वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
उन्हाळ्यात विशेषतः देशावर वा कोरड्या प्रदेशांत होणारा त्रास म्हणजे डिहायड्रेशन अर्थात शरीरातील पाणी कमी होणे हा होय. बाहेरील तापमानाप्रमाणे शरीराचे तापमान बदलणे आणि आपल्याला वातावरणाशी समायोजित ठेवणे याकडे आपल्या शरीराचा नैसर्गिक कल असतो.
December 28, 2017
ईस्टर संडे ख्रिस्ती बांधवांसाठी हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. ख्रिस्ती समाज हा सण साजरा करतात. पॅलेस्टाइनमध्ये रोमन व ज्यू लोकानी येशू ख्रिस्ताला क्रुसावर चढविले. त्यानंतर तिसऱ्या दिवशी रविवारी येशू परत जिवंत झाला. ह्या प्रसंगाचे स्मरण म्हणून वसंत ऋतूतील पहिल्या पौर्णिमेनंतर येणारा पहिला रविवार, हा ईस्टर संडे म्हणून हा सण साजरा केला जातो.
April 17, 2022
सर्वसाधारणपणे लसणीचा उपयोग भाजीला फोडणी देण्यासाठी, एखाद्या भाजीची ग्रेव्ही तयार करण्यासाठी, किंवा चटणी बनविण्यासाठी केला जातो. एखादी बेचव भाजी केवळ लसूण त्यामध्ये घातल्याने किती चविष्ट बनते ! पण केवळ खाद्यपदार्थांची चव वाढविण्याखेरीज ही लसूण अजून किती तरी प्रकारे उपयोगाला येते.
June 21, 2019
त्या परमात्म तत्त्वाच्या लोकविलक्षण स्वरूपाचे अधिक विस्तृत वर्णन करताना आचार्य श्री शब्द वापरतात,
October 30, 2020
तीन-चार वर्षांपूर्वीची गोष्ट नागपूरहून दिल्लीला येत होतो. सेकंड एसीच्या डब्यात साईडच्या दोन जागांपैकी एक जागा मिळाली. समोरच्या सीट वर एक दाक्षिणात्य माणूस होता. ओळख झाली. त्याचे नाव मेथ्यु होते.
January 1, 2015
विविध धान्यांवर जलरंगाने रंगविलेले विविध श्री.गणेश
September 29, 2015

September 30, 2015
सध्या तर फळभाज्यांसह विविध गोष्टींचे रस भल्या पहाटे पिण्याची चढाओढच अनेक स्त्री-पुरुषांमध्ये दिसते. जॉगिंग ट्रॅक्सवर तर भल्यासकाळी त्या रसठेल्यांसमोर रांगा लागतात. कुणी दुधीचा रस रोज पितो, तर कुणी कढीपत्त्याचा, कुणी गव्हाचा तृणरस तर कुणी कारल्याचा, कोरफड, काकडी, गाजराचा किंवा कुणी या सगळ्याचा मिक्स रस रोज नियमित, न चुकता सेवन करतात. एकवेळ व्यायाम राहिला तर चालेल; पण हे रस अनेकजण पितातच.
खरंच असे रस रोज पिणं हे आरोग्यवर्धक असतं?
नियमित फिरायला जाणारे आणि नियमित ज्यूस / रस घेणारे असे अनेकजण कधी विचार करतात की, याचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो? त्यासाठी कधी डॉक्टरांचा सल्ला घेतला आहे का? मी कोणता रस घेऊ? किती घेऊ? किती दिवस घेऊ? आणि घेऊ की नको? असं कुणी विचारतं का डॉक्टरांना? छे.छे.! असा सल्ला घेण्याची आपल्याला गरजच वाटत नाही, कारण सेल्फ मेडिकेशन करणा:यांची संख्या आपल्याकडे काही कमी नाही. पण निदान त्याबद्दल वाचन, नेटवरून काही माहिती तरी घेतो का? तर नाही. ते औषधी आहे ना? मग सर्वाना चालते, असाच एक समज. पण ते औषधी आहे म्हणूनच प्रश्न आहे, कारण औषध म्हटलं की त्याला डोस म्हणजे मात्र / प्रमाण आले. कालावधी आला आणि मुख्य म्हणजे तुम्हाला याची गरज आहे का हे तपासणं आलं.
मधुमेह नसणा:यानं मधुमेहाचं औषध घेतलं तर चालेल का?
जेव्हा पहाटे आपल्याला रस विकत मिळतात, तेव्हा ते कधी काढले आहेत याची माहिती घेणं आवश्यक आहे. तसंच त्यांची साठवण करताना, वाटप करताना स्वच्छतेची पुरेशी काळजी घेतली जात आहे का हे बघणंसुद्धा आवश्यक आहे. रस काढताना ती वनस्पती स्वच्छ धुवून, निवडून नंतर रस काढला जातो का? ते ही बघा. जर औषधांवर पेस्टिसाइडचे फवारे मारले जात असतील तर ते साध्या पाण्यानं धुवून निघत नाहीत. त्यांचे अंश रसातही येतात. म्हणून ही द्रव्यं कुठून आणली जातात त्याचीही माहिती घ्यावी. अनेक जण स्वत:च्या घरीच ज्यूस काढतात. आणि विचारतात, हे तर चालेल ना प्यालं तर? पण त्यांनीसुद्धा काळजी घेणं, सल्ला घेणं आवश्यकच आहे. आपण जे काही खाणार आहोत त्याची पूर्णत: शास्त्रीय माहिती घेणं आवश्यक आहे. साधे कपडे खरेदीला गेल्यावरही आपण किती चौकसपणो खरेदी करतो? आणि सेवीय पदार्थाबाबत मात्र फारच उदासीन असतो. म्हणूनच आधी सारासार विचार करा, तो महत्त्वाचा!
कुठल्याही प्रकारचे रस पिताना ऋतू, वय, प्रकृती, आजार, वनस्पतीचे गुणधर्म या सर्व गोष्टींचा विचार करणं आवश्यक आहे. आणि तुमच्या डॉक्टरांनी/वैद्यांनी सुचवलं असेल, सांगितलं असेल तर त्यांच्या सल्ल्यानुसारच हे रस घेणं योग्य. स्वत:च्या मनानं, आपल्याला वाटतं म्हणून किंवा सगळे पितात म्हणून हे रस पिऊ नका.
आयुव्रेदामध्ये रसचिकित्सा सांगितली आहे. याचे दोन अर्थ होतात.
1) रस - स्वरस, एखाद्या वनस्पतीचा अंगचा रस.
2) रस+षड्रस- चव जिभेलाच ‘रसना’ असे म्हणतात.
कारण यामुळे चवीचं ज्ञान होतं. या चवी सहा प्रकारच्या असतात. गोड, आंबट, खारट, तुरट, कडू आणि तिखट. या प्रत्येक चवीचे शरीरावर परिणाम होत असतात. या चवीसुद्धा ठरावीक प्रमाणात घेणं आवश्यक असतं. हे प्रमाण कमी-जास्त झाल्यास आजार होतात.
उदा. गोड चव ही फक्त मधुमेहींनाच वज्र्य नाही तर ज्यांचं वजन वाढते आहे, ज्यांना सर्दी-खोकल्यासारखे कफाचे आजार सतत होतात त्यांनीसुद्धा गोड जास्त खाऊ नये. याचप्रमाणो कडू चव जरी आवश्यक असली तरी त्याचं प्रमाण अत्यल्प असावं, अधिक प्रमाणात घेतल्यास शरीरात रुक्षता वाढते. सतत तहान लागणं, त्वचा कोरडी होणं, हे त्यातूनच घडतं. रोज कारल्याचा रस घेण्यानं त्या बाईंचं काय झालं, हे आता तुम्हालाही समजलं असेल! औषध ही दुधारी तलवार आहे. स्वत:च्या मनानं औषधं घेऊन स्वत:वर प्रयोग करणं, स्वत:ला ‘गिनिपिग’ बनवणं हे अत्यंत चुकीचं आहे. त्यातलाच एक प्रकार म्हणजे औषधींचा / वनस्पतींचा रस वापरून चिकित्सा करणं. यात ज्या वनस्पतींमध्ये भरपूर रस असतो, प्रामुख्यानं त्यांचा रस वापरला जातो. विविध स्वरूपात औषधं वापरली जातात. उदा. चूर्ण, काढा, गोळ्या यापैकी एक म्हणजे रस. ज्या वनस्पतींमध्ये दृवांश कमी असतो त्यात थोडं पाणी टाकून, कुटून हा रस काढला जातो. यास अग्निसंस्कार नसतो यामुळे रस टिकाऊ नसतात. 2-3 तासांपेक्षा अधिक टिकत ते टिकत नाहीत. ते फसफसतात. आंबट होतात. रक्ताभिसरण सुधारण्यासाठी, रक्तदाब कमी करण्यासाठी हृदयाला बल्य म्हणून दुधी भोपळा रस उपयोगी आहे. पण तुम्ही रोज घेत असाल तर त्यावर किटकनाशकं फवारणी किती प्रमाणात आहे याची माहिती घ्या. रक्तवाढीसाठी किंवा डोळ्यासाठी अनेक जण गाजर, बीट दुर्वाचा असे रस घेतात. गाजर रस स्वरूपात किंवा त्यासह स्निग्ध पदार्थ तेल, तूप इत्यादि असल्यासच शरीरात शोषला जातो. सलाड म्हणून गाजर कच्चं खाल्यास शरीरास काहीही मिळत नाही. त्याऐवजी तेलाची फोडणी असलेली कोशिंबीर किंवा गाजर हलवा खाणं योग्य. त्याचप्रमाणं गाजर रसही सतत घेत राहिल्यास शरीरातील केरॅटिन वाढते. त्वचा तांबूस होते. बीट रससुद्धा रोज घेऊ नये. मधूनमधून खंड करावा. गाजर-बीट एकत्र घेतल्यास 1/4 भाग बीट व 3/4 भाग गाजर रस असं प्रमाण ठेवावं. कोरफड रस नियमित घेणा:या व्यक्तीही आहेत. त्याचा ब्रँडेंड रसही आता बाजारात मिळतो. कोरफडीचं कार्य मुख्यत: यकृत, गर्भाशय यावर होतं. सतत कोरफड रस घेण्यानं मूळव्याध होण्याची शक्यता असते. तसेच गर्भिणी, पाळीच्या वेळी अति रक्तस्त्रव होणा:या स्त्रिया, यांनी हा कोरफड रस घेऊ नये.
-- संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ. वैद्य रजनी गोखले
October 1, 2016
“क्रमश:” या नव्या सदराद्वारे काही मराठी पुस्तके “मराठीसृष्टी”द्वारे वाचकांपर्यंत पोचवण्याच्या या प्रयत्नातील हे पहिले पुस्तक..... “गावाकडची अमेरिका”. आतापर्यंतच्या “मराठीसृष्टी”च्या अनेक उपक्रमांना प्रतिसाद आणि दाद देणार्या आमच्या वाचकांना हा प्रयत्न नक्कीच आवडेल...
“मराठीसृष्टी”च्या माध्यमातून “गावाकडची अमेरिका” हे एका अत्यंत वेगळ्या विषयावरील पुस्तक प्रकाशित करण्यात आले. या पुस्तकाचे इ-बुक सुद्धा प्रकाशित केले. हे पुस्तक आता वेबसाईटवर “क्रमश:” च्या माध्यमातून आपल्यासाठी आणत आहोत.
सर्वसाधारणपणे अमेरिकेत, किंवा एकूणच परदेशात जाऊन आलेली मंडळी तिकडच्या शहरांविषयीच बोलतात, लिहितात. प्रवासवर्णनेही शहरकेंद्रित असतात. कदाचित पर्यटक म्हणून गेल्यावर शहरातच फिरणे जास्त होत असेल किंवा गावांमध्ये काय बघायचे अशी भावना असेल. या पुस्तकाचं वेगळेपण इथेच आहे.
अमेरिकेत दहा वर्षाहून जास्त काळ ग्रामीण भागात वास्तव्य करणार्या डॉ.संजीव चौबळ यांनी तिथल्या ग्रामीण जीवनाचं सुंदरसं चित्र आपल्यासमोर उभं केलेलं आहे. आजकाल मुंबई-महाराष्ट्रात वास्तव्याला असणार्या बहुतांशी मराठी माणसांचाही मराठीत लिहिण्याचा (आणि बोलण्याचाही) सराव हद्दपार झालेला आहे. या पार्श्वभूमीवर डॉ.संजीव चौबळ यांचं आणखी एक वैशिष्ट्य जाणवलं ते म्हणजे इतका मोठा काळ अमेरिकेत घालवूनही त्यांची आपल्या मातृभाषेची नाळ तुटलेली नाही. पुस्तकाचं हस्तलिखित पाहिल्यावर प्रथमदर्शनीच त्याची साक्ष पटली. अत्यंत स्पष्ट आणि सुवाच्य अक्षर, खाडाखोड तर अजिबात नाही. भाषाही सुंदर आणि हवी तिथे अलंकारिकही.
या पुस्तकावर संपादकीय प्रक्रिया करताना काही बाबी ठरवून ठेवल्या होत्या. लेखक दशकभरापेक्षा जास्त काळ महाराष्ट्रात वास्तव्य करत नसतानाही त्याने केलेला प्रयत्न स्तुत्य आहेच. त्यामुळेच शुद्धलेखन किंवा व्याकरणाच्या चौकटीत संपूर्ण पुस्तक बसवताना या बाबींचा अतिरेकी आग्रह मुद्दामहून टाळला आहे. काही ठिकाणी बोली भाषा मुद्दामहून तशीच ठेवली आहे.
दोन-चार महिने परदेशातील मुलाबाळांकडे वास्तव्याला जाऊन आल्यावर मराठीत बोलताना फाडफाड इंग्रजी शब्दांची पेरणी करणार्या “फॉरेन रिटर्नड” पालकांकडे बघितलं तर अमेरिकेतील घरातही मराठीतच बोलणार्या चौबळांच्या कुटुंबाचंही कौतुक करावसं वाटतं. पुस्तकाच्या निर्मितीप्रक्रियेत संपूर्ण कुटुंबाचा सहभाग होता आणि म्हणूनच “गावाकडची अमेरिका” या पुस्तकाची निर्मिती एक वेगळा आनंद देऊन गेली.
आपल्या प्रत्येकामध्ये एक लेखक दडलेला असतो. त्याला सुप्तावस्थेतून जागं करुन लिखाणासाठी एखादं व्यासपीठ मिळवून द्यावं म्हणून “मराठीसृष्टी”ची निर्मिती झाली. “मराठीसृष्टी” या वेबपोर्टलवर वाचकांनी मनोमन प्रेम केलेलं आहे. दररोज हजारोंच्या संख्येने वाचक इथे येतात. या वाचकांतूनच लेखक बनतात.
प्रतिथयश प्रकाशकांचे दरवाजे या नव्या लेखकांसाठी बंदच असतात. यातूनच प्रकाशन व्यवसायात काही गैरप्रवृत्ती बळावल्या आणि लेखक त्या गैरप्रवृत्तींना बळी पडू लागले. स्वखर्चाने प्रकाशन करु इच्छिणार्या लेखकांनाही मार्गदर्शनाअभावी या गैरप्रवृत्तींना बळी पडावं लागलं. त्यामुळे “मराठीसृष्टी”ने प्रकाशन व्यवसायात पाय टाकताना संपूर्ण पारदर्शकतेचं धोरण स्विकारलंय आणि त्याचप्रमाणे आमची वाटचाल सुरु आहे.
इंटरनेटच्या माध्यमातून मराठीत लिहिणार्या आणि लिहू इच्छिणार्याही, नव्या दमाच्या आणि जुन्या ताकदीच्याही सर्व लेखकांना शुभेच्छा!
निनाद अरविंद प्रधान
व्यवस्थापकीय संचालक आणि संपादक
मराठीसृष्टी डॉट कॉम
May 28, 2015
भारताने फक्त १४ दिवसातच पाकिस्तानला आपली शस्त्रे खाली ठेवण्यास भाग पाडलं. भारताने या युद्धात निर्णायक विजय मिळवला. पाकिस्तानच्या वतीने लेफ्टनंट जनरल ए.के. नियाझी यांनी शरणगतिपत्रावर सही केली. भारताने लगेचच बांगलादेशच्या स्वातंत्र्याची घोषणा केली व जगाच्या नकाशावर बांगलादेश हा नवीन देश उदयास आला.
December 3, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti