महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरानजीक असलेली बुटीबोरी औद्योगिक वसाहत ही आशिया खंडातील सर्वात मोठी पंचतारांकित औद्योगिक वसाहत आहे.
April 9, 2016
सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स (Saint Vincent and the Grenadines) हा कॅरिबियनमधील एक छोटा द्वीप-देश आहे. सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स कॅरिबियन समुद्रातील अँटिल्स द्वीपसमूहाचा भाग असून त्याच्या उत्तरेला सेंट लुसिया, पूर्वेला बार्बाडोस तर दक्षिणेला ग्रेनेडा हे देश आहेत. ह्या देशाच्या अखत्यारीमध्ये सेंट व्हिन्सेंट हे मध्यम आकाराचे बेट व ग्रेनेडीन्स ह्या द्वीपसमूहामधील अनेक लहान बेटे आहेत.
March 7, 2019
धरणगाव हे जळगाव जिल्ह्यातील तालुका मुख्यालय असलेले एक महत्त्वाचे शहर आहे. या शहरात माळी समाजाच्या लोकांची मोठी संख्या आहे
October 10, 2015
परभणी परिसराशी अनेक पौराणिक संदर्भ जुळलेले आहेत. संत जनाबाईंच्या विठ्ठलभक्तीचा स्पर्श या जिल्ह्याला झालेला आहे. जिंतूरसारखे जैन भाविकांचे श्रद्धास्थान असलेले ठिकाण या जिल्ह्यात आहे.शिवाय दक्षिण गंगेचा (गोदावरीचा) काठ लाभलेल्या या जिल्ह्यातून मराठवाडा कृषी विद्यापीठ कार्यरत आहे.
June 26, 2015
प्राचीन इजिप्त संस्कृती ईशान्य देशात वसलेली संस्कृती आहे. उत्तर व दक्षिण इजिप्तचे एकत्रिकरण केल्यानंतर ही संस्कृती उदयास आली, असे मानले जाते.
March 9, 2017
अमेरिकेतील सॉल्ट लेक सिटीमधील सॉल्ट लेक चर्च हे सर्वांत मोठे एलडीएस चर्च आहे. या चर्चचे बांधकाम पूर्ण करण्यास सुमारे ४० वर्षे लागली.
September 1, 2023
भारतातील पहिली रेल्वे मुंबई-ठाणे दरम्यान सुरू झाली. दि.१६ एप्रिल, १८५३ रोजी ती वाहतूकीस खुली करण्यात आली व त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली होती. १८७० मध्ये मुंबईला कोलकाता या महानगराशी, तर १८७१ मध्ये चेन्नईशी लोहमार्गाद्वारे जोडण्यात आले.
June 26, 2015
गुजरात राज्यातील कच्छ हे शहर शक राजा दुसरा रुद्रदामन याच्या राज्याचा भाग होते. कच्छचा उल्लेख महाभारतात, पाणिनीच्या अष्टाधायीमध्ये व शिशुपाल वध या खंडकाव्यात आढळतो.
July 5, 2016
हे मंदिर जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथे आहे. भारतातील प्रमुख गणेश पीठापैकी हे एक पीठ होय. या स्थानांजवळील तलावात वर्षाऋतूत नेहमी कमळ असतात. कमळ म्हणजे पदम आणि आलय म्हणजे घर – म्हणून याला पद्मालय असे म्हणतात.
October 16, 2018
पुणे-नासिक महामार्गावर चाकण -राजगुरूनगर- मंचर- नारायणगांवाहून जुन्नर मार्गे लेण्याद्री हे अंतर पुण्यापासून ९४ किमी. आहे.
November 8, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti