(User Level: User is not logged in.)

युवा-विश्व

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • तीन ओंजळी पाणी

    आई, वडील, आजी, आजोबा आपल्यात भौतिक नव्हे तर नैतिक मूल्यं ही ओंजळभर सोडून जातात. ओंजळभर पाणी काय असतं? अर्घ्य देणं काय असतं? पूर्वीच्या काळी काशीयात्रेला काही दिवस नाही तर काही महिने लागायचे. काशीयात्रेला जाणं कष्टाचं तर होतंच पण कधी व्यक्ती जर गेलीच तर तिला एक नेम करावा लागायचा. गंगेच्या पात्रात उभं राहून तीन ओंजळी पाण्याचे अर्घ्य सूर्याला देऊन आपल्याला अत्यंत प्रिय असलेल्या एखाद्या गोष्टीचा जन्मभरासाठी त्याग करायचा आणि अशी शपथ सूर्याच्या साक्षीने घ्यायची. गंगेला दिलेला हा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेघ, त्यामुळे ते वचन कधीच मोडायचं नाही.

      June 4, 2026


  • मंगेश मुंबईकर घोगरे

    छंद हे मानवी जीवनातील केवळ विरंगुळा असत नाहीत तर जीवनाला आकारही देतात. अभ्यास जेव्हां छंद बनतों तेव्हां नाविन्यपूर्ण व सृजन आकाराला येतं. प्रत्येक सृजन पायवाट असते प्रेरणेची. कोणत्याही छंदाचा अभ्यास केला की त्यात प्राविण्य मिळतं आणि यशा कडे जाण्याचा रस्ता मोकळा होतो.बुद्धीला व्यायाम देणारी शब्दकोडी म्हणजे अनेकांचे वेळ घालवण्याचे साधन असते. पण सहसा कोणी एखादे शब्दकोडे तयार करण्याचा विचार करत नाही. पण एका भारतीय आणि त्यातही मराठी माणसाने असा भन्नाट छंद जोपासला आणि शब्दकोड्यात वेळ घालवण्याऐवजी त्यात वेळेची गुंतवणूक केली.

      August 12, 2026


  • क्रिकेट चा दुर्लक्षित तारा मुक बधीर क्रिकेट पटू:बाबा सिधाये

    माणसें घडतात ती प्रेरणेमुळेच. आपल्या अवतीभवती असलेल्या प्रेरणेचा शोध घ्यायचा असतो. काही व्यक्तिमत्वें काळाच्या ओघात विस्मृतीत जातात,काही व्यक्तिमत्त्वें दुर्लक्षित राहतात. जेव्हा एखादी व्यक्ती कल्पने च्या पलीकडे जाऊन काहीतरी करते, असाध्य गोष्ट साध्य करते, अपंगत्वाचा बाऊ न करता त्यावर मात करते,व इतिहास घडविते त्याची दखल इतिहासाला घ्यावीच लागते. शरीराने अपंग असलेले मनाने अपंग नसतात.खेळाडू परिपूर्ण असावा त्याच्यामध्ये कोणतच व्यंग नसावं अशी सर्वांची इच्छा असते पण अनेक खेळाडूंनी व्यंग असतानाही यशश्री खेचून आणली आहे. व्यंग असून खेळणं वेगळं आणि अनेक पदकांची माळ गळ्यात घालून प्राविण्य मिळवणं वेगळं .असेच एक व्यक्तिमत्व म्हणजे बाबा ‘पँथर’ सिधाये उर्फ यशवंत प्रभाकर, जे पहिलेच मूकबधिर क्रिकेटपटू होते.

      June 24, 2026


  • जोगेवाडीची शाळा

    शिक्षकांमुळे शाळेला ओळख मिळते व शाळेमुळे विद्यार्थ्यांना ओळख मिळते. अशीच ओळख सुनील खेडकर यांनी अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील जोगेवाडी या शेवटच्या टोकावरच्या गावाला मिळवून दिली. महाराष्ट्रातील कायम दुष्काळी छायेत असणारा पाथर्डी तालुका व या तालुक्यातील दुर्गम व डोंगराळ भागात छोटीशी लोकवस्ती असणारे मौजे जोगेवाडी गाव तालुक्यापासून ३५ किलोमीटर अंतरावर आहे. या गावात बहुसंख्येने भटक्या जमातीतील लोक राहातात. यात वंजारी, मागासवर्गीय यांचा प्रामुख्याने समावेश होतो. गावात विकासाच्या मागासलेपणासोबतच मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक अनास्था होती.

      June 19, 2026


  • आम्हाला बी थोडं घडवां की हो

    अब्राहम लिंकन सांगून थकले की माझ्या मुलाला हे शिकवा माझ्या मुलाला ते शिकवा, त्यांनी मुख्याध्यापकांना लिहिलेलं पत्र मुख्याध्यापकांच्या खोलीत फोटो फ्रेम मध्ये बंदिस्त झालं आहे. फ्रेम मध्ये बंदिस्त केले की विचार ही बंदिस्त होतात कां?प्रेरणेच्या पायवाटा या धूळ खाण्यासाठी नसून त्याच्यावरून मार्गक्रमण करण्यासाठी असतात. शाळेत फक्त अभ्यासक्रम शिकवतात. संस्कार करणं शाळेची जबाबदारी आहे असं परिपत्रक तरी अजून निघालेले नाही कारण परिपत्रकाच्याच मार्गाने काही शाळा मार्गक्रमण करतात.

      June 18, 2026


  • बाल लेखिकांची भरारी

    पुण्यात काही दिवसापूर्वी एका बाल साहित्य महोत्सवाचे उद्घाटन भावार्थ व संवाद तर्फे आयोजित केले होते.आराध्या नंदकर, साक्षी भांड व पालवी मालुंजकर या तीन मुलींनी त्याचे उद्घाटन केले होते. राजीव तांबे यांनी या तीनही मुलींची साहित्यिक म्हणून मुलाखत घेतली. अनेक बाल साहित्य संमेलनातूनही मुलांची पुस्तके प्रसिद्ध होत आहेत.असे प्रेरणादायक उपक्रम वारंवार घडायला हवेत. पुस्तक प्रदर्शनातही त्यांची पुस्तकें स्टाॅल वर ठेवली जातात.मुले लिहीत आहेत ती केवळ प्रेरणेमुळेच. समृद्ध माणसांचा राबता घरात असण्याबरोबरच पुस्तकांचाही राबता घरात असेल तर मुले वाचू लागतात, लिहू लागतात.

      July 13, 2026


  • स्वप्नांच्या पलिकडे

    स्वप्नांच्या पलीकडे विजय आहे,पराजयही आहे.पानगळ झाली तरी झाड कुठे निराश होतं? पून्हा नव्याने अंगाखांद्यावर पानें फुलें घेऊन बहरत असतं. नैराशाच्ये विचार ,आत्महत्येचे विचार ही पानगळचअसते. काळे ढग निघून जातात तसे तेही जातात. जे धीर धरतात तेच जगतात.

      June 29, 2026


  • आगळीवेगळी प्रक्रिया

    प्रक्रिया को लर्निंग स्पेस: शैक्षणिक प्रक्रिया गतिमान होण्यासाठी अनेक पर्याय आज काल आपण समाजामध्ये पाहतो. अशीच एक पुण्यातील आगळीवेगळी प्रायोगिक शाळा म्हणता येईल अशी जागा प्रक्रिया को लर्निंग स्पेस बाळसं धरत आहे. नवनवीन विचारांची कास धरत व समाजात विकास रुजवण्यासाठी काही व्यक्ती प्रयत्नशील असतात, त्यापैकीच मुग्धा व सचिन नलावडे हे एक जोडप आणि त्यांनी सुरू केलेली प्रक्रिया Co learning Space ही मुलांसाठीची जागा….. या संस्थेच्या नावातच याची विचारधारा लपलेली आहे, शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, या प्रक्रियेत सहभागी असणारा प्रत्येक घटक म्हणजे मुले, प्रवर्तक, पालक, संस्थेचे इतर सर्व पदाधिकारी शिकत आहेत…..इथे येणारा प्रत्येकजण शिकण्याच्या भावात आहे, म्हणून नावात Colearning आहे, सहशिक्षणाची ही अव्याहत प्रक्रिया एकत्रितरित्या चालू ठेवण्याची ही जागा असा या नावाचा जन्म झाला आहे. सचिन ने नाव अनब इथे राबवली जाणारी शिक्षण पद्धती याचा हे नाव देताना अतिशय खोलवर विचार केलेला आहे.

      June 22, 2026


  • डॉ. रघुनाथ माशेलकर

    पाठांतराने गुण मिळतात; पण विचार करण्याने व त्यानुसार आचार करण्याने सद्गुण अंगी बाणतात. वेगवेगळ्या कल्पना केल्यानेच नावीन्य जन्म घेते. केवळ पुस्तकं वाचून आयुष्यात यशस्वी होता येत नाही. पुस्तकाच्या पलीकडेही काही वेगळी माणसंही समजून घेण्यासाठी अभ्यासायची असतात.

      June 10, 2026


  • जाणिवा विकसन

    जाणिवा ही अशी बाब आहे की, ती कळतं पण वळत नाही, अशा स्वरूपात असते. आपल्यामध्ये जाणिवा आहेत हेच मुळात ओळखायला हवं. जाणिवा योग्य दिशेने विकसित झाल्या तरच व्यक्तिमत्त्व बहरतं.

      July 13, 2026