एक वेगळा पौष्टिक खाद्यपदार्थ
मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे आणि मुंबईतले ५५ पूल बांधल्यावर तिथे जो टोल नावाचा राक्षस ऊभा झाला तो त्यानंतर शांत झालाच नाही. आता महाराष्ट्रात टोल संस्कृती चांगलीच रुजलेय. कोणी कितीही ओरडलं तरी टोल बंद होण्याची शक्यताच नाही. नव्या सरकारला सहा महिन्यातच याची प्रचिती आली आणि आता तर त्याची कबुलीच सरकारने दिली.
सर्व सामान्य नागरिकांना नेहमीच संभ्रमात टाकणारा विषय म्हणजे वारस विषयक कायद्यातील तरतुदी. ह्या तरतुदी अत्यंत किचकट असून भारतात हिंदूंसाठी (बौद्ध, शीख, जैन, ब्राह्मण समाज,आर्यसमाज, नंबुद्री, लिंगायत) ‘हिंदू वारसा कायदा’, मुस्लिमांसाठी‘मुस्लिम वारसा कायदा’ तर पारसी, ख्रिश्चन, अंग्लो इंडियन आणि इतर सर्व धर्मियांसाठी ‘भारतीय वारसा कायदा’ यातील तरतुदी पहाव्या लागतात.
आज सुमारे 10 वर्षांनंतर सुद्धा ब्राझील सफरीवरील अमेझॉन नदीची विशालता तिचे अप्रतिम निसर्ग सौंदर्य आणि सृष्टी आजही डोळ्यासमोर जशीच्या तशी उभी राहते. ऑब्रिगडो म्हणजे धन्यवाद आणि अमिगो म्हणजे मित्र हे दोन पोर्तुगीज शब्द पण कायम लक्षात राहिलेत.
रॉक्सी सिनेमा हे कॅनडामधील जुन्या चित्रपटगृहांपैकी एक सिनेमागृह आहे. तसं पहायला गेलो तर कॅनडात Ice Hockey, Niagara Falls सारख्या अनेक प्रसिद्ध गोष्टी आहेत पण इथली नाट्यगृह, चित्रपटगृह एका वेगळ्याच धाटणीने बांधलेली असतात. अशा चित्रपटगृहात चित्रपट पहायला मजा का नाही येणार?
माझा मोठा भाऊ सुरेश त्याच्या दोन मित्रांना घेऊन कुठल्यातरी नाटकातले संवाद सादर करायचा. घरातल्या हॉलमध्ये आईच्या काही नऊवारी साड्या किंवा रोज वापरायच्या चादरी इकडे तिकडे लटकावून त्यांचं स्टेज तयार व्हायचं. आम्ही बाल गोपाळ , मित्रमंडळी हे सगळे त्यांचे प्रेक्षक असायचो.
Hinduja हॉस्पिटलमधुन एका डॉक्टरला ऑपरेशन साठी कॉल आला... खुप घाई करून तो डॉक्टर हॉस्पिटल मध्ये पोहोचला... त्याने पटकन सगळ्या नर्सला ऑपरेशनची तयारी करण्यास सांगितले, स्वतःचे कपडे बदलले, आणि पटकन ऑपरेशन थिएटर जवळ आला...
तिथे त्याने पाहिले की एका मुलाचे वडिल , जे कि वडिलोपार्जित गर्भश्रीमंत होते ते हॉल बाहेर रागात चकरा मारताय आणि डॉक्टर ची वाट पाहताय...
डॉक्टरांना पाहताच त्या मुलाच्या वडिलाचा पारा चढला व ते रागातच डॉक्टर ला म्हणाले
"तुम्ही इथे यायला इतका वेळ का घेतला? तुम्हाला कळत नाही का माझ्या मुलाचे प्राण धोक्यात आहे ते? तुम्हाला काही जबाबदारी ची जाणिव आहे की नाही?"
यावर डॉक्टर स्मितहास्य देत म्हणाला "मला माफ करा, मी हॉस्पीटल मध्ये नव्हतो, मी फोन आल्यानंतर जितक्या लवकर येता आले तितक्या लवकर आलो, आणि आता मी प्रार्थना करतो की तुम्ही शांत व्हा.. मला माझ काम करू द्या"
"शांत व्हा??” वडील म्हणाले , “जर तुमचा मुलगा आता ऑपरेशन थिएटर मध्ये असता तर?? जर तुमचा स्वतःचा मुलगा आता मृत्यु च्या जबड्यात असता तर तुम्ही काय केल असतं??" वडील रागात म्हणाले...
डॉक्टर पुन्हा एकदा स्मितहास्य देत म्हणाले "कोणत्याही प्रकारचे पापकर्म न करणे व सर्व प्रकारचे कुशलकर्म करणे अशी शिकवण देणाऱ्या तथागताचा मी उपासक आहे...आता तुम्ही शांत व्हा व समस्त प्राणिमात्राविषयी मैत्रिभावना करा... मी माझे पुर्ण प्रयत्न करतो..."
आणि असे म्हणत डॉक्टर ऑपरेशन थिएटर मध्ये गेला तसे वडिल त्या डॉक्टरकडे रागातच पहात राहिले आणि काही तासांनंतर डॉक्टर आनंदात बाहेर आले आणि त्या मुलाच्या वडिलांना म्हणाले "अभिनंदन ऑपरेशन यशस्वी झालं...तुमच्या पुण्यकर्माचे फळ व आमचे प्रयत्नांनी मुलाचे प्राण वाचले"
त्यावर मुलाच्या वडिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला...त्यांनी डॉक्टर ना धन्यवाद दिले.. डॉक्टरांनी त्याना काहीही प्रतिक्रिया दिली नाही आणी ते तसेच तिथुन ताडकन निघुन गेले...
यावर मग श्रीमन्तीचा पडदा पडलेल्या वडिलांना आश्चर्य झाला आणि ते शेजारी उभ्या असलेल्या नर्सला रागात म्हणाले "किती गर्विष्ठ आणि माजोरा आहे हा डॉक्टर"
त्यावर ती नर्स रडत म्हणाली "त्या डॉक्टरांचा मुलगा काल अपघातात वारला... आज ते त्याचा अंतिम संस्कार करत होते जेव्हा आम्ही त्यांना तुमच्या मुलाच्या ऑपरेशन साठी फोन केला... आणि ते स्वतःच्या मुलाचा अंतिम संस्कार अर्धवट सोडुन घाईने तुमच्या मुलाच्या ऑपरेशन साठी आले आणि आता अंतिम संस्कार पुर्ण करण्यासाठि पटकन गेले... अहो ज्यांचा स्वतःचा एकुलता एक मुलगा मेला तो काय गर्व आणि माज करणार?"
हे ऐकुन त्याच्ये वडिल सुन्न झाले..आणि त्यांना खुप पश्चाताप झाला...
सबक- कधीच कुणाबद्दल काहीही बोलुन मोकळे होऊ नये कारण तुम्हाला नसतं माहित त्याने काय भोगलय...
जर हा मजकूर वाचून मनाला थोडंसं तरी पटलं असेल तर नक्कीच विचार करा आणि ह्याविषयी इतरांना कळवा . .
हा संदेश संपूर्ण महाराष्ट्रात पोहचवा . . . जसा मी तुमच्या पर्यंत पोहचवला त्याप्रमाणे
धन्यवाद
पैसा सर्वच नसतो, माणुसकी जपा
उल्हास हरी जोशी, मोः-9226846631
( श्री. पांडुरंग बबन मोरे यांच्या सौजन्याने)
“लाय लाय लायेकरणी” हे असेच एक कोळीगीत. त्यात त्याकाळच्या वेगळ्या प्रदेशात राहाणाऱ्या कोळी बायकांच्या विशिष्ट वेषभूषेवरून, चाली रीती वरून, बोली भाषेवरून ती कोणत्या गावातील आहे हे ओळखता यायचे. ह्या गाण्यात त्याचेच वर्णन केले आहे. नीट ऐकाल तर त्यावेळच्या मुंबईत असणाऱ्या गावांची नावे (वेसाव, भांडुप, वरळी, दांडा, मालवणी, कुलाबा, शिवडी, शिव, वसई, कर्जत माहीम वगैरे) आपल्या कानावरून जातील.
श्री शिव भजन
लगान, चक दे इंडिया यासारख्या जोशभर्या चित्रपटातील रोमांच प्रत्यक्षात यावेत आणि अंगावर शहारे उमटावेत असंच काहीसं दिल्लीमध्ये राष्ट्रकुल स्पर्धांच्या निमित्ताने अनुभवायला मिळालं. नकारात्मक प्रचाराकडून अभूतपर्व ऐतिहासिक यशाच्या दिशेने वाटचाल करणारी या स्पर्धेची यशोगाथा एखाद्या चित्रपटाला साजेशी होती. या स्पर्धेमुळे भारताने क्रीडा महासत्ता बनण्याच्या दिशेने कूच केली असल्याचे जगाला पहायला मिळाले.
Copyright © 2025 | Marathisrushti