वेश्याव्यवसाय नक्किच वाईट आहे. या वेश्यांकडे जाणारे आपल्या आजुबाजुचीच मुल व पुरुष असतात. मी नेहेमी जाणार्यांच्या बाबतीत जास्त लिहित नाही पण ही लहान मुल, नुकती मिसरुढ फ़ुटलेली मुलं जेव्हा वेश्यांकडे जाताना दिसतात. तेव्हा खुप काही तरी चुकतय अस जाणावत. ही मुल बरेच वेळा चांगल्या कुटुंबातली व चांगल्या शाळांमधली असतात.या मुलांना सेक्सबाबत व ऎडस् बाबत अर्धवट माहिती असते. विवाहापूर्वसंबंध किती घातक आहेत याची त्यांना मुळिच कल्पना नसते. खर तर या मुलांना योग्यवेळी काऊंसिलिंगची गरज असते
Hinduja हॉस्पिटलमधुन एका डॉक्टरला ऑपरेशन साठी कॉल आला... खुप घाई करून तो डॉक्टर हॉस्पिटल मध्ये पोहोचला... त्याने पटकन सगळ्या नर्सला ऑपरेशनची तयारी करण्यास सांगितले, स्वतःचे कपडे बदलले, आणि पटकन ऑपरेशन थिएटर जवळ आला...
तिथे त्याने पाहिले की एका मुलाचे वडिल , जे कि वडिलोपार्जित गर्भश्रीमंत होते ते हॉल बाहेर रागात चकरा मारताय आणि डॉक्टर ची वाट पाहताय...
डॉक्टरांना पाहताच त्या मुलाच्या वडिलाचा पारा चढला व ते रागातच डॉक्टर ला म्हणाले
"तुम्ही इथे यायला इतका वेळ का घेतला? तुम्हाला कळत नाही का माझ्या मुलाचे प्राण धोक्यात आहे ते? तुम्हाला काही जबाबदारी ची जाणिव आहे की नाही?"
यावर डॉक्टर स्मितहास्य देत म्हणाला "मला माफ करा, मी हॉस्पीटल मध्ये नव्हतो, मी फोन आल्यानंतर जितक्या लवकर येता आले तितक्या लवकर आलो, आणि आता मी प्रार्थना करतो की तुम्ही शांत व्हा.. मला माझ काम करू द्या"
"शांत व्हा??” वडील म्हणाले , “जर तुमचा मुलगा आता ऑपरेशन थिएटर मध्ये असता तर?? जर तुमचा स्वतःचा मुलगा आता मृत्यु च्या जबड्यात असता तर तुम्ही काय केल असतं??" वडील रागात म्हणाले...
डॉक्टर पुन्हा एकदा स्मितहास्य देत म्हणाले "कोणत्याही प्रकारचे पापकर्म न करणे व सर्व प्रकारचे कुशलकर्म करणे अशी शिकवण देणाऱ्या तथागताचा मी उपासक आहे...आता तुम्ही शांत व्हा व समस्त प्राणिमात्राविषयी मैत्रिभावना करा... मी माझे पुर्ण प्रयत्न करतो..."
आणि असे म्हणत डॉक्टर ऑपरेशन थिएटर मध्ये गेला तसे वडिल त्या डॉक्टरकडे रागातच पहात राहिले आणि काही तासांनंतर डॉक्टर आनंदात बाहेर आले आणि त्या मुलाच्या वडिलांना म्हणाले "अभिनंदन ऑपरेशन यशस्वी झालं...तुमच्या पुण्यकर्माचे फळ व आमचे प्रयत्नांनी मुलाचे प्राण वाचले"
त्यावर मुलाच्या वडिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला...त्यांनी डॉक्टर ना धन्यवाद दिले.. डॉक्टरांनी त्याना काहीही प्रतिक्रिया दिली नाही आणी ते तसेच तिथुन ताडकन निघुन गेले...
यावर मग श्रीमन्तीचा पडदा पडलेल्या वडिलांना आश्चर्य झाला आणि ते शेजारी उभ्या असलेल्या नर्सला रागात म्हणाले "किती गर्विष्ठ आणि माजोरा आहे हा डॉक्टर"
त्यावर ती नर्स रडत म्हणाली "त्या डॉक्टरांचा मुलगा काल अपघातात वारला... आज ते त्याचा अंतिम संस्कार करत होते जेव्हा आम्ही त्यांना तुमच्या मुलाच्या ऑपरेशन साठी फोन केला... आणि ते स्वतःच्या मुलाचा अंतिम संस्कार अर्धवट सोडुन घाईने तुमच्या मुलाच्या ऑपरेशन साठी आले आणि आता अंतिम संस्कार पुर्ण करण्यासाठि पटकन गेले... अहो ज्यांचा स्वतःचा एकुलता एक मुलगा मेला तो काय गर्व आणि माज करणार?"
हे ऐकुन त्याच्ये वडिल सुन्न झाले..आणि त्यांना खुप पश्चाताप झाला...
सबक- कधीच कुणाबद्दल काहीही बोलुन मोकळे होऊ नये कारण तुम्हाला नसतं माहित त्याने काय भोगलय...
जर हा मजकूर वाचून मनाला थोडंसं तरी पटलं असेल तर नक्कीच विचार करा आणि ह्याविषयी इतरांना कळवा . .
हा संदेश संपूर्ण महाराष्ट्रात पोहचवा . . . जसा मी तुमच्या पर्यंत पोहचवला त्याप्रमाणे
धन्यवाद
पैसा सर्वच नसतो, माणुसकी जपा
उल्हास हरी जोशी, मोः-9226846631
( श्री. पांडुरंग बबन मोरे यांच्या सौजन्याने)
अंबाणी दादांच्या महालाची फार चर्चा होत असते. त्या चर्चेमुळे आग्य्रातील ताजमहल आणि वाशिंग्टन येथील व्हाईट हाऊस हे राजवाडे कम महाल फिके पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवाय या दोन्ही महालांची नव्हाळी कमी झालेलीच आहे. ताजमहलाचं दर्शन बिल क्लिंटन पासून ते बाबूराव कोटलवार आणि मिशेलवहिनी ओबामा पासून मंगलाताई ओतारे यांच्यापर्यंत कुणीही,कधीही घेऊ शकतात.
सत्तावीस नक्षत्रांपैकी 17 व्या क्रमांकाचे हे नक्षत्र. अनुराधा हे नावच स्त्रीलिंगी आहे. या नक्षत्रावर जन्मलेली व्यक्ती ही मातृत्व जागरूक आणि जागृत असलेली असते. मृदू स्वभावाच्या या नक्षत्रावरील जन्मलेल्या व्यक्ती या पृथ्वीतत्त्वाचा असल्यामुळे यांनी शीतरंग हे वस्त्र प्रावरणाच्या रंग निवडीत अधिक प्रमाणात उपयोगात आणावेत. निळा मोरपंखी हिरवा हॅलो आकाशी लीफ ग्रीन आणि कधीतरी सप्ताहातून एखादे वेळेस लालसर नारिंगी रंगांचे कपडे उदाहरणार्थ पंजाबी, टॉप, साडी, नाईटी, गाऊन इत्यादी हे महिलांसाठी तर पुरुषांनी टी-शर्ट, शर्ट, जब्बा, नेहरू शर्ट, इत्यादी वापरात आणावे. ब्राउन किंवा तपकिरी हा रंग ही यांच्यासाठी लॉटरी सारखे फळे देणारा ठरतो.
भाताच्या ढिगाप्रमाणे या नक्षत्राचा अवकाशात दिसणारा आकार आहे. चार तारे या नक्षत्रात दिसतात. वृश्चिक राशीच्या व्यक्तींचा नक्षत्र अनुराधा असते. अशा व्यक्तींनी डाळिंब हे फळ खाण्यामध्ये नियमित ठेवावे. म्हणजे वृश्चिकेचा एक गुण जो इतरांना न परवडण्यासारखा असतो तो जरा कमी कमी होईल. या व्यक्ती शक्यतोवर कठीण शब्द बोलताना वापरत नाहीत. मात्र समोरच्या व्यक्तीच्या बाबतीतील कुठल्याही कारणासाठीची सहनशक्ती संपुष्टात आल्यावर या व्यक्ती एखादे वाक्य अगदी शब्द देखील,वृश्चिकेच्या डंख मारण्याप्रमाणे वापरतील की, समोरची व्यक्ती बेजार वा घायाळ होऊन जाते. या नक्षत्रासाठी अग्नेय दिशा भारत चांगली. ज्या वास्तूत या व्यक्ती वास करतात, त्या वास्तू बरोबर या व्यक्तींची घट्ट मैत्री जमते. कारण वास्तुपुरुष देखील अग्नेय दिशेला असतो.
या नक्षत्राची देवता मित्र असून नागकेशर हा आराध्यवृक्ष आहे. ओम मित्राय नमः हा जप कुलस्वामी कुलस्वामिनी जपानंतर १०८ वेळा म्हणाल्यास अशा व्यक्तींना परिस्थितीवर मात करण्यासाठी पर्यायी मार्ग (सोल्युशन/सोलूशन)आपोआप मिळते. नागचाफा या आराध्यवृक्षाशिवाय बकुळ/केवडा हेही आराध्याचे उपवृक्ष म्हणून योजलेले आहेत.
आपण आपल्या देवतांचे वा प्रियजनांची छायाचित्रे वा फोटो जवळ ठेवतो त्याप्रमाणे आपल्या आराध्य वृक्षाचा फोटो देखील या व्यक्तीने जवळ ठेवल्यास यांना आणखी जादुई परिणामांचा अनुभूती येतील. ऑगस्ट ते ऑक्टोबर हा इंग्रजी महिन्यांचा काळ या नक्षत्र धारकांसाठी सुगीचा काळ असतो. म्हणजे बारा महिन्यांपैकी या महिन्यांच्या काळात या व्यक्तींनी कुठलाही निर्णय घेतला तर त्याचे फळ हे मिळतेच. नागकेशराला वर्षातून जशी दोन वेळा फुले येतात त्याच प्रमाणे या व्यक्तीही वर्षातून किमान दोन वेळा आनंदी जीवनाचा अनुभव घेतात.
मित्र पद्मासनारुढं अनुराधेश्र्वरं भजे ।
शूलां कुशल सद्षांहूं युग्यंशोणित वर्णकम् । हा मंत्र जप या व्यक्तींनी म्हटल्यास अधिक उत्तम. शिवाय
अनुराधाधियोमित्रः आयुष्योवर्धकस्तथा ।
सर्वारिष्ट विनाशाय मित्रायच नमो नमः ।। हा जप देखील या व्यक्तींनी केला तर पीडा हरण होतील म्हणजे नष्ट होतील. या नक्षत्रावर जन्मलेली व्यक्ती दयाशील, बुद्धिवान, प्रवासी, अल्प पुत्रवान, शांत आणि स्त्रियांसाठीहे नक्षत्र अधिक चांगले गुण देते जसे उत्तम मैत्री, मैत्रिणी देते, अभिमान नसणारी प्रसन्नता देऊनसर्वांना मान्य असणारे व्यक्तिमत्त्व देते. गुरुभक्ती सह या नक्षत्रावरील स्त्रिया या अखंड सौभाग्य प्राप्त करणाऱ्या असतात.
सर्वांची काळजी घेणाऱ्या या नक्षत्रावरील स्त्रियांची काळजी मात्र स्वतःलाच घ्यावी लागते. वरील रंगांबरोबरच यांनी सोनेरी आणि पांढरा तसेच चंदेरी रंग ही उपयोगात आणण्यास हरकत नाही.
शुभम भवतु
- गजानन सिताराम शेपाळ.
होणार तर होऊ द्या
आमचा काही तंटा नाही.
तुमच्या भव्य स्वप्नांपुढे
आमची काही नकार घंटा नाही.
पण लक्षात ठेवा………
महाराष्ट्रातले वेगवेगळ्या प्रकारचे शाकाहारी लोक..
पुराणकालीन रामसेतू आख्यायिकेतील काल्पनिक भाग नसून नैसर्गिक चमत्कार आहे, भूगर्भातील चमत्कारिक संसाधनांचा वापर करून नल व नील या वानरांच्या(वनात राहणारे नर)सहकार्याने प्रभू श्रीरामचंद्राने बांधलेला सेतू होय. समुद्राच्या तळाशी बुडालेल्या रामसेतूच्या अस्तित्वाची साक्ष देणारे कितीतरी पुरावे भारतात आहेत. रामसेतू हा संशोधानाचा भाग आहे. अश्याच काही पुराव्यांचा मागोवा घेणारा हा लेखप्रपंच….
माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर यांनी राज्य शासनाच्या महान्यूज या पोटर्लला दिलेली मुलाखत खास मराठीसृष्टीच्या वाचकांसाठी.
मराठी अर्वाचीन कादंबरीचे जनक' अशा शब्दांत ज्यांचे वर्णन होते अशा हरी नारायण उर्फ ह. ना. आपटे यांचा जन्म ८ मार्च १८६४ रोजी झाला.
भारतातील कंपनी सरकारचे राज्य खालसा होऊन ब्रिटिश सरकारची सत्ता प्रस्थापित झाल्यानंतर प्रतिभावंतांची जी पहिली पिढी जन्माला आली, त्यात ह. ना. आपटे यांचा समावेश होता.
हरी नारायण आपटेंनी कथा, स्फूट लेखन, कविता, कादंबरी, नाटक व पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांत मर्दमुकी गाजवत आपले नाव प्रतिभेच्या सर्व दालनांवर सुवर्णाक्षरांनी कोरले. 'करमणूक' या त्या काळात वाचकप्रिय झालेल्या मासिकाची स्थापना त्यांनी केली व त्याचे ते काही काळ संपादकही होते. ज्ञान प्रकाश या मासिकाचेही त्यांनी काही काळ संपादन केले व आनंदाश्रम ही प्रकाशनसंस्था चालवली. प्रख्यात महिलांची माहिती देणारे 'स्त्रीरत्ने' हे सदर त्यांनी बराच काळ लिहिले. त्यात त्यांनी लीलावती, राणी दुर्गावती अशा कर्तृत्ववान महिलांची ओळख वाचकांना करून दिली.
कै. गोविंद बल्लाळ देवल यांचे सुप्रसिद्ध `संगीत शारदा' हे नाटक मा.ह. ना. आपटेंनीच प्रकाशात आणले व केशवसुतांची कविताही त्यांनीच प्रयत्नपूर्वक लोकप्रिय केली.
अकोल्यात झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांना लाभले. त्यावेळी अध्यक्षपदावरुन त्यांनी केलेले भाषण बरेच गाजले. या भाषणात त्यांनी नवमराठी साहित्याचा पुरस्कार करून मराठी वाङमय जीवनस्पर्शी असलेच पाहिजे या भूमिकेचा पुरसकार केला. ह. ना. आपटेंनी अनेक पुस्तकांना प्रस्तावनाही लिहिल्या. मा.ह. ना. आपटेंनी साहित्याच्या अनेक प्रांतांत मुशाफिरी केली असली, तरी ते गाजले त्यांच्या कादंबरी लेखनामुळेच. बारा सामाजिक व अकरा ऐतिहासिक कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. त्या सर्वच लोकप्रियही झाल्या. पण त्यांचे नाव आजतागायत गाजत राहिले, ते त्यांच्या 'पण लक्षात कोण घेते?' या कादंबरीमुळे. ही कादंबरी मराठी साहित्याच्या वाटचालीतील मैलाचा दगड बनून राहिली. त्यांच्या लिखाणावर महादेव गोविंद रानडे व गोपाळ कृष्ण गोखले या सुधारणावादी नेत्यांचा प्रभाव होता. त्यामुळे त्यांच्या लिखाणाचा गाभाही समाजाला शहाणे करून सोडण्याचाच होता.
ह. ना. आपटेंचा इंग्रजी भाषेचा अभ्यास दांडगा होता. त्यामुळेच त्यांनी शेक्सपियर व्हिक्टर ह्युगो, कॉग्रेव्ह, फ्रेंच नाटककार मोलियर यांच्या नाटकांची रुपांतरे मराठीत आणली. मेडोज टेलर याच्या दोन गाजलेल्या कादंबऱ्यांची 'तारा' व 'पांडुरंग हरी' ही रुपांतरे त्यांनी प्रकाशित केली. निबंधकार विष्णूशास्त्री चिपळूणकर हे ह. ना. आपटेंचे लेखनातील आदर्श. शास्त्रीजींच्या मृत्यूनंतर त्यांनी 'शिष्यजनविलाप' ही ऐंशी श्लोकांची विलापिका लिहिली. त्यांनी वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी 'केसरी'मध्ये त्यांनी भवभूती व कालिदास यांच्यासंदभांत टीकात्मक लेखन केले. हे लेखन त्यांनी 'बिचारा' या टोपण नावाने केले होते.
ह.ना.आपटे यांचे ३ मार्च १९१९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ : इंटरनेट
Copyright © 2025 | Marathisrushti