(User Level: User is not logged in.)

युवा-विश्व

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • आठवणीतले शिक्षक

    शिक्षक व मुख्याध्यापक यांच्यामुळे शाळा नावारूपाला येते. अशीच एक नावाजलेली शाळा, बीड येथील चंपावती विद्यालय व तिचे मुख्याध्यापक मुकुंद घनश्याम कुलकर्णी यांची ही यशोगाथा. पूर्वी चांगल्या शाळा चांगल्या संस्कारामुळे ओळखल्या जायच्या. तेथून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यावर शिक्षकाची व शाळेची छाप असे. आताही शाळा चांगल्या निकालावरून ओळखल्या जातातच.

      June 8, 2026


  • संबोध

    अनुभूतीशिवाय संबोध स्पष्टता नाही. संबोध स्पष्ट नसले की बोध होत नाही. अर्थ माहीत नसताना बऱ्याचशा वेळेला अनेक विद्यार्थी पाठांतर करतात. पाठांतर जर समजून केलं तर संबोध स्पष्ट व्हायला मदत होते. अनेक वेळा पाठांतर करून गुण मिळवण्याचा प्रयत्न केला जातो, विद्यार्थ्यांना अर्थ विचारला असता ते निरुत्तर होतात.

      June 30, 2026


  • “मुलांच्या मनाचा ताबा घेणारं फुलपाखरू”

    अनुदिन प्रकाशन परभणी तर्फे नुकताच प्रसिद्ध झालेला ‘फुलपाखरू’ हा मुलांसाठी लिहिलेला व मोठ्यांना अंतर्मुख करायला लावणारा बालकाव्य संग्रह आहे. कवितेच्या वेडातून अरुण प्रातिनिधीक कविता संग्रह संपादित व प्रकाशित केला. मुका फकीर, निळ्या हिरव्या तळ्यात, पोळा, अशी जिंदगानी हे कविता संग्रह ‘असे माझे हायकू संग्रह’ प्रसिद्ध आहेत. भगवान बुद्धांच्या शिकवणीवर आधारित धम्मपदांचा ओवीरूप धम्मपद या नावाने कविता संग्रह तर ‘फुलांच्या बागेत’ बालकविता संग्रह प्रकाशित आहे. ‘निसर्गसृष्टी’ तसेच ‘हायकू भिमाचे’ दोन हायकू संग्रह संपादित व प्रकाशित आहेत. हिंदी हायकूच्या अनुवादाची दोन पुस्तके ‘सूर्यनारायण गुप्त यांचे निवडक हायकू’आणि ‘हायकू आकाश के छोटे छोटे चांद’ प्रकाशित आहे. तांका प्रकार रूढ करण्यासाठी म्हणून लिहलेला सांज फुले १०११ तांका असलेला मराठीतील पहिला तालुका तांका संग्रह प्रसिद्ध आहे. तांका आणि गझल या काव्य प्रकारासाठी अनुदिन त्रैमासिक संपादित आणि प्रकाशित करतात.त्यांचे हिंदी हायकू लेखन अनेक हिंदी प्रातिनिधीक संग्रहातून प्रसिद्ध आहे.

      July 24, 2026


  • आम्हाला बी थोडं घडवां की हो

    अब्राहम लिंकन सांगून थकले की माझ्या मुलाला हे शिकवा माझ्या मुलाला ते शिकवा, त्यांनी मुख्याध्यापकांना लिहिलेलं पत्र मुख्याध्यापकांच्या खोलीत फोटो फ्रेम मध्ये बंदिस्त झालं आहे. फ्रेम मध्ये बंदिस्त केले की विचार ही बंदिस्त होतात कां?प्रेरणेच्या पायवाटा या धूळ खाण्यासाठी नसून त्याच्यावरून मार्गक्रमण करण्यासाठी असतात. शाळेत फक्त अभ्यासक्रम शिकवतात. संस्कार करणं शाळेची जबाबदारी आहे असं परिपत्रक तरी अजून निघालेले नाही कारण परिपत्रकाच्याच मार्गाने काही शाळा मार्गक्रमण करतात.

      June 18, 2026


  • यशाच्या पुढे समाधान आहे

    काही गोष्टी मनावर बिंबवायलाच हव्यात. आजच्या पिढी समोर फक्त डर के आगे जीत हे हेच सातत्याने येत आहे. श्रम आणि चिकाटी असेल तर यश तुमच्या पायाशी लोळण घेतं.32 तासांच्या अतिशय जटिल शस्त्रक्रियेनंतर मेंदूतील ट्यूमर काढून टाकल्यानंतर, दोन शल्यचिकित्सक पूर्णतः थकून जमिनीवर पडले,तरीही विजयी भावनेने भारलेले होते. हा क्षण उच्च-जोखमीच्या प्रक्रियेचा शारीरिक आणि मानसिक ताण दर्शवतो, जिथे प्रत्येक सेकंद महत्त्वाचा असतो आणि प्रत्येक निर्णय जीवन आणि मृत्यूमध्ये फरक करू शकतो.

      July 3, 2026


  • हेलन केलर

    मुलांच्या संदर्भातल्या समस्या म्हणजे मुले स्क्रीन टाईमचा वापर खूप करतात, त्यासाठी पालक हतबल आहेत.

    एखाद्या वस्तूच्या अतिवापरामुळे आपणच एखादं व्यंग निर्माण करतो. व्यंगावर मात करण्यासाठी आपणच प्रयत्न केले पाहिजेत. यापूर्वीही अनेकांनी व्यंगावर मात केली आहे हे आमच्या मुलांना कळायला हवं. अनेकांनी व्यंगावर मात तर केली आहेच, पण यशश्रीही खेचून आणली आहे.

      June 13, 2026


  • समस्या २०० अपंगांच्या सुटल्या प्रेरणेतून

    अनेक वर्ष दुःखात, दारिद्र्यात, अज्ञानात असलेल्या समाजाला त्या त्यावेळी त्या त्या व्यक्तींनी प्रेरणाची पायवाट निर्माण केल्यामुळेच समाज त्यातून बाहेर येऊ शकला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज यांच्यामुळे आज खितपत पडलेला समाज यशाची मजल गाठू शकलां. पाजपांढरी या ४ हजार लोकवस्तीच्या गावात दोनशेहून अधिक अपंग रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यात आहेत. त्या गावात अपंगांची संख्या एवढी का? तर गरोदरपणातील स्त्रियांच्या प्रकृतीची हेळसांड ! अनिल रामचंद्र रघुवीर या अपंग कार्यकर्त्याने त्याच्या प्रयत्नाने गावाच्या या व्यथेवर मात केली. त्याने हताश अपंग दुर्बलांना संघटित करून त्यांचे गाऱ्हाणे सरकार दरबारी मांडले.

      July 4, 2026


  • प्रेरणा निसर्गाची

    कुंडीतील सदाफुली बहरली होती. टवटवीतपणे डोलत डोलत नेत्राला सुख देत होती. प्राप्त परिस्थितीमध्ये मिळेल तेवढ्या पाण्यावर मिळेल तेवढ्या जमिनीवर फुलायचं हे वनस्पती पासून शिकायला हवं. कड्या कपारीत बीज रुजतं आणि वाढतं. कसल्याही तक्रारी न करता या वनस्पती वाढतात, बीज अंकुरतं. कुठली प्रेरणा ?कोणाकडून घेतात काहीच कळत नाही. आपणास त्यांच्यापासून प्रेरणा घ्यायला हवी की प्राप्त परिस्थितीत सुद्धा समाधान असतं व त्याही परिस्थितीत फुलायचं व दुसऱ्यांना आनंद द्यायचा असतो. दोन दिवस पाणी येणार नाही म्हणल्यावर आपण जास्तीचं पाणी भरून ठेवू शकतो पण वनस्पतींनी काय करावं? कसलीही तक्रार नाही, कसलीही खदखद नाही मिळेल तेवढ्यात खुश राहायचं,दुःखं‌ उगाळायचं नाही.

      June 19, 2026


  • पुस्तकात न सापडणाऱ्या गोष्टी

    कसल्या कसल्या विचाराने, प्रेरणेने लोकं भारलेली असतात. भारावले पण जेव्हा कृतीत उतरतं तेव्हा ती प्रेरणेची पायवाट बनते. सामान्य माणसे भारूनही जातात पण लगेच विरूनही जातात. संकल्प उत्साहात करून माणसे दुसऱ्या दिवशी पुन्हा तो पाळत नाहीत व चाकोरी बद्दल जीवन जगतात. माणसे स्वकेंद्रित होत असताना, स्वार्थी होत असताना कुठेतरी समाजामध्ये यशोगाथा जेव्हा दिसते तेव्हा अनेकांनी ठरवून टाकलेलं असतं की आपण ही आपला वाटा उचलायला हवा. अनेकांना आपलीच दुःखं मोठी वाटतात आणि त्याला ते कुरवाळतत बसतात. आमची मूल्य व्यवस्था ठरवते भविष्यात आणि आयुष्यात आम्ही कोण होणार? स्वतःचे दुःखं,अश्रू पुसण्यात माणसे दंग असतात. आपली इतरांशी तुलना करण्यात माणसें आयुष्य खर्ची घालतात. आपण जेव्हा तुलना करतो तेव्हा आपली साठा करण्याची प्रवृत्ती बळावते, त्याच्याकडे जे नाही ते जमवण्याच्या नादात माणसे भौतिकतेच्या आहारी जातात. भौतिक गोष्टी कमावण्याच्या नादात माणसे उपभोग घ्यायचा विसरतात किंवा घेऊ शकत नाही अशी परिस्थिती येते. दिव्यांग नसतानाही खोटे प्रमाणपत्र सादर करून दिव्यांगांची सर्व पदे मिळवायची असे ही सुरू झाले आहे, त्यामुळे खऱ्या दिव्यांगांना बऱ्याच वेळा सोयी सुविधा पासून दूरच राहावे लागते. प्रमाणपत्र हे आज व्यक्तिमत्त्वाचं परिमाण झालं आहे. पूर्वी प्रमाणपत्र कामगिरी पाहून दिल जात असे आता ते पैसे देऊन काहीजणांना सहज मिळवता येतं.

      July 18, 2026


  • मोक्षा रॉय

    मोक्षा रॉय यांना जगातील सर्वात तरुण वकील होण्याचा मान नुकताच मिळाला आहे. पुरस्कार मानवी जीवनाला चांगलं जीवन जगण्याची प्रेरणा देतात. पुस्तके वाचून अनेकांनी पुरस्कार मिळवले आहेत; पण पुस्तकांच्यापलीकडे जाऊनही त्याबद्दलही पुरस्कार मिळतात. आपलं भवताल आपल्याला घडवतं, बिघडवतं. आपल्या सभोवतालच्या गोष्टींची दखल घेतली नाही, तर आपलं अस्तित्वच धोक्यात येतं. ग्लोबल वॉर्मिंगमुळे दरडी कोसळणे, पूर येणे या घटना वारंवार घडत आहेत, तरीही सामूहिक जनजागृती होत नाही. मनातली जागृतीच असंख्य जणांना वाचवू शकते. शिक्षणाने मनात जाणीवजागृती निर्माण व्हायला हवी. शिक्षण म्हणजे केवळ पाठांतर करून माहिती लक्षात ठेवणं नाही. आपल्या शिक्षणामुळे आपलं व समाजाचं कल्याण कसं होईल? हा मनात विचार शिक्षणामुळे रुजायला हवा. मूल्यांची रुजवणूक पुस्तकातली मूल्यं पाठ करून होत नाही, तर त्यासंबंधीची जाणीव झाल्याने ती आपल्यात रुजतात.

      June 2, 2026