व्हियेतनाम हा आग्नेय आशियातील एक देश आहे. व्हियेतनामच्या उत्तरेस चीन, पश्चिमेस लाओस व कंबोडिया हे देश तर पूर्वेस व दक्षिणेस दक्षिण चीन समुद्र आहेत. सुमारे ८.८ कोटी लोकसंख्या असलेला व्हियेतनामचा ह्या बाबतीत जगात १३ वा तर आशिया खंडात आठवा क्रमांक आहे. हनोईही व्हियेतनामची राजधानी तर हो चि मिन्ह सिटी (जुने नाव: सैगॉन) हे येथील सर्वात मोठे शहर आहे. बौद्ध धर्म हा या देशाचा मुख्य धर्म असून देशाची ८५% लोकसंख्या ही बौद्ध धर्माची अनुयायी आहे.
इ.स. ९३८ साली साम्राज्यवादी चीनपासून व्हियेतनामला स्वातंत्र्य मिळाले. १९व्या शतकाच्या अखेरीस फ्रेंचांनी ह्या भूभागावर आक्रमण करून येथे फ्रेंच इंडोचीन ही वसाहत निर्माण केली. दुसरे महायुद्ध संपल्यानंतर झालेल्या पहिले इंडोचीन युद्धामध्ये हो चि मिन्हच्या नेतृत्वाखाली व्हियेतनामी सैन्याने फ्रान्सचा पराभव केला. १९५४ साली व्हियेतनामचे उत्तर व दक्षिण असे दोन तुकडे करण्यात आले. मात्र एकत्रीकरणावरून पुन्हा झालेल्या व्हियेतनाम युद्धात उत्तरेची सरशी झाली व १९७६ साली व्हियेतनाम पुन्हा एकदा एकसंध बनला. पुढील एक दशक सोव्हियेत संघाच्या छत्रछायेत दारिद्र्य व एकाकीपणात काढल्यानंतर व्हियेतनामच्या कम्युनिस्ट पक्षाने अनेक आर्थिक व राजकीय सुधारणा हाती घेतल्या.
या देशाची लोकसंख्या नऊ कोटी आहे. सुरुवातीचा बराच काळ पारतंत्र्यात असलेला हा देश इ स ९३८ मध्ये बाक डाँग नदीवरील युद्धात (Battle of Bạch Đằng River) चीनचा निर्णायक पराभव करून हा देश स्वतंत्र झाला. नंतर त्यावर अनेक व्हिएतनामी सम्राटांनी आता या देशाच्या ताब्यात आहे त्यापेक्षा अधिक प्रदेश काबीज करून एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत राज्य केले. त्यानंतर युरोपियन सत्तांचा त्या भागांत शिरकाव होवून तो फ्रेंच वसाहतीत सामील झाला. दुसर्या महायुद्धाच्या (इ स १९४० च्या) जवळपास काही काळ तेथे जपानी साम्राज्यही पसरले होते. व्हिएतनामच्या पहिल्या स्वातंत्र्ययुद्धात १८५४ साली त्यांनी फ्रेंचांना उत्तर व्हिएतनाममधून बाहेर काढले आणि त्या देशाची उत्तर आणि दक्षिण व्हिएतनाम अशी फाळणी झाली. मात्र पुढेही हे युद्ध कमी अधिक प्रमाणात चालूच राहिले आणि प्रथम फ्रेंच व नंतर १९७५ मध्ये अमेरिकेला दक्षिणेतून काढता पाय घ्यायला लावून उत्तरेतल्या कम्युनिस्टांनी सर्व देश एकसंध केला.
१९७८ मध्ये शेजारी कंबोडियाने व्हिएतनामच्या काही भूभागावर कब्जा करण्याचा प्रयत्न केला. व्हिएतनामने चिनी पाठिंबा असलेल्या कंबोडियाच्या ख्मेर रूज या जुलुमी राजवटीवर हल्ला करून तिचा पाडाव केला आणि कंबोडियाच्या पूर्वीच्या राजाला सत्तेवर आणले. असे वरवर दिसत असले तरी व्हिएतनामला सोविएत युनियनचा पाठिंबा होता आणि ख्मेर रुजला चीनचा; त्यामुळे हे युद्ध सोव्हिएत युनियन व चीन मधले छुपे युद्ध मानले जाते. व्हिएतनामवर दबाव टाकण्यासाठी चीनने व्हिएत-चीन सरहद्दीवर युद्ध छेडले आणि व्हिएतनामचा काही भागही व्यापला. मात्र चिवट व्हिएतनामने तेथे प्रतिकार तर केलाच पण कंबोडियावरची आपली पकडही कमी केली नाही. यासाठी त्यांना सोव्हिएत युनियनचा उघड पाठिंबा आणि सैन्य मदतही मिळाली. शेवटी चीनने आपले सैन्य व्हिएतनामच्या व्यापलेल्या भूमीतून मागे घेतले. मात्र व्हिएतनामी सैन्य कंबोडियात पूर्ण स्थिरस्थावर होईपर्यंत पुढची दोन वर्षे तेथेच तळ ठोकून होते.
व्हिएतनाम हा आग्नेय आशियातील इंडोचायना द्विपकल्पावरील एक देश आहे. ‘सोशॅलिस्ट रिपब्लिक ऑफ व्हिएटनाम’ या नावानेही तो ओळखला जातो.
हानोई ही व्हिएटनामची राजधानी आहे. व्हिएतनामचे क्षेत्रफळ ३,३२,३३८ चौ.कि.मी. आहे. साधारण नऊ कोटीच्या जवळपास व्हिएटनामची लोकसंख्या आहे. याच्या पश्चिमेस कंबोडिया आणि लाओस, उत्तरेस चीन, पूर्वेस आणि दक्षिणेस दक्षिण नी समुद्र, पूर्वेस उत्तर भागात टाँकीनचे आखात तर नैर्ऋत्येस थायलंडचे आखात आहे. चीनपासून दक्षिणेस पसरलेल्या या देशाचा आकार लांबट इंग्रजी ‘एस’ या. अक्षरासारखा आहे. देशाची उत्तर दक्षिण लांबी १,६५० कि.मी. तर पूर्व पश्चिम रूंदी उत्तर भागात ६०० कि.मी. आणि दक्षिण भागात ३४० कि.मी. आहे. याची मध्यभागातील रूंदी फक्त ५०कि.मी. आहे. ८ अंश ३० ते २३ अंश उत्तर आणि १०२ अंश १० ते १०९ अंश ३० पूर्व रेखांश या भागात याचा विस्तार झालेला आहे. २,३०९ कि.मी. लांबीचा समुद्र किना- व्हिएटनामला लाभला आहे. उत्तर व्हिएतनाम आणि दक्षिण व्हिएतनाम यांचे .२ जुलै १९७६ रोजी विलिनीकरण होऊन सोशॅलिस्ट रिपब्लिक ऑफ व्हिएतनाम हा स्वतंत्र देश अस्तित्वात आला. प्राकृतिक दृष्ट्या व्हिएतनामचे पाच भाग पाडले गेले आहे.
देशाच्या दक्षिणेकडे मेकाँग नदीचा त्रिभुज प्रदेश आहे. आग्नेय आशियातील सर्वात लांब नदी म्हणून ही नदी प्रसिद्ध आहे. सुपीक जमीन, मुबलक पर्जन्यमान यामुळे व्हिएतनाम हा जगातील समृद्ध तांदूळ उत्पादक देशांपैकी व्हिएटनाम एक आहे. ऊस, केळी, नारळ याचे उत्पादनही मोठ्या प्रमाणावर होते. हवामान उष्ण कटिबंधीय मोसमी प्रकारचे आहे. २९ अंश ते १७ अंशापर्यंत येथील तापमान असते. १५० ते २०० सें.मी. पर्यंत पर्जन्यमान आहे. ओक, बीच, चेस्टनट, पाईन, साग, ओबनी, बांबू इ. वृक्षे येथे आढळतात. वाघ, हत्ती, गेंडा, हरीण, माकडे, मगरी, सुसरी इ. प्राणी तर विविध प्रकारचे पक्षी येथे पाहावयास मिळतात. अँथ्रसाईट, लिग्नाईट या प्रकारचे कोळसे, लोह, जस्त, शिसे, बॉक्साईट, तांबे, क्रोमियम, टंगस्टन आणि कथिल ही येथील मुबलक प्रमाणात मिळणारी खनिजे आहेत. दक्षिण किनाऱ्यावरील अपतट येथे खनिज तेलाचे साठे आढळले आहेत.
देशातील औद्योगिक क्षेत्र अजूनही मर्यादित स्वरूपात आहे. त्यामानाने शेतीचे उत्पन्न आयात देऊन जाते. व्हिएतनामची अधिकृत भाषा व्हिएतनामी आहे. तर येथील मुख्य धर्म बौद्ध आहे. व्हिएतनामचे मुख्य चलन डॉन्ग हे आहे.
राजधानी व सर्वात मोठे शहर :हनोई
अधिकृत भाषा :व्हियेतनामी
राष्ट्रीय चलन :डाँग
सौजन्य : विकिपीडिया