(User Level: User is not logged in.)

क्रीडा-विश्व

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • पॉंटिंग, सचिन आणि आपण

    खेळ वा संस्थेपेक्षा व्यक्तीस महत्त्व येते आणि नंतर तर परिस्थिती इतकी हाताबाहेर जाते की ती व्यक्ती म्हणजेच खेळ वा संस्था असे मानले जायला लागते. हे मागास समाजाचे लक्षण आहे आणि आपल्याकडे ते अनेक क्षेत्रांबाबत पाहायला मिळते.

      February 23, 2012


  • क्रिकेटपटू ग्रेग चॅपल

    ९६४-६५ मध्ये ग्रेग चॅपल यांनी सात आठवड्यामध्ये १० शतके केली. शाळेच्या एका सामन्यामध्ये त्यांनी व्दिशतक केले आणि अँशले वूडकॉक यांच्याबरोबर पहिल्या विकेटसाठी स्कॉट कॉलेज विरुद्ध ३०० धावांची भागीदारी केली.

      August 16, 2021


  • क्रिकेटपटू चेतन चौहान

    चेतन चौहान यांनी पुणे विद्यापीठासाठी रोहिंग्टन बात्रा ट्रॉफीसाठी क्रिकेट खेळले , आणि त्याच सीझनमध्ये त्यांची निवड वेस्ट झोनसाठी झाली ती विझी ट्रॉफीसाठी.

      August 5, 2021


  • लंडनमधील वेम्ब्ले स्टेडियम

    वेम्ब्ले स्टेडियम हे लंडनमधील वेम्ब्ले पार्क येथे आहे. मुख्यतः फुटबॉल खेळासाठी या मैदानाचा उपयोग केला जातो. या स्टेडियम वरील पांढरी कमान ही शहराच्या बाहेरून सुद्धा दिसते. ही कमान सर्व युरोपात प्रसिद्ध अशी कमान आहे.

    'द फुटबॉल असोसिएशन' यांच्या मालकीचे हे स्टेडियम असले तरी वेम्ब्ले नॅशनल स्टेडियम लि. यांच्यामार्फत या स्टेडियमचे सर्व व्यवहार पाहिले जातात. २००० साली बंद करण्यात आले. २००३ पर्यंत हे आहे त्याच अवस्थेत होतं; परंतु नंतर स्टेडियमचे नवीन बांधकाम सुरू झाले. २००६ मध्ये ते पूर्ण व्हायला हवे होते परंतु हे संपूर्ण बांधकाम ९ मार्च २००७ला पूर्ण झाल्यावर ते हस्तांतरीत करण्यात आले.

    युरोप मधील हे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे मैदान असून त्याची आसन क्षमता ९०,००० आहे. जगातील सर्वात उंच आणि सर्वात मोठे मैदान म्हणूनही याचा नावलौकिक आहे. या मैदानातील संपूर्ण आसन व्यवस्थेवर छत घालण्यात आले आहे. हे जगातील सर्वांत महाग बांधकाम असलेले स्टेडियम आहे. ८०० दशलक्ष पौंडस् इतका खर्च या बांधकामाला आला आहे.

    हे मैदान १८८० पासून म्हणजेच बांधकाम होण्यापूर्वीपासून फुटबॉलचे मैदान म्हणून ओळखले जाते. या नवीन बांधकामाचे आर्कीटेक्ट फोस्टर फ्लस पार्टनर्स प्लस पॉप्युलर हे होते तर इंजिनिअर म्हणून मोट मॅकडोनाल्ड यांनी काम पाहिले. ग्रूफफिल्ड मल्टीफ्लेक्स या ऑस्ट्रेलियन कंपनीने याचे बांधकाम केले. फुटबॉल असोसिएशन, द डिपार्टमेन्ट ऑफ मिडिया अॅन्ड स्पोर्टस आणि लंडन डेव्हलपमेन्ट एजन्सी यांचा हे स्टेडियम पूर्ण करण्यात सहभाग होता.

    या स्टेडियमचा आकार हा बाऊलप्रमाणे असून याचे वरचे छत हे सरकते आहे. काहीवेळा अॅथलेटिक्ससाठी सुद्धा या मैदानाचा उपयोग केला जातो.

    हे स्टेडियम वेम्ब्ली पार्क स्टेशन पर्यंत भूमिगत रेल्वेने जोडले गेले आहे. या मैदानाचे बांधकाम सुरू असताना ३,५०० कामगार त्यावर काम करीत होते. ५६.कि.मी. लांबीची हेवी ड्यूटी विजेची केबल येथे आणण्यात आली असून २,६१८ प्रसाधनगृहे येथे बांधण्यात आली आहेत. एक किलोमीटर परिसरात या स्टेडियमचे बांधकाम आहे. वेम्ब्ले नॅशनल स्टेडियम लि. यांच्यामार्फत या स्टेडियमचे सर्व व्यवहार पाहिले जातात. इंग्लंड नॅशनल फुटबॉल टीम यांचे हे होम ग्राउंड आहे.

    फुटबॉलच्या सामन्यांप्रमाणेच या मैदानावर इतरही खेळांचे सामने आणि मोठे संगीत महोत्सव होतात. 'लंडन- ड्रीम्स या बॉलीवूडच्या चित्रपटाचे हे मुख्य चित्रिकरणाचे केंद्र होते. २०११ यु.ई.एफ.ए. चॅम्पियन लीग फाईनलच्या सामन्यांसाठी हे मैदान वापरण्यात येणार आहे. वेम्ब्ले स्टेडियम हे पूर्वी ब्रिटिश एम्पायर एक्झिब्यूशन स्टेडियम किंवा एम्पायर स्टेडियम या नावाने ओळखले जात असे. जगातील अनेक मोठ्या फुटबॉलच्या स्टेडियमपैकी हे एक महत्त्वाचे मोठे स्टेडियम आहे. इंग्लंडचे राष्ट्रीय फुटबॉल स्टेडियम असल्यामुळे तसेच भौगोलिक दृष्ट्या खेळांसाठी स्वाभाविक मैदान असल्यामुळे ते फुटबॉलचे होम ग्राउंड म्हणून ओळखले जाते.

    या मैदानावर युरोपियन कप म्हणजे यु.ई.एफ.ए. चॅम्पियन्स लीगच्या स्पर्धा घेतल्या जातात. ज्या १७ स्टेडियमवर एफ.आय.एफ.ए. वर्ल्ड कपच्या मॅचेस घेतल्या जातात, त्यापैकी वेम्ब्ले स्टेडियम हे एक मैदान आहे. याचे पूर्वीचे बांधकाम असलेल्या इमारती आणि स्टेडियम हे २००० साली बंद करण्यात आले.

    जगातील सर्वात उंच आणि सर्वात मोठे मैदान म्हणूनही याचा नावलौकिक आहे. या मैदानातील संपूर्ण आसन व्यवस्थेवर छत घालण्यात आले आहे. हे जगातील सर्वांत महाग बांधकाम असलेले स्टेडियम आहे. ८०० दशलक्ष पौंडस् इतका खर्च या बांधकामाला आला आहे. हे मैदान १८८० पासून म्हणजेच बांधकाम होण्यापूर्वीपासून फुटबॉलचे मैदान म्हणून ओळखले जाते. या नवीन बांधकामाचे आर्कीटेक्ट फोस्टर फ्लस पार्टनर्स प्लस पॉप्युलर हे होते तर इंजिनिअर म्हणून मोट मॅकडोनाल्ड यांनी काम पाहिले. ग्रुफफिल्ड मल्टीफ्लेक्स या ऑस्ट्रेलियन कंपनीने, याचे बांधकाम केले. फुटबॉल असोसिएशन, द डिपार्टमेन्ट ऑफ मिडिया अॅन्ड स्पोर्टस आणि लंडन डेव्हलपमेन्ट एजन्सी यांचा हे स्टेडियम पूर्ण करण्यात सहभाग होता.

      July 27, 2023


  • सुप्रसिद्ध क्रिकेटपटू केन बॅरिंगटन

    केन बॅरिंग्टन यांनी ८२ कसोटी सामन्यामध्ये ५८.६७ च्या सरासरीने ६,८०६ धावा केल्या त्यामध्ये त्यांची २० शतके आणि ३५ अर्धशतके होती. त्यांची सर्वोच्च धावसंख्या होती २५६ धावा . त्याचप्रमाणे त्यांनी २९ विकेट्स घेतल्या आणि एका इनिंगमध्ये ४ धावा देऊन ३ विकेट्स घेतल्या.

      December 11, 2021


  • इंग्लंडमधील व्हिला पार्क मैदान

    इंग्लंडमधील व्हिला पार्क मैदान

    इंग्लंडमधील अॅस्टन जिल्ह्यातील बर्मिंगहॅम येथील हे प्रसिद्ध फुटबॉल मैदान आहे. १८९७ पासून ॲस्टन व्हिला फुटबॉल क्लबचे ते होम ग्राउंड आहे. १६ इंटरनॅशनल सामन्यांचे यजमानपद व्हिला पार्कने यशस्वी केले. १८९९ मध्ये तेथे पहिला आंतरराष्ट्रीय सामना झाला. इंग्लंडमधील हे पहिले वहिले आंतरराष्ट्रीय स्तरावरचे फुटबॉल मैदान आहे.

      August 10, 2023


  • जानेवारी २९ : इरफान पठाणची पहिल्याच षटकातील विक्रमी हॅट-ट्रिक

    हरभजन सिंगनंतर कसोट्यांमध्ये त्रिक्रम करणारा एकमेव भारतीय गोलंदाज.

      January 29, 2016


  • हिरा है सदा के लिये

    असं म्हणतात, पैसा पैशाकडेच जातो.. तसाच हिरा हिऱ्याकडेच जातो, असेही म्हटले तर?धोनीने २०११ चा वनडे वर्ल्डकप जिंकल्यावर या क्षणाची वाट पाहत १३ वर्षे गेली. वनडे वर्ल्डकप आपण सचिनसाठी जिंकत आहोत, ही भावना तेव्हा जवळपास प्रत्येक खेळाडूच्या मनात होती. आज T20 वर्ल्डकप जिंकतानाही भारतीय टीमला असेच काहीसे जाणवले असेल. ८ महिन्यांपूर्वीही ती संधी आली होती. पण… असो.

      July 1, 2024


  • क्रिकेटपटू अल्फ व्हॅलेन्टाईन

    अल्फ व्हेलेंटाईन याने पहिल्याच कसोटी सामन्यामध्ये पहिल्या इनिंगमध्ये त्याने ८ विकेट्स घेतल्या त्यामधील ५ विकेट्स त्याने लंचच्या पूर्वी घेतल्या त्या पहिल्याच दिवशी .

      August 20, 2021


  • नेदरलँड्सचा एक सलामीवीर आणि मराठी वृत्तपत्रे

    …समालोचन करताना एकाने डेस्काटचे नामकरण त्याच्या नावातिल ‘टेन’चा वापर करून “रायन टेन डेस्डुलकर” असे केले. मराठी वृत्तपत्रांमध्ये आज छापुन आलेली त्याची काही “नावे”

      February 23, 2011