(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • आमदार नितेश राणे

    आमदार नितेश राणे

    या वर्षीच्या ‘उद्याचा मराठवाडा’ या प्रतिष्ठीत दिवाळी अंकात कणकवलीचे विद्यमान आमदार श्री. नितेश राणे यांच्यावर सप्टेंबर २०१७ महिन्याच्या मध्यावर लिहिलेला माझा हा लेख. मी श्री नितेश राणेचा किंवा काॅंग्रेसचा किंवा इतर कोणत्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता किंवा समर्थक नाही. मी राजकारणावर लिहायचंही टाळतो. सिंधुदुर्गातील माझ्या परिचयाच्या आणि तौलनिक विचार करणाऱ्या काही जाणकारांशी चर्चा करुन मी श्री नितेश राणेवरील हा लेख लिहिलेला आहे.

      December 5, 2017


  • बारा ज्योतिर्लिंगे – श्री विश्वेश्वर

    बारा ज्योतिर्लिंगे – श्री विश्वेश्वर

    उत्तर भारतातील काशी ऊर्फ वाराणसीत हे दिव्य ज्योतिर्लिंग असून यालाच श्री काशी विश्वेश्वर असे म्हणतात.

      August 13, 2013


  • भारतीय स्त्री वैज्ञानिक अनुराधा टि के

    अनुराधा टी.के.यांचा जन्म  कर्नाटकातील बेंगळुरू येथे झाला. त्यांनी बंगळुरू येथील विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्समध्ये पदवी प्राप्त केली.  १५ जुलै २०११ रोजी  अंतराळ केंद्रातून GSAT-१२ उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.  प्रकल्प संचालक म्हणून त्यांनी GSAT-10, GSAT-9, GSAT-17 आणि GSAT-18 संप्रेषण उपग्रहांच्या प्रक्षेपणाचेही निरीक्षण केले.

      August 25, 2025


  • विडा घ्या हो नारायणा – भाग ७

    पानामधले महत्त्वाचे घटक झाले. पान, चुना, कात आणि सुपारी. हे सर्व पदार्थ एकमेकांना पूरक आहेत. यातील प्रत्येक पदार्थाचे काही विशिष्ट वेगवेगळे गुणधर्म आहेत. पण हे पदार्थ जेव्हा चावले जातात, एकमेकात मिसळले जातात, आणि सर्वात महत्त्वाचे, चघळले जात असताना, त्यात लाळ मिसळली जाते, तेव्हा या सर्वांचे मुलभूत गुणधर्म थोडे बदलून सौम्य होतात.

      July 8, 2017


  • किर्लोस्करवाडी : महाराष्ट्राचा मानबिंदू!

    किर्लोस्करवाडी : महाराष्ट्राचा मानबिंदू!

    सुरुवातीला किर्लोस्करवाडीत फक्त पाण्याचे पंप बनत होते. किर्लोस्करांचे पंप इतके लोकप्रिय झाले की, पुढे पंप म्हणजे किर्लोस्करांचे, अशीच ख्याती झाली. किर्लोस्करांनी पुढे आपल्या उत्पादनांचा पसारा वाढवला आणि डिझेल व विजेवर चालणाऱ्या पंपांबरोबरच यांत्रिक नांगर, ट्रॅक्टर्स अशा शेती उत्पदनांसाठी लागणाऱ्या यंत्रांचीही निर्मिती तिथेच सुरू झाली.

      March 26, 2022


  • एक काल्पनीक पत्र

    दिल्लीमध्ये नुकतेच झालेले तीन भूकबळी. त्याबद्दलची अस्वस्थता मांडण्याचा केलेला प्रयत्न

      August 4, 2018


  • भारतीय स्त्रीशास्त्रज्ञ शिना राणी

    ५७ वर्षीय शीना राणी ह्या  हैदराबादमधील डीआरडीओच्या हाय-टेक लॅबमध्ये शास्त्रज्ञ आहेत . त्या  १९९९ पासून अग्नि मालिकेतील सर्व क्षेपणास्त्रांच्या प्रक्षेपण नियंत्रण प्रणालींवर काम करत आहेत. पंतप्रधान मोदींनी संपूर्ण मोहिमेला ‘मिशन दिव्यास्त्र’ असे नाव दिले होते.

      August 12, 2025


  • श्री शिवभुजंग स्तोत्रम् – २०

    यदा कर्णरंध्रं व्रजेत्कालवाहद्विषत्कंठघंटा घणात्कारनादः |
    वृषाधीशमारुह्य देवौपवाह्यंतदा
    वत्स मा भीरिति प्रीणय त्वम् ‖ २० ‖

    प्रस्तुत श्लोकात भगवान जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज आपल्या परम उपास्य भगवान श्री शंकरांच्या चरणी अत्यंत मनोहर प्रार्थना करीत आहेत.
    एखाद्या भक्ताने केलेले हे अत्यंत लडिवाळ आर्जव आहे.
    ते म्हणतात,

    यदा कर्णरंध्रं व्रजेत्- ज्यावेळी माझ्या कानावर येईल,
    कालवाह - म्हणजे भगवान यमराजांच्या
    द्विषत्कंठघंटा- कंठात बांधलेल्या घंटेचा घणात्कारनादः - भीषण अशा प्रकारचा आवाज.
    तो ज्यावेळी माझ्या कानावर येईल, अर्थात माझा मृत्यू, काळ जवळ येईल, त्यावेळी हे भगवान महाकाल !
    वृषाधीशमारुह्य - वृषभाधीश अशा आपल्या नंदीवर बसून,
    देवौपवाह्यंतदा- हे भगवन् त्यावेळी आपण माझ्याजवळ यावे.
    वत्स - हे भक्ता !
    मा भीरिति - घाबरू नको, अशा आपल्या आश्वासक ध्वनीने
    प्रीणय त्वम् - आपण मला प्रसन्न करा.
    ही तुलनाच मोठी रम्य आहे.

    आचार्य श्री म्हणतात माझ्या अंतिम समयी माझ्यासमोर भगवान यमराज नाही जर आपण असावे.
    माझ्या कानात यमांच्या रेड्याच्या गळ्यात बांधलेल्या घंटेचा भीषण नाद नाही तर, हे वत्सा ! घाबरू नको. असा आपला आशीर्वाद घुमावा.
    आपण वृषभा वर बसून यावे या विनंतीत, मला मृत्यू नंतर कशावर बसूनच जायची वेळ असेल तर ती यमराजाच्या काळ्याशार रेड्यावर नाही तर आपल्या पांढऱ्या शुभ्र नंदीवर बसून, यमराजांच्यासोबत त्यांच्या नरकात नव्हे तर नंदीवर बसून आपल्या परम वैभवशाली कैलास लोकांस जाण्याचे भाग्य प्रदान करावे. अशी अत्यंत सुंदरतम प्रार्थना आचार्यश्री करीत आहेत.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

      June 29, 2020


  • सह्याद्री वाहिनीचा वाढदिवस

    त्या काळात, दिल्ली केंद्र वेगवेगळ्या बातम्या आणि राजकीय/राष्ट्रीय पातळीवरचे कार्यक्रम यांचे प्रमुख स्थान मानले जायचे. पण मुंबई ही मनोरंजनाची खाण आहे. या बॉलीवुड नगरीची गैरहजेरी दूरदर्शनमध्ये होती, म्हणून मुंबई दूरदर्शन केंद्राचा शुभारंभ करण्यात आला आणि महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात, घराघरात, डीडी सह्याद्री हे नाव पोचले.

      October 2, 2021


  • सामाजिक शिष्टाचार- वेळेचे नियोजन व व्यवस्थापन

    प्रत्येकाने आपले काम ठरलेल्या वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे. ठरलेल्या वेळेत गुणवत्तापूर्ण काम होणे हे तर उत्पादकतेचं प्रमुख परिमाण आहे. आपापले काम वेळेवर पूर्ण करणे हे केवळ संस्थेच्या हिताचेच नव्हे तर आपले जीवन अर्थपूर्ण होण्यासाठी, वेळेचा सदुपयोग करून अनेक व्याप सांभाळण्यासाठी उपयुक्त आहे. गेलेला क्षण परत येत नाही म्हणून प्रत्येक क्षण सत्कारणी लावावा लागतो. त्यासाठी आवश्यक आहे ती कामांची क्रमवारी ठरवणे.

      October 14, 2018