महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
नारायणगाव हे पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर असून, ते समुद्रसपाटीपासून ६५६ मीटर उंचीवर मीना नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे.
November 28, 2024
सोलापूर रेल्वे वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे केंद्र आहे. कुर्डुवाडी व होटगी ही जंक्शन्स जिल्ह्यात आहेत. मुंबई -चेन्नई, सोलापूर – विजापूर व मिरज – लातूर हे तीन लोहमार्ग जिल्ह्यातून गेले आहेत. कन्याकुमारी, चेन्नई, मुंबई, आग्रा, दिल्ली, हरिद्वार, भुवनेश्र्वर, बेंगलोर, हैदराबाद ही अनेक शहरे रेल्वेद्वारे सोलापूरला जोडली गेली आहेत. हे रेल्वेदृष्ट्या दक्षिणेचे प्रवेशद्वार आहे.
June 26, 2015
ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने चेन्नई शहरात इ.स.१६३९-४०मध्ये फोर्ट सेंट जॉर्ज या किल्ल्याचे बांधकाम केले. हातमागावर सुती कापड विणणाऱ्या वीणकऱ्यांना ब्रिटिशांनी किल्ल्याच्या परिसरात ठेवले होते. नंतर फोर्ट सेंट जॉर्ज येथील कारखाना पुनर्रचित करून प्रेसिडेन्सी म्हणजे अध्यक्षांच्या हुकुमतीखाली चालणारी संस्था निर्माण करण्यात आली.
November 28, 2024
सुशिक्षितांचे शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या डोंबिवलीत अनेक समृद्ध ग्रंथालये आणि वाचनालये आहेत. डोंबिवलीकरांची वाचनाची आवड जोपासण्यात त्यांचा मोठा हातभार आहे. विविध विषयांवरील असंख्य पुस्तके या वाचनालयांत संदर्भासाठी तसेच घरी नेण्यासाठी उपलब्ध आहेत. अनेक वाचनालये संगणकीकृत असून ऑनलाईन सुद्धा पुस्तक नोंदवता येते.
October 15, 2018
या जिल्ह्यातील प्रमुख पिके संत्री व कापूस ही नगदी पिके आहेत. खरीप हंगामात मुख्यतः तांदूळ, ज्वारी, भूईमुग, कापूस, मूग, तूर, सोयाबीन ,तर रब्बी हंगामात ज्वारी व ऊस, डाळी, ही पिके घेतली जातात. महाराष्ट्रात गव्हाच्या क्षेत्रात नागपूर जिल्हा पहिल्या ५ जिल्ह्यांमधे आहे.
June 26, 2015
मॉडर्न आर्ट गॅलरीची स्थापना १९५४ मध्ये दिल्ली येथे झाली.
January 23, 2017
मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर न्यास (Trust) हा भारतातील एक श्रीमंत न्यास समजला जातो.
May 27, 2016
गोंड, कोहली, पोवार, गोवारी, हळबी या जाती-जमातींचे लोक भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वास्तव्य करतात त्याचबरोबर विविध प्राचीन जाती-जमातींचा निवास आणि धातूच्या भांड्यांची निर्मिती करणारे,पारंपरिक कलाकुसर ही आढळतात.
June 22, 2015
मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर शहर हे मराठा समाजातील शिंदे या वतनदार घराण्याचे वतनी संस्थान म्हणून प्रसिध्द आहे.
December 14, 2016
ब्राझील (अधिकृत नाव: पोर्तुगीज: República Federativa do Brasil) हा दक्षिण अमेरिका खंडातील सर्वांत मोठा देश आहे. क्षेत्रफळानुसार ब्राझील जगातील पाचवा मोठा, लोकसंख्येनुसार जगात पाचवा व लोकशाहीवादी देशांमध्ये जगात चौथा मोठा देश आहे. ब्राझीलच्या पूर्वेस अटलांटिक महासागर असून देशाला ७,४९१ कि.मी. लांबीची विस्तृत किनारपट्टी याला लाभली आहे. याच्या उत्तरेस व्हेनेझुएला, सुरीनाम, गयाना, वायव्येस कोलंबिया, पश्चिमेस बोलीव्हिया व पेरू, नैर्ऋत्येस आर्जेन्टिना व पेराग्वे तर दक्षिणेस उरुग्वे हे देश आहेत.
October 9, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti