(User Level: User is not logged in.)

शहरे आणि गावे

महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • अल्जीरिया

    अल्जीरिया

    अल्जीरिया हा आफ्रिका खंडाच्या उत्तर भागातील माघरेब प्रदेशामधील एक देश आहे. अल्जीरियाच्या उत्तरेला भूमध्य समुद्र, ईशान्येला ट्युनिसीया, पूर्वेला लिब्या, आग्नेयेला नायजर, नैऋत्येला माली व मॉरिटानिया तर पश्चिमेला मोरोक्को व पश्चिम सहारा हे देश आहेत. क्षेत्रफळानुसार अल्जीरिया सुदानखालोखाल आफ्रिका खंडातील दुसऱ्या क्रमांकाचा तर जगातील १०व्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश आहे. अल्जीयर्स ही अल्जीरियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

    ऐतिहासिक काळामध्ये रोमन साम्राज्याचा भाग असलेल्या अल्जीरियावर सातव्या शतकामध्ये मुस्लिमांनी अधिपत्य मिळवले. मध्य युग काळादरम्यान येथे अनेक विद्वान व पंडितांचे वास्तव्य होते. सुमारे इ.स. १५१७ साली हा भूभाग ओस्मानी साम्राज्यामध्ये आणला गेला. १९व्या शतकाच्या सुरूवातीस अमेरिका व बार्बरी राज्यांमध्ये झालेल्या दोन युद्धांमुळे अल्जीरियाची स्थिती कमकूवत झाली होती. ह्याचा फायदा घेत फ्रेंचांनी हा भाग काबीज केला. इ.स. १८३० पासून फ्रान्सची वसाहत असलेल्या अल्जीरियाला १९६२ साली स्वातंत्र्य मिळाले.

    सध्या अल्जीरियामध्ये अध्यक्षीय प्रजासत्ताक पद्धतीचे सरकार असून अब्देलअझीझ बुतेफ्लिका हा १९९९ सालापासून राष्ट्राध्यक्षपदावर आहे. खनिज तेल व नैसर्गिक वायूचे मोठे साठे असलेल्या अल्जीरियाची अर्थव्यवस्था ह्या उद्योगांवर अवलंबुन आहे. अल्जीरिया आफ्रिकन संघ, अरब संघ, ओपेक, संयुक्त राष्ट्रे इत्यादी आंतरराष्ट्रीय संघटनांचा सदस्य आहे.

    ईशान्येला ट्युनिसीया; पूर्वेला लिब्या; आग्नेयेला नायजर; नैऋत्येला माली, मॉरिटानिया; पश्चिमेला मोरोक्को, पश्चिम सहारा

    राजधानी व सर्वात मोठे शहर : अल्जीयर्स
    अधिकृत भाषा : अरबी
    इतर प्रमुख भाषा : बर्बर, फ्रेंच
    स्वातंत्र्य दिवस : जुलै ५, १९६२ (फ्रान्सपासून)
    राष्ट्रीय चलन : अल्जीरियन दिनार(DZD)

    देश : अल्जेरिया
    राजधानी : अल्जिरस
    चलन : अल्जेरियन डायनर


    Country : Algeria
    Capital city : Algiers
    Currency : Algerian dinar
    Calling code : 213

    ( Source : Wikipedia )

      March 12, 2018


  • महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ

    महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ

    महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ ही मुंबई कामगार कल्याण निधी अधिनियम १९५३ अन्वये स्थापना करण्यात आलेली संस्था आहे.

      March 22, 2017


  • अमरावती जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर तिवसा

    तिवसा हे अमरावती जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. समुद्रसपाटीपासून ३०६ मीटर उंचीवर ते वसलेले आहे. तालुक्याचे मुख्यालय असल्याने या शहरात राज्य शासनाची अनेक कार्यालये आहेत.

      November 28, 2024


  • सोलापूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर बार्शी

    बार्शी हे सोलापूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. या शहराला ‘मराठवाड्याचे प्रवेशद्वार’ असेही म्हणतात. बार्शीची तूरडाळ संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. देशात विष्णूची दोन मंदिरे प्रसिद्ध आहेत.

      November 28, 2024


  • रिया (RIA) प्रकारचा कोकण किनारा

    रिया (RIA) प्रकारचा कोकण किनारा

    महाराष्ट्राच्या अति पश्चिमेस अरबी समुद्र व सह्याद्री पर्वत यांच्यामध्ये उत्तरेस दमनगंगा नदी व दक्षिणेस तेरेखोल नदीपर्यत गेलेला लांबट अरुंद प्रदेश कोकण म्हणून ओळखला जातो.

      March 18, 2017


  • गयाना

    गयाना

    गयानाचे सहकारी प्रजासत्ताक हा दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर किनार्‍यावरील एक देश आहे. गयानाच्या पूर्वेला सुरिनाम, पश्चिमेला व्हेनेझुएला, दक्षिण व नैऋत्येला ब्राझिल तर उत्तरेला अटलांटिक महासागर आहे.

      October 10, 2018


  • कोकणचा मेवा – तोरणीची फळे

    मार्च महिन्यात इतरत्र अभावानेच आढळणारी पांढरट पिवळी टपोरी तोरणीची फळे बाजारात येतात. अलिकडे या फळांचे प्रमाण कमी झाले आहे. आंबट-गोड चवीची ही फळे इथल्या विविधतेची ओळख करून देतात.

      November 14, 2018


  • सर्वाधिक लांब अंतर कापणारी हिमसागर एक्स्प्रेस

    सर्वाधिक लांब अंतर कापणारी हिमसागर एक्स्प्रेस

    हिमसागर एक्स्प्रेस ही देशातील सर्वाधिक लांब अंतर कापणारी रेल्वे आहे. कन्याकुमारी ते जम्मू-तावी असा ३७५१ किलोमीटरचा प्रवास ही रेल्वे करते.

      December 17, 2016


  • p-3433-Karimganj.8

    करीमगंज

    आसाम राज्यातील जिल्हा मुख्यालय असलेले करीमगंज हे शहर बांगलादेशच्या सरहद्दीवर वसलेले आहे. कुशीयारा नावाची नदी या शहराजवळून वाहते. ही नदीच भारत आणि बांगलादेश यांच्यामधली सीमा मानली जाते. या शहराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे नोटी खल नावाचा एक मोठा कालवा या शहरातून वाहतो.

    करीमगंज जिल्ह्याची स्थापना १९८३ मध्ये झाल्यानंतर जिल्ह्याचे मुख्यालय या शहरात आले. त्यापूर्वी हे शहर सील्हेट जिल्ह्याचा एक भाग होते. रस्ते व रेल्वे मार्गाने हे शहर देशाच्या विविध भागांशी जोडलेले आहे. गुवाहाटीपासून करीमगंज ३५० किलोमीटर अंतरावर वसलेले आहे.

      April 19, 2017


  • वाळूचे बेट फ्रासर

    वाळूचे बेट फ्रासर

    ऑस्ट्रेलियातील फ्रासर बेट हे जगातील सर्वांत मोठे वाळूचे बेट आहे.

      March 14, 2017