(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • संत ज्ञानेश्वर (१९४०)

    संत ज्ञानेश्वर हा चित्रपट १९४० रोजी प्रदर्शित झाला. अमेरिकेतील चित्रपट महोत्सवात दाखवण्यात आलेला हा पहिला भारतीय चित्रपट ठरला. १९७२ रोजी मुंबई दूरदर्शनच्या माध्यमातून दाखवण्यात आलेला दूरचित्रवाणीवरील हा पहिला मराठी चित्रपट होय..

  • चिरविजय भारतीय स्थलसेना

    वाचकांना स्थलसेनेची रचना, कार्य आणि उपलब्धींबद्दल सर्वंकष माहिती दिली आहे. स्थलसेने बद्दल ची सर्व माहिती वस्तुत: देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे आणि त्याचमुळे या विषयात स्वारस्य असणाऱ्या तसेच अजाणतेपणानी इंडियन आर्मी आणि इंडियन आर्मड कोर्सेस यांच्यात गल्लत करणाऱ्या वाचकांना भारतीय स्थलसेनेच्या गौरवशाली इतिहास आणि वर्तमानबद्दल माहिती देण्यात हे पुस्तक सफल झाले आहे.

  • आहेर आणि अभिनंदनाच्या आणखी काही तऱ्हा !

    3 L 03विशेष निमित्ताने विविध वयाच्या आणि नात्याच्या माणसांना शुभेच्छा देण्याचा कल आता वाढतोच आहे. पैशांना काही मोलच राहिले नाही. कितीही पैसे खर्च केले तरी आपल्याला आणि उत्सवमूर्तीला विकत घेतलेली वस्तू आवडेलच याचा नेम नसतो. मग "हटके " असे काही द्यावे असे वाटते.त्यासाठीच मी अलीकडेच काही वेगळ्या वस्तू बनवून दिल्या त्याची ही थोडी झलक !

    फक्त महत्वाचे म्हणजे हे काम मिरवून कौतुक करून घेण्याचे आता माझे वय नाही आणि तो उद्देशही नाही. पण याआधी मी जेव्4 L 04हा अशी माहिती शेअर केली तेव्हा अनेकांनी तशा वस्तू स्वत: बनवून आनंद घेतला. त्यावरून आपल्याला आणखी चांगल्या वस्तू सुचल्याचे कळवले. कांही मुलींनी सुट्टीत अशा वस्तू बनवून विकल्या आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी मदत जमवली. आनंद वाटण्याचा एवढाच माझा उद्देश आहे .2 L 02

    मला आईवडिलांसारखे असलेल्या परांजपे दांपत्याने नुकताच लग्नाचा साठावा वाढदिवस साजरा केला.त्यांच्यासाठी 5 L 05मुंडावळ्यांचा ६० आकडा तयार करून सजविलेले पाकीट मलाच भरभरून आशीर्वाद देऊन गेले. ऑफिसमधील एका चेनस्मोकर मित्राला त्याच्या वाढदिवसाला जाड कार्डबोर्डची सिगारेट बनवून त्यात पुष्पगुच्छ अडकवून दिला. देताना अशा शुभेच्छा दिल्या की पुढच्या वाढदिवसापर्यंत मधली ही सिगारेट कायमची जाऊ दे आणि मला थेट पुष्पगुच्छ देता येऊ दे ! एका वकील मित्राला " ऑर्डर ऑर्डर "वाल्या हातोड्यात घालून पुष्पगुच्छ दिला.नुसता नारळ देतांना त्याला जर एखादी नक्षी6 L 06दार लेस बांधून दिली तर त्याचे मोल वाढते. ५००/६०० रुपयांचा खरा पुष्पगुच्छ २ /३ दिवसात फेकून द्यावा लागतो.पण हंस / बदकाच्या आकाराच्या टोपल्यात सजवून दिलेला कृत्रिम फुलांचा गुच्छ कांही वर्षे आपली आठवण ठेवतो.

    एकाच गुच्छाला दोन मुठी ठेवून बनविलेला गुच्छ हा लग्नाच्या रौप्य महोत्सवासाठी ! तोपर्यंत संसार ही २ मुठींची तलवार नाही हे पटलेले असते.

    --मकरंद करंदीकर.

  • राहुल गांधींची स्टंटबाजी

    राहुल गांधींना उत्तर प्रदेशात अटक म्हणजे, राजकुमार आता प्रसिद्धीसाठी स्टंटबाजी कशी करायची याचे प्रॅक्टीकली धडे गिरवीत आहेत याचे एक उत्तम उदाहरण आहे. तसे पाहायला गेले तर राजकुमारांना आणि त्यांच्यासोबत असलेले त्यांचे राजकीय गुरु दिग्विजयसिंह आणि रीटा बहुगुणा, राजबब्बर या हाय प्रोफाइल राजकीय नेते मंडळीना प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या समस्येबाबत किती कळवळा आहे?

  • मुंबई – एक अस्वच्छ शहर आहे का ?

    जगातील अस्वच्छ शहरांच्या यादीत मुंबईचे नाव असल्याचे कोठेतरी माझ्या वाचनात आले आणि माझे मन बेचैन झाले.

  • फुगा फुटायची वेळ

    अरविंद केजरीवाल यांची स्थिती बैलाएवढा होण्यासाठी फुगणार्‍या बेडकाप्रमाणे झाली आहे. भ्रमाचा हा फुगा फुटण्याची वेळ आता आलेली आहे. भ्रष्टाचाराविरुद्धच्या आंदोलनातून अण्णा हजारे बाजूला झाले, तशी त्यांची जागा घेण्याचा प्रयत्न केजरीवाल यांनी चालवला असला तरी त्यांचे ते आंदोलन दिशाहीन भरकटताना दिसू लागले आहे.

    श्री. परेश प्रभू
    संपादक, नवप्रभा

  • पिंपळाच्या पानावर विराजमान झालेले श्री गणेश…….

    चित्रकार कै कमलाकांत राजे यांच्या कुंचल्यातून साकार झालेल्या श्री गणरायाच्या चित्रमय आविष्कारांना घेउन येत आहोत खास गणेशोत्सवाच्या निमित्ताने. श्री गणेश ही एकच संकल्पना घेउन १०० हून जास्त, अप्रतिम कलाकृती त्यांच्या कुंचल्यातुन साकारल्या. या कलाकृती इ-बुकच्या माध्यमातून मोफत डाउनलोडसाठी उपलब्ध आहेत.

  • मार्लेश्वरची यात्रा

    सह्याद्रीच्या उंच कडय़ांच्या कुशीत वसलेले शंकाराचे स्वयंभू देवस्थान श्री क्षेत्र मार्लेश्वर हे महाराष्ट्रातील पवित्र देवस्थान आहे. हे अतिशय प्राचीन देवस्थान आहे. दरवर्षी संक्रातीला लाखो भक्त देवरुखजवळील मार्लेश्वराच्या यात्रेला जमतात. विशेष म्हणजे, त्यादिवशी मार्लेश्वराचे शुभमंगल साजरे केले जाते.(या वर्षी हा योग १४ जानेवारी ला आहे) मारळ या गावचा देव म्हणजे मार्लेश्वर. भगवान परशुरामाने मारळच्या देवस्थानाची स्थापना केली, असे सांगितले जाते. आणेराव साळुंके हा आंगवलीचा सरदार १८०० मध्ये शिकारीला गेला असता त्याला गुहेमध्ये शंकराचे दर्शन झाले. तोच हा मार्लेश्वर. ज्यादिवशी मार्लेश्वराचा शोध लागला तो दिवस मकर संक्रांतीचा होता. म्हणून संक्रांतीला मार्लेश्वराचा उत्सव साजरा होतो.

    त्यादिवशी साखरपा या गावातील गिरिजादेवी या देवीला मिरवत मार्लेश्वराच्या विवाहासाठी आणले जाते. आंगवली या गावात मार्लेश्वर प्रकट झाला म्हणून तेथील लोक चांदीचा मुकुट या सोहळ्यासाठी आणतात. अनेक गावांतून मार्लेश्वरला पालख्या येतात. देवरुख येथील श्री देव व्याडेश्वर हे यजमानी असतात. हा लग्नसोहळा मोठय़ा थाटात पार पडतो. त्यानंतर ठिकठिकाणच्या पालख्या व दिंडय़ा येतात. या दिंडय़ा श्री मार्लेश्वराच्या करवल्या होतात. या यात्रेसाठी अन्नछत्र चालवले जाते. अतिशय रमणीय निसर्ग लाभलेल्या या ठिकाणी आलेला माणूस तहानभूक विसरून आजूबाजूच्या सुंदर परिसराचा व हिरव्यागार वनराजीचा आस्वाद घेण्यातच दंग होतो. उंचच उंच डोंगर, मधूनच वाहणारी बावनदी, हिरवीगार झाडी.. हे सर्व पाहून प्रवासात आलेली मरगळ दूर होऊन मन प्रसन्न होते. येथून चालताना सभोवतालचे सृष्टीसौंदर्य व हिरवीगार वनराजी पाहून व या सर्वाचा आस्वाद घेत असतानाच आपण देवळाजवळ केव्हा पोहोचतो ते कळतच नाही.

    शंकराचे हे स्वयंभू देवस्थान संगमेश्वर तालुक्यातील देवरुख गावापासून 18 कि.मी. वर आहे. शंकराचे निस्सीम भक्त मार्लेश्वरची फेरी सहसा चुकवत नाहीत. मार्लेश्वरचं वैशिष्ट्य म्हणजे इथे नास्तिक मंडळीही रमतात. याचं कारण म्हणजे इथला रम्य निसर्ग. पावसाळ्यात इथला धबधबा रौद रूप धारण करतो. परंतु त्याचं ते रूपही मनाला भावतं. भाविक मंडळी शंकराचं दर्शन घेऊन तृप्त होतात तर निसर्गप्रेमींना इथे आगळीच भेट मिळते. म्हणूनच मार्लेश्वर हे ठिकाण लोकप्रिय आहे.

    मार्लेश्वर. भगवान शंकराचं मंदिर आणि नजिकचा धबधबा यामुळे आस्तिकांबरोबरच नास्तिकही इथे आवर्जून येतात. संगमेश्वर रेल्वेस्थानकापासून ३८ कि.मीटर अंतरावर आहे. देवरूख समुद्रसपाटीपासून उंच असल्यामुळे इथला बराचसा भाग ओसाड भासतो. मात्र पावसाळ्यात हाच परिसर घनदाट झाडांनी वेढला जातो. लांबवर पसरलेल्या सह्यादीचं दर्शन रस्त्यावरून जाताना होतं. देवरूख गावं मागं पडलं की काही मिनिटांतच आपण मार्लेश्वरला पोहोचतो. सह्यादीच्या उंच पर्वतांच्या तुलनेत मालेर्श्वरचा डोंगर एका दमात चढण्याइतपतच उंच आहे. डोंगर किंवा ब्रीज चढून गेल्यावर डोंगर पोखरून गुहा तयार केलेली दिसते. गुहेची उंची खूपच कमी असल्यामुळे वाकून आत प्रवेश करावा लागतो. आत गेल्यावर मिट्ट काळोखात समईच्या प्रकाशात मार्लेश्वराची पिंड आणि मूर्तीचं दर्शन होतं. असं सांगितलं जातं की या गुहेत एकही विजेचा दिवा टिकत नाही. अनेकांनी इथे विजेचा दिवा लावण्याचा प्रयत्न केला. पण प्रत्येक वेळेस तो असफल ठरला असं इथले पुजारी सांगतात. त्यामुळे इथे बॅटरी, मेणबत्ती किंवा कंदिल घेऊनच यावं लागतं. मेणबत्तीने गुहेच्या कपारीत निरखून पाहिल्यास बरेच साप दिसतात. परंतु आजवर कुणालाही सापाने चावल्याचं ऐकण्यात आलेलं नाही.

    मार्लेश्वराच्या मंदिरानंतर डोंगराची सपाटी संपते. इथल्या सपाट भागाला लागूनच खाली घळी आहे. मंदिरातून बाहेर आल्यावर समोर पांढराशुभ्र धबधबा आपल्याला खुणावतो. घळीत उतरून या धबधब्याकडे जाता येतं. इतर मोसमात तुम्ही या धबधब्याच्या पाण्यात खेळू शकता. पण पावसाळ्यात मात्र त्या घळीत उतरणंही कठीण होतं. गुळगुळीत दगड आणि डोंगरकपारीतून वाहणारा तो शांत धबधबा अचानक उग्र रूप धारण करतो. आता ब्रीजवर उभं राहून पावसाळ्यातही जवळून धबधब्याचे बोचरे तुषार अंगावर घेण्याचा आनंद लुटता येतो. मार्लेश्वराच्या डोंगराला तिन्ही बाजूंनी डोंगरांनी वेढलं आहे. मार्लेश्वरचा परिसर पावसाळ्यात अधिक खुलतो. त्यावेळेस तर इथे निसर्गप्रेमींनी आवर्जून यावं. त्याचबरोबर इतर दिवसांमध्येही मार्लेश्वरला आवर्जून भेट द्या. निसर्गाची भिन्न रूपं आपल्याला अनुभवायला मिळतात.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- विकिपीडिया

  • मंगेश पाडगावकरांच्या जन्मदिवसानिमित्त त्यांचे कवितावाचन…

    कवी मंगेश पाडगावकर यांचा जन्म १० मार्च १९२९ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे झाला. आज त्यांचा जन्मदिवस. त्यानिमित्त त्यांच्या कवितांचं वाचन त्यांच्याच आवाजात ऐकूया.

    https://www.youtube.com/watch?v=VmhjVAiICzU

    मंगेश पाडगावकरांचा जीवनपट वाचण्यासाठी क्लिक करा...

  • इकोफ्रेंडली होळी रंगपंचमी

    आतापर्यंत होळी आणि रंगपंचमी कशी साजरी होत आली आहे ते आपण बघत आलो आहोत. पण सध्या राज्यात दुष्काळ आहे पाण्यासाठी गावागाडील लोकांना वण वण भटकावे लागत आहे म्हणून त्यावर एक विचार कवितेतून.