१९१० ते १९१४ पर्यंत ते केंटकडून खेळत होते परंतु पहिल्या महायुद्धामुळे ७ वर्षे फुकट गेली. टिच फ्रीमॅन यांनी १९१९ च्या लहान सीझनमध्ये ६० विकेट्स घेतल्या तर १९२० मध्ये १०२ विकेट्स घेतल्या तर १९२१ मध्ये १६६ विकेट्स घेतल्या आणि १९२२ मध्ये १९४ विकेट्स घेतल्या ही त्यांची जबरदस्त गोलंदाजी पाहून , परफॉर्मन्स पाहून विझडेनने १९२३ मध्ये त्यांना ‘ विझडेन क्रिकेटियर ऑफ द इअर ‘ म्हणून त्यांना सन्मानित केले.
July 15, 2021
जिम लेकर यांची खेळाची कारकीर्द आणि त्यांनी केलेल्या खेळाचे आकडे बघूनच त्यांच्या कर्तृत्वाची ओळख होते. त्यांनी ४६ कसोटी सामन्यांमध्ये १९३ विकेट घेतल्या आणि ६७६ धावा काढल्या . कारण ते प्रमुख गोलंदाज होते.
December 19, 2021
शाळेत असताना जॉन वयाच्या १७ व्या वर्षापर्यंत आठवड्याच्या सुट्टीच्या दिवशी क्रिकेट खेळत असे. त्यांचे कोच होते माजी क्रिकेटपटू सी. एस. आर. बॉसवेल . बॉसवेल स्वतः ३० फर्स्ट क्लास क्रिकेट सामने खेळलेले होते. जॉन एड्रीच क्रिकेटमध्ये कट् , कव्हर ड्राइव्ह असे फटके मारण्यामध्ये तरबेज होते. १९५६ आणि १९५७ मध्ये ते फर्स्ट क्लास सामने कंम्बाईन्ड सर्व्हिसेस साठी खेळले. ते ‘ सरे ‘ साठी पहिला फर्स्ट क्लास सामना १९५८ च्या सेशनमध्ये खेळले. त्या वर्षी त्यांनी ५२.९१ च्या सरासरीने १,७९९ धावा केल्या.जॉन एड्रीच यांनी त्यांचा पहिला कसोटी सामना ६ जून १९६३ रोजी इंग्लडविरुद्ध खेळला .
July 20, 2021
सुनील आणि सचिन, सभ्य गृहस्थहो, तुमची झापडं काढा, जागे व्हा, जनप्रक्षोभ ज़रा समजून घ्या , आणि पाकिस्तानशी क्रीडासंबंध तोडायला अनुकूलता दाखवा. नाहींतरी, सरकार, ‘काय करावें’ ती कृती तुम्हांला विचारून थोडीच अमलात आणणार आहे ? तुमच्या चुकीच्या स्टँडबद्दल इलेक्ट्रॉनिक मीडिया तुम्हांला नांवें ठेवतच आहेत. तरी , जनक्षोभ तुमच्या विरुद्ध जाण्यांआधी तुमचा स्टँड बदला, लवकर बदला, नाहींतर उशीर झालेला असेल .
February 22, 2019
रुसी मोदी यांनी ‘ सम इंडियन क्रिकेटर्स ‘ हे पुस्तक लिहिले असून त्यात भारताच्या २३ महत्वाच्या क्रिकेटपटूंवर लिहिले आहे त्याला सर डॉन बर्डमन यांनी ‘ प्रस्तावना ‘ लिहिली असून त्याचा मराठीत अनुवाद बाळ. ज. पंडित यांनी केला असून हे पुस्तक अत्यंत महत्वाचे आहे.
December 3, 2021

वेम्ब्ले स्टेडियम हे लंडनमधील वेम्ब्ले पार्क येथे आहे. मुख्यतः फुटबॉल खेळासाठी या मैदानाचा उपयोग केला जातो. या स्टेडियम वरील पांढरी कमान ही शहराच्या बाहेरून सुद्धा दिसते. ही कमान सर्व युरोपात प्रसिद्ध अशी कमान आहे.
'द फुटबॉल असोसिएशन' यांच्या मालकीचे हे स्टेडियम असले तरी वेम्ब्ले नॅशनल स्टेडियम लि. यांच्यामार्फत या स्टेडियमचे सर्व व्यवहार पाहिले जातात. २००० साली बंद करण्यात आले. २००३ पर्यंत हे आहे त्याच अवस्थेत होतं; परंतु नंतर स्टेडियमचे नवीन बांधकाम सुरू झाले. २००६ मध्ये ते पूर्ण व्हायला हवे होते परंतु हे संपूर्ण बांधकाम ९ मार्च २००७ला पूर्ण झाल्यावर ते हस्तांतरीत करण्यात आले.
