(User Level: User is not logged in.)

वैचारिक लेखन

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • कुपोषण : मुळापर्यंत पोहचण्याची गरज !

    प्रकाशन दिनांक :- 03/04/2005

    डॉ. अभय बंग यांच्या नेतृत्वाखाली ‘बालमृत्यू मूल्यमापन समिती’ने आपला दुसरा आणि अंतिम अहवाल शासनाला नुकताच सादर केला. या अहवालात राज्यातील बालमृत्यूंना आळा घालण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांची शिफारस करण्यात आली आहे.

      April 30, 2005


  • छत्रपती संभाजी महाराजांचा अमानुष वध आणि नववर्ष शोभा यात्रा ?

    आम्हाला सांगण्यात आले कि राम वनवासातून आयोध्येत याच दिवशी परत आले म्हणून आपण गुढ्या तोरणे उभारतो. पण निषिद्ध असलेल्या बांबूवर ,कडू लिंबाचा पाला लावून ,पालथा तांब्या हे सर्व अशुभ एकत्रित करून “गुढी उभारली जाते हा काय आनंदोत्सव आहे ? खुद्द आयोध्येत अथवा उत्तरेकडील कुठल्याही राज्यात अशी गुढी उभारली जात नाही .

      March 17, 2018


  • नका आत्महत्या करू; करा निसर्ग शेती !

    एखादा साथीचा जीवघेणा रोग पसरावा त्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे लोण पसरत चालले आहे. रोज कुठे ना कुठे एखादा शेतकरी आत्महत्या करत आहे. लोकसुद्धा ‘रोज मरे त्याला कोण रडे’ या भावाने शेतकऱ्यांच्या आत्महत्यांकडे तटस्थ नजरेने पाहायला लागले आहेत.

      September 11, 2005


  • मुंबईला मुंबईच राहू द्या

    आपल्या राज्यकर्त्यांच्या, धोरणकर्त्यांच्या कल्पनाशत्त*ीचा विकास फारच कुंठित झाला आहे. कुठलाही नवा म्हणून जो विचार हे लोक समोर मांडतात मुळात ती कुठलीतरी उचलेगिरी असते. सध्या भारतात चिनी वस्तूंचा बराच बोलबाला आहे.

      February 4, 2007


  • वाया जाणारे अन्न वाचवता येईल

    लग्नसराई सुरू असते. प्रत्येक जण लग्नाच्या गरबडीत असतो.घरामध्ये उत्साह असतो.याच उत्साही वातावरणात आपण काय करतो.याचे भान नसते. लग्नकार्यात अनेक बाबी हितकारक घडतातच असे नाही. काही परंपरा जपल्या जातात. वधुवरांची मिरवणूक असते. वर्‍हाडींचा थाटमाट असतो. पै पाहुण्यांचे आदरातिथ्य असते. भोजनावळी उठतात.हे प्रत्येक धर्मामध्ये कमीअधिक प्रमाणात घडत असते. त्यामुळे मानवी जीवनात आनंद घेणो हा एक हेतू यामागे असतो.

    लग्नामध्ये अक्षता टाकणो हा प्रकार असतो. आशिर्वाद द्यावेत हा त्यामागचा मुळ हेतू आहे. लग्नमंडपात विवाहानिमित्त आलेल्या मंडळीना या अक्षता वाटतात. ज्वारी वा तांदुळास हळद वा रंग टाकून रंगीत बनवलेली असते. काहीठिकाणी त्यामध्ये धने टाकले जातात. ह्या धान्य मिश्रणास मग प्लास्टिकच्या पिशवीत भरतात. पुड्या बनवतात .त्यात 'आम्ही आपले सहर्ष स्वागत करित आहोत' असा मजकूर असलेली, परिवाराच्या नावाचा उल्लेख असलेली चिठ्ठी लावलेली असते. साधारणत: एका लग्नामध्ये पंधरा ते वीस किलो धान्य अक्षता तयार करण्यासाठी वापरतात. परवाच्या एका लग्नामध्ये एक व्यक्ती 'फुलं आहेत का?' असा असा प्रश्न करत होती. मी सहजच प्रश्न केला तर मिळालेले उत्तर खूपच उद्बोधन करणारे होते. ती व्यक्ती म्हणाली 'मी कुणाच्याही लग्नात अक्षता न फेकण्याचा निर्णय घेतलेला आहे. कारण या हाताने अन्नधान्याची नासाडी आपण का करावी?' त्याचा प्रतिप्रश्न बरेच काही सांगत होता. आणि ते बरोबरही होते. 'फुलं नाही मिळाली तर मग काय करता?' आम्ही विचारलेल्या प्रश्नावर ती व्यक्ती पटकन उत्तरली. 'मग काहीच नाही. हाताने टाळी.बस्स. अहो कितीतरी होणारे नुकसान आपण टाळू शकतो.' मला ते पटले. मग निर्णय घेतला. अक्षताऐवजी फुलं फेकण्याचा. काही ठिकाणी जाणिवपूर्वक धान्याऐवजी फुलांचा वर्षाव करतात. काही परंपरा मोडीत निघाल्या पाहिजेत तर चांगल्या परंपरा नवीन सुरू केल्या पाहिजेत. त्यांचे जतनही झाले पाहिजे.

