महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
कापूस लोकर आणि वनस्पतीजन्य तेलांचा व्यवसाय या जिल्ह्यात ऐतिहासिक काळापासून चालतो आहे. कापूस आणि रेशीम यांच्या एकत्रीकरणातून तयार झालेल्या हिमरू नावाच्या वस्त्रप्रकारासाठी औरंगाबाद ओळखले जाते. पैठणी या नावाने आजही लोकप्रिय असलेल्या रेशमी साड्यांचे उत्पादनही औरंगाबाद परिसरात मोठ्या प्रमाणात होई.
June 22, 2015
पोलंड हा मध्य युरोपातील एक देश आहे. पोलंडच्या उत्तरेला बाल्टिक समुद्र व रशियाचे कालिनिनग्राद ओब्लास्ट, ईशान्येला लिथुएनिया, पूर्वेला बेलारूस व युक्रेन, दक्षिणेला स्लोव्हाकिया, नैऋत्येला चेक प्रजासत्ताक तर पश्चिमेला जर्मनी हे देश आहेत. ३,१२,६८५ वर्ग किमी क्षेत्रफळ असलेला पोलंड हा आकाराने युरोपातील ९वा व जगातील ६९वा मोठा देश आहे. वर्झावा तथा वॉर्सो ही पोलंडची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
February 26, 2019
औरंगाबाद हा कृषिप्रधान जिल्हा आहे. जिल्ह्यातले एकूण ६,८९,८०० हेक्टर क्षेत्र लागवडीखाली येते, त्यातील जिरायती ५,३७,३०० हेक्टर आहे व १,५२,५०० हेक्टर क्षेत्र बागायती आहे
June 22, 2015
गुजरात राज्यातील कच्छ हे शहर शक राजा दुसरा रुद्रदामन याच्या राज्याचा भाग होते. कच्छचा उल्लेख महाभारतात, पाणिनीच्या अष्टाधायीमध्ये व शिशुपाल वध या खंडकाव्यात आढळतो.
July 5, 2016
मराठी साहित्यातील एक नाटककार, विनोदी लेखक आणि समीक्षक म्हणून प्रसिध्द असणारे श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचा जन्म बुलढाणा येथे झाला.
June 22, 2015
शेंदुरजाना घाट हे अमरावती जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. वारुड तालुक्यात ते येते. या शहरातील साक्षरतेचे प्रमाण संपूर्ण अमरावती जिल्ह्यात लक्षणीय आहे.
November 28, 2024
संत ज्ञानेश्वर – वारकरी संप्रदायाचे दैवत व महाराष्ट्राचे अनमोल रत्न संत ज्ञानेश्वरांचा जन्म इ. स.१२७५ मध्ये येथील पैठण तालुक्यातील आपेगाव येथे झाला. ज्ञानेश्वरांनी येथेच रेड्याच्या मुखातून वेद वदवून घेतले असे म्हटले जाते.
June 22, 2015
आंब्याबरोबरच काळसर लाल रंगाचे कोकमही लक्ष वेधून घेतात. ताजे कोकमही बाजारात मिळतात. कोकमच्या सारची चवही पर्यटकांना या दिवसात घेता येते. मात्र सोबत पॅकींगमध्ये उपलब्ध असलेले गोड-आंबट कोकम किंवा कोकम सरबतालाच पसंती जास्त असते. नारळ आणि कोकमापासून बनविलेल्या सोलकढीची लज्जतही काही निराळीच असते.
November 15, 2018
श्री विष्णूला सिद्धी प्राप्त करून देणारा, कार्य सिद्धीस नेणारा सिद्धटेकचा हा सिद्धिविनायक अष्टविनायकांपैकी उजव्या सोंडेचा एकमेव गणपती. श्री क्षेत्र सिद्धटेक हे अहमदनगर जिह्यातील कर्जत तालुक्यात भीमा नदीच्या काठावर वसलेले एक खेडेगाव आहे.
April 10, 2016
मुंबई-पुणे-बंगळूर-चेन्नई हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ कोल्हापूर जिल्ह्यातून जातो. अलीकडेच पुणे-कोल्हापूर हा महामार्ग चौपदरी करण्यात आल्यामुळे प्रवासाचा वेळ वाचून प्रवाशांना अनेक फायदे होत आहेत. कोल्हापूर व रत्नागिरीला जोडणारा आंबा घाट, सावंतवाडीला जोडणारा फोंडा घाट, तसेच सिंधुदूर्ग जिल्ह्याला जोडणारा अंबोली घाट हे पश्र्चिम महाराष्ट्र व कोकणाला जोडणारे प्रमुख घाट या जिल्ह्यात आहेत.
June 26, 2015
Copyright © 2025 | Marathisrushti