(User Level: User is not logged in.)

युवा-विश्व

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • स्वप्नांना डोळ्यांची गरज नसते.

    स्वप्नांना दृष्टिकोनाची गरज असते. दृष्टीहिनांनीही स्वप्न पाहून इतिहास घडविला आहे. भारतातील सगळ्यात तरुण उद्योजक श्रीकांत बोला २०२१ मध्ये फोर्ब्सच्या ३० अंडर ३० च्या यादीतही त्याला स्थान देण्यात आले आहे. ज्यांना वाटते की, शारीरिक अक्षमता एखाद्या व्यक्तीच्या यशाच्या मार्गात अडथळा ठरू शकते, त्यांच्यासाठी श्रीकांत बोला हे एक आदर्श उदाहरण आहे. श्रीकांत अंध असून ही‌ कोट्यवधींचा मालक झाला आहे. श्रीकांतने हे खरं करुन दाखवलं आहे की, स्वप्न पाहण्यासाठी डोळ्यांची गरज नाही, स्वत:वरील विश्वास तुम्हाला तुमचं यश गाठायला मदत करु शकतो.श्रीकांत बोला याचा जन्म ७ जुलै १९९२ रोजी झाला. आंध्र प्रदेशातील सीतारामपुरम येथील मछलीपट्टणम येथे जन्मलेला श्रीकांत आयुष्याच्या सुरुवातीपासूनच अंध होता. त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थितीही फारशी चांगली नव्हती.

      June 23, 2026


  • प्रेरणेचं चालतं बोलतं विद्यापीठ : रमेश पानसे

    आज बरेच जण, बोलतात, लिहितात शैक्षणिक चर्चा करतात त्यात भाग घेतात पण प्रत्यक्ष शिक्षणासंबंधी कार्य रमेश पानसे व त्यांच्या विचारसरणी सारखे लोक करीत आहेत, त्यासाठी त्यांनी अर्थशास्त्राची प्राध्यापकी सोडून शिक्षण क्षेत्राला वाहून घेतले. श्रीमती अनुताई वाघ यांच्या प्रेरणेने व सानिध्यात राहून त्यांनी त्यांच्या अर्धवट कार्यास पूर्णत्वास नेण्याचे ठरवले आहे. ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार नावीन्यपूर्ण पद्धतीने करण्यात ते सध्या कार्यरत आहेत. ग्राममंगल च्या माध्यमातून शिक्षणाची एक संकल्पना ते रुजवत आहेत व ती चांगली आकार घेत आहे. ग्राममंगल शाळा ऐना(ता. डहाणू) येथे आहे, तसेच विक्रमगड, भामरागड, पुणे येथेही त्यांनी शाळा सुरू केल्या आहेत.

      July 23, 2026


  • समस्या २०० अपंगांच्या सुटल्या प्रेरणेतून

    अनेक वर्ष दुःखात, दारिद्र्यात, अज्ञानात असलेल्या समाजाला त्या त्यावेळी त्या त्या व्यक्तींनी प्रेरणाची पायवाट निर्माण केल्यामुळेच समाज त्यातून बाहेर येऊ शकला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज यांच्यामुळे आज खितपत पडलेला समाज यशाची मजल गाठू शकलां. पाजपांढरी या ४ हजार लोकवस्तीच्या गावात दोनशेहून अधिक अपंग रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यात आहेत. त्या गावात अपंगांची संख्या एवढी का? तर गरोदरपणातील स्त्रियांच्या प्रकृतीची हेळसांड ! अनिल रामचंद्र रघुवीर या अपंग कार्यकर्त्याने त्याच्या प्रयत्नाने गावाच्या या व्यथेवर मात केली. त्याने हताश अपंग दुर्बलांना संघटित करून त्यांचे गाऱ्हाणे सरकार दरबारी मांडले.

      July 4, 2026


  • आठवणीतले शिक्षक

    शिक्षक व मुख्याध्यापक यांच्यामुळे शाळा नावारूपाला येते. अशीच एक नावाजलेली शाळा, बीड येथील चंपावती विद्यालय व तिचे मुख्याध्यापक मुकुंद घनश्याम कुलकर्णी यांची ही यशोगाथा. पूर्वी चांगल्या शाळा चांगल्या संस्कारामुळे ओळखल्या जायच्या. तेथून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यावर शिक्षकाची व शाळेची छाप असे. आताही शाळा चांगल्या निकालावरून ओळखल्या जातातच.

      June 8, 2026


  • ईकिगाई

    ‘रिकामं मन सैतानाचं घर असतं’, हे लहानपणापासून आपण ऐकत आलेलो असतं. आपण मनाला सतत गुंतवून ठेवायलाच हवं. पुस्तकात तरी मनाला गुंतवायला हवं किंवा पुस्तकांपलीकडे मनाला गुंतवायला हवं. म्हणजे थोडक्यात स्वतःच्या मनाचा ईकिगाई ठरवता आला पाहिजे. ईकिगाई म्हणजे ‘Art of staying young… while growing old’.

      July 6, 2026


  • आयुष्य खूप सुंदर आहे.

    आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तुम्हाला ते जगता यायला हवं. केवळ जगणं महत्त्वाचं नाही तर जगताना आस्वाद घेता यायला हवा. जगायला जनावरं सुद्धा जगतात पण आपल्या जगण्यात एखादी गोष्ट नीट समजून घेतली तर आनंदामध्ये कित्येक पटीने वाढ होते. केवळ गुणांची टक्केवारी करिअर, मोबाईल टास्क असल्या गोष्टीमुळे सगळ्यांचे गुंतणं वाढलं आहे इतकं की स्वतःचे भान त्यांना राहत नाही. होण्यासाठी व आनंद घेण्यासाठी स्वतःचे भान हवंच. स्वतःचं आयुष्य संपवण्या इतपत भान हरवलं तर आयुष्य आनंदी व सुंदर कसं लागेल..

      June 9, 2026


  • वावर

    माणसांचा व मनाचा वावर कुठे कुठे व कसा कसा होईल हे काहीच सांगता येत नाही. वावर सद्भावनेचा असेल तर ‘पाऊले चालती पंढरीची वाट’ ही अनुभूती येतेच.

      June 18, 2026


  • तीन हजार टाके

    काही पुस्तके वाचायला हवीत. पुस्तके प्रेरणा देतात. संघर्षात जगायला शिकवतात. संघर्ष माणसाला घडवतं. अपयशाच्या रस्त्यामधूनच एक दिवस यशाचा रस्ता सापडतो. नैराश्याचे ढगसुद्धा काही काळ अवकाश व्यापून राहातात; पण तेसुद्धा कधीतरी बरसतातच आणि बरसल्यावर अंकुर सोबत घेऊनच आसमंत उजळून टाकतात. पुस्तक आदर्शाचा आरसा असतो. आरशात पाहून स्वत:चं मूल्यमापन करायचं असतं. स्वतःची प्रतिमा सुधारायची असते. आरसा केवळ अस्तित्वच दाखवत नाही, तर व्यक्तित्वही दाखवतो. सामान्य व्यक्तीच्या वर्तनातही असामान्य जीवन असतं. आयुष्य निरनिराळे पदर आपल्याला उलगडून दाखवते व आपण घडतो. प्रतिकूल परिस्थितीत इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतल्यानंतर सुधा मूर्ती यांनी ३००० स्त्रियांचे जटानिर्मूलन केले. त्या देवदासी म्हणून वेश्या व्यवसाय करायच्या. त्या आपण देवाला वाहिलेल्या आहोत म्हणून जटा काढतच नसत. दोनदा अपयश आल्यानंतरही सुधा मूर्ती मागे हटल्या नाहीत. तिसऱ्यांदा त्यांना समजावण्यात यश आले व हळूहळू देवदासींच्या प्रथेवरील देवदासींचा विश्वास उडून सत्य त्यांना कळू लागले.

      June 3, 2026


  • नेत्रबाधितांसाठी वाचनसेवा

    केवळ पुस्तके वाचूनच ज्ञान मिळतं असं नाही. काही वेळा पुस्तके बोलतातही. ‘बोलकी पुस्तके’ हा असाच उपक्रम दशरथ पाटील ही राबवीत आहेत. पण नेत्रहीनांसाठी वेगवेगळ्या वयोगटांसाठी, वेगवेगळ्या आशयाचा मजकूर ऑडिओ स्वरूपात सादर करून त्यांना ऐकवण्याचं काम प्राची गुर्जर करतात.

      July 12, 2026


  • अंकनाद

    पुस्तकाबाहेरच्या अनेक बार्बीमधून पुस्तकांमधील संबोध स्पष्ट करता येतात, म्हणून पुस्तकाच्या पलीकडे शोध घेणं आवश्यक असतं. पुस्तकातल्या काही गोष्टी मुलांना अभ्यासायला नकोशा वाटतात. गणित या विषयाची काही मुलांना भीती वाटते, तो विषय त्यांना कंटाळवाणा वाटतो आणि म्हणून पुस्तकापासून ते दूर राहातात, अशा मुलांची ही भीती दूर व्हावी म्हणून अंकनाद गणिताची सात्मीकरण प्रणाली, विद्यार्थ्यांची गणिताशी मैत्री घडवते.

      July 2, 2026