(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • आजच्या तरुणांपुढील आदर्श व आव्हाने

    मला एक असा तरुण मिळवुन द्या की जो शरीराने तंदुरुस्त आहे, त्याच्या इच्छा व विकार त्याच्या ताब्यात आहेत. त्याचे मन आरशासारखे पारदर्शक व स्वच्छ आहे. तर मी जगात कोणताही चमत्कार करुन दाखवेन.” – थॉमस हक्सले खरं आहे, आजच्या जगाला विकसीत करणारा एकमेव सक्षम घटक म्हणून तरुणाईकडे पाहीले जाते. सामाजिक उत्थानाची जबाबदारी असलेल्या या तरुणांपुढे काय आदर्श व आव्हाने आहेत? हा प्रश्न एखाद्या वयस्कर माणसाला विचारला तर त्याचे उत्तर कदाचित असे असेल. आजच्या तरुणांना आदर्श बघवत नाहीत आणि आव्हाने पेलत नाहीत – खरीच अशी परिस्थिती आहे का? आजची तरुण पिढी ही उद्याची मार्गदर्शक पिढी असेल. त्यामुळे या तरुणांनी दूरदृष्टीने विचार करुन काही मुलभुत आव्हाने पेलणे आवश्यक आहेत.

      June 3, 2017


  • किचन क्लिनीक – पिकलेली पपई

    किचन क्लिनीक – पिकलेली पपई

    पिकलेली पपई हि चवीला गोड,थंड असून पित्तनाशक असते.

    आता पिकलेल्या पपईचे घरगुती उपचार पाहूयात:

    १)जेवणानंतर काही वेळाने पिकलेल्या पपईच्या १-२ फोडी खाल्ल्याने अन्न पचन सुलभ होते.

    २)बाळंतीण बाईला जेवणानंतर पपई खायला दिल्यास तिला भरपूर दुध येते.

    ३)ज्या स्त्रीयांना मासिक पाळीच्या वेळी स्त्राव कमी होतो त्यांनी पपई खावी व ओटी पोटाला एरंडेल तेलाने मालीश करावे.

    ४)पपईच्या बियांचे चुर्ण १-२ चमचे गरम पाण्यासह दीर्घ काळ सेवन केल्याने कृमिंचा प्रादुर्भाव कमी होतो.

    ५)प्रसुतीनंतर गर्भाशय संकुचित होऊन रक्तस्राव थांबावा म्हणून पपईच्या बियांचा रस काढुन प्यावा व ओटीपोटाला देखील हा रस + एरंडेल तेल हे मिश्रण चोळावे.

    पपई हि गरोदर स्त्रीने खाऊ नये कारण पपई मध्ये गर्भाशय संकोच करण्याचा गुण असल्याने त्यामुळे गर्भपात होऊ शकतो.

    तसेच पपईचे अतिसेवन केल्यास बायकांना मासिक पाळीच्या वेळेस अतिरक्तस्त्राव होऊ शकतो.

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

      December 21, 2016


  • धनगरवाडा

    धनगरवाडा या मराठी चित्रपटात महाराष्ट्रातील डंगे धनगर समाजाचे जगण्याचे वास्तव दर्शविण्यात आले आहे. कथालेखक विजयकुमार दळवी यांच्या ‘धनगरवाडा’ या गाजलेल्या कादंबरीवर हा चित्रपट आधारीत आहे.

    अडीचशेहून अधिक चित्रपटांचं छायांकन केलेले ख्यातनाम सिनेमॅटोग्राफर समीर आठल्ये यांनी धनगरवाडाच्या निमित्ताने दिग्दर्शन क्षेत्रात पहिलं पाऊल टाकले आहे.

    महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील चंदगड तालुक्यातील उंच डोंगरमाथ्यावर घनदाट जंगलात वसलेल्या एका धनगरपाड्यावर या चित्रपटाचं चित्रीकरण करण्यात आले. त्यामुळे चित्रपटाला लाभलेला एक वेगळाच नैसर्गिक ताजेपणा डोळ्यांना नक्कीच सुखावेल, असं समीर आठल्ये यांनी सांगितले. धनगरवाडाच्या माध्यमातून त्यांनी धनगर समाजाच्या समस्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.

    ज्येष्ठ अभिनेते स्व. सदाशिव अमरापूरकर यांनी ‘झिमू’ या जातपंचायतीच्या प्रमुखाची भूमिका चित्रपटात साकारली आहे. सदाशिव अमरापुरकर यांच्यासोबत वरद विजय चव्हाण, पल्लवी पाटील, मिलिंद गवळी, गणेश यादव, माधव अभ्यंकर, सुहासिनी देशपांडे, पूजा पवार, जयवंत वाडकर आणि गणेश आगलावे यांच्या प्रमुख भूमिका आहे.

    गीतकार बाबा चव्हाण यांची मधूर गीतरचना आणि पटकथा-संवाद अनिल सपकाळ यांनी लिहिले आहेत.

    अलका कुबल-आठल्ये, शिल्पा मसुरकर प्रस्तुत आणि विजयकुमार दळवी – प्रकाश मसुरकर निर्मित धनगरवाडा

      February 7, 2017


  • नोव्हेंबर ११ : रुसी मोदी आणि रॉय फ्रेड्रिक्स

    अखेरच्या पाच सामन्यांमधील त्यांचा धावांचा योग १००८ एवढा येतो. पाच सामन्यांमधून हजाराच्यावर धावांचा रुसींचा हा विक्रम चाळीस वर्षांहून अधिक काळ टिकला. वयाची उणीपुरी २० वर्षेही झालेली नसताना त्यांनी हा पराक्रम केला हे विशेषच ! समकालीन सलामीचे फलंदाज चेंडू अडवून काढण्यात आणि शक्य तितके चेंडू सोडून देण्यात धन्यता मानत असताना आणि मधल्या फळीतील फलंदाज डावाच्या संयमी बांधणीला महत्त्व देत असताना रॉय यांनी आक्रमक फलंदाजी करीत आपला वेगळेपणा सिद्ध केला.

      November 11, 2010


  • नकाशे

    आता सर्वसामान्य माणसाचा आर्थिकस्तर उंचावल्याने आणि नोकरदारांची अनेक कार्यालये कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देऊन प्रवास पर्यटनासाठी आर्थिक सवलती देत असल्याने लोकांचा विविध प्रकारच्या पर्यटनाकडे ओढा वाढलाय. गतिमान, यांत्रिक जीवनात आपली बॅटरी चार्ज होण्यासाठी लोकांनाही एक सुखद बदल म्हणून प्रवासाला जाण्याची आवश्यकता वाटते. त्यामुळे चार सहा दिवस वेगळ्या वातावरणातील पर्यटनाला जाण्यासाठी त्यांचा मनोदय असतो.

      May 18, 2023


  • रेझोनांस’ म्हणजे काय ….?

    “रेझोनांस” म्हणजे काय ....? आणि त्याची शक्ती काय आहे

    मित्रानो

    सोशल मिडीयावर एप्रील मे मध्ये एक मेसेज खुप व्हायरल झाला होता

    सर्वानी एक प्रार्थना करा किंवा आशी चर्चा करा यांदा खुप पाऊस पडनार आहे व त्या पद्धतीचे मेसेज फाँरवर्ड करा

    त्या मागचा वैदिक विचार एव्हढाच होता की पोझिटिव्ह एनर्जी तयार होऊन पावसासाठी पोझिटिव्ह वातावरण तयार होईल

    आणी तसेच होऊन आज चोहीकडे छान पाऊस पडतोय

    पूरातण वैदीक पद्धती या विज्ञानावरच आधारीत आसुन या मध्ये पोझिटिव्ह लहरी निर्मान होऊन मनुष्य जिवनाला त्याचा फायदाच होतो

    आपण जेव्हा एकट्याने प्रार्थना करत असतो, उपासना करत असतो तेव्हा त्या उपासनेला व्यष्टी अथवा व्यक्तिगत केलेली उपासना म्हणतात. ही उपासना नित्य म्हणजे प्रतिदिन [ अरबी फारसी शब्द “रोज” ] केली जाणारी प्रार्थना, नैमित्तिक म्हणजे विशिष्ट कार्यासाठी केली जाणारी उपासना हे यातले मुख्य दोन प्रकार आहेत. हेच दोन्ही प्रकार समष्टी म्हणजे सामुहिक प्रार्थनेला सुद्धा लागू होतात. पण सध्या हिंदू बांधव सामुहिक प्रार्थना करणे विसरले आहेत. आणि कधी केलीच तर ती आरतीच्या स्वरूपात. आणि तीही आरडा ओरडा करत, चुकीच्या पद्धतीने आणि चुकीचे शब्द म्हणत. हिंदू प्रार्थनेला एकत्र येत नाहीत ही अत्यंत वाईट आणि घातक गोष्ट आहे.

    सर्वप्रथम आपण रेझोनांस म्हणजे काय ते पाहू. रेझोनांस....अर्थात एका वस्तूचे, अणूचे किंवा कोणत्याही एका गोष्टीचे स्पंदन दुसऱ्या एखाद्या गोष्टीशी जुळणे याला रेझोनांस असे म्हणतात.

    १] मायक्रोवेव्ह च्या फ्रिक्वेन्सी बरोबर अन्नातील पाण्याची फ्रिक्वेन्सी जुळवली जाते आणि रेझोनांस उत्पन्न होऊन उष्णतेची निर्मिती होते आणि अन्न शिजते.

    २] रेझोनांसचे हेच तंत्र संगीतातही वापरले जाते. ज्या वेळेस दोन तारांच्या कंपन पावणाऱ्या Frequency किंवा वारंवारीता जुळते त्या वेळेस दुसरीही तार आपोआप कंप पावू लागते.

    ३] MRI अर्थात Magnetic Resonance Imaging या तंत्रज्ञानातही रेझोनांसचाच वापर केला जातो. पेशंटला ज्या Scanner खाली झोपवतात तो Scanner पृथ्वीच्या Magnetic Field ८००० पट जास्त शक्तीचे Magnetic Field उत्पन्न करतो. पेशंटच्या शरीरातील हायड्रोजनचे अणूतील Protons या MF बरोबर अलाईन होतात म्हणजे MF च्या प्रमाणे जुळवून घेतले जातात. नंतर जेव्हा Redio -Frequency त्यांच्यावर सोडली जाते त्यावेळेस हे Protons MF च्या उभ्या दिशेत फिरायला लागतात. आणि Protons ची ही सगळी माहिती Redio -Frequency च्या Coil कडे पाठवली जाते. ह्या Protons चे वेगवेगळ्या प्रकारच्या पेशीतील वर्तन हे वेगवेगळे असते. हे Protons पाण्यात मेद किंवा चरबीपेक्षा कमी वेगाने शांत होतात. ही माहिती साठवली जाते, ताडून पाहिली जाते आणि मग पेशंटला काय विकार असेल त्याचे निदान केले जाते.

    आता आपण धर्मातील रेसोनांस कडे वळू.

    जेव्हा भजन, प्रार्थना, उपासना यासाठी एका विशिष्ट देवाच्या मंदिरात, विशिष्ट गुरुंच्या दरबारात एका भावनेने जमलेले लोक प्रार्थना करतात तेव्हा तेथे जितके लोक असतील त्यांची शक्ती कमी न होता ती भूमिती श्रेणीने एकमेकांना मिळते. अर्थात ती १+१= २ अशी वाढत न जाता तेथे चार जण प्रार्थना करत असतील तर ४*४=१६ म्हणजे चार चोक सोळा पटीत वाढत जाते. याचा एकत्रित प्रार्थना करणारयांना इतक्या प्रचंड प्रमाणात लाभ होतो. याच तत्वाचा काही धर्मांमध्ये फार सुंदर उपयोग करून घेतला आहे. हिंदू धर्मातील आरतीमध्ये हेच अपेक्षित आहे. परंतु त्यात भक्तीपेक्षा गोंधळ आणि चुकीच्या आरत्या म्हणणे यामुळे फायदा होताना दिसून येत नाही. ओम सहनाववतु .....या प्रार्थनेत एकत्र येऊन कार्य करण्याविषयीच सांगितले गेले आहे. त्यात ऋषी म्हणतात की आपण एकत्र येऊन प्रार्थना करू, एकत्र भोजन करू, एकत्र कार्य करू आणि एका विद्वेषरहित समाजाची निर्मिती करून खूप मोठी कार्ये पार पाडू. पराक्रम करू. ही शिकवण आज आपण विसरलो आहोत. रस्त्यावरून जाता जाता एका हातानेच देवाला नमस्कार करून आपण आपले "कर्तव्य" पार पाडायला लागलो आहोत.

    मन:शक्तीच्या परमपूज्य श्री विज्ञानानंदांनी [ पूर्वाश्रमीचे श्री. भिडे ] रेझोनांसचे फार छान उदाहरण दिले आहे. एकदा अमेरिकेतील एका शहरात लष्कराचे संचलन चालू असते. आणि हे संचलन करता करता हे जवान एका लष्करी पुलावरून जावू लागतात. आणि हा शक्तिशाली पूल जो प्रचंड मोठ्या, अवजड लष्करी वाहनांनी आणि रणगाड्यांनीही पडला नाही तो या एका सुरात, एका तालात, एका ध्येयाने प्रेरित झालेल्या सैनिकांच्या संचलनाने पडला. यातही कारणीभूत आहे हा रेझोनांसच .......
    मला असे नेहमी वाटते की ज्ञानेश्वरांनी जेव्हा त्यांना कोणीच मडके दिले नाही तेव्हा स्वत:च्या पाठीवर मांडे भाजले होते तेव्हा हे रेझोनांसचे तत्व किंवा शरीरातील स्थिर विद्युत यापैकी कशाचा तरी वापर केलेला असावा. स्थिर विद्युत निर्माण होताना त्या विद्युत निर्माण करणारया वस्तुत उष्णता निर्माण न होता ती जी वस्तू जवळ आहेत त्यात होत असते. श्री ज्ञानेश्वर हे एक महान योगी होते. त्यांना हे अशक्य नक्कीच नव्हते. आपल्याला त्याचे कारण न कळल्याने तो चमत्कार वाटतो. तसेच ज्ञानेश्वरांचे स्वत:चे लग्न अर्थात विवाह झालेला नसूनही त्यांनी स्त्री, पुरुष, प्रणय, फुले, भुंगे अशा अनेक उपमा दिल्या आहेत. प्रेम प्रसंग आणि अशाच अनेक गोष्टींचे वर्णन केले आहे. फुलांच्या मनातले सांगितले आहे. ते त्यांना या सर्वांशी समस्पंद गती अर्थात रेझोनांस करता येत असल्यामुळेच होय. म्हणजेच ते इतर व्यक्ती आणि वस्तू यांच्याशी त्यांची स्वत:ची स्पंदगती जुळवू शकत होते.

    मित्रांनो अशी ही शक्ती आपण चांगल्या कामासाठी उपयोगात आणणार आहोत का? मित्रांनो आपण भीमरुपी, रामरक्षा, तुळशीदासांचे बजरंग बाण, हनुमान चालीसा,, सप्तशती मधील काही मंत्र, गायत्री मंत्र मृतसंजीवनी मंत्र अशा अति शक्तिशाली मंत्रांचे एकत्रित पठण केले तर फार मोठी शक्ती निर्माण करू शकतो. नुसत्या चुकीच्या आरत्या ओवाळण्यापेक्षा असे काही केले तर फार चांगले होईल. एक शक्ती संपन्न समाज निर्माण होईल.

    Always B ++

    जय हिन्द

      August 7, 2016


  • लोकप्रतिनिधींनो भ्रमातून बाहेर पडा!

    माणसाची खरी परीक्षा संकटाच्या काळात होत असते. त्याचा खरा कस तेव्हाच लागत असतो. खरे तर माणसाची खरी परीक्षा म्हणण्यापेक्षा त्याची खरी ओळख म्हणणे अधिक संयुत्ति*क ठरेल.

      May 6, 2007


  • स्व’चा द्वेष करणारे नियोजन

    स्वातंत्र्यप्राप्तीसाठी झालेल्या लढ्यात स्वदेशीचा विचार प्रेरक होता. पण तो विचार स्वातंत्र्याच्या लढ्यात जेवढा महत्त्वाचा मानला गेला तेवढाच तो स्वातंत्र्यानंतरच्या नियोजनात त्याज्य आणि तिरस्करणीय ठरवला गेला. त्याचा परिणाम आपल्या आर्थिक स्थितीवर तर झालाच पण आपल्या सांस्कृतिक जीवनावरही झाला.

      November 15, 2023


  • बाळक्रीडा अभंग क्र.३

    संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते.

      August 14, 2018


  • श्री शिवापराध क्षमापणस्तोत्रम् – ६

    दुग्धैर्मध्वाज्ययुक्तैर्दधिसितसहितैः स्नापितं नैव लिड्गं
    नो लिप्तं चन्दनाद्यैः कनकविरचितैः पूजितं न प्रसूनैः ।
    धूपैः कर्पूरदीपैर्विविधरसयुतैर्नैव भक्ष्योपहारैः क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो ॥६॥

    भगवान श्री शंकरांच्या पूजनाचा विषय निघाल्यानंतर या पूजेमध्ये अर्पण करण्याच्या पुढील पदार्थांची आचार्यश्री ना स्वाभाविक आठवण झाली. या उपचारांचा देखील मी कधी विनियोग केला नाही. अशी कबुली देत त्यासाठी क्षमा मागताना आचार्यश्री म्हणतात,
    दुग्धैर्मध्वाज्ययुक्तैर्दधिसितसहितैः - दूध,मध, आज्य म्हणजे तूप यांनी युक्त असलेल्या दही आणि साखर सह, अर्थात पंचामृताने,
    स्नापितं नैव लिड्गं - मी कधीही शिवलिंगाला स्नान घातले नाही.
    नो लिप्तं चन्दनाद्यैः- त्या भगवान शंकरांच्या प्रतीक शिवलिंगावर कधी चंदन इत्यादींचा लेप लावला नाही. कनकविरचितैः पूजितं न प्रसूनैः - कधी सोने इत्यादींनी सजविलेल्या फुलांनी, अर्थात फुले किंवा आभूषणांनी,
    धूपैः- ऊद इ. धूपांनी, कर्पूरदीपै - कापूर आरती इत्यादींनी कधी भगवंता तुझी पूजा केली नाही.
    र्विविधरसयुतैर्नैव भक्ष्योपहारैः - विविध रसांनी युक्त असणारे भक्ष इत्यादी नैवेद्य समर्पित केले नाही.
    नैवेद्यात मधुर, आम्ल,लवण,कटू, कशाय आणि तिक्त हे
    सहा रस असावेत आणि भक्ष्य म्हणजे खाता येणारे, लेह्य म्हणजे चाटता येणारे, पेय म्हणजे पिता येणारे आणि चोष्य म्हणजे चोखता येणारे अशा चार प्रकारचे अन्न असावे असे वर्णन आहे.
    क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो - हे श्री महादेव शंभो माझ्या या अपराधांना क्षमा करा.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

      July 25, 2020