महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
सेंट लुसिया (इंग्लिश: Saint Lucia; फ्रेंच: Sainte-Lucie) हा कॅरिबियनमधील एक द्वीप-देश आहे. सेंट लुसिया पूर्व कॅरिबियन समुद्रामध्ये अटलांटिक महासागराच्या सीमेजवळ एका लहान बेटावर वसला असून तो लेसर अँटिल्सचा भाग आहे. सेंट लुसियाच्या उत्तरेस मार्टिनिक, दक्षिणेस सेंट व्हिन्सेंट तर आग्नेयेस बार्बाडोस ही बेटे आहेत. कॅस्ट्रीझ ही सेंट लुसियाची राजधानी व सर्वात मोठे शहर असून देशाच्या १.७३ लाख लोकसंखेच्या ३२ टक्के रहिवासी कॅस्ट्रीझमध्ये राहतात.
March 7, 2019
कोल्हापूर जिल्ह्यात प्रामुख्याने मराठा, लिंगायत, जैन व धनगर लोक मोठ्या संख्येने राहतात. ग्रामीण व शहरी लोकसंख्येचे प्रमाण अनुक्रमे सुमारे ७०% व ३०% आहे. यावरून जिल्ह्याचे ग्रामीण स्वरूप लक्षात येते. हा जिल्हा सधन मानला जातो.
June 26, 2015
नांदेड जिल्ह्यात प्रामुख्याने मराठी भाषा बोलली जाते. आदिवासी क्षेत्रात बोलीभाषा वापरली जाते. तेलुगूचा व दखनी उर्दूचा उपयोगही काही प्रमाणात या जिल्ह्यात केला जातो.
June 26, 2015
सापांचे प्रदर्शन केरळ राज्यातील कन्नूर शहरात प्रसिद्ध सर्प उद्यान आहे. येथे प्रत्येक तासाला सापांचे प्रदर्शन भरविण्यात येते.
October 21, 2023
अमेरिकेतील जॉर्जिया घुमट स्टेडियम हे या प्रकारातील जगातील सर्वांत मोठे स्टेडियम आहे.
८० हजार प्रेक्षक क्षमता असलेल्या स्टेडियमचा विस्तार ९.१९ एकरांत आहे.
याचे छत टेफलॉन व फायबरपासून बनविलेले आहे.
March 16, 2017
लळिंग किल्ला – धुळे जिल्ह्यातील हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारात मोडणारा किल्ला आहे. लळिंग किल्ला हा धुळे – मालेगाव रस्त्यावर धुळ्यापासून ८ किमी अंतरावर आहे.
June 22, 2015
भारतातील पहिली रेल्वे मुंबई-ठाणे दरम्यान सुरू झाली. दि.१६ एप्रिल, १८५३ रोजी ती वाहतूकीस खुली करण्यात आली व त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली होती. १८७० मध्ये मुंबईला कोलकाता या महानगराशी, तर १८७१ मध्ये चेन्नईशी लोहमार्गाद्वारे जोडण्यात आले.
June 26, 2015
सूर्यापेट हे आंध्र प्रदेशातील नलगोंडा जिल्ह्यातील एक मोठे शहर आहे.
October 17, 2023
पंजाब राज्यातील अमृतसर शहरात जालियानवाला बाग आहे.
इंग्रजांच्या रौलेक्ट अॅक्टचा विरोध करण्यासाठी जमलेल्या लोकांवर १३ एप्रिल १९१९ रोजी अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. इंग्रज अधिकारी जनरल डायरच्या आदेशावरुन अचानक झालेल्या गोळीबारात एक हजारपेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडले. येथील विहिरीत १२० शव आढळले होते.
January 24, 2017
महाराष्ट्राच्या नांदेड जिल्ह्यातील माहूर अथवा माहूरगड हे एक प्रसिध्द धार्मिक स्थळ आहे. पैनगंगा नदीच्या काठावर सातपुडा पर्वतरांगाच्या कुशीत असलेले माहूर हे समुद्रसपाटीपासून २६०० फूट उंचीवर असून त्याला घनदाट जंगलाचा वेढा आहे.
March 5, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti