महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
हरियाणा राज्यातील यमुनानगर जिल्ह्यात प्राचीन चॅनेती स्तूप आहे.
December 15, 2016
जमैकाचे राष्ट्रकुल हा कॅरिबियनच्या ग्रेटर अँटिल्स भौगोलिक प्रदेशामधील एक लहान द्वीप देश आहे. जमैका कॅरिबियन समुद्रामध्ये क्युबाच्या १४५ किमी दक्षिणेस व हिस्पॅनियोलाच्या १८१ किमी पश्चिमेस वसला असून तो कॅरिबियनमधील पाचव्या क्रमांकाचा मोठा देश आहे. आहे. २०१२ साली सुमारे २९ लाख लोकसंख्या असलेला जमैका ह्या बाबतीत अमेरिका व कॅनडा खालोखाल अमेरिका खंडामधील तिसऱ्या क्रमांकाचा इंग्लिश भाषिक देश आहे. किंग्स्टन ही जमैकाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
February 19, 2019
जिल्ह्यात उस्मानाबाद, भूम व कळंब या ठिकाणी औद्योगिक वसाहती असून जिल्ह्यात साखर कारखाने ही आहेत.
June 23, 2015
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ ह्या अकोल्यातील महत्त्वाच्या संस्था व त्याचबरोबर महाराष्ट्रातील पहिले कृषी-पर्यटन केंद्र हेही याच जिल्ह्यातलं.
June 22, 2015
महाराष्ट्र मेरी टाईम बोर्ड (एमएमबी) ६ लहान बंदरे विकसित करीत आहे. एप्रिल १२ पर्यत तीन मालवाहू धक्यांचे काम पूर्ण झाले असून तीन मालधक्यांचे पूर्वबांधकाम प्रगतीवर आहे.
March 19, 2017
आंध्रप्रदेशातल्या कृष्णा जिल्ह्याचे हे मुख्यालय आहे. इथे विशेष दर्जा असलेली महापालिका असून इथले बंदर प्रसिध्द आहे. ब्रिटीश काळात या शहराचे नाव मासुलीपट्टणम असे होते. कृष्णा नदी बंगालच्या उपसागराला या ठिकाणी मिळते.
February 7, 2017
रिलायन्स विमानतळ विकासक प्रा. लि. कडे असलेल्या नांदेड विमानतळावरुन नियोजित व अनियोजित उड्डाणे होतात.
November 28, 2024
कापूस लोकर आणि वनस्पतीजन्य तेलांचा व्यवसाय या जिल्ह्यात ऐतिहासिक काळापासून चालतो आहे. कापूस आणि रेशीम यांच्या एकत्रीकरणातून तयार झालेल्या हिमरू नावाच्या वस्त्रप्रकारासाठी औरंगाबाद ओळखले जाते. पैठणी या नावाने आजही लोकप्रिय असलेल्या रेशमी साड्यांचे उत्पादनही औरंगाबाद परिसरात मोठ्या प्रमाणात होई.
June 22, 2015
सातारा जिल्ह्याला मोठी ऐतिहासिक, सामाजिक व शैक्षणिक पार्श्वभूमी लाभली आहे. सातारा जिल्ह्याने भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात व सामाजिक जडणघडणीत फार मोठे योगदान दिले आहे. ‘महाराष्ट्र धर्म वाढवावा’ असे सांगणार्या समर्थ रामदासांचा सहवास या जिल्हयाला लाभला.
June 26, 2015
इंडोनेशिया हा आग्नेय आशिया व ओशनियामधील एक देश आहे. हा देश हिंदी महासागरामध्ये एकूण १७,५०८ बेटांवर वसला आहे. बोर्नियो, जावा, सुमात्रा, सुलावेसी, तिमोर व न्यू गिनी ही येथील प्रमुख बेटे आहेत. इंडोनेशियाची लोकसंख्या सुमारे २३ कोटी असून जगातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या ह्याच देशात आहे. संस्कृतमध्ये या देशाचे नाव दीपांतर आहे..
February 21, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti