महाकवी कालीदासाची कथा कवन रूपात ५ भागात मांडली आहे.रसिक वाचकांनी जरूर वाचावी.
काँग्रेसी सरकार भ्रष्ट होते म्हणून मोदींचे सरकार निवडून दिले. त्याच्याही प्रत्येक निर्णयावर कथित बुद्धीजीवी तुटून पडताहेत.
आपण खरं म्हणजे खुश राहण्याची आपली क्षमता गमावून बसलोय. आपली सहनशक्ती जवळपास संपत आलीय. एखादा निर्णय झाल्याबरोबर त्याचे चांगले - वाईट परिणाम दिसण्याआधीच टीकेची झोड उठवली जाते. याच कारणांमुळे बर्याच नेत्यांनी कुठलाही निर्णय घेण्याची उत्सुकता दाखवली नाही. हा व्यक्ती किमान काही निर्णय घेवून काही जनताभिमुख सुधारणा आणण्याचा प्रयत्न तरी करतोय तर बुद्धीजिवी लोक विनाकारण भ्रष्टाचारी लोकांना अनावधानाने का असेना साथ देताना दिसताय. भ्रष्टाचारी लोकांना तर मोदी नकोच आहे.
पण इथे एक महत्त्वाचा मुद्दा आहे की, मोदी स्वतः पैसे खात नाही कुणाला खाऊ देत नाही. त्या माणसाने १२ वर्षे गुजरातचे नेतृत्व केले. विकासात पिछडलेला गुजरात सर्वात पुढे नेवून ठेवला. आज प्रत्यक्ष जावून बघा गुजरात मध्ये रस्ते आणि इतर प्राथमिक सुविधा इतर राज्यांच्या तुलनेत किती चांगल्या आहेत.
आता पंतप्रधान असतानाही तो व्यक्ती १४-१६ तास काम करतो, विदेश दौऱ्यात हॉटेलात न थांबता विमानात झोप घेतो, त्याने अडिच वर्षात सुटी घेतलेली नाही, त्याच्यावर कुठलाच व्यवहारात पैसे खाल्ल्याचा साधा आरोप नाही, स्वतःच्या किंवा कुणा नातलगाच्या नावे मालमत्ता घेतल्याचे आढळलेले नाही, कुठलाही नातेवाईक लाभाच्या पदावर नाही, मंत्रिमंडळात निवडून शक्य तेवढे जादा प्रामाणिक लोक नेमलेले आहेत. सगळे नातेवाईक चरितार्थासाठी १०-१५ वर्षापूर्वी करीत होते तिच नोकरी व व्यवसाय करताहेत, त्यांच्या आर्थिक स्थितीत लक्षणीय बदल दिसत नाही. असं यापूर्वी भारतात घडल्याचं मला तरी माहीत नाही, तरी आपण अशा व्यक्तीच्या प्रत्येक निर्णयावर तुटून पडत राहिलो तर आपण चांगला म्हणणार कुणाला?
आपण खुश आणि समाधानी कशाने होणार ? प्रत्यक्ष राम, कृष्ण किंवा शिवाजी जरी पंतप्रधान झाले तरी आपण टीकाच करणार का ? निर्णय घेताच चांगले-वाईट परिणाम दिसण्याआधीच टीका. उलट मी तर म्हणतो जनतेसाठी काहितरी करण्याची तळमळ असलेल्या अशा माणसाचा एखादा निर्णय चुकला तरी त्याच्या पाठिशी ठाम रहायला हवे, असे केले नाही तर भविष्यात कोणताही नेता जनकल्याणाच्या गोष्टीसुध्दा करणार नाही. सत्ता मिळाली की आपल्याच सात पिढ्यांचे कल्याण करुन मोकळा होईल. आजही ९९ टक्के लोक तेच करताहेत.
पण मध्यमवर्गीय बुध्दीजीवी लोकांनी आपली विचारसरणी बदलली नाही तर लवकरच पुन्हा परकिय राजवट किंवा असामाजिक विचारांचे लोक सत्ता बळकावून देशाचा बट्ट्याबोळ केल्याशिवाय राहणार नाहीत. धन्यवाद !
लेखक - डॉ. विवेक उपासनी, जळगाव.
[ कृपया लेख लेखकाच्या नावासह फॉरवर्ड करावा ]
आता नाही कुठे अंतराला ओल
कसा तरी व्हावा एकमेळ
वाढतो मी पान जेवतो न कोणी
माझीच कहाणी मी वाचतो
राशी :- तूळ
स्वामी :- शुक्र
देवता :- भगवान राम
जप मंत्र :- ॐ श्री रामाय नमः
उपास्यदेव :- दुर्गा देवी
रत्न :- हीरा
जन्माक्षर :- र रा ऋ री रि रु रू रेरो त ता तृ त्रा ति ती तु तू ते तूळ हा एक अंतराळातील तारका समूह आहे. बारा राशीतली ही एक ज्योतिष-राशी आहे. यावर शुक्र (ज्योतिष) ग्रहाचा अंमल आहे. तूळ रास कुंडली मध्ये ७ आकड्याने दर्शवतात. ही वायू तत्व असलेली रास आहे.चित्रा नक्षत्राचा तिसरा व चौथा चरण, स्वातीचे चारही चरण व विशाखाच्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय चरण मिळून ही राशी बनते. या व्यक्ती आकर्षक, सुंदर, प्रेमळ, कष्टाळू, सौंदर्यप्रेमी, न्यायप्रिय, आणि नीतिवान असतात.अंतःकरण जाणून घेण्याची हातोटी दिसून येते.
आज आपल्या देशात असे एकही क्षेत्र नाही, जेथे चीनने घुसखोरी केलेली नाही. साध्या सुईपासून ते महागातल्या महाग इलेक्ट्रॉनिक वस्तूपर्यंत आपण चिनी उत्पादनावर अवलंबुन आहोत. आपल्या संस्कृतीचा, जीवनपद्धतीचा अभ्यास करून टाकाऊ पण आकर्षक आणि कमी किमतीच्या वस्तू विक्रीस आणून चिनी ड्रॅगनने भारतीय बाजारपेठेला विळखा मारला आहे. चीनची भारतातील गुंतवणूक डोळे पांढरे करणारी आहे. त्यामुळे हा विळखा तोडायचा असेल तर सर्वात आधी आपल्याला सक्षम व्हावे लागेल.
अश्विन कृष्ण त्रयोदशीला धनत्रयोदशी असे म्हणतात. धर्मशास्त्रानुसार यमराजाला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी दीपदान केले जाते. या दिवशी घरातील अलंकार, सोने-नाणे स्वच्छ करतात.
मानवाच्या सतत वाढणाऱ्या लोकसंख्येसाठी राहायला आवश्यक जमीन, उद्योगधंद्यांना आणि इतर कामासाठी लागणारी जमीन, या वाढीव लोकसंख्येला पुरविण्यासाठी पिकवाव्या लागणाऱ्या अन्नासाठी आणखी जमीन, असा हा जमिनीवर अधिकाधिक अतिक्रमण करणारा विकास प्राण्यांसाठी, पक्ष्यांसाठी आणि वनस्पतींसाठी घातक ठरत आहे.
पद्मविभूषण हा भारतातील दुसर्या क्रमांकाचा नागरी सन्मान आहे. यामध्ये एक पदक आणि प्रशस्तीपत्र भारतीय राष्ट्रपतींच्या हस्ते दिले जाते.
जागतिक पाहुणचार
Copyright © 2025 | Marathisrushti