    लग्न लागल्यानंतर भूकेजलेले वर्‍हाड लगेच पंगतीला जेवायला बसते. एकतर वधुवर पक्षाचा तसा आग्रह असतो! भूक असो वा नसो पण लग्नसोहळय़ात जेवण्याचा आनंद घेणो वेगळेच असते.पंगती बसतात. वाढपी वाढतात. लहान मोठे वयाचा विचार न करता वाढतात. जेवण पोटभर होते. उरलेले अन्न तसेच पात्रामध्ये शिल्लक असते. असे कितीतरी अन्न फेकून दिले जाते. अन्नाची नासाडी होते.वाया जाते.ते आपण टाळू शकतो. त्यासाठी मानवी प्रयत्न होणे आवश्य़क आहेत. काही व्यक्ती यासाठी झगडतात.त्यांना बळ मिळायला हवे.

    वाढत्या लोकसंख्येत एकीकडे भूकबळी होताहेत आणि एकीकडे अन्न वाया घालवून नासाडी केली जाते ही विसंगती योग्य नाही. पंचतारांकित हॉटेल, ढाबे, खानावळी येथे भोजन मिळते . तिथे व्यवहार असतो. पण खूप अन्न वाया जाते. हॉटेलमध्ये अन्नग्रहण करत असताना सोबतच्या द्रव्यांमुळेही अन्न वाया जाते. मोठमोठय़ा सार्वजनिक ठिकाणी अन्नदान केले जाते तिथेही अन्नाची नासाडी होते. हे वाया जाणारे अन्न ही गरीब लोकांची गरज आहे.देवस्थाने अन्नदान करतात. लग्नकार्य आणि इतर धार्मिक उत्सवप्रसंगी वाया जाणारे अन्न आपण वाचवू शकतो. जेवढे लोक जमणार आहेत. तितक्यांचा स्वयंपाक करणो . ताटात जेवणानंतर अन्न शिल्लक पडणार नाही. याची काळजी संयोजकांसह पाहुण्यांनी घेतली पाहिजे. तरच अन्नाची नासाडी थांबेल.पाणीबचत, उर्जाबचत जशी काळाची गरज आहे तद्वतच अन्नाची नासाडी थांबविणे ही देखील काळाची गरज आहे.त्यासाठी प्रचार आणि प्रसार होणो आवश्य़क आहे. अन्न आणि पुरवठा विभागासह समाजाचे ते काम आहे. ही समस्या केवळ प्रादेशिकच नाही तर जागतिक स्तरावरील आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर या बाबीचा विचार व्हावा.

    प्रत्येकाने प्रत्येक जेवणावेळी हे आठवावे की जगातील कोणीतरी व्यक्ती अन्न नाही म्हणून मृत्यूला जवळ करतोय.कुपोषणामुळे बालमृत्यू होताहेत. पुर्णांन्न न मिळाल्याने मृत्यूचे प्रमाण करोडोत आहे. एकट्या बंगळुरू शहरात दरवर्षी लग्नात ९४२ टन अन्न वाया जाते. मग जगाची आकडेवारी किती मोठी असेल? त्याप्रती संवेदना जागृत झाल्यास अन्नाची बचत होईल. त्यासाठी कायदा करून कडक अंमलबजावणी करता येईल. बहुतांश लग्नकार्यामध्ये भिकारी अथवा दुर्लक्षित समाज जेवणासाठी पंगतीला बसतो किंवा अन्न मागत असतो आणि दुसर्‍या बाजुला पोटावरून हात फिरवत मनसोक्त भोजन केले जाते ही विसंगती कधी मिटणार? 'अन्न हे पुर्णब्रह्म आहे.ते यज्ञकर्म आहे' असे म्हणतात. हे ब्रम्ह सर्वांसाठी सारखे नको का ?

    -- विठ्ठल जाधव
    शिरूरकासार जि.बीड. मो.9421442995

    पुण्यनगरी/12 मे 2017

      May 16, 2017


  • शिक्षण क्षेत्राचा सांगाडा !

    आपली संपूर्ण शिक्षणप्रणाली विदेशी विद्यापीठांच्या जाळ्यात अडकण्यापूर्वीच सरकारने योग्य ती पावले उचलणे आवश्यक आहे. शिक्षण क्षेत्राच्या मरू घातलेल्या सांगाड्यात जीव ओतण्याचा प्रयत्न करण्याऐवजी नव्या रसरशीत, चैतन्याने भरलेल्या, इथल्या संस्कृतीशी, प्राचीन ज्ञानाशी इमान राखणार्‍या शिक्षणपद्धतीला विकसित होऊ द्यावे.

      December 15, 2012


  • प्रॉब्लेम आहे ? मग त्यावर हसा

    असा कोणता माणूस नाही ज्याला प्रॉब्लेम नाही, आणि असा कोणताही प्रॉब्लेम नाही जो सुटत नाही….
    नाही, नाही…हे कोणत्याही ज्योतिषाचं किंवा काउन्सेलरच वाक्य नाही. कारण प्रॉब्लेम सुटतो की नाही, माहित नाही. पण त्याच्याकडे तटस्थपणे पाहून थोडा वेळ हसू शकता.
    एक माणूस सिनेमा थिएटरमध्ये मोठी पगडी घालून बसला होता. मागच्या माणसाला प्रॉब्लेम झाला. कारण सिनेमा दिसत नव्हता. त्याने प्रॉब्लेम कसा सोडवला पहा?
    पुढे पगडी घालून बसलेल्या माणसाला सांगितलं. अधून मधून सिनेमात काय चाललं आहे मलाही सांगा!! पगडीवाल्याला त्या बोलण्याचा अर्थ काळला आणि त्याने पगडी काढली.

      March 15, 2026


  • मतांनाही मूल्य हवे!

    प्रकाशन दिनांक :- 23/05/2004

    परिस्थितीनुरूप बदल हा कुठल्याही क्षेत्रातील विकासाचा अविभाज्य भाग आहे. बदलत्या परिस्थितीला अनुसरून योग्य ते बदल स्वीकारीतच कोणतीही व्यवस्था टिकू शकते, प्रगल्भ होऊ शकते. काळाच्या प्रवाहात टिकून राहण्यासाठी ही लवचीकता आवश्यकच ठरते.

      May 23, 2004


  • शब्द, अक्षर, भाषा : पुन्हां चारोळी, मुक्तक

    कांहीं काळापूर्वी मी ‘कृपया चारोळी म्हणूं नका’ अशा शीर्षकाचा लेख ‘मराठीसृष्टी’ वेबसाइटवर अपलोड केला होता. त्यात मी असें प्रतिपादन केलें होतें की जसें हास्यरसप्रधान गझलला ‘हझल’ असें (वेगळें) अभिधान मिळालेलें आहे . ( हल्लीच गझल-सागर प्रतिष्ठाननें हझल-संग्रह प्रकाशित केला आहे) . आपण हास्यप्रधान लघुकाव्याला ‘चारोळी म्हणायला हरकत नाहीं ; पण गंभीर, विचारप्रवर्तक, चिंतनपर अशा लघुकाव्याला चारोळी’ हे हलकेंफुलकें, light-weight, ( कांहींसें ‘थिल्लर’ ) नांव मुळीच suitable,योग्य वाटत नाहीं. चार ओळी अशा अर्थाचा शब्द हवा असल्यास ‘चतुष्पदी’ म्हणायला हरकत नाहीं. अनेक ‘चतुष्पदी’ असल्यास, ‘चारोळ्या’ म्हटलें जातें, त्याबद्दल अधिक न बोलणेंच बरें.

    या पार्श्वभूमीवर, ‘मराठीसृष्टी’वर निलेश बामणे यांचें एक लघुकाव्य ‘चारोळी’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेलें आहे, तें पहाणें योग्य ठरेल. तें काव्य असें आहे -

    ‘कुत्री – मांजरी
    जगतात स्वतःसाठी
    जगा एकदातरी
    समाजातील उपेक्षितांसाठी…’

    किती गंभीर, विचारप्रवर्तक काव्य ! तें आपल्याला अंतर्मुख करतें , जीवनाबद्दल चिंतन करायला भाग पाडते. चार ओळींमध्ये एवढा अर्थ भरलेला आहे, वा: ! श्री. निलेश बामणे यांना kudos !

    पण अशा या अर्थपूर्ण, संजीदा ( गंभीर, serious) काव्याचें शीर्षक ‘चारोळी’ असें वाचून आपण ( किमान मीतरी) उंचावरून दण्णकन् खाली आदळतो. हें शीर्षक, मजकुराच्या महत्तेचा पूर्णपणें खात्मा करून टाकते ! या काव्याला ‘मुक्तक’ हें अभिधान द्यायला काय हरकत आहे ?, तें नांव योग्यच आहे. मुक्तक म्हणजे खरें तर ‘Stand-alone verse’. आणि हें लघुकाव्य ( आणि यासारखी इतर लघुकाव्यें ) stand-alone verse, स्वतंत्र काव्य आहेच.

    अशी आणखी उदाहरणें देता येतील. जसें की, शिरीष पै यांच्या ‘अज्ञातरेषा’ या नांवाच्या मृत्यूवरील लघुकाव्यांचा संग्रह. सांगायला नकोच की, यातील प्रत्येक stand-lone लघुकाव्य गंभीर आहे. या लघुकाव्यांना कवयित्रीनें ‘चारोळी/चारोळ्या’ म्हटलेलें नाहीं, हें निश्चित. ( आणि, कुणी जर तसें नांव देऊन म्हटलेच, तर तें योग्य ठरणार नाहींच ).

    कोणी कदाचित असें म्हणेल की, ‘संस्कृत व हिंदीत मुक्तक म्हणतात हें ठीक ; पण मराठीत आम्ही काय म्हणून असें शीर्षक वापरायचें ?’ याचें उत्तर म्हणून मी महाराष्ट्र सरकारनें स्थापन केलेल्या ‘अभिजात मराठी भाषा समिती’च्या २०१३च्या अहवालातील एक उतारा देतो . हा अहवाल, राज्य सरकारनें मराठी भाषेला ‘अभिजात’ भाषेचा दर्जा मिळावा म्हणून, केंद्राला officially submit केलेला आहे. या समितीत रंगनाथ पठारे, हरी नरके, नागनाथ कोतापल्ले, श्रीकांत बहुलकर, सतीश काळसेकर प्रभृती मान्यवरांचा, तसेंच राज्य सरकारच्या संबंधित Departments चे संचालक / सचिव यांचा समावेश होता. हा उतारा मराठीची पूर्वज भाषा ‘महाराष्ट्री’ हिच्यात जवळजवळ २००० वर्षांपूर्वी लिहिल्या गेलेल्या ‘गाथासप्तशती’ या ग्रंथाबद्दल आहे. तो असा –

    उद्.धृत मजकूर सुरूं (Quote ) =

    ‘गाथासप्तती’ हा महाराष्ट्री भाषेतला इ.स.च्या पहिल्या-दुसर्‍या शतकातील मुक्तकांचा ( द्विपदी, गाथांचा) संग्रह आहे. ....... ‘गाथा’ लोकप्रिय छंद किंवा वृत्त आहे.

    = उद्.धृत मजकूर समाप्त (Unquote )

    [ वरील उतार्‍यात ‘मुक्तक’ या शब्दाला दिलेला Bold Type माझा ] .

    अशा मात्तबर समितीनें ‘मुक्तक’ या शब्दाचा उपयोग केलेला आहे. यापेक्षा अधिक athoratative भाष्य कुणी करायची जरूरच नाही. हें स्पष्ट आहे की, मुक्तक’ हें कांहीं ( चन्द, a few) पंक्तीचें stand-alone लघुकाव्य आहे (दोन-तीन-चार वगैरे ) ; आणि, हा शब्द मराठीत रूढ आहे. [ कुठल्याही stand-alone लघुकाव्याला मुक्तक’ असें संबोधण्यात theoritically प्रत्यवाय नाहीं ; मात्र हल्ली साधारणतया चार ओळींच्या लघुकाव्याला, चतुष्पदीला, ‘मुक्तक’ म्हटलें जातें, एवढेंच ] .

    आपण ‘Lyric’ ला ‘भावगीत’ हा सुंदर प्रतिशब्द निर्माण केला ( हा शब्द फक्त मराठी व कन्नडमध्येच आहे). Free-verse ला ‘मुक्तकाव्य’ असा शब्द आपण योजायला लागलो. तर मग stand-alone गंभीर प्रकृतीच्या लघुकाव्याला आपण आधीपासून प्रचलित असलेला ‘मुक्तक’ हा सुंदर शब्द वापरला, तर काय काय हरकत आहे ?

    सूज्ञांस अधिक सांगणें नलगे.

    -- सुभाष स. नाईक
    Subhash s. Naik

      August 16, 2017


  • भारनियमन नव्हे देशद्रोह!

    28रविवार, ऑक्टोबर 2007

    छोट्या पडद्यावर एक जाहिरात नेहमीच झळकत असते. त्या जाहिरातीचे स्लोगन अतिशय आकर्षक आहे. ‘भांडण चांगल्यासाठी असेल तर भांडण चांगलेच आहे’, अशा आशयाचे ते स्लोगन आहे.

      October 28, 2007