(User Level: User is not logged in.)

युवा-विश्व

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • सहज शिक्षण

    ठाणे इथल्या सरस्वती स्कूल मराठी माध्यम पूर्व प्राथमिक विभागात मुलांना भरपूर मोकळीक दिली जाते. मूल आपल्या परिसराचं आकलन स्वतः करून घेतं, आपण त्यांना योग्य मुक्त अवकाश दिला पाहिजे, या सहजशिक्षण प्रक्रियेबद्दल शाळेत शिक्षक आणि घरी पालक आता सजग झाले आहेत. यासाठी गेले तीन वर्षे त्या विभागाच्या मुख्याध्यापिका रती भोसेकर आणि शिक्षक कार्यरत आहेत, तेव्हापासूनच पालकांचे ऑनलाइन वर्कशॉप सुरू आहेत.

      July 14, 2026


  • पाणी

    लाथ मारीन तिथे पाणी काढीन ही म्हण हनुमंत केंद्रे यांनी प्रत्याक्षात आणली आहे.भगिरथाने प्रयत्नाने स्वर्गातली गंगा पृथ्वीवर आणली हे आपण पुराणात ऐकले होते. पण दुष्काळी गावाला सुजलाम सुफलाम करण्याची किमया जलदूत म्हणून ओळखले जाणारे हनुमान केंद्रे यांनी केली आहे.दुष्काळ हा काही काही गावासाठी पाचवीला पुजलेला असतो, पण स्वप्नं बघण्याचा आशावादी दृष्टिकोन ठेवला तर काय होऊ शकते याचा वस्तुपाठ हनुमान केंद्रे यांनी सिद्ध करून दाखवला आहे. पाणी टंचाई मुळे गावकरी गांव सोडून जात असतांना गावातच राहून पाणी आणून लोकांना परत यायला भाग पाडणारे हनुमंत केंद्रे हे प्रेरणेचे स्तोत्र आहेत. होरपाळणाऱ्या दुष्काळाची ही गोष्ट आहे. पाणी आणण्याची आणि त्याच्या संघर्षाची कहाणी इतर दुष्काळग्रस्त गावांनीही अनुकरण करावी अशी आहे. यशोगाथा नुसत्या माहीत असून चालत नाही तर एखाद्या प्रेरणादायी व्यक्तिमत्व असेल तर लोकं त्या व्यक्तीची पायवाट चालायला लागतात. कुणीतरी घनदाट जंगलातून रस्ता शोधण्यासाठी धाडस करून चालणं आवश्यक असतं. पायवाट असल्याशिवाय काही माणसें पायच उचलत नाहीत. हनुमंत केंद्र यांनी लोकांना एकत्र करून श्रमदान आला प्रवृत्त करून पाणी गावामध्ये आणलं. एखाद्या गावाचं स्वरूप बदलवून टाकणं आणि कायापालट करणे यासाठी भीष्मप्रतिज्ञाच आवश्यक असते.पाणी नाही म्हणून रडायचं नाही तर लढायचं हा संदेश देणारे हनुमंत केंद्रे. लोकांना एकत्र आणून श्रमदान करायला लावून गावात पाणी आणण्याचा निर्धार करणं आणि आधी पाणी आणि मग लग्न यावर ठाम राहुन गावाला पाण्या बाबतीत स्वयंपूर्ण करून जवळपासच्या१४ -१५गावाला ही पाणीपुरवठा करणारा प्रेरणादायी तरुण हनुमंत केंद्रे ज्याच्यावर पाणी हा चित्रपट तयार झाला आहे.

      July 9, 2026


  • नकोशी झाली हवीशी

    फिन्द्री” बनली प्रोफेसर … बापासाठी नकुशी ,आईसाठी साहेबीन आपण काहींना नकोसे जरी असलो तरी अनेकांना हवेसें असतो आणि त्यासाठी जगायचं असतं.आपलं अस्तित्व केवळ भविष्यावर सोपवून चालत नाही. आपणच आपल्या आयुष्याचे शिल्पकार असतो.मुलगी झाली म्हणून तिला लहानपणी बाळ असताना फेकलं गेलं ,नकोशी असणारी ती मोठेपणी मात्र शिकली आणि प्राध्यापक बनली व डॉक्टरेटही मिळवली व महाविद्यालया मध्ये विभाग प्रमुख आहे व अध्यापन ही करते. हे स्वप्नं नव्हें ही वास्तवातील प्रेरणेची पायवाटच आहे.पण बापाला मुलगी नको होती म्हणून तिचं फेकलं जाणं हे अस्तित्वाचं सृजनात्मक रूप घेऊन अवतरले आहे.

      June 17, 2026


  • प्रेरणेचं चालतं बोलतं विद्यापीठ : रमेश पानसे

    आज बरेच जण, बोलतात, लिहितात शैक्षणिक चर्चा करतात त्यात भाग घेतात पण प्रत्यक्ष शिक्षणासंबंधी कार्य रमेश पानसे व त्यांच्या विचारसरणी सारखे लोक करीत आहेत, त्यासाठी त्यांनी अर्थशास्त्राची प्राध्यापकी सोडून शिक्षण क्षेत्राला वाहून घेतले. श्रीमती अनुताई वाघ यांच्या प्रेरणेने व सानिध्यात राहून त्यांनी त्यांच्या अर्धवट कार्यास पूर्णत्वास नेण्याचे ठरवले आहे. ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार नावीन्यपूर्ण पद्धतीने करण्यात ते सध्या कार्यरत आहेत. ग्राममंगल च्या माध्यमातून शिक्षणाची एक संकल्पना ते रुजवत आहेत व ती चांगली आकार घेत आहे. ग्राममंगल शाळा ऐना(ता. डहाणू) येथे आहे, तसेच विक्रमगड, भामरागड, पुणे येथेही त्यांनी शाळा सुरू केल्या आहेत.

      July 23, 2026


  • पुस्तकात न सापडणाऱ्या गोष्टी

    कसल्या कसल्या विचाराने, प्रेरणेने लोकं भारलेली असतात. भारावले पण जेव्हा कृतीत उतरतं तेव्हा ती प्रेरणेची पायवाट बनते. सामान्य माणसे भारूनही जातात पण लगेच विरूनही जातात. संकल्प उत्साहात करून माणसे दुसऱ्या दिवशी पुन्हा तो पाळत नाहीत व चाकोरी बद्दल जीवन जगतात. माणसे स्वकेंद्रित होत असताना, स्वार्थी होत असताना कुठेतरी समाजामध्ये यशोगाथा जेव्हा दिसते तेव्हा अनेकांनी ठरवून टाकलेलं असतं की आपण ही आपला वाटा उचलायला हवा. अनेकांना आपलीच दुःखं मोठी वाटतात आणि त्याला ते कुरवाळतत बसतात. आमची मूल्य व्यवस्था ठरवते भविष्यात आणि आयुष्यात आम्ही कोण होणार? स्वतःचे दुःखं,अश्रू पुसण्यात माणसे दंग असतात. आपली इतरांशी तुलना करण्यात माणसें आयुष्य खर्ची घालतात. आपण जेव्हा तुलना करतो तेव्हा आपली साठा करण्याची प्रवृत्ती बळावते, त्याच्याकडे जे नाही ते जमवण्याच्या नादात माणसे भौतिकतेच्या आहारी जातात. भौतिक गोष्टी कमावण्याच्या नादात माणसे उपभोग घ्यायचा विसरतात किंवा घेऊ शकत नाही अशी परिस्थिती येते. दिव्यांग नसतानाही खोटे प्रमाणपत्र सादर करून दिव्यांगांची सर्व पदे मिळवायची असे ही सुरू झाले आहे, त्यामुळे खऱ्या दिव्यांगांना बऱ्याच वेळा सोयी सुविधा पासून दूरच राहावे लागते. प्रमाणपत्र हे आज व्यक्तिमत्त्वाचं परिमाण झालं आहे. पूर्वी प्रमाणपत्र कामगिरी पाहून दिल जात असे आता ते पैसे देऊन काहीजणांना सहज मिळवता येतं.

      July 18, 2026


  • आदिवासींचा डॉक्टर, समाजसेवेचा ध्यास : डॉ. राहुल जोशी

    आदिवासींचा डॉक्टर, समाजसेवेचा ध्यास : डॉ. राहुल जोशी

    काही माणसे आपल्या पदामुळे मोठी होतात, तर काही आपल्या कार्यामुळे लोकांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण करतात. डॉ. राहुल जोशी हे दुसऱ्या प्रकारातील व्यक्तिमत्त्व आहेत. वैद्यकीय सेवेसोबतच समाजसेवेची अखंड तळमळ, आदिवासी बांधवांविषयी असलेली आत्मीयता आणि निसर्गाशी असलेले जिव्हाळ्याचे नाते यामुळे त्यांनी अनेकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे.

      July 8, 2026


  • तीन हजार टाके

    काही पुस्तके वाचायला हवीत. पुस्तके प्रेरणा देतात. संघर्षात जगायला शिकवतात. संघर्ष माणसाला घडवतं. अपयशाच्या रस्त्यामधूनच एक दिवस यशाचा रस्ता सापडतो. नैराश्याचे ढगसुद्धा काही काळ अवकाश व्यापून राहातात; पण तेसुद्धा कधीतरी बरसतातच आणि बरसल्यावर अंकुर सोबत घेऊनच आसमंत उजळून टाकतात. पुस्तक आदर्शाचा आरसा असतो. आरशात पाहून स्वत:चं मूल्यमापन करायचं असतं. स्वतःची प्रतिमा सुधारायची असते. आरसा केवळ अस्तित्वच दाखवत नाही, तर व्यक्तित्वही दाखवतो. सामान्य व्यक्तीच्या वर्तनातही असामान्य जीवन असतं. आयुष्य निरनिराळे पदर आपल्याला उलगडून दाखवते व आपण घडतो. प्रतिकूल परिस्थितीत इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतल्यानंतर सुधा मूर्ती यांनी ३००० स्त्रियांचे जटानिर्मूलन केले. त्या देवदासी म्हणून वेश्या व्यवसाय करायच्या. त्या आपण देवाला वाहिलेल्या आहोत म्हणून जटा काढतच नसत. दोनदा अपयश आल्यानंतरही सुधा मूर्ती मागे हटल्या नाहीत. तिसऱ्यांदा त्यांना समजावण्यात यश आले व हळूहळू देवदासींच्या प्रथेवरील देवदासींचा विश्वास उडून सत्य त्यांना कळू लागले.

      June 3, 2026


  • कैद्यांच्या मुलांचे काय होते?

    जी माणसे स्वतःला विसरून इतरांच्या साठी काम करतात ती प्रेरणेची स्त्रोत्र असतात. समाज दोषींच्या कुटुंबाकडे व मुलाकडे दोषी नजरेने पाहतो. दुःखाला असंख्य पदर असतात. दुसऱ्यांचे दुःख दूर करणारे नकळत एक पायवाट निर्माण करतात. बेंगळुरूचे जोडपे व्ही मणी आणि सरोजी यांनी दोषींच्या मुलांसाठी घर बांधण्यासाठी अनेक विलासी वस्तूंचा त्याग केला, ज्यांचे भविष्य अन्यथा अनिश्चित दिसेल. हे जोडपे गेल्यानंतरही त्यांची एनजीओ SOCARE काम करत आहे. कैद्यांच्या मुलांचे काय होते? जोडप्याने त्यांना सुरक्षित आश्रयस्थान तयार करण्यासाठी बचत वापरली 1990 च्या दशकाच्या सुरुवातीस, बेंगळुरूमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये काम करत असताना, व्ही मणी प्रवासात मध्यवर्ती कारागृहातून जात असत. “आजीवन शिक्षा झालेल्यांची मुले सर्व व्यावहारिक हेतूंसाठी अनाथ झाली आहेत आणि त्यांना तुरुंगाबाहेर रडताना पाहणे खूप दुःखदायक आहे.”असे ते म्हणत.

      July 10, 2026


  • ज्ञानदा इंग्लिश स्कूलचे वेगळेपण

    काही शाळा मुख्याध्यापकामुळे ओळखल्या जातात. पण काही शाळा संस्थाचालकामुळेही ओळखल्या जातात. त्यापैकीच एक नागेश जोशी. औरंगाबाद येथील ज्ञानदा इंग्लिश स्कूलला भेट देण्याचा योग आला. भारतीय शिक्षण व्यवस्थेला अनुसरून भारतीय संस्कार व मूल्यांवर आधारित एक चांगली शाळा पाहायचा योग आला.

      June 26, 2026


  • अॅन फ्रँकची डायरी

    केवळ पुस्तकावर विसंबून राहायचे नसेल तर काही छंद जोपासायला हवेत. छंदातून आनंद तर मिळतोच; पण ज्ञान आणि कौशल्य यासाठीही छंद उपयोगी पडतात. डायरी लिहिण्याचा छंद हा संघर्षाचा आणि हर्षाचा कोलाज असतो. छंद म्हणून लिहिणं वेगळं आणि आलेल्या अनुभवाची गाथा लिहिणं वेगळं. अनेकांच्या आयुष्यात पुस्तकं येतच नाहीत. जन्मापासून संघर्ष, आव्हानं यांचा सामना करावा लागतो. पुस्तकांपेक्षाही परिस्थितीच माणसांना शिकविते, संघर्ष करत करतच ते आयुष्य जगत असतात आणि तोच वस्तुपाठ पुस्तक म्हणून आपल्यासमोर येतो.

      June 12, 2026