(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • मखमली शुद्ध कल्याण

    संध्याकाळ उलटत असताना, रात्रीचे रंग आकाशात पसरत असताना, कानावर "रसिक बलमा" ही काळीज चिरून टाकणारे शब्द येतात आणि डोळ्यातील उरलेली झोप पूर्णपणे उडून जाते!! गाण्याचा पहिल्याच आलापित अवघे स्वरशिल्प उभे करणारा तो अविस्मरणीय आवाज, पहिल्याच झटक्यात आपल्या मनात रुतून बसतो. "रसिक बालमा हाये, दिल क्युं लगाया, तोसे दिल क्युं लगाया" या ओळीतील पहिल्या "लगाया" वर जी भावनांची थरथर दाखवली आहे, ती शास्त्राच्या पलीकडची आहे!! बहुदा श्रुती शास्त्र त्याचे स्वरांचे थोडेफार विश्लेषण करू शकेल तरीदेखील तो नेमका झालेला परिणाम, शब्दापलीकडचा आहे आणि तो ऐकून "भोगावा" लागतो. त्याशिवाय, त्याची विखारी खुमारी जाणवणार नाही!!

    "रसिक बलमा, हाये दिल क्युं लगाया,
    जैसे रोग लगाया".
    या गाण्यात एक आणखी खास बात आहे. पहिला अंतरा सुरु व्हायच्या आधी जो वाद्यमेळ आहे, तो सतारीच्या सुरांनी सुरु होतो आणि त्याच्या पाठीमागे सारंगीच्या सुरांचे "अस्तर" आहे. सतारीचे सूर वरच्या सुरांत वाजत आहेत आणि सारंगीचे सूर किंचित ठाय लयीत तसेच मंद्र सप्तकात वाजत आहेत आणि ही स्वरांचा खेळ, काही क्षणांपुरता(च) आहे. लगेच व्हायोलिनचे सूर अवतरतात, ते वेगळ्या पट्टीवर!! अखेर मात्र, सुरवातीच्या सुरावर सतार येउन थांबते!! हा खेळ फार विलक्षण आहे. संगीतकार म्हणून शंकर/जयकिशन यांना या सांगीतिक वाक्यांशाचे संपूर्ण श्रेय द्यावेच लागेल. यात आणखी मजा म्हणजे हा जो वाद्यमेळ आहे, तिथे हा राग दूर सारलेला आढळतो पण तरीही परत चाल मुखड्याला अप्रतिमरीत्या येउन मिळते. सुगम संगीतात प्रयोग कसे करता येतात, याचे हे गाणे म्हणजे उत्तम उदाहरण ठरेल.
    शुद्ध कल्याण रागाची ओळख करून घेण्यासाठी या गाण्याकडे नि:संशयरीत्या बघता येईल. "भूप" रागाचा "तोंडावळा" दिसत असताना, "मध्यम" आणि "निषाद" स्वर किंचित अस्तित्व दाखवतात आणि हा राग पूर्ण वेगळा म्हणून अवतरतो. यात आणखी गंमत म्हणजे "भूप" राग सकाळचा मानला जातो तर "शुद्ध कल्याण" मात्र रात्रीचा पहिला प्रहर घेतला जातो. याचे मुख्य कारण हा राग पूर्वांगात भूप रागाशी नाते सांगतो तर उत्तरांगात यमन रागाशी. त्यामुळे, "औडव-संपूर्ण" या प्रकारात, हा राग येतो. "सा","रे","ग","प" हे स्वर आणि याचे संगती, यामुळे या रागाची वेगळी ओळख मनात ठसते.
    या रागावर भूप रागाची सावली इतकी आहे की पूर्वीच्या ग्रंथात,या रागाची ओळख "भूप कल्याण" या नावाने केलेली वाचायला मिळते. खरेतर या रागाचे आरोही स्वर आणि भूप रागाचे आरोही स्वर, यात सत्कृत्दर्शनी काहीही फरक नाही पण खरी गंमत इथेच आहे. स्वर लावण्याची पद्धत आणि कुठल्या स्वराला प्राधान्य द्यायचे, याचे नियम, यामुळे भारतीय रागदारी संगीत अतिशय गुंतागुंतीचे आणि त्याचबरोबर विलोभनीय झाले आहे.
    भारतीय रागदारी संगीतात, "धृपद-धमार" गायकी वगळल्यास, दोन भाऊ एकत्रितपणे गायन करताना फारसे आढळत नाही. राजन-साजन मिश्रा (कदाचित वडाली बंधू) याला अपवाद असावेत. दोन तंबोरे एकत्रित सुरात रुणझुणत असावेत त्याप्रमाणे या व्दयीचे गाणे जमते. एकाने हरकत घ्यावी आणि दुसऱ्याने त्या हरकतीचे दीर्घ तानेत रुपांतर करावे, हा खेळ तर हे दोघेजण फारच बहारीने करतात. गाण्यातील लय किती वेगवेगळ्या पद्धतीने घेता येते तसेच "वाकवता" येते, यासाठी तर यांचे गायन उद्मेखूनपणे ऐकावे.
    "सकल गुण निधी ध्यान" ही बंदिश जवळपास ५० मिनिटांची आहे म्हणजे या रागाचे सगळे वैभव आपल्याला या रचनेत बघता तसेच अनुभवता येईल. आलापीत लागलेला खर्जातील स्वर इतका विलक्षण आहे की आपण, त्या स्वराकडे एकटक "बघत" बसतो!! वर मी जी स्वरावली मांडली आहे, त्याचे नेमके प्रत्यंतर या रचनेत ऐकता येईल. प्रत्येक स्वर आणि त्या स्वराला जोडलेली हरकत, काही ठिकाणी अतिशय लोभसवाणी आहे. तसेच रचना अगदी, द्रुत लयीत सुरु होते तेंव्हा मध्येच एके ठिकाणी जो असामान्य "खर्ज" लावलेला आहे, तो खास ऐकण्यासारखा आहे.गायनात एखाद्या तानेत "खटका" घेऊन, त्या स्वराचे निराळेच सौंदर्य दाखवण्याची त्यांची शैली केवळ लाजवाब अशीच म्हणावी लागेल.
    प्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांनी अनेक अप्रतिम भजने गायली आहेत त्यातील एक रचना - "ओमकार प्रधान रूप गणेशाचे" ही रचना ऐकुया. संगीतकार कमलाकर भागवत यांची चाल आहे. लेखाचे नाव "मखमली शुद्ध कल्याण" असे जे मला द्यावेसे वाटले, ते या गाण्याच्या संदर्भात. गमतीचा भाग असा आहे, या गाण्याचे सूर बघितले तर यात, थोडा "भूप" आहे, थोडा "देसकार" आहे पण तरीही "शुद्ध कल्याण" राग या गाण्यात प्रकर्षाने आढळतो. खरतर चित्रपट गीते काय किंवा भावगीते काय, त्या गाण्याची चाल म्हणजे रागाची प्रतिकृती किंवा आराखडा नव्हे. अर्थात, याला अपवाद अशी काही गाणी असतातच.
    "ओंकार प्रधान रूप गणेशाचे,
    हे तिन्ही देवांचे जन्मस्थान".
    पारंपारिक भजनाचा ताल न वापरता वेगळ्याच ढंगाचा ताल वापरला आहे. "आकार तो ब्रह्म, ऊकार तो ब्रह्म" इथे मात्र राग दूर गेला आहे पण परत अंतरा संपताना, सूर मात्र नेमके जुळवून घेतले आहेत. सुमन कल्याणपूर इतकी सुरेल आवाजाची गायिका पण त्यामानाने तिच्या गायकीची "परीक्षा" घेणारी फारशी गाणी वाट्याला आली नाही, इतकेच नव्हे बहुतेकवेळा तिच्या आवाजाची तुलना लताबाईंच्या गायाकीशी होत गेली आणि बहुदा याच तुलनेच्या आग्रहापायी या गायिकेला मराठी चार भावगीते वगळता, फारशी संधी मिळाली नाही आणि गायनाचे तसे "चीज" झाले नाही.
    असेच एक गाणे इथे देण्यासारखे आहे. देशभक्तीवर आधारित गाण्यात "शुद्ध कल्याण" राग किती अप्रतिमरीत्या मिसळला आहे, हे बघण्यासारखे आहे. "जहां डाल डाल पर सोने की चिडिया" हेच ते गाणे. जवळपास, ७ मिनिटांचे गाणे पण ऐकताना, गायन, कविता आणि रचना, या सगळ्या बाबतीत गाणे कुठेही जरादेखील रेंगाळत नाही. केरवा तालात जरी गाणे सुरवातीला बांधले असले तरी पुढे त्यात अनेक ताल वापरले आहेत. गाण्यातील शब्दानुसार, गाण्याची चाल आणि ताल, बदलले आहेत आणि हे सगळे करत असताना, संगीतकार म्हणून हंसराज बहेल यांनी, गाणी फार खुबीने रंगतदार ठेवले आहे.
    "जहां डाल-डाल पर सोने की चिडियां करती है बसेरा,
    वो भारत देश हमारा,
    जहां सत्य, अहिंसा और धर्म का पग-पग लगता डेरा,
    वो भारत देश हमारा."
    मोहमद रफीचा मुळातला जोरकस, अतिशय सुरेल आवाज अशा गाण्यात फार विलक्षण खुलतो. सुरवातीचा संस्कृत श्लोक इतक्या वरच्या सुरात आहे की, तिथे गायकाचा "गळा" पोहोचणे, हीच मुळातली एक परीक्षा आहे. देशभक्तिपर गाण्यात नेहमी आवाजात एक जोरकस स्वर आवश्यक असतो, जेणेकरून शब्दातील भावना तितक्याच ओतप्रोतपणे रसिकांच्या मनात ठाण मांडून बसतील. अर्थात असे करताना, गाणे जरादेखील प्रचारकी वाटता कामा नये, ही काळजी जरुरीची असते अन्यथा सगळी रचना, एखाद्या पक्षाच्या जाहिरात वाटण्याची शक्यता असते. इथे, या गाण्यात ही सगळी व्यवधाने, संगीतकार म्हणून हंसराज बहेल यांनी फारच समर्थपणे सांभाळली आहे. हिंदी चित्रपट गीतांत अशी बटबटीत गाणी भरपूर सापडतात. त्यादृष्टीने बघता, हे गाणे इतके मोठे असून देखील अतिशय श्रवणीय झाले आहे. हिंदी चित्रपट संगीतात, हा प्रश्न मला बरेचवेळा पडलेला आहे. हंसराज बहेल सारखा प्रतिभावंत संगीतकार हाताशी असून, याला त्यामानाने फारशी संधी कधीच मिळाली नाहीत. हंसराज बहेलच्या मानाने निकृष्ट दर्जाच्या संगीतकारांना, इथे कितीतरी संधी मिळाल्या आहेत आणि संधी मिळून देखील त्याला वाया घालवलेल्या आढळतात. केवळ दैवगती, असेच फडतूस नाव द्यावे लागते.
    आह" चित्रपटात "ये शाम की तनहाइयां" हे गाणे आपल्याला "शुद्ध कल्याण" रागाचे आणखी वेगळे स्वरूप दाखवते. गंमत बघण्यासारखी आहे, सुरवातीला मी "रसिक बलमा" या गाण्याचा उल्लेख केला तो रागाच्या संदर्भात. आता याच संगीतकार जोडीने हे गाणे दिले आहे. शंकर/जयकिशन हे रागाच्या बाबतीत किती चोखंदळ होते, हे या गाण्यावरून समजून घेता येईल. या दोन्ही गाण्यांच्या चाली संपूर्णतया भिन्न आहेत पण तरीही चालीच्या अंत:प्रवाहातून याच रागाची धून ऐकायला मिळते. खरेतर कुठल्याही सुगम संगीताच्या रचनेतून रागाची संपूर्ण ओळख करून घेण्याच्या फंदात पडू नये कारण एकाच रागाची अनंत रूपे आपल्याला गोंधळात टाकू शकतात. किंबहुना नेहमीच गोंधळात टाकतात.
    "ये शाम कि तनहाइयां, ऐसे में तेरा गम;
    पत्ते कही फडके, हवा आयी तो चौके हम"
    हाच प्रकार इथे घडतो. अर्थात या विचाराची दुसरी बाजू अशी, सुगम संगीताने, रागदारी संगीत किती व्यामिश्र आहे, किती वैविध्याने नटलेले आहे हे सगळे फार सहजतेने अनुभवता येते.
    हिंदी चित्रपट, "पेईंग गेस्ट" मध्ये देखील या रागाची ओळख दाखवणारे नितांत रमणीय गीत आहे - चांद फिर निकाला मगर तुम ना आये". गाण्याची चाल आणि पडद्यावरील सादरीकरण इतके महत्वपूर्ण आणि परिपूर्ण आहे की, गाणे ऐकताना, कुठल्या रागावर आधारित? असला प्रश्नच मनात उद्भवत नाही आणि याचे श्रेय, संगीतकार सचिन देव बर्मन आणि गायिका लताबाई, यांच्याकडे नि:संशय जाते.या संगीतकाराला, चित्रपट गाणे कसे "सजवायचे" याचे नेमके भान होते आणि प्रसंगी त्यासाठी रागदारी नियमांना तिलांजली देण्याचे धार्ष्ट्य त्यांनी वेळोवेळी दाखवले.
    "चांद फिर निकाला मगर तुम ना आये,
    जला फिर मेरा दिल, करु क्या मैं हाये".
    इथे देखील हाच प्रकार घडला आहे. रागाचे सूर आणि चलन ध्यानात घेता, प्रथमत: या गाण्यात "शुद्ध कल्याण" कुठे आहे, याचाच शोध घ्यावा लागतो!! गाणे हे शब्दानुरूप असणे जरुरीचे आहे आणि त्यासाठी चाल निर्मिती करताना, सूर कुठून घेतले, कशा प्रकारे वापरले, हे मुद्दे नेहमीच गैरलागू ठरतात. थोडक्यात, केवळ हे गाणे या रागावर आहे म्हणून हे गाणे सुंदर आहे,असे ध्वनित करणे, हा रागदारी संगीताचा फाजील दुराभिमान ठरतो. मग प्रश्न असा येतो, शुद्ध कल्याण रागाच्या लेखात, या गाण्याची जागा कुठे? प्रश्न जरी वाजवी असला तरी काही प्रमाणात अस्थानी ठरू शकतो कारण, आपल्याला इथे या रागाची ओळख करून घ्यायची आहे, तो राग संपूर्णपणे समजून घ्यायचा नाही. एकदा का हा विचार नक्की केला म्हणजे मग वरील सगळेच प्रश्न निकालात निघतात!!
    -- अनिल गोविलकर

  • विधीलिखित

    कोणाला कोणच्या प्रसंगातून कोणत्या वेळी जावं लागतं ते विधिलिखित असतं.
    ते टळणार नसतं. त्यांतून किती जीव मनस्तापाने होरपळून निघतात. आपण सिरीयल्स मधून,कथा कादंबर्यातून हे बघतो, वांचतो पण मी प्रत्यक्षात घडलेली घटना इथे सांगत आहे. ( पात्रांची नांव बदलली आहेत)
    वैशाली ताईंच्या लग्नाचा वाढदिवस होता, संध्याकाळी बाहेर जेवायचं ठरलं होतं. मोठी मुलगी गांवातच होती, ती पण येणार होती केक घेऊन.
    आंघोळ आटपून त्या पूजेला बसल्या, तितक्यात फोन खणखणला. "आई, वेळ आहे कां ऐकायला" हो हो बोल बेटा.
    वैशाली ताईंना वाटलं, लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पूजानी त्यांच्या धाकट्या मुलीने फोन केला असावा. "आई" तिचा आवाज थोडा रडवेला वाटला. रात्रीच तिच्याशी गोष्टी झाल्या होत्या, थोडी तुटकच बोलली होती, जेवण झालं कां असं विचारलं तर , "नाही ग इतक्यांत कसंच जेवण? आई तू झोप. मी सकाळी करते फोन" म्हणाली होती.
    "आई, तूं बसून घे" पूजा म्हणाली. बराच वेळ ती बोलणार होती.
    तिने सांगितलं ते वैशाली ताईंना धक्का देणारं होतं. तरी त्यांनी शांततेन एकेक गोष्ट ऐकली. "बरं मी ठेवते, मी कोर्टात जाते आहे. बघते कोणी वकील मिळाला तर. तूं अजिबात काळजी करूं नकोस. मी मॅनेज करीन. बाबांना पण ऊगीच पाठवू नकोस. त्यांच्या तब्येतीची काळजी घे" असं म्हणून तिने फोन कट केला. कशातरी रडवेल्या होत त्यांनी पूजा संपवली आणि तिच्या बाबांना सगळं सांगितलं. ते पण खूप काळजीत पडले.
    पूजाचं लग्न होऊन 2 वर्ष झाली होती. पहिलं नव नवलाईचं वर्ष एकमेकांचे वाढदिवस साजरे करण्यांत, हाॅटेल, आऊटींग मध्ये गेले. नंतर पूजानी तिच्याच कंपनीत पुनः जाॅब मिळवला. सासू सकाळीच डबा घेऊन शाळेत निघून जात होती. नंतरचं सगळं पूजा बघून घेत होती. सगळ्यांसाठी पोळ्या भाजी करून ती आॅफीसला जायची.
    हळूहळू घरांत कुरबूर सुरू झाली. एका माणसाचा खर्च वाढला. तिचे सासरे तिच्या आॅफीसमध्ये जाऊन जाऊन पैसे मागत. वरून म्हणतं, तूला आमच्याकडे सगळं घरचं जेवण मिळतं, राहायला झोपायला जागा मिळते, फळ-दूध सगळं मिळतं तर घरभाड्या सकट तूं सगळे पैसे दे.
    तिनी त्यांना ते द्यायला सूरवात केली. एका महिन्यांत प्रिमियम भरायचे होते म्हणून ती देऊ शकली नाही, तर सासरे आॅफीसमध्ये पोचले. पूजानी संध्याकाळी येतांना काढून
    आणते सांगितलं. तर तिला एटीएम कार्ड मागायला लागले. ती कांही पेइंग गेस्ट नाही, जे ते एक दिवस ऊशीर झाला तर कांगावा करत होते. त्यांचा मुलगा पूजाचा नवरा बॅन्केत मॅनेजर आहे, तो तिचा खर्च चालवूं शकत होता तरी ती भीक नको ........म्हणून पैसे पुरवत होती.
    त्यांना पैसे दिले. घरी पोचल्यावर पूजाच्या कानावर नवर्याचे बोलणे पडले. बाबा, तिला कां मागतां मी देतो आहे न ? घरभाडं, किराणा, प्लाॅटचं लोन सगळं मी करतो न. आईचा पूर्ण पगार वाचतोच आहे. बाबा म्हणत होते तिचा पगार घर बांधायला लागेल.
    खूप रगडा झाला त्यांवरून. सासूनी दोघांना वेगळं राहा सांगितलं. दोघं वेगळे झाले. थोडे दिवस बरे गेले. नंतर पूजाचा नवरा घरी आईकडे जाऊन जेवून यायचा. कधी न सांगता तिथेच राहून जायचा असं सुरू झालं. मग त्यावरून पूजात व तिच्या नवर्यात दोघांमध्ये वाद होऊ लागले. एक दिवस अचानक त्यानी बॅग भरली आणि चेन्नई ला जायचं आहे असं सांगून निघून गेला. सकाळी सकाळी दाराची बेल वाजली, पूजा नुकतीच आंघोळ करून बाहेर आली होती. तिनी दार उघडलं तर कोर्टाचा माणूस नोटिस घेऊन दारांत ऊभा. तिच्या नवर्यानी घटस्फ़ोटाची नोटिस पाठवली होती. तिच्या ह्रदयाचा थरकांप झाला. एका रात्री भांडणं झालं होतं तेव्हां मला आतां तुझ्या बरोबर राहायचचं नाही असं म्हणाला होताच. पण खरंच असा वागेल वाटलं नव्हतं. कालच बॅग घेऊन चेन्नई ला गेला आणि आज ही नोटिस. पूजाचा थरकांप उडाला. हात पाय कांपायला लागले. तिनी कशीतरी नोटीस घेतली व विचारलं हे काय आहे? घटस्फ़ोटाची नोटिस पाठवली होती त्याने. दार बंद करून बालकनीत आली नोटिस वांचतच होती, तेवढ्यात तिला टोपीखाली चेहरा लपवून तो (तिचा नवरा) सुजित जातांना दिसला. तिने त्याचीच बाईक बाहेर काढली आणि त्याचा पाठलाग करून त्याला गाठलं. खूप सवाल जबाब झाले, तो घरी आलाच नाही. ती सासरच्या घरी गेली तर सासूनी घरांत घेतलंच नाही. उलट कांगावा केला, "मी पोलीसांना बोलावते, सांगते ही मुलगी आम्हांला त्रास द्यायला आली आहे" पूजा परत स्वतःच्या घरी आली.
    कोर्टात त्यांची भेट झाली. शेवटी सहा महिन्यांच्या ऊहापोही नंतर परस्पर संमतिने घटस्फ़ोट घेतला.
    त्यांतही सुजितने mutual divorce साठी मी कांही ही एल्युमिनी देणार नाही असं वकीलांना सांगितलं. आई आणि मुलानी मिळून सगळी योजना आधीच आंखून ठेवली होती.
    सुजितच्या एका मैत्रिणीने तिच्या भावासाठी पूजाला होकार द्यायला लावला, तो पण पूजाला ओळखत होता.
    इतक्या चंगल्या मुलीचे असे हाल झालेले त्यानी पण बघितले होते.
    वैशाली ताईंना आतां खूप छान जांवई मिळाला. पूजा आणि दिपक दोघंही आतां अमेरिकेत आहेत. त्यांना एक गोड मुलगी आहे.
    दिपक गंमतीनी म्हणतो, "सुजितचे आभार मानायला हवे आपण सुजितशी तुझं लग्न झालंच नसतं तर माझी तुझी गांठच पडली नसती, तूं इथे मिरजला कशाला आली असतीस? "
    --प्रतिभा जोगदंड केकरे
  • मीही पुत्र त्यांचाच…….

    एक होऊन महाराष्ट्राचे करा संवर्धन करा….

    बाळासाहेबांना हीच श्रद्धांजली….

    डॉ. निलेश जयवंत

    ठाणे

  • निसर्ग आणि आपण

    संक्रांत होऊन गेली, की हवा गरम होऊ लागते. पहाटे आणि संध्याकाळी येणारे वारे सुखद वाटू लागतात. ‘तहान’ जागी होऊ लागते. या दिवसात मला आठवतं, आम्ही झाडाला मडकी टांगून ठेवत असू. त्या मडक्यात पक्ष्यांना प्यायला पाणी ठेवलं जाई. दिवसभर जाता-येता त्या मडक्यात पाणी आहे ना, हे पाहिलं जाई. झाडावरचे कावळे, चिमण्या ते पाणी पीत आणि तृप्त होऊन उडून जात.

  • कवीची खंत

  • मिसिंग पर्सन ऑनबोर्ड

    जहाज रशियाच्या तॉप्से पोर्ट मधून फ्रान्स कडे निघाले होते. ब्लॅक सी मधून इस्तम्बूल मार्गे मेडिटेरेनियन सी मध्ये जाणार होते.

  • शुद्ध लोण्यापासून बनवलेला कृष्ण

    तब्बल ४७० किलो शुद्ध लोण्यापासून बनवलेली ही मूर्ती.

  • पहिले आंतरराष्ट्रीय ऊर्जा संमेलन

    २१ व्या शतकातील दुसर्‍या दशकाच्या शेवटी पृथ्वीवरील पा‌णि, ऊर्जा, जमीन एकू‌णच निसर्गातील पंचमहातत्वाच्या प्रदूष‌णाचा प्रश्न गंभीर होत आहे.एवढंच नव्हे तर पुढील पिढीला देण्यासाठी आपल्याकडे नैसर्गिक संपत्तीचा ठेवा कदाचित उरणार नाही एवढा र्‍हास होत आहे. जमिनीचा वरचा थर तयार हो‌ण्यासाठी किमान ६०० वर्ष इतका वेळ म्ह‌‌णजे जवळ जवळ ६ शतकांचा कालावधी लोटतो. हे एक उदाहर‌ण झालं मात्र यासारखी कितीतरी नैसर्गिक साधन संपत्ती आपण रिसायकल न करता पिढय़ानुपिढय़ा वापरत आहोत, यासाठीच विज्ञानभारती व केंद्रीय ऊर्जा व नवीनकर‌णीय खात्यातर्फे पहिल्या आंतरराष्ट्रीय ऊर्जा संमेलनाचे आयोजन विश्वसरैय्या नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर येथे आयोजन केले होते.

  • लोककला आणि कलावंतांना राजाश्रयाचा प्रश्न..

    जीवन ही एक कला आहे. मानवी जीवनात कला नसेल तर औदासिन्य , दैन्य असेल. कलाकार आपली कला जीव ओतून सादर करत असतो.रसिक त्यास प्रतिसाद देतात. रसिकांचा प्रतिसाद हा कलाकारांचा खरा आनंद असतो. कलाकाराच्या दृष्टीने कला हे त्याच्या जगण्याचे आणि इतरांना आदर्शवत जगवण्याचे माध्यम असते. चित्रकार रंगरेषांच्या, गायक आवाजाच्या, वादक वाद्यांच्या तर लेखक लेखनीच्या माध्यमातून आपली कला सादर करत असतो. कला त्याच्यासाठी जीव की प्राण असते. तो कलेत रमतो.कला जगतो.कला जोपासतो. कला परंपरेने आणि आवडीने त्याचबरोबर कौशल्याने साध्य होते. कलेच्या साधनेसाठी कठिण परिश्रमाची गरज असते.तरच ती अवगत होते.

    लग्नकार्यात गायक गातात. वर्हाडीमंडळीचे मनोरंजन करतात. सनई ,चौघडा, बासरीबरोबर ढोल आणि बँडवादनही होते. किर्तनात पकवाज, टाळ, हार्मोनियम अशी वाद्ये असतात तर गायक , वादक , किर्तनकार सहभागी असतात. लोककलेतही तमाशामध्ये ढोलकीवादक, नृत्यकला, अभिनय कला असते. जागरण गोंधळामध्ये संबळ, ढोलकी , तुणतुणे या वाद्यांसह वाघ्या-मुरळी हे कलाकार असतात. देवीच्या मंदीरात आराधी आपली कला सादर करतात. कवड्याच्या माळा, ज्योत आणि एकासुरात लोकगीते म्हणणारी कलावंत मंडळी येथे असते.चित्रपट, नाटक यांतूनही कलाच आविष्कृत होते.त्याचबरोबर पोतराज, मसनजोगी, कुरमुडेवाले, नंदीबैलवाले यांचेसह असंख्य लोककला जोपासणारे कलाकारच असतात. त्यांचे जीवनमान आज कसे आहे ? हा एक महत्वाचा प्रश्न आहे. जागतिकीकरणाच्या आणि आधुनिकतेच्या स्पर्धेच्या युगात नुसती भागंमभाग चालू आहे. रस्त्यावरचा डोंबार्याचा खेळ पाहण्यात कोणालाही रूची नाही. कलाकार जीव ओतून, मेहनतीने कलेचे सादरीकरण करत असतो. ज्याच्या कलेला समाजाचा आधार मिळाला तो कलावंत यशस्वी होतो. यश, प्रसिध्दीच्या जोरावर अर्थप्राप्ती होते. सिनेतारका , सिनेकलावंत यांच्यासाठी पायघड्या घातल्या जातात. टीआरपीवाढीसाठी चढाओढ लागते. झगमगाटी दुनिया असते.अशा कलाकारांचा वेगळा समुह होतो. आज लाखो कलावंत असे आहेत की कला सादरीकरणासाठी त्यांना संधी नाही.मंच नाही.जी व्यवस्था आहे ती कमकुवत आहे. आराधी, गोंधळी किंवा इतर लोककलावंताना चरितार्थ चालविण्याचे साधन त्यांचेकडे नसते. एकतर समाजाचा आधार संपुष्टात येत असताना उदरनिर्वाहाचे साधन नसल्याने अनेक कलावंत खितपत पडलेले आहेत. तमाशातील वगामध्ये राजाचे पात्र करणारे कलावंत स्वतःच्या जीवनाचा तमाशा करून बसले आहेत! कलेच्या माध्यमातून जे काही मिळते त्यातून उपजिवीका न भागल्याने कित्येक कलावंतांनी एकतर ती कला सोडून दिली किंवा स्वतः नैराश्याच्या गर्तेत गेलेले आहेत. काहींनी व्यसनाला जवळ केले आहे.

    प्राचिन काळात कला जाणिवपुर्वक जोपासली जायची. राज्याच्या सांस्कृतिक वैभवात त्यामुळे भर पडायची. युग बदलले. यांत्रिकीकरणामुळे पोटाचेच प्रश्न निर्माण झाले.गतीमान युगात नवनवे शोध लागत गेले तसा लोककलेचा वारसा कमी होत गेला. पुढील पिढीत हे गुण उतरत नाही. त्यासाठी प्रयत्न झाले नाहीत अथवा कालौघात दुर्लक्षित झाले. त्यामुळे झाले काय की जी वैभवशाली परंपरा आपण निर्माण केली होती.जी बाब समाजाच्या जडणघडणीमध्ये खूप मोलाची भर टाकत होती. सुसंस्कृत समाजासाठी ज्याचा मोठा हातभार होता अशा कला लोप पावत चालल्या आहेत. एकेकाळी रसिकजनांनी डोक्यावर घेतलेली कला नावापुरतीच राहीलेली आहे. जत्रा, यात्रा, उत्सव , बाजार असे समाजसमुहाचे उपक्रम कमी होत आहेत तसा या कलांची र्हासाकडे वाटचाल सुरू आहे. शिवकालात याच लोककलेने महत्वाची भूमिका बजावलेली आहे.तमाशा, पोवाडा, भजन किंवा कोणतीही लोककला असो आता समाजमान्यता कमी होतेय. राजमान्यतेच्या बाबतीतही तेच आहे. त्या कलावंतासमोर आज खूप अडचणी आहेत. त्यांच्या आरोग्याचे प्रश्न असतील. किंवा मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न असेल ते सोडविण्यासाठी कुणालाही त्यात रस नाही.कितीतरी वृध्द कलावंत जर्जर आजाराने त्रस्त आहेत. त्यांना विमाकवच नाही कि सुरक्षाकवच नाही. जोपर्यंत कलावंताच्या अंगात रग आणि धग आहे तोपर्यंत धरपड करण्यातच त्याची कला संपते. सिनेमा,ऑडिशनच्या , चित्रपटात काम देण्याचा स्वप्नापायी कितीतरी कलाकाराची फसवणूक होऊन जीवन बरबाद झालेले आहे. त्यासाठी आज काहीतरी उपाययोजना करावीच लाजेल.. हजारो स्वप्न उराशी घेऊन आलेले तरूण कलाकार गैरमार्गास गेलेले आहेत. हे वास्तव स्वीकारण्यावाचुन पर्याय नाही.

    वृध्द कलावंताना व्यवस्थेकडून मानधन मिळते . कितीतरी वर्षापासुन त्यात वाढ झालेली नाही. कितीतरी कलावंत अजुनही मानधनापासुन वंचित आहे. 'क' दर्जाच्या कलावंताला दरमहा दीड हजार इतके मानधन मिळते. ते त्याच्या उपजिविकेसाठी पुरते का ? निवड प्रक्रिया किती पारदर्शक होते हेही महत्वाचे असते. बँकेच्या दारात मानधनासाठी तासन् तास ताटकळत बसणार्या कलावंताला मिळणारी वागणूक आश्चर्यचकित करणारी आहे. तालुक्यातून दरवर्षी फक्त तीन चारच प्रस्तावाची शिफारस होते. यातून काही अडाणी दुर्गम भागातील लोककलावंत पुढे येत नाहीत किंवा त्यांच्या कलेचे मुल्यमापन करण्याचे कोणतेच परिमाण उपलब्ध नाही. संगणक क्रांतीमुळे या लोककला लोप पावत चालल्यात. तसे काही वृद्ध कलावंताचा तर मानधन न मिळताच मृत्यूही झालेला असतो.

    लोककला असो की इतर कला असो ही जाणिवपुर्वक जोपासायला हवी. तिचे संगोपन, संवर्धन हे शासन आणि समाजव्यवस्थेने केले पाहिजे. सुसंस्कृत समाजासाठी ते गरजेचे आहे. कला, क्रिडा क्षेत्रात नैपुण्य मिळवार्या विद्यार्थ्यांसाठी पंचवीस गुण देण्याचा निर्णय असताना खूप मुलं त्यापासून वंचित राहतात किंवा ज्यांचे पालक सुशिक्षित आहेत अशांचीच दखल घेतली जाते. लोककला सादर करणार्या विद्यार्थ्यांचा या गुणवाढीसाठी काही उपयोग नाही. लोककला जतन झाल्या. तिचे संगोपन झाले तर समाजजीवनात रस निर्माण होईल. मान्यताप्राप्त कलावंताच्या पाल्याला नोकरी आणि शिक्षणात सवलती देता येतील.

    पुण्यनगरी
    विठ्ठल जाधव
    शिरूरकासार,जि.बीड
    संपर्क-9421442995

  • भाव अंतरी उमलत होते…

    दत्ता डावजेकर यांच्या संगीतसाजाने नटलेलं हे गीत डोळ्यांत पाणी उभे करते. किंवा

    ‘दिव्यत्वाची जेथ प्रचीती, तेथे कर माझे जुळती

    परि जयाच्या दहन भूमीवर नाही चिरा, नाही पणती…‘

    त्याचप्रमाणे मनात राष्ट्रभक्तीची, मातृभूमीची, मायबोलीची ज्वाला तेजाने तळपत ठेवणारी गीते वेगळेच स्फुरण आणतात. अगदी वाचता क्षणी जीव

    ओवाळून टाकायचीही तयारी व्हावी, इतकं वजन त्या गाण्यांतून असे.