अनेक शाळा अभ्यासक्रमावर आधारित आशय शिकविण्याचा प्रयत्न करतात. वर्गातील प्रचंड विद्यार्थी संख्येमुळे अभ्यासक्रम शिकवणे ही शिक्षकांना नेमून दलेली कामगिरी असते. त्यामुळे अभ्यासक्रमाबाहेरचे शिकविण्यावर व विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण ओळखून त्यानुसार त्यांना वाव देण्यासाठी शिक्षकांकडे वेळही नसतो. त्यामुळे एक चाकोरीबद्ध अभ्यासक्रम पूर्ण करणे एवढेच शिक्षक करू शकतात.
June 17, 2026
अनेक शिक्षक, शाळा, आज ‘सृजनात्मकतेकडे वाटचाल करत आहेत. नावीन्यशील प्रयोगामुळे शिक्षणक्षेत्रात आशाादयक चित्र निर्माण होत आहे. असेच एक शिक्षक आहेत श्री. बालाजी जाधव. आठवणीतील शिक्षक आणि शाळा ही जगण्याची ऊर्मी असते. जसे शिक्षक तंशी शाळा. As is the H.M., so is the school. शिक्षकामुळे शाळा लक्षात राहतात. दुर्गम, दुष्काळी भागात राहून शाळेला बागायती करणारे, नंदनवन करणारे शिक्षक श्री. बालाजी जाधव, गुगल इन्नोव्हेटर शिक्षक. ॲप्स, वेब स्वनिर्मित करुन गुगल मायक्रोसॉफ्टकडून सन्मान. गुगलसोबत दोनशेहून जास्त कार्यशाळा घेऊन दोन लाखाहून जास्त शिक्षक प्रवाहात आणले. शाळा ५० पेक्षा जास्त देशासोबत व्हर्चुअली जोडली आहे. ‘शिक्षणभक्ती’ हे युट्युब चॅनेल आहे. गुगल मायक्रोसॉफ्ट, एक्सेल गुजरात सरकारकडून आयसिटी वर्कबद्दल सन्मान. महाराष्ट्र ई-गव्हर्नमेंट आयटी सेलचे सदस्य. एससीईआरटीचे टेक्नो रिसोर्स पर्सन. कार्यप्रेरणा साधन व्यक्ती. बालभारती ॲप क्रिएशन सदस्य १५ देशात व्हर्चुअल ऑफलाईन, २५ अँड्रॉइड अॅप्लिकेशन केले. शाळेसाठी एसएमएस चॅनल केले. स्पर्धा परीक्षेसाठी ५०० फ्री ऑनलाइन टेस्ट. ओपेन सोर्स टूल फॉर ऑनलाइन टेस्ट. व्हिडिओज, अॅप्स गृहपाठचा वापर लाखो विद्यार्थी करतात. शाळेत लॅपटॉप स्वतः आणला, गैरहजर मुलेही यायला लागली. सुरुवातीला फ्फक्त तेवीस विद्यार्थी येत होते. त्यापैकी १२ विद्यार्थी हजर असायचे. मुलं गावात भटकत असायची. मुलांची आवड जपण्यासाठी स्वतः लॅपटॉप घेतला.
June 12, 2026
पाठांतराने गुण मिळतात; पण विचार करण्याने व त्यानुसार आचार करण्याने सद्गुण अंगी बाणतात. वेगवेगळ्या कल्पना केल्यानेच नावीन्य जन्म घेते. केवळ पुस्तकं वाचून आयुष्यात यशस्वी होता येत नाही. पुस्तकाच्या पलीकडेही काही वेगळी माणसंही समजून घेण्यासाठी अभ्यासायची असतात.
June 10, 2026
“मेरे लिखने की प्रेरणा वहा से आती है जहाँ के लोग शोषित है मगर फिरभी हार नही मानते”- असे महाश्वेता देवी यांनी म्हटले आहे. संघर्ष सुद्धा प्रेरणेची बाब असू शकते. एखाद्याचा संघर्ष, दुःखं,वेदना पाहिल्यानंतर आपले दुःखं त्याच्यासमोर काहीच नाही हे समजून माणूस पुन्हा जोमाने उभा राहतो. योग्य वयात संघर्ष करावा लागला तर त्याचं एवढं अप्रूप नसतं पण बालपणीच एखादी मोठी जबाबदारी अंगावर पेलावी लागली तर ती विचार करायला लावते.. बालपण हे खेळण्याचे वय, आनंदी राहण्याचे वय पण त्या वयात पोटासाठी धोकादायक कसरती करून आपलं व कुटुंबाच पोट भरणं हे तो मुलगा शिकतो व त्याला पाहून आपण किती सुखी जीवन जगत आहोत, जराही कष्ट नाहीत याची जाणीव व्हायला लागते. जाणीव होणं म्हणजेच प्रेरणाची सुरुवात असते. नैराश्यात आशेचा किरण दिसणें ही सुद्धा प्रेरणाची पहाट असते. आर्थिक परिस्थितीमुळे जेव्हा पालक आपल्या पाल्यांना शाळेत पाठवू शकत नाहीत व त्या कोवळ्या जीवांचा उपयोग अर्थाजनासाठी करतात तेंव्हा, आपल्या मुलांचा गृहपाठ करण्याची काही पालकांची कीव येते. आपल्या पाल्यांना कसली शिक्षा होऊ नये म्हणून काही पालक इतके हळवे होत असतील तर तो मुलगा कोणत्या संघर्षाला पुढे उभा राहील? अथक परिश्रम, जिद्द यांनी संघर्षावर मात करता येते. आमच्या मुलांना काही पालक संघर्ष करू देत नाहीत ही वस्तुस्थिती आहे.
June 13, 2026
स्वप्नांना दृष्टिकोनाची गरज असते. दृष्टीहिनांनीही स्वप्न पाहून इतिहास घडविला आहे. भारतातील सगळ्यात तरुण उद्योजक श्रीकांत बोला २०२१ मध्ये फोर्ब्सच्या ३० अंडर ३० च्या यादीतही त्याला स्थान देण्यात आले आहे. ज्यांना वाटते की, शारीरिक अक्षमता एखाद्या व्यक्तीच्या यशाच्या मार्गात अडथळा ठरू शकते, त्यांच्यासाठी श्रीकांत बोला हे एक आदर्श उदाहरण आहे. श्रीकांत अंध असून ही कोट्यवधींचा मालक झाला आहे. श्रीकांतने हे खरं करुन दाखवलं आहे की, स्वप्न पाहण्यासाठी डोळ्यांची गरज नाही, स्वत:वरील विश्वास तुम्हाला तुमचं यश गाठायला मदत करु शकतो.श्रीकांत बोला याचा जन्म ७ जुलै १९९२ रोजी झाला. आंध्र प्रदेशातील सीतारामपुरम येथील मछलीपट्टणम येथे जन्मलेला श्रीकांत आयुष्याच्या सुरुवातीपासूनच अंध होता. त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थितीही फारशी चांगली नव्हती.
June 23, 2026
अब्राहम लिंकन सांगून थकले की माझ्या मुलाला हे शिकवा माझ्या मुलाला ते शिकवा, त्यांनी मुख्याध्यापकांना लिहिलेलं पत्र मुख्याध्यापकांच्या खोलीत फोटो फ्रेम मध्ये बंदिस्त झालं आहे. फ्रेम मध्ये बंदिस्त केले की विचार ही बंदिस्त होतात कां?प्रेरणेच्या पायवाटा या धूळ खाण्यासाठी नसून त्याच्यावरून मार्गक्रमण करण्यासाठी असतात. शाळेत फक्त अभ्यासक्रम शिकवतात. संस्कार करणं शाळेची जबाबदारी आहे असं परिपत्रक तरी अजून निघालेले नाही कारण परिपत्रकाच्याच मार्गाने काही शाळा मार्गक्रमण करतात.
June 18, 2026
रोहिणी लोखंडे यांनी विद्यार्थ्यांसाठी राबवलेल्या उपक्रमांची डोंगराएवढी यादी बघूनच थक्क व्हायला होते; त्याचबरोबर, त्यांची विद्यार्थीहिताची तळमळ लक्षात येते. हे उपक्रम बघा हं-रंजक अध्यापन, संगीत कवायत, शाळेला रंगरंगोटी, शिक्षण महोत्सव, We learn English हा परिपाठ, वैदिक गणिताचे अध्यापन, स्पेलिंग बँक, इंग्रजी अंताक्षरी, ‘आम्ही वाचतो’ (मुले पुस्तके वाचून वहीत लिहीत असत), सामान्यज्ञान व प्रश्नमंजुषा, प्रश्नकुंभ, भाषा अभिव्यक्ती, मुलाखत, ग्लोबल क्लासरूम (केरळच्या संतोष तळपट्टी या शिक्षकांची घेतलेली मुलाखत), दिनांकांचा पाढा, लेझिम पथक, स्नेहसंमेलनातून निधीसंकलन (सात लाख रुपये), खाऊगल्लीची लज्जत (सहा हजार रुपयांची कमाई ), शाळेची कंपाउंड वॉल.. लोखंडेबाईंनी असे विविध उपक्रम शाळांमध्ये राबवले. त्यामुळे मुलांमध्ये शाळेविषयी गोडी निर्माण झाली. शाळेत येणाऱ्या मुलांची संख्या वाढली.
June 15, 2026
कुंडीतील सदाफुली बहरली होती. टवटवीतपणे डोलत डोलत नेत्राला सुख देत होती. प्राप्त परिस्थितीमध्ये मिळेल तेवढ्या पाण्यावर मिळेल तेवढ्या जमिनीवर फुलायचं हे वनस्पती पासून शिकायला हवं. कड्या कपारीत बीज रुजतं आणि वाढतं. कसल्याही तक्रारी न करता या वनस्पती वाढतात, बीज अंकुरतं. कुठली प्रेरणा ?कोणाकडून घेतात काहीच कळत नाही. आपणास त्यांच्यापासून प्रेरणा घ्यायला हवी की प्राप्त परिस्थितीत सुद्धा समाधान असतं व त्याही परिस्थितीत फुलायचं व दुसऱ्यांना आनंद द्यायचा असतो. दोन दिवस पाणी येणार नाही म्हणल्यावर आपण जास्तीचं पाणी भरून ठेवू शकतो पण वनस्पतींनी काय करावं? कसलीही तक्रार नाही, कसलीही खदखद नाही मिळेल तेवढ्यात खुश राहायचं,दुःखं उगाळायचं नाही.
June 19, 2026
अनुभूती शिवाय संबोध स्पष्टता नाही.संबोध स्पष्ट नसले की बोध होत नाही. अर्थ माहीत नसताना बऱ्याचशा वेळेला अनेक विद्यार्थी पाठांतर करतात. पाठांतर जर समजून केलं तर संबोध स्पष्ट व्हायला मदत होते. अनेक वेळा पाठांतर करून गुण मिळवण्याचा प्रयत्न केला जातो, विद्यार्थ्यांना अर्थ विचारला असता ते निरुत्तर होतात. जीवनाचा संबोध स्पष्ट नसला की जीवन आत्महत्या जवळ करतं. जीवन कळायला जीवन समजलं पाहिजे. माणसांचेही संबोध काही वेळा कळत नाहीत ते समजून घ्यायला हवेत, यांच्याशी संवाद साधायला हवा. अनेक माणसे अशी कां वागतात हे आपल्याला कळत नाही कारण आपण त्यांना समजून घेतलेलं नसतं.आपण जेंव्हा म्हणतो तू मला समजूनच घेतलं नाही, तुला मी कळालोच नाही, बऱ्याच वेळेला माणसांचे मन कळत नाही.
July 6, 2026
देवाला अनेक ठिकाणी जायला जमत नाही म्हणून काही चांगली माणसे पृथ्वीतलावर कदाचित पाठवले असावीत.काही माणसांचे निष्पाप कर्म पाहून हाच विचार मनात येतो. प्रेरणेची पायवाट अजून काय असते?
June 7, 2026
Copyright © 2025 | Marathisrushti