डेव्हिड शेपर्ड यांनी त्यांचा पहिला कसोटी सामना वेस्ट इंडिजविरुद्ध ओव्हल वर 12 ऑगस्ट 1950 रोजी खेळला. तेव्हा त्यांनी पहिल्या इनिंगमध्ये 11 धावा काढल्या तेव्हा ते वेस्ट इंडिजच्या रामाधीन कडून 11 धावांवर बाद झाले. तर दुसऱ्या इनिंगमध्ये त्यांनी 29 धावा काढल्या.
September 8, 2021
न्यूझीलंडची पहिली कसोटी, कसोटीदर्जा मिळविणारे संघ आणि हरलेल्या कसोट्यांपेक्षा अधिक कसोट्या जिंकणारे संघ.
January 10, 2011
कॉली स्मिथ याने त्याच्या तिसऱ्या फर्स्ट क्लास क्रिकेट सामन्यामध्ये जमेका कडून खेळताना १९५४-५५ साली टूरवर आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध त्याने १६९ धावा केल्या. त्याने त्याचा पहिला कसोटी सामना खेळला तो २६ मार्च १९५५ रोजी ऑस्ट्रलिया विरुद्ध म्हणजे त्याच वर्षी खेळला.
August 22, 2021

वेम्ब्ले स्टेडियम हे लंडनमधील वेम्ब्ले पार्क येथे आहे. मुख्यतः फुटबॉल खेळासाठी या मैदानाचा उपयोग केला जातो. या स्टेडियम वरील पांढरी कमान ही शहराच्या बाहेरून सुद्धा दिसते. ही कमान सर्व युरोपात प्रसिद्ध अशी कमान आहे.
'द फुटबॉल असोसिएशन' यांच्या मालकीचे हे स्टेडियम असले तरी वेम्ब्ले नॅशनल स्टेडियम लि. यांच्यामार्फत या स्टेडियमचे सर्व व्यवहार पाहिले जातात. २००० साली बंद करण्यात आले. २००३ पर्यंत हे आहे त्याच अवस्थेत होतं; परंतु नंतर स्टेडियमचे नवीन बांधकाम सुरू झाले. २००६ मध्ये ते पूर्ण व्हायला हवे होते परंतु हे संपूर्ण बांधकाम ९ मार्च २००७ला पूर्ण झाल्यावर ते हस्तांतरीत करण्यात आले.
युरोप मधील हे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे मैदान असून त्याची आसन क्षमता ९०,००० आहे. जगातील सर्वात उंच आणि सर्वात मोठे मैदान म्हणूनही याचा नावलौकिक आहे. या मैदानातील संपूर्ण आसन व्यवस्थेवर छत घालण्यात आले आहे. हे जगातील सर्वांत महाग बांधकाम असलेले स्टेडियम आहे. ८०० दशलक्ष पौंडस् इतका खर्च या बांधकामाला आला आहे.
हे मैदान १८८० पासून म्हणजेच बांधकाम होण्यापूर्वीपासून फुटबॉलचे मैदान म्हणून ओळखले जाते. या नवीन बांधकामाचे आर्कीटेक्ट फोस्टर फ्लस पार्टनर्स प्लस पॉप्युलर हे होते तर इंजिनिअर म्हणून मोट मॅकडोनाल्ड यांनी काम पाहिले. ग्रूफफिल्ड मल्टीफ्लेक्स या ऑस्ट्रेलियन कंपनीने याचे बांधकाम केले. फुटबॉल असोसिएशन, द डिपार्टमेन्ट ऑफ मिडिया अॅन्ड स्पोर्टस आणि लंडन डेव्हलपमेन्ट एजन्सी यांचा हे स्टेडियम पूर्ण करण्यात सहभाग होता.
या स्टेडियमचा आकार हा बाऊलप्रमाणे असून याचे वरचे छत हे सरकते आहे. काहीवेळा अॅथलेटिक्ससाठी सुद्धा या मैदानाचा उपयोग केला जातो.
हे स्टेडियम वेम्ब्ली पार्क स्टेशन पर्यंत भूमिगत रेल्वेने जोडले गेले आहे. या मैदानाचे बांधकाम सुरू असताना ३,५०० कामगार त्यावर काम करीत होते. ५६.कि.मी. लांबीची हेवी ड्यूटी विजेची केबल येथे आणण्यात आली असून २,६१८ प्रसाधनगृहे येथे बांधण्यात आली आहेत. एक किलोमीटर परिसरात या स्टेडियमचे बांधकाम आहे. वेम्ब्ले नॅशनल स्टेडियम लि. यांच्यामार्फत या स्टेडियमचे सर्व व्यवहार पाहिले जातात. इंग्लंड नॅशनल फुटबॉल टीम यांचे हे होम ग्राउंड आहे.
फुटबॉलच्या सामन्यांप्रमाणेच या मैदानावर इतरही खेळांचे सामने आणि मोठे संगीत महोत्सव होतात. 'लंडन- ड्रीम्स या बॉलीवूडच्या चित्रपटाचे हे मुख्य चित्रिकरणाचे केंद्र होते. २०११ यु.ई.एफ.ए. चॅम्पियन लीग फाईनलच्या सामन्यांसाठी हे मैदान वापरण्यात येणार आहे. वेम्ब्ले स्टेडियम हे पूर्वी ब्रिटिश एम्पायर एक्झिब्यूशन स्टेडियम किंवा एम्पायर स्टेडियम या नावाने ओळखले जात असे. जगातील अनेक मोठ्या फुटबॉलच्या स्टेडियमपैकी हे एक महत्त्वाचे मोठे स्टेडियम आहे. इंग्लंडचे राष्ट्रीय फुटबॉल स्टेडियम असल्यामुळे तसेच भौगोलिक दृष्ट्या खेळांसाठी स्वाभाविक मैदान असल्यामुळे ते फुटबॉलचे होम ग्राउंड म्हणून ओळखले जाते.
या मैदानावर युरोपियन कप म्हणजे यु.ई.एफ.ए. चॅम्पियन्स लीगच्या स्पर्धा घेतल्या जातात. ज्या १७ स्टेडियमवर एफ.आय.एफ.ए. वर्ल्ड कपच्या मॅचेस घेतल्या जातात, त्यापैकी वेम्ब्ले स्टेडियम हे एक मैदान आहे. याचे पूर्वीचे बांधकाम असलेल्या इमारती आणि स्टेडियम हे २००० साली बंद करण्यात आले.
जगातील सर्वात उंच आणि सर्वात मोठे मैदान म्हणूनही याचा नावलौकिक आहे. या मैदानातील संपूर्ण आसन व्यवस्थेवर छत घालण्यात आले आहे. हे जगातील सर्वांत महाग बांधकाम असलेले स्टेडियम आहे. ८०० दशलक्ष पौंडस् इतका खर्च या बांधकामाला आला आहे. हे मैदान १८८० पासून म्हणजेच बांधकाम होण्यापूर्वीपासून फुटबॉलचे मैदान म्हणून ओळखले जाते. या नवीन बांधकामाचे आर्कीटेक्ट फोस्टर फ्लस पार्टनर्स प्लस पॉप्युलर हे होते तर इंजिनिअर म्हणून मोट मॅकडोनाल्ड यांनी काम पाहिले. ग्रुफफिल्ड मल्टीफ्लेक्स या ऑस्ट्रेलियन कंपनीने, याचे बांधकाम केले. फुटबॉल असोसिएशन, द डिपार्टमेन्ट ऑफ मिडिया अॅन्ड स्पोर्टस आणि लंडन डेव्हलपमेन्ट एजन्सी यांचा हे स्टेडियम पूर्ण करण्यात सहभाग होता.
July 27, 2023
इंग्लिश कर्णधार बॉब वायटने बदललेला फलंदाजीचा क्रम आणि तरीही इंग्लंडने गमावलेली कसोटी
January 28, 2016
रॉय टॅटरसॉल हा खरेतर ‘स्टॉक बॉलर’ म्हणूनही ओळखला जात असे. त्याने ८ इनिंग्समध्ये २४६ षटके टाकली होती.
August 27, 2021
त्याचा रेकॉर्ड बघाल तर त्याने ३९ कसोटी सामन्याच्या ६६ इनिंग्समध्ये २२.८८ च्या सरासरीने १४४२ धावा केल्या त्यामध्ये त्याचे एकही शतक नाही परंतु तो कप्तान म्हणून ‘ आउटस्टँडिंग ‘ होता असे म्हटले जाते.
August 8, 2021
हरभजन सिंगनंतर कसोट्यांमध्ये त्रिक्रम करणारा एकमेव भारतीय गोलंदाज.
January 29, 2016
बापू नाडकर्णी यांनी ४१ कसोटी सामन्यांमध्ये १,४१४ धावा केल्या त्यामध्ये त्यांचे १ शतक आणि ७ अर्धशतके असून त्यांची सर्वोच्च धावसंख्या होती १२२ नाबाद.
August 26, 2021
पद्माकर शिवलकर म्हटले की अनेक गोष्टी आठवतात त्याचबरोबर त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचा उल्लेख हमखास होतो परंतु पद्माकर शिवलकर यांनी सहसा स्वतःबद्दल भाष्य उघडपणे फारसे केले नाही , ते केले तो प्रसंग त्यांच्या क्रिकेट-आत्मचरित्रात आढळला आणि तो प्रसंग होता रवींद्र नाट्य मंदिर येथे ‘ मराठी माणसावरचा अन्याय ‘ ह्या विषयावर बोलण्यासाठी त्यांना आमंत्रित केले होते .
July 25, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti