महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
अमेरिकेतील जॉर्जिया घुमट स्टेडियम हे या प्रकारातील जगातील सर्वांत मोठे स्टेडियम आहे.
८० हजार प्रेक्षक क्षमता असलेल्या स्टेडियमचा विस्तार ९.१९ एकरांत आहे.
याचे छत टेफलॉन व फायबरपासून बनविलेले आहे.
March 16, 2017
उत्तर अमेरिका खंडातील अमेरिकेची संयुक्त संस्थाने हा देश जगात सर्वत्र केवळ अमेरिका किंवा संयुक्त संस्थाने (युनायटेड स्टेट्स) या नावाने ओळखला जातो.
March 2, 2019
महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील पवनी येथे एका स्तंभावर गणेशपट्ट आहे. येथील भट यांच्या घरासमोरील ओसरीमध्ये असलेल्या ९० से. मी स्तंभावर चारही बाजूस वेगवेगळ्या गणेश प्रतिमा आहेत. यापैकी सर्वतोभद्र हा एक गणेश आहे. अतिशय पुरातन मूर्तीमुळे या गणेशाला अनोखे महत्त्व आहे.
November 19, 2015
अकोला जिल्हा महाराष्ट्राच्या पूर्व भागात आहे. या जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र अकोला हे आहे. अकोला जिल्हा हा विदर्भाच्या अमरावती प्रशासकीय विभागात येतो.
June 22, 2015
कांचिपुरम हे तमिळनाडू राज्यातील एक महत्वाचे जिल्हा मुख्यालय असलेले शहर आहे. चेन्नईपासून ७२ किलोमीटर अंतरावर वसलेल्या या शहराने ११.६०५ वर्ग किलोमीटर क्षेत्र व्यापलेला आहे.
January 12, 2018
मार्च महिन्यात इतरत्र अभावानेच आढळणारी पांढरट पिवळी टपोरी तोरणीची फळे बाजारात येतात. अलिकडे या फळांचे प्रमाण कमी झाले आहे. आंबट-गोड चवीची ही फळे इथल्या विविधतेची ओळख करून देतात.
November 14, 2018
रत्नागिरीची लोकसंस्कृती स्वभावतः कोंकणी असून जिल्ह्याचा अभिमानास्पद इतिहासाचे प्रतिबिंब येथील संस्कृतीत दिसून येते. अनेक शैक्षणिक संस्था आणि उद्योगांचे माहेरघर असलेले रत्नागिरी, व्यापार आणि निवासासाठी सोयीचे ठिकाण मानले जाते.
June 23, 2015
जिल्ह्यात केवळ बीडमधे औद्योगिक वसाहत आहे. जिल्ह्यात के १९७० साली परळी येथे औष्णिक विद्युत केंद्र उभारण्यात आले. १९९५ मध्ये वृक्षारोपणासाठी महाराष्ट्र शासनाच्या वनश्री पुरस्काराने या केंद्रास गौरविण्यात आले.
June 22, 2015
अमरावती या शब्दाचा अर्थ पुराणातील देव इंद्राची नगरी / राजधानी असा होतो. अमरावती जिल्ह्याच्या परिसराचा संबंध महाभारताशी जोडला असल्याचे संदर्भ पौराणिक कथा दंतकथांत आढळतात. भगवान श्रीकृष्णाची पत्नी रुक्मिणी ही कुंडिनपूरच्या राजाची कन्या असल्याचा उल्लेख पुराणात आढळतो.
June 22, 2015
हा जिल्हा कमी पावसाच्या, पर्जन्यछायेच्या प्रदेशात येतो. येथे पावसाचे वार्षिक सरासरी प्रमाण ५०० ते ७५० मि. मी. (५० ते ७५ से.मी.) इतके कमी आहे. तसेच पावसाची विभागणीही असमान आहे. परंतु उजनीच्या धरणामुळे जिल्ह्यात बागायती उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. सोलापूर जिल्हा ‘ज्वारीचे कोठार’ मानला जातो.
June 26, 2015
Copyright © 2025 | Marathisrushti