(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • इंदौर

    जन्माला यावं आणि एकदा तरी इंदौरला जाऊन सराफा आणि ५६ दुकानांच्या पदार्थांचा मनसोक्त आस्वाद घ्यावा... ते जर जमलं नाही तर आपलं आयुष्य फुक्कट वाया गेलं असं समजावं आणि धोकटी खांद्याला अडकवून वाट चालायला सुरुवात करावी...

    पैलं म्हणजे इंदौरी पोहे... कोथिंबीर, बारीक इंदौरी शेव, ओलं खोबरं आणि डाळिंबाचे दाणे पसरलेले...

    नंतर विकास स्वीट्सची टमटमीत फुगलेली एक दाल कचौरी आणि एक आलू कचौरी खावी आणि तिथंच भल्यामोठ्या लोखंडी कढईत असं झक्कासपैकी ऊकळत असलेले, वरुन असं लालबुंद केशर तरंगत असलेले, बदाम, पिस्ते, काजू भरपूर असलेले, चार चमचे दाट केशरी साय ग्लासात वरुन पांघरलेले केसरिया दूध ग्लासभर प्यावे...

    जोशींचा हवेत फेकून परत झेललेल्या दहिवड्याला मोक्ष द्यावा...

    हे जोशी, एकाच हाताच्या प्रत्येक बोटाची चिमूट करुन त्या पाच चिमूटीत पाच प्रकारचे मसाले पकडून... एकेक करत दह्यावर सोडतात आणि अशी मस्त नक्षी बनवतात... (जसं सीसीडी मधे कॉफीवर नक्षी बनवतात ना तसं)... जोशी दह्यावर मसाला सोडताना बघून आपण असं स्वतःला विसरुन जातो की बास्स यार... विचारायचंच नाही... फक्त तिथं ऊभं राहून तो अनुभव घ्यायचा...

    गराडू खावं...

    खुसखुशीत तळून लाल रंगाच्या साखरेच्या पाकातून निथळून काढलेली जिलेबी खावी...
    ती निथळणारी जिलेबी बघितली की आठवतंय बघ... न्हाऊनिया ऊभी मी....

    नंतर दहा स्वादांची पाणीपुरी खावी... रेग्युलर, शाही रेग्युलर, पुदिना, जिरा, प्याज, लसणी... वगैरे वगैरे दहा टेस्ट्स आणी सगळं झाल्यावर दोन गोड मसाला पुरी... नांकावरुन येणारा घामाचा थेंब सावरत सावरत... सुर्र सुर्र करत ते उरलेले पाणी पिऊन घ्यावे...

    नंतर पुढं यावं आणि भुट्टे का कीस... कीस म्हणजे अक्षरशः किसचा अनुभव देणारा हा कीस ! दिसायलाच एवढा आकर्षक तर मग चवीला तर अतिशय भन्नाट !

    जरा अजून इच्छा असेल तर फरियाली साबुदाणा खिचडी... एकदम खल्लास...

    जरा पुढं आलं की नेमा आईस्क्रिम... फक्त केशर मलई पिस्ता कुल्फी खायची आणि तोपर्यंत फालुदा बनवायाला सांगायचा... कुल्फी संपवायची आणि फालुद्याला सामोरं घ्यायचं... अतिशय मन लावून, अंतर्मन शांत करत करत हळूवारपणे फालुद्याचा एकेक घास नमामि फालूदा म्हणत स्वअर्पण करायचा...

    हे सगळं झाल्यावर तृप्त होतंय सगळं... विलक्षण समाधान येतंय चेहेऱ्यावर... या संपूर्ण साधनेचं तेज चढतेय सर्वांगावर... आपोआपच समोरची वाट स्पष्ट होते... अंतिम विश्रांतीचं ठिकाण स्पष्ट दिसायला लागतं...

    बाहेर यायचं तिथून... गाडीत बसायचं आणि चालकाला गाडी हायकोर्ट समोरच्या पार्श्वनाथ पान सदनकडे घ्यायला सांगायची...

    दादा तिथे बसलेले असतातच...
    कड्डक असं कलकत्ता प्युअर १२०/३००, प्युअर नवरतन किवाम आणि चटणी, थोडीशी खूश्बू, एकदम बारीक सुप्पारी (भाजलेली) एकच चिमूट, दोन वेलदोडे आणि लवंग त्यात उभी करुन जाळून... लवंग जळतानाच पानाची अलगद् घडी करुन घ्यायचे आणि त्याला आपल्या तोंडात डावीकडे सिंहासनावर विराजमान करायचे... तीनेक मिनीटे तिथंच थांबायचे... घोळवायचं असं गारशार तोंडात... आजिबात चावायचं नाही, गिळायचं नाही, इकडून तिकडे तोंडात फिरवायचं निही... घेतला वसा टाकायचा नाही... ऊतायचं नाही... मातायचं नाही... शांत बसायचं... आपोआप ब्रह्मानंदाशी आपला परिचय होतो... दाट ओळख होते... समाधिस्थ हलकेपणा येतो आपल्याला कवटाळून घेतो...

    हलकेच गाडीत येऊन बसायचं...

    सारथ्याला खूण करायची...

    गाडी मुक्कामाच्या दिशेने निघालेली असते... आपण आपलं अन्नदाता सुखी भव म्हणत ब्रह्मानंद समाधीत भान विसरलेलो असतो...

    अशी आहे इंदौरी खाऊ गल्ली
    आणि
    इंदौरी मेहमान नवाजी़...

    खरंखुरं अतिथी देवो भव हे तत्त्व जपणारं इंदौर ...!!!

    आपल्यावर प्रेम करणारी आणि आपल्याला प्रेम करायला लावणारी...

    उमेश कुलकर्णी.

  • भारतमातेच्या वीरांगना – २६ – राजकुमारी गुप्ता

    हम को जो करना था हमने किया…. किती शक्तीशाली वाक्य आहे हे, हे नुसतेच शब्द नव्हे तर ही कृती आहे. जी कुठल्याही परिस्थितीशी समझोता न करता केली गेली, वारंवार केली गेली. इतक्या पक्क्या विचारांच्या होत्या आपल्या भारतमातेच्या वीरांगना राजकुमारी गुप्ता.

  • पेबेलॉकॉन आयलंड

    मागील तीन महिन्यात जहाजावरुन दिसणाऱ्या बेटाचे ज्याचे नाव पेबेलॉकॉन आयलंड आहे त्याच्याबद्दल सगळ्यांकडून खूप ऐकले होते. जहाजावरुन आयलंड दिसायचं पण थोडंसंच. पाण्याच्या वर तरंगणारी थोडीशी हिरवीगार झाडी आणि एका चिमणीतून जळणाऱ्या गॅसची एक तांबडी फडफडणारी ज्वाला. रात्रीच्या निरव शांततेत आणि अंधारात तर ही ज्वाला आणखीनच प्रखर दिसायची.

  • बेवड्याची डायरी – भाग ८ – व्यसनाधीनतेची कबुली.. स्वतः ठरवा

    सरांनी त्यांच्या हातातील पुस्तक सर्वाना दाखले त्यावर ‘ रोजचे प्रतिबिंब ‘ असे नाव होते .. मित्रानो हे अल्कोहोलीक्स अँनॉनिमस या संघटनेने प्रकाशित केलेले पुस्तक असून या पुस्तकातील सर्व विचार हे पूर्वी व्यसनी असलेल्या माणसांनी लिहिले आहेत ..अल्कोहोलिक्स अॅनाॅनिमस या संघटनेने सुधारणेसाठी ज्या बारा पायऱ्या किवा ज्या सूचना दिल्या आहेत ..त्यावर हे पुस्तक आधारित आहे..प्रत्येक महिन्यात एका पायरीवरचे विचार यात दिलेले आहेत

  • अती सामान्य पण असामान्य :: सजीवांचा आहार आणि आनुवंशिक आज्ञावल्या.

    सजीवांचे शरीर हे एक स्वयंचलीत यंत्र आहे. त्यामुळे त्याला, आपले नैसर्गिक व्यवहार करण्यासाठी उर्जेची गरज असते. निसर्गाने, ही उर्जा मिळण्यासाठी, परिपूर्ण अशी योजना फार कल्पकतेने केली आहे असे दिसून येते आणि तीही कोट्यवधी वर्षांपूर्वी. प्रत्येक सजीवाचा आहार हेच निसर्गाने शोधलेले आणि अत्यंत यशस्वीरित्या वापरलेले उर्जासाधन आहे.

  • गृहनिर्माण संस्थांच्या सर्वसाधारण सभा कधी व कशाप्रकारे घ्यावी?

    हकार कायद्यातील नविन बदलानुसार, वार्षिक सर्वसाधारण सभा भरवण्याकरिता मुदतवाढ देणेची तरतूद नाही. परंतु, कोव्हीड-१९ च्या पार्श्वभुमीवर कायद्यात केलेल्या बदलाने सर्व गृहनिर्माण संस्थांना वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यास ३१ मार्च, २०२१ पर्यंत सुट देऊन मोठा दिलासाच दिला आहे. तसेच, काही मार्गदर्शक सुचना देखील केल्या आहेत. तथापि, सदर सुचना सर्वसामान्य सदस्यांना माहित नसल्याने बरेच गोंधळून जातात. कायदे तज्ञाचा सल्ला न घेता, इतर कमेटी सदस्यांचा विचार न करता फक्त स्व:ता कायद्याच्या बडग्यापासून वाचण्यासाठी कमेटी सदस्यत्वाचा राजीनामा देतात.

  • ऊपकार जाणावेत

  • ऋजू स्वभावाचा बिहाग

    खरतर संगीतात अनेक भावना आढळतात पण त्या भावनांचा शास्त्राशी संबंध जोडला तर हाताशी तसे फारसे लागत नाही. काहीवेळा असेच वाटते, केवळ काही स्वरांच्या साद्धर्म्याने विचार केला तर, काही भावना मनाशी येऊ शकतात तरीही, अखेर शास्त्रकाट्यावर तपासणी करता, सूर आणि भावना, याचे नेमके नाते जोडता येत नाही, हेच खरे. मग प्रश्न पडतो, राग आणि समय, किंवा राग आणि भावना, याला काय आधार आहे? हे सगळे केवळ "संकेत" असेच मानायचे का? तसे मानले तर, हे "संकेत" निर्माण करण्यामागे काय उद्दिष्ट असावे? आज वर्षानुवर्षे, बहुतेक रागांचे समय, त्याला लगडलेल्या भावना, याचा आपल्या मनावर परिणाम झालेला असतो, त्या परिणामाचा कार्यकारण भाव आणि संगती कशी लावायची? की पुन्हा कोऱ्या पाटीवर नव्याने धुळाक्षरे शिकायची? या प्रश्नांची उत्तरे तशी सोपी नाहीत पण, विचार करायला नक्की लावणारी आहेत.
    मी, जेंव्हा "बिहाग" रागाला, "ऋजू" भावनेची जोड देतो तेंव्हा , माझ्या मनात पारंपारिक संकेत आणि त्याला जोडून आलेले विचार, याचेच प्राबल्य असते.आपल्याला बरेचवेळा, मी, कवी सुधार मोघ्यांच्या एका कवितेत वाचलेल्या ओळी आठवतात.
    "शब्दांना नसते सुख, शब्दांना दु:खही नसते;
    जे वाहतात ओझे, ते तुमचे माझे असते"!!
    स्वरांच्या बाबतीत असाच विचार करणे योग्य आहे का? खरेतर स्वर म्हणजे निसर्गातील ध्वनी. त्यांना आपण, शास्त्राची जोड दिली आणि त्याला अभिजात स्वरूप प्रदान केले. याचाच वेगळा अर्थ, त्या स्वरांचे नैसर्गिकत्व कायम राखणे, हाच उद्देश असू शकतो. त्यावर मानवी भावनांचे आरोपण करणे, अन्यायकारक असू शकते. असे झाले तरी देखील, स्वरांच्या सान्निध्यात वावरताना, आपल्या मनात भावनांचे तरंग उमटत असतात, अगदी अनाहूतपणे, ही देखील वस्तुस्थिती आहे.
    आरोही स्वरांत, "रिषभ" आणि "धैवत" वर्जित असल्याने, "औडव" जातीचा राग तर पुढे अवरोहात हे दोन्ही वर्जित स्वर अस्पष्टपणे लावले जातात. पूर्वीच्या संदर्भात बघायला गेलो तर, या रागात, "मध्यम" फक्त शुद्ध स्वरूपात लावला जायचा परंतु आधुनिक काळात, "तीव्र मध्यम" उपयोगात आणला जातो. अर्थात, जेंव्हा हा स्वर लावला जोतो, तेंव्हा हा राह लखलखून समोर येतो. आरोहात "ग म प नी सां" ही स्वरसंगती या रागाची ठेवण दर्शवते. बहुतेक स्वर "शुध्द" स्वरूपात लावत असल्याने, या रागाला "ऋजू" स्वरूप प्राप्त झाले. आक्रमकता, या रागाच्या स्वभावाशी फटकून वागते. वास्तविक, "गंधार" आणि "निषाद" हे "वादी - संवादी" असले तरी देखील, "मध्यम" स्वराचा प्रयोग हेच वैशिष्ट्य मानले जाते. आता आपण, शास्त्राच्या अधिक आहारी न जाता, त्याच्या "ललित" स्वरूपाकडे वळूया.
    उस्ताद रशीद खान यांनी गायलेली "मरे मन अटकाओ रे अली" ही बिहाग रागातली चीज ऐकण्यासारखी आहे . मुळात, या गायकाचा अत्यंत मृदू आवाज, त्यामुळे उपरिनिर्दिष्ट भावना, इथे अतिशय सुंदररीत्या सादर झाली आहे. स्वर उच्चारताना, त्याचा "स्वभाव" ओळखून, गायला गेला तर होणारे गायन, अधिक प्रभावी ठरते. रशीद खान, इथेच नव्हे तर एकुणातच "मंद्र सप्तक" किंवा "शुद्ध स्वरी सप्तक" गायन करतात. याचा एक परिणाम असा होतो, रसिकाला स्वराची "ओळख" करून घेता येते. ताना घेताना देखील, अति दीर्घ स्वरूपाच्या ताना टाळून, गायची पद्धत आहे, प्रसंगी तान खंडित करून, दोन भागात तान, पूर्ण करण्याचा विचार दिसतो.सुरवातीला लावलेला अति खर्ज आणि त्यातून पुढे आवाजात आलेला मोकळेपणा, यामुळे ही रचना अधिक वेधक होते. कधीकधी तर, बंदिश, भावगीताशी दुरान्वये का होईना, पण नाते सांगते की काय? असा भास निर्माण करण्याइतकी जवळीक साधली जाते. या मागे अर्थात, जे रसिक, शास्त्रापासून दूर असतात, त्यांना देखील रंजक वाटावे, हा स्पष्ट विचार दिसतो. असे करताना देखील, आपण "बंदिश" गात आहोत, याचे भान कुठेही सुटलेले दिसत नाही आणि खरेच ही तारेवरची कसरत आहे.
    "बोलिये सुरिली बोलियां
    खट्टी मिठी आंखो से रसिली बोलियां".
    "गृहप्रवेश" चित्रपटात या रागावर आधारित अतिशय सुंदर गाणे आहे. "बोलिये सुरिली बोलीया" हेच ते गाणे. संगीतकार जयदेव यांची निर्मिती आहे. या संगीतकाराच्या बहुतांशी रचना या "गायकी" ढंगाच्या असतात आणि त्यामुळे गाताना, फार जपून, विचार करून गाव्या लागतात. रचनेतच, अनेक गुंतागुंतीच्या रचना करून, गायक/गायिकेच्या गळ्याची परीक्षा बघणाऱ्या असतात. गाण्यात, सरळ, स्पष्ट असा केरवा ताल आहे पण, ताल अत्यंत "धीमा" ठेवलेला. त्यामुळे कविता आणि गायन, याचा आपल्याला सुरेख आस्वाद घेता येतो.
    गाणे जरा बारकाईने ऐकले तर ध्यानात येईल, गाण्यात काही ठिकाणी "बिहाग" दिसत नाही!! विशेषत: गाण्याचा पहिला अंतरा झाल्यानंतर, गाण्याची सुरवात ऐकताना, असे आढळून येते. हा संगीतकार किती कुशाग्र बुद्धिमत्तेचा होता, याचे हे एक उत्तम उदाहरण. गाण्यात, राग सादर करणे किब=नवा त्या रागाच्या सावलीत गाणे तयार करणे, यात तशी "निर्मिती" आढळत नाही कारण, गाण्याच्या चालीचा "नकाशा" तुमच्या समोर असतो आणि त्यानुरूप गाणे तयार करायचे, इतकेच तुमच्या हाती असते परंतु, प्रत्येक रागात, अनेक छटांच्या शक्यता आढळत असतात आणि हाताशी असलेल्या कवितेनुरूप, रागातील एखादी छटा, कवितेच्या आशयाशी जुळते आणि त्या छटेनुसार, पुढे चालीचा वेगवेगळ्या लयीच्या अंगाने विस्तार करायचा, ही या संगीतकाराची खरी खासियत होती आणि तीच इथे दिसून येते.
    "तेरे सूर और मेरे गीत,
    दोनो मिलकर बनेगी प्रीत".
    "गुंज उठी शहनाई" या चित्रपटात, खऱ्या अर्थात, "बिहाग" राहाची "ओळख" देणारे गाणे आपल्याला ऐकायला मिळते. "तेरे सूर और मेरे गीत", हेच ते गाणे. मघाशी, मी या रागाचा स्वभाव "ऋजूतेशी" जोडला होता आणि या गाण्याच्या चाल्लीतून, नेमका तोच भाव दृग्गोचर होतो. संगीतकार वसंत देसायांची ही अजरामर कृती. लताबाईंच्या पहिल्याच आलापात हा राग समोर येतो. किती अप्रतिम लडिवाळ हरकत गायिकेच्या गळ्यातून निघाली आहे. या गाण्याची आणखी एक गंमत इथे मांडायची आहे. गाण्याच्या प्रत्येक कडव्यानंतर जे संगीत असते, ती खास ऐकण्यासारखे आहे. बासरीचे सूर सुरवातीला खंडित स्वरूपात येतात परंतु एका विविक्षित क्षणी त्याच बासरीच्या सुराने, लयीचे संपूर्ण "वर्तुळ" पूर्ण केले जाते. हा प्रकार वाटतो तितका सोपा नाही. गाणे "दादरा" या प्रचलित तालात बांधले आहे, गाण्याचा स्वभाव उत्फुल्ल आहे परंतु गाणे कुठेही आपली संयतशील मर्यादा सोडून भिरकटत नाही,
    सगळे गाणे, एका सुंदर बंधनात बांधले आहे पण तरीही बंधनातीत आहे. लताबाईंची सुंदर गायकी आणि मुळात, गाण्यच्या चालीत असलेला "अश्रुत" गोडवा, यामुळे हे गाणे कधीही ऐकायला सुंदर वाटते.
    "कोई गाता मैं सो जाता,
    संस्कृती के विस्तृत सागर में
    सपनो की नौका के अंदर
    दुख सुख की लहेरो में उठ गिर,
    बहाता जाता".
    काही वर्षापूर्वी "आलाप" नावाचा चित्रपट आला होता. त्यात, बिहाग रागाशी नाते सांगणारे एक गाणे आढळले. "कोई गाता मै सो जाता". याची चाल ऐकतानाच अवघड आणि गायकी ढंगाची आहे, हे जाणवते. संगीतकार जयदेवने या गाण्याची "तर्ज" बांधली आहे. राग संगीताच्या असंख्य छटा कशा असतात, हे इथे बघता येईल. वरती, याच संगीतकाराने अगदी वेगळ्या धाटणीची चाल निर्माण केली आहे आणि इथे संपूर्ण वेगळी चाल!!
    या गाण्यात मात्र, "तीव्र मध्यम" लागलेला दिसतो, जो मी वरती उद्मेखून मांडला आहे तरीही, हे गाणे, बिहाग रागाचे लक्षणगीत म्हणून मानणे कठीण आहे, इतके "तीरोभाव" या गाण्यात दिसतात.
    या गाण्याची मजा म्हणजे, गाण्यात हा राग दिसत आहे, असे वाटत असताना, चाल वेगळे वळण घेते आणि ऐकणाऱ्याला आश्चर्यचकित करते. पहिल्या ओळीत राग सापडतो पण, लगेच पहिला अंतरा वेगळ्या सुरावर सुरु होतो, तिथेच चाल थोडी रेंगाळते आणि अंतरा संपत असताना, आपल्याला बिहाग परत भेटतो!! या गाण्यात अगदी दोष(च) काढायचा झाल्यास, गायक येशुदास याचे शब्दोच्चार. कित्येकवेळा, त्याच्या आवाजातील "दाक्षिणात्य" हेल बरेचवेळा कानाला खटकतात. अन्यथा हे गाणे अतिशय सुंदर आहे.
    हे गाणे म्हणजे एक सुंदर कविता आहे - हरिवंश राय बच्चन यांची. वास्तविक हा कवी कधीही चित्रपटासाठी गाणी लिहिणारा नव्हता पण तरीही संगीतकार जयदेव यांनी, या कवितेतून गाण्याची शक्यता ओळखली आणि त्याला सूर अर्पण केले.
    "तुज साठी शंकरा
    भिल्लीण मी झाले".
    आपल्या मराठीत देखील या रागावर आधारलेली काही गाणी ऐकायला मिळतात. "चिमुकला पाहुणा" या चित्रपटात, असेच "गायकी" ढंगाचे अप्रतिम गाणे ऐकायला मिळते. "तुज साठी शंकरा" हे, संगीतकार स्नेहल भाटकर यांनी बनवलेले गाणे ऐका. ईश्वराची आळवणी आहे पण तरीही गाण्यात जबरदस्त गायकी आहे. पहिलीच ओळ बघा, "तुज" शब्द तसा खर्जात लावलेला आहे पण क्षणात "शंकरा" शब्दावर वरच्या सुरांत केलेली आलापी ऐकताना, आपण दिपून जातो आणि ही करामत लताबाईंची. खरतर, या गायिकेच्या गळ्याला कुठे "अटकाव" आहे, हा संशोधनाचा(च) विषय आहे. लयीची कितीही अवघड वळणे असू देत, गळ्यावर अशा काही पद्धतीने तोलून घेतली जातात आणि आपल्या समोर सादर होतात, की ऐकताना अविश्वसनीय वाटावे!!
    खरेतर, बिहाग रागापासून, काही ठिकाणी फटकून, चाल वळणे घेत पुढे सरकते, इतकी की, काही ठिकाणी "मारुबिहाग" रागाची सावली आढळते. अर्थात, "मारुबिहाग" राग हा, "बिहाग" रागाच्या कुटुंबातला असल्याने, तसा फार फरक पडत नाही.
    "पास रहते हुवे भी तुझसे बहुत दूर है हम,
    किसे दर्द सुनाते है की मजबूर है हम,
    तेरे प्यार मे दिलदार जो है मेरा हाल-ए-दिलदार
    कोई देखे या ना देखे अल्ला देख रहा है".
    "मेरे महेबूब" या चित्रपटातील हे गाणे आहे. संगीतकार नौशाद यांची चाल आहे तर शकील बदायुनी यांची शब्दकळा आहे. खरेतर केवळ "बिहाग" रागाची संपूर्ण ओळख म्हणून या गाण्याची निवड करणे अवघड आहे पण चालीत रागाच्या भरपूर छटा आढळतात. अतिशय जलद लयीतील गाणे आहे, अर्थात चित्रपटातील नृत्यगीत असल्याने द्रुत लय असणे साहजिक ठरते. गाण्यात तसे फार काही असामान्य नाही तसेच गाण्यात नेहमीचा केरवा ताल वापरला आहे. असे असून देखील लताबाईंच्या वेधक गायकीने आपले लक्ष या गाण्याकडे वेधले जाते.
    "मन हो राम रंगी रंगले,
    आत्म रंगी रंगले
    मन विश्वरंगी रंगले".
    भीमसेन जोशी यांनी अजरामर केलेली ही रचना. गोविंदराव टेंबे यांची शब्दकळा आहे. हे गाणे मात्र निखालस बिहाग रागाची ओळख करून देते, अगदी पहिल्या सुरापासून. पंडितजींचा जोमदार पण तरीही प्रसंगी हळवा होणारा आवाज असल्याने, गाण्याचा परिणाम आपल्या मनावर लगेच आणि दीर्घकाळ होतो. भजन गायकीला मैफिलीत मानाचे स्थान मिळवून देण्यात ज्या शास्त्रीय संगीत गायकांचा महत्वाचा वाटा आहे त्यात पंडित भीमसेन जोशी यांचे स्थान फार वरच्या क्रमांकाने ठेवावे लागेल.
    -- अनिल गोविलकर

  • “सांज ये गोकुळी”

    .... यमूनेशी कलून बसलेल्या यशोदेची अस्वस्थता काठाच्या पाण्याबरोबर लपलप करत होती. तिचं पाण्यातलं प्रतिबिंब विरळ होत चाललं... यमूना सावळी दिसू लागली, तशी आपल्या मागे चोरपावलांनी खट्याळ कान्हाच येऊन उभा की काय वाटून गर्रकन फिरून यशोमती उभी झाली. पण तिची काजळभरली नजर लांब जाऊन रिकामीच परत आली.. दूरपर्यंत फक्त हळूवार पावलांनी उतरत जाणारी सांज तेव्हढी दिसली. क्षितीजावर कायम उठावदार दिसणारी पर्वतरांग खरोखरच धूसर झालीय, की तिच्या डोळ्यांची डबडब धुकं होऊन उरलीय तिला कळेना...
    .... यमुनेपल्याडच्या देवळात संध्यारतीचा घंटारव झाला अगदी त्याचवेळी दूर धुळीचा लोळ उठला, गाई परतून येतानांचा घुंगुरवाळा वातावरणात घुमला तशी माऊली आनंदली...
    कान्ह्याच्या इच्छेविरुद्ध आज त्याला गाई राखायला पाठवल्याने, दुपारी त्याने गोपाळकाला केला पण स्वतः खाल्ला नाही ह्याची खबर तिच्यापर्यंत आली होती. त्याचं असं उपाशी राहणं तिला वेदना देतं हे पक्क जाणून असलेला तो नाठाळ, सांजेला परतून जाऊ तेव्हा यशोदेनं ताजं लोणी घुसळून ठेवलेलं असणार आणि आज नेहमीपेक्षा जास्त मायेने मला ती ते भरविल हे जाणून त्याने मुद्दाम काला चुकवला हे तिलाही कळलं होतंच.... पण म्हणून असा राग मनात धरून संपूर्ण गोकुळातल्या गाई- गुराखी परतून घटका उलटत आली तरी ह्याने मात्र परतू नये, ही शिक्षा आता माऊलीला सहन होईना... धुळीच्या लोटाकडे सावळ्याच्या ओढीनं धावत सुटलेली ती कुठल्याही क्षणी त्याचं दर्शन होईल आणि त्याला कुशीत घेऊ, गोंजारू अपार मायेने भरवू ह्या आशेनं निघाली. सांज गडद होत गेल्याने तिला आता वाटा दिसेनात, प्रत्येक वाट जणू तिच्या सावळ्याच्याच रंगाची होऊन गेलीय असं तिला वाटलं आणि त्या वाटण्याचं हसू फुटलं...
    गाई गोपी परतले... पाखरं परतली... धूळ शमली..... कान्हा मात्र दिसेना.
    नक्की लपून बसला असेल, आज तिला टोकाचं अस्वस्थ केल्याशिवाय हा शांत होणारच नाही, ओळखून तिने त्याच्या सार्‍या जागा धुंडाळल्या. ताजं लोणी वाडग्यात भरून, ते हाती घेऊन इथे- तिथे शोधत राहिली... त्याला आर्त हाका मारत राहिली... बाळ गोपाळांच्या घरी गेली, विचारपूस केली, सारी म्हणाली आम्ही त्याला दुपारनंतर पाहिलंच नाही.. आता मात्र माऊलीच्या डोळ्यांचं पाणी खळेना. का मी त्याला त्याच्या मनाविरुद्ध धाडलं म्हणत स्वतःला दुषण देऊ लागली. हातातलं लोणी पाहून अजूनच हळवी झाली. त्याचा माग काढायला ह्याला- त्याला पाठवू लागली.
    इतक्यात हवेच्या झोताबरोबर बासरीचा स्वर कानी आला आणि कान्हा येत असल्याची तिला खूण पटली.. आवाजाच्या दिशेने तिने धाव घेता, तो आवाज मात्र चारी दिशांनी येऊ लागला... इथे जावे की तिथे सैरभैर झाली. सारी त्याची माया आहे, रुसवा गेलेला नाही उमजून, शेवटी आहे तिथे बसली.
    भरल्या डोळ्यांनी सभोवताली पाहता उभं गोकूळच शामरंगाने रंगलंय असं तिला जाणवलं. तिने ज्याला दारात- घरात शोधलं त्याची छाया विश्वावर उमटलीय, जो तिला बसल्याजागी ब्रम्हांड दर्शन घडवतो त्याची चिंता करणारी ती कोण? ह्या प्रश्नाचं उत्तर शोधू लागली.
    बघता बघता, ही सांज म्हणजे स्वतः यशोदा आहे आणि गडद अंधार जणू तिचा पान्हा होऊन चौफेर पसरतो आहे असं तिला वाटू लागलं... त्या पान्हयाची ओळख पटून तरी कान्ह्याने माऊलीकडे धाव घ्यावी अशी उर्मी तिच्या तना- मनातून वाहू लागली. त्याचवेळी खांद्यावर झालेल्या उबदार स्पर्शानं ती अचानक शांत झाली आणि डोळे अथक झरू लागले. तिच्या हातातलं वाडगं काढून घेत, लोण्याचा शांतपणे आस्वाद घेत तो तिच्या पुढ्यात बसला....
    तिचं ओतप्रोत वात्सल्यानं माखलेलं ते रूप कान्हा कितीतरी वेळ बघत राहिला....

    -बागेश्री देशमुख
    *******
    "सांज ये गोकुळी" हे गाणं मला असं भेटतं.
    सुधीर मोघेंच्या शब्दातली जादू मनावर रेंगाळत राहते. सावळी सांज धुंद करून टाकते... आशाबाईंचा आवाज, (श्रीधर) फडके सरांचं संगीत प्रत्येक शब्दाला काळजापर्यंत पोहोचवतो.

    WhatsApp वरील संजीव वेलणकर यांच्या संगीत संगीत आणि फक्त संगीत या ग्रुप वर आलेला लेख साभार प्रकाशित.

  • राशी व त्यांचे स्वभाव – मीन

    राशी :- मीन
    स्वामी :- गुरु
    देवता :- चक्रपाणि
    जप मंत्र :- ॐ ह्रीं क्रीं चक्रायनमः
    उपास्यदेव :- हनुमान
    रत्न :- पुष्कराज / लसणी

    जन्माक्षर :- दी ची दि दु दू थ थाथ्र झ झं झा झि झी त्र दे द्रे द्रो दो च चा चं ही द्विस्वभावी राशी आहे.कन्या रास मीन राशीचा विरोधी रास मानली जाते. माशाला पाठीचा कणा नसतो. त्यामुळे मीन मानसिक व शारीरिक बाबतीत खूप लवचिक असतात. मीन राशीचे लोक सदैव मदतीस तत्पर, संवेदनशील, कल्पक, कधीही नाही न म्हणणारे असे असतात. मीन राशीला व्यवहार जमत नाही. तसेच जास्त वेळी लक्ष देणाऱ्या व्यायाम प्रकारांना ते कंटाळतात. मीन राशीचा खाण्यावर ताबा अजिबात नसतो. पोहता न येणारी मीन राशीची व्यक्ती क्वचित आढळते.

    विजय कुलकर्णी स्वामी समर्थ सेवा केंद्र काठापुर बु जिल्हा पुणे(आपल्या सर्वांच्या माहितीसाठी)