महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
फिजीचे प्रजासत्ताक (इंग्लिश: Republic of Fiji; फिजीयन: Matanitu ko Viti; फिजी हिंदी: फ़िजी गणराज्य) हा दक्षिण प्रशांत महासागरात वसलेला ओशनिया खंडाच्या मेलनेशिया भागातील एक द्वीप-देश आहे. हा देश सुमारे ३३२ बेटे असलेल्या द्वीपसमूहाचा बनला असून ह्यांपैकी ११० बेटांवर लोकवस्ती आहे. व्हिटी लेवू व व्हानुआ लेवू ही येथील प्रमुख बेटे आहेत. फिजीची राजधानी सुवा व्हिटी लेवू बेटावरच वसली आहे व ७५ टक्के रहिवासी सुवा महानगर परिसरामध्ये वास्तव्यास आहेत.
October 13, 2018
स्वीडनमधील ओरेब्रोचा किल्ला १३व्या शतकात बांधला गेला आहे.
September 1, 2023
बार्बाडोस मधील ब्रिजटाउन शहराची ओळख प्राचीन बंदर अशीही आहे. बार्बाडोसची राजधानी असलेल्या या शहराचे प्रशासन पार्लमेंटव्दारा चालविले जाते. या शहराची नोंद युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत आहे.
May 11, 2018
सुरीनाम हादक्षिण अमेरिकेतील एक देश आहे. सुरीनामच्या पूर्वेला गयाना, पश्चिमेला फ्रेंच गयाना व दक्षिणेला ब्राझील हे देश तर उत्तरेला अटलांटिक महासागर आहे. पारामारिबो ही सुरीनामची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
March 4, 2019
महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील हा प्राचीन घाट मार्ग आहे. हा मार्ग जुन्नर व कोकणातील भाग जोडतो. या मार्गाचे एक टोक जुन्नरच्या दिशेला तर दुसरे टोक कोकणात मुरबाड तालुक्यात आहे.
May 30, 2016
बेलीझ हा मध्य अमेरिकेतील एक लहान देश आहे. बेलीझच्या उत्तरेस मेक्सिकोचा युकातान द्वीपकल्प, पश्चिमेस व दक्षिणेस ग्वातेमाला तर पूर्वेस कॅरिबियन समुद्र आहेत. इंग्लिश ही राजकीय भाषा असलेला बेलीझ हा मध्य अमेरिकेमधील एकमेव देश आहे.
October 6, 2018
ट्युनिसिया हा उत्तर आफ्रिकेतील भूमध्य समुद्राच्या किनार्यावरील एक देश आहे. माघरेब भागात वसलेल्या व उत्तर आफ्रिकेमध्ये आकाराने सर्वात लहान असलेल्या ट्युनिसियाच्या पश्चिमेला अल्जीरिया, आग्नेयेला लिबिया व उत्तर आणि पूर्वेला भूमध्य समुद्र आहे. ट्युनिसियाचा ४०% भाग सहारा वाळवंटाने व्यापला आहे. ट्युनिस ही ट्युनिसियाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.
February 22, 2019
आठवड्यातील वारांनुसार पुण्यात पेठा अस्तित्वात आहेत. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे शहर पेठांचे शहर म्हणूनही प्रसिध्द आहे.
November 20, 2015
१२ ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग परळी येथे आहे. ते जवळजवळ सातशे वर्ष जुने असून अहिल्याबाई होळकरांनी त्याचा इ.स. १७०६ मध्ये जिर्णोध्दार केला.
June 22, 2015
ऑस्ट्रेलियातील लॉर्ड होवे बेट हे ज्वालामुखीनिर्मित बेट असून, या ठिकाणी हजारो प्राण्यांच्या जाती आढळतात. पक्षी अभ्यासकांसाठी हे बेट महत्त्वपूर्ण आहे.
July 8, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti