरजू महाराज हे लखनऊ घराण्यातील कथक नृत्याचे प्रमुख प्रतिनिधी मानले जातात.

    बनारस घराणे : प्रसिध्द साहित्यिकांमधील एक जानकी प्रसाद यांच्यापासून कथकमधील बनारस घराण्याचा उगम झाला. या घराण्यात नटवरी नृत्याचा जास्तीत जास्त वापर केला जातो. यातील घेरे (चक्कर) डाव्या व उजव्या दोन्ही बाजूंनी घेतले जातात.

    रायगढ घराणे : छत्तीसगडचे महाराज चक्रधार सिंह यांच्याकडे कथकमधील रायगढ घराणे जन्माला आले. यात तबल्याचा जास्त वापर केला जातो. वेगवेगळ्या प्रकारच्या नृत्यशैली,कलाकारांमधील एकात्मता आणि तबल्याच्या विविध रचना यांमुळे या घराण्यातील नृत्यशैलीला वेगळेच महत्व प्राप्त होते. पंडित कार्तिक राम, पंडित फिर्तु महाराज, पंडित कल्याणदास महांत व पंडित बरमानलक हे ह्या घराण्यातील नृत्यशैलीचे प्रतिनिधी मानले जातात.

    इतर शास्त्रीय नृत्य प्रकारांच्या तुलनेत कथक मध्ये पाय ताठ ठेवले जातात. हा कथक वरील मुघल प्रभावामुळे झालेला बदल आहे असे मानले जाते.

    -- पूजा प्रधान

  • बॉनसायसाठी रोपे

    बॉनसाय तयार करण्याच्या दोन मुख्य पायर्‍या आहेत. पहिली पायरी म्हणजे निवडलेले रोप बॉनसाय बनवण्यासाठी तयार करणे आणि दुसरी पायरी म्हणजे बॉनसाय बनवणे.

  • प्रत्येक शब्द ‘क’ पासून सुरु करुन येवढा मोठा परिच्छेद

    मराठी भाषेची ताकद खालील लेखात पहा. प्रत्येक शब्द 'क' पासून सुरु करुन येवढा मोठा परिच्छेद लिहिला आहे. जगातल्या कोणत्या इतर भाषेत अशी ताकद असेल ?

    केव्हातरी कोल्हापूरच्या कर्तव्यतत्पर केळकर काकांबद्दल काकांच्याच कचेरीतल्या केशवने काकूंसमोर कागाळी केली. काकू कावल्या. काकूंनी कपाटातून कात्री काढून काकांच्या कामाचे कोरे करकरीत कागद कचाकचा कापले. काकांचे कापलेले कागद केशवानेच कचऱ्यात कोंबून काकांच्याच किचनमध्ये ' कजरारे-कजरारे' कवितेवर कोळीनृत्य केले. काकूंनी कागद कापल्याचे कळताच काका कळवळले. काकांनीही कमालच केली. काकांनी काकूंचे काळे कुळकुळीत केस कात्रीने कराकरा कापले. काका काय करताहेत काकूंना कळेनाच! काकूंनी कर्कश्श किंचाळून कलकलाट केला. काका काकूंची कसली काळजी करणार! काकांना कामाची काळजी. काकूंच्या कर्णकर्कश्श कोलाहलातही, केशवाने कचऱ्यात कोंबलेले कागदाचे कपटेन कपटे काढून काकांनी कचेरीकडे कूच केले. कचेरीच्या कामासाठी काकांनी कंबर कसली. कागदाच्या कापलेल्या कपट्यांचे काकांनी 'कोलाज' करून कामकाज कार्यान्वयित केले. केशवाचे कारनामे कळताच काकांनी काट्यानेच काटा काढला. काकांनी केशवालाच कोलाजचे काम करण्यासाठी कुथवला. कपटी केशवने काकांवरच कामचुकारपणाचा कांगावा करून कामाचा कंटाळा केला. काकांनी कठोरपणे केशवाला कामावरून काढले. कासावीस काकूंनी कालच्या कडू कारल्याची कोशिंबीर कटाप करून काकांसाठी कच्च्या कैरीचे कोय काढून कालवण केले. काकांनीही करुणेने काकूंचे कृत्रिम केस कुरवाळले. केळकरांच्या कोकणस्थ कुटुंबात कर्तव्यापुढे कर्मकांड केव्हाही कनिष्ठच. कर्तव्यदक्ष काकांच्या कार्यकाळात कचेरीने कर्मरूपी किल्ल्याचे कीर्तिशिखर काबीज केले. कामावरून काढलेल्या केशवाने कितीतरी काबाडकष्ट काढल्यावर कोल्हापूरच्या कॉम्रेड कणेकर कॉलेजने केशवाला कबड्डीचा कर्णधार केला. क्रिडापटू केशवाने कबड्डीतच करियर केले. कालच्या कागाळीखोर केशवाला काळानेच केला 'कबड्डीतल्या किचकट कसरतींचा कर्ता'!

    कथासार
    -
    क्रियेविण करिता कथन, किंवा कोरडेची कीर्तन,
    कितीक किताब कष्टाविण, काय कामाचे

    -- चिंतामणी कारखानीस