युरोप मधील हे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे मैदान असून त्याची आसन क्षमता ९०,००० आहे. जगातील सर्वात उंच आणि सर्वात मोठे मैदान म्हणूनही याचा नावलौकिक आहे. या मैदानातील संपूर्ण आसन व्यवस्थेवर छत घालण्यात आले आहे. हे जगातील सर्वांत महाग बांधकाम असलेले स्टेडियम आहे. ८०० दशलक्ष पौंडस् इतका खर्च या बांधकामाला आला आहे.
हे मैदान १८८० पासून म्हणजेच बांधकाम होण्यापूर्वीपासून फुटबॉलचे मैदान म्हणून ओळखले जाते. या नवीन बांधकामाचे आर्कीटेक्ट फोस्टर फ्लस पार्टनर्स प्लस पॉप्युलर हे होते तर इंजिनिअर म्हणून मोट मॅकडोनाल्ड यांनी काम पाहिले. ग्रूफफिल्ड मल्टीफ्लेक्स या ऑस्ट्रेलियन कंपनीने याचे बांधकाम केले. फुटबॉल असोसिएशन, द डिपार्टमेन्ट ऑफ मिडिया अॅन्ड स्पोर्टस आणि लंडन डेव्हलपमेन्ट एजन्सी यांचा हे स्टेडियम पूर्ण करण्यात सहभाग होता.
या स्टेडियमचा आकार हा बाऊलप्रमाणे असून याचे वरचे छत हे सरकते आहे. काहीवेळा अॅथलेटिक्ससाठी सुद्धा या मैदानाचा उपयोग केला जातो.
हे स्टेडियम वेम्ब्ली पार्क स्टेशन पर्यंत भूमिगत रेल्वेने जोडले गेले आहे. या मैदानाचे बांधकाम सुरू असताना ३,५०० कामगार त्यावर काम करीत होते. ५६.कि.मी. लांबीची हेवी ड्यूटी विजेची केबल येथे आणण्यात आली असून २,६१८ प्रसाधनगृहे येथे बांधण्यात आली आहेत. एक किलोमीटर परिसरात या स्टेडियमचे बांधकाम आहे. वेम्ब्ले नॅशनल स्टेडियम लि. यांच्यामार्फत या स्टेडियमचे सर्व व्यवहार पाहिले जातात. इंग्लंड नॅशनल फुटबॉल टीम यांचे हे होम ग्राउंड आहे.
फुटबॉलच्या सामन्यांप्रमाणेच या मैदानावर इतरही खेळांचे सामने आणि मोठे संगीत महोत्सव होतात. 'लंडन- ड्रीम्स या बॉलीवूडच्या चित्रपटाचे हे मुख्य चित्रिकरणाचे केंद्र होते. २०११ यु.ई.एफ.ए. चॅम्पियन लीग फाईनलच्या सामन्यांसाठी हे मैदान वापरण्यात येणार आहे. वेम्ब्ले स्टेडियम हे पूर्वी ब्रिटिश एम्पायर एक्झिब्यूशन स्टेडियम किंवा एम्पायर स्टेडियम या नावाने ओळखले जात असे. जगातील अनेक मोठ्या फुटबॉलच्या स्टेडियमपैकी हे एक महत्त्वाचे मोठे स्टेडियम आहे. इंग्लंडचे राष्ट्रीय फुटबॉल स्टेडियम असल्यामुळे तसेच भौगोलिक दृष्ट्या खेळांसाठी स्वाभाविक मैदान असल्यामुळे ते फुटबॉलचे होम ग्राउंड म्हणून ओळखले जाते.
या मैदानावर युरोपियन कप म्हणजे यु.ई.एफ.ए. चॅम्पियन्स लीगच्या स्पर्धा घेतल्या जातात. ज्या १७ स्टेडियमवर एफ.आय.एफ.ए. वर्ल्ड कपच्या मॅचेस घेतल्या जातात, त्यापैकी वेम्ब्ले स्टेडियम हे एक मैदान आहे. याचे पूर्वीचे बांधकाम असलेल्या इमारती आणि स्टेडियम हे २००० साली बंद करण्यात आले.
जगातील सर्वात उंच आणि सर्वात मोठे मैदान म्हणूनही याचा नावलौकिक आहे. या मैदानातील संपूर्ण आसन व्यवस्थेवर छत घालण्यात आले आहे. हे जगातील सर्वांत महाग बांधकाम असलेले स्टेडियम आहे. ८०० दशलक्ष पौंडस् इतका खर्च या बांधकामाला आला आहे. हे मैदान १८८० पासून म्हणजेच बांधकाम होण्यापूर्वीपासून फुटबॉलचे मैदान म्हणून ओळखले जाते. या नवीन बांधकामाचे आर्कीटेक्ट फोस्टर फ्लस पार्टनर्स प्लस पॉप्युलर हे होते तर इंजिनिअर म्हणून मोट मॅकडोनाल्ड यांनी काम पाहिले. ग्रुफफिल्ड मल्टीफ्लेक्स या ऑस्ट्रेलियन कंपनीने, याचे बांधकाम केले. फुटबॉल असोसिएशन, द डिपार्टमेन्ट ऑफ मिडिया अॅन्ड स्पोर्टस आणि लंडन डेव्हलपमेन्ट एजन्सी यांचा हे स्टेडियम पूर्ण करण्यात सहभाग होता.
July 27, 2023
पद्माकर शिवलकर म्हटले की अनेक गोष्टी आठवतात त्याचबरोबर त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचा उल्लेख हमखास होतो परंतु पद्माकर शिवलकर यांनी सहसा स्वतःबद्दल भाष्य उघडपणे फारसे केले नाही , ते केले तो प्रसंग त्यांच्या क्रिकेट-आत्मचरित्रात आढळला आणि तो प्रसंग होता रवींद्र नाट्य मंदिर येथे ‘ मराठी माणसावरचा अन्याय ‘ ह्या विषयावर बोलण्यासाठी त्यांना आमंत्रित केले होते .
July 25, 2021
द के. डी. सिंग बाजू स्टेडियम हे भारतातील लखनौ शहरात आहे. हे मैदान हॉकीचे मैदान म्हणूनही ओळखले जाते. प्रसिद्ध भारतीय हॉकी खेळाडू के. डी. सिंग यांचे नाव या मैदानाला देण्यात आलेले आहे.
July 17, 2023
वयाच्या १५ व्या वर्षीच त्यांनी हॅट्रिक घेऊन आणि ६५ धावा करून फर्स्ट क्लास क्रिकेटची सुरवात केली. १९३६ साली ते इंग्लंडच्या टूरवर गेले तेव्हा ते २१ वर्षाचे होते. मुश्ताक अली पहिला कसोटी सामना ५ जानेवारी १९३४ रोजी इंग्लंडविरुद्ध खेळले. त्यावेळी त्यांनी ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर ११२ धावा केल्या. सामना संपल्यावर लेखक सर नेव्हिल कार्डस यांनी लिहिले ,’ मुश्ताक अली यांची खेळी सर्व फटक्यांनी परिपूर्ण होती आणि त्या फटक्यात जे लखलखणारे तेज होते त्यावरून भारतीयांच्या डोळ्यातील तीक्ष्णता जाणवली . मुश्ताक यांनी आपल्या हातातल्या बॅटचे रूपांतर जादूगाराच्या कांडीत केले !’
July 21, 2021
भारताचा जगविख्यात फलंदाज (सलामीवीर) सुनील मनोहर गावस्कर यांनी तीस वर्षांपूर्वी पाकिस्तान विरुद्ध खेळतांना आजच्या दिवशी म्हणजेच "०७ मार्च १९८७"रोजी अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमवर आपल्या कसोटी क्रिकेट करकिर्दीतील १०००० (दहा हजार) धावा पूर्ण केल्या.
अशी अजोड कामगिरी करणारा सुनील गावस्कर हा क्रिकेट विश्वातील पहिला महान फलंदाज ठरला.
पाकिस्तान विरुद्धच्या या सामन्यात सुनील छप्पन धावांवर खेळत असतांना 'एजाज फकी' च्या गोलंदाजीवर स्लीप मधे बॉल ढकलुन एक धाव काढली आणि समोर(नॉनस्ट्राइकरएंड वर) उभ्या असलेल्या किरण मोरेनी धावत जाउन सुनीलचं अभिनंदन केलं. एक क्षण सुनीलला समजलच नाही की आपलं शतक झालं नाही तरी हा इतका खुश का झाला आहे. पण किरणनी जेव्हा सांगितलं की तुम्ही दहा हजार धावा पूर्ण केल्या आहेत तेव्हा मात्र सुनील आपला आनंद लपवु शकला नाही. संपूर्ण भारतात आनंदाचं उधाण आलं. कारण साऱ्या भारतीयांचं स्वप्न सुनीलनी प्रत्यक्षात उतरवलं होतं. अनेक ठिकाणी पेढे/मिठाई वाटुन लोकांनी आपल्या भावनांना मोकळी वाट करुन दिली, जणु काही स्वत:च्याच घरात काही खास घडलं होतं. याला कारण सुनील गावस्कर - तो होताच मुळी सर्वांचा लाडका.
सुनीलच्या या दैदीप्यमान कामगिरीमुळे भारताचा क्रिकेट जगतात दबदबा निर्माण झाला. भारतीय क्रिकेट आणि खेळाडु याबद्दल क्रिकेट खेळणाऱ्या देशातील रसिक आदराने पाहु लागले कारण सुनीलनी आपल्या थक्क करणाऱ्या कामगिरीमुळे भारतीय क्रिकेट एका वेगळ्याच उंचीवर नेउन ठेवलं होतं.
अशा या महान फलंदाजाचं आपण सारे मिळून कौतुक करुया!!!
March 7, